Skip to main content

बॅचलरांच्या मेळ्यामध्ये

लेखक बिनडोक बनी यांनी बुधवार, 13/08/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
बॅचलरांच्या मेळ्यामध्ये आम्ही वैवाही भाबडे. तुम्हा रुचेल का हो हे माझे मोडके तंगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो बायको घरात आम्हा म्हणते फावडे. जन्म स्वैपाकात गेला, अमुचे भांड्यांशी वाकडे. जशी समजून चाले ती आम्हांसी बोकडे. जरा चालवूद्या हात, जुळवितो माझे शब्द. लव्हमॅरेज अमुची कथा अगदिच नाही निर्बुद्ध. - बिनडोक बनी प्रेरणास्थान : अंकुश चव्हाण यांचा ज्ञानियांचा मेळ
लेखनविषय:

वाचने 2574
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

फाडली ओवी शेवटी !!

In reply to by प्राजु

प्राजुताई, यु टू? जमलंय हो चांगलं.... बिपिन.

हा हा हा.. बने.... ओव्याचा निकाल लावलास हो :)

मस्त सर्किट (पुर्वीचा खरा डॉन)

हसवून सोडलेस हां... चालू दे चालू दे :)

वा वा! ये स्वागत आहे! छान आहे हो विडंबन! (स्वगत - 'केशवा' काय काय चमत्कार दाखवणार आहेस रे बाबा? ;) आता फक्त तात्यांनीच केलेले विडंबन वाचायचे बाकी आहे झालं! :O :B ) चतुरंग