गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 4:08 pm

मागिल भाग..
काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..!
पुढे चालू....
=======================

त्या रात्री.. मला झोप अशी नीट येतच नव्हती. मनात एकच विचार येत होता. माणूस.. हा, आधी सदाचारी असल्याचा दिसतो,आणि मग.. धर्म त्यामागून डोकावल्यासारखं का वाटतं? म्हणजे नम्रतेची नमस्कार हि कृती असली, तरी मनात येणारी तशी भावना, ही त्या कृतीच्याही पाठिमागे हात जोडून प्रथम उभी नसते का? आणि जर का नसेल..किंवा नसती तर हा "नमस्कार" -जन्माला तरी आला असता काय? (कारण गुरुजि स्वतः .., ज्या धर्माचारांना सदाचारानी आशिर्वाद दिलेला नसेल्,त्याची कायम कठोर उपेक्षा करत असत. हे आंम्ही पहात आलेलो होतो.) एका बाजूला हे विचार आणि दुसर्‍या बाजुला

"बुद्धी जो (धर्मविरोधी) कौल देते,तसं मला व्यवहारात (फक्त ऐहिकतेनी)वागता का येत नाही??? सारखा सगळीकडे धर्म का..लावावा-अगर मिसळावा-लागतो? फोटोवर गंध-रहावं,म्हणून आधी-लावलेल्या-गोपिचंदनासारखा!"

हा प्रश्न छळत होता. म्हणजे एखाद्याला मदत करताना.."हे माणासाच्या जातीचं माणूसकी म्हणून असलेलं कर्तव्य आहे.". अशी शुद्ध ऐहिक भावना मनात न येता, किंवा येत असली..तरी.., "असं वागणं..हे भगवंतानी आपल्यावर-टाकलेलं कार्य आहे." ह्या धर्मविचाराची अठवण का येते? आणि त्यानीच हा असला सद् आचार-संपन्न का होतो? ह्या विचारांनी छळायला सुरवात केली.

आणि अचानक-

"ह्या तुमच्या कायश्या म्हणतात त्या..वस्तुस्थितीचा जेंव्हा खडखडीतपणानी आणि जसाच्या तसा स्विकार होत नाय ना,तेंव्हा हे असले कल्पनांचे शेले अंगावर..(आणि बरोबरिला किंवा जोडिला) घ्यायला लागतात हो!"

हे सखाराम काकाचं एका प्रसंगातलं खणखणीत उत्तर अठवलं. आणि मी शांत झालो. माझ्या एका चुलत मामेभावचं आणि एका तथाकथित खालच्या जातीतल्या म्हणवल्या गेलेल्या मुलिचं प्रेमविवाह प्रकरण आमच्या याच सखाराम काकानी आणि गुरुजिंनी काहि वर्षांपूर्वी मार्गी लावलं होतं..तेंव्हाच्या प्रसंगातलं ते वाक्य.

गुरुजि:- अरे सख्या.. आता तू पण त्या संघटनेच्या नादानी म्हणतोस.., की जातीबिती सब झूठ म्हणून ! माला तर ते, असंही वाटतं.. ते सोड..., पण मग गावकर्‍यांनी आणि जातपंचायतीच्या लोकांनी (मिळून..) केलेल्या..या अंतर्जाती-लग्न विरोधाला हाणून पाडताना, त्याच (धार्मिक...) गावकर्‍यांना-"मला ह्यांचं लग्न लावायला..गावदेविनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय".. म्हणून का सांगितलस रे...??? पुरो-गामि माणसा!?.. म्हणजे चांगलं वागायला/आणायला धर्म लागतोच बर्‍याचदा..!, हे माझं मतच खरं झालं कि नाही??? ...क्का.........य?

सखाराम काका:- छ्या... तू आपला, ह्या शाळेतला 'कागद' त्या शाळेत वापरल्या सारखं बोलतोस हो! अरे..आधी "जातीतच लग्ने करून मरा...!" हा आपला मूळ धर्म ना? आणि अजुनही तो बर्‍याचश्या माणसांच्या डोक्यात..त्यात ह्या असल्या भांडणांना गावदेविच्या उत्सवाच्या राजकारणाचे रंग भरवले त्यांनी .. मग म्हटलं .., की जरा त्यांचच औषध त्यांच्या वर उलट वापरावं...कसं??? लोहा लोहे को काटता है...ना? मग घेतली जरा त्या देवीला-अंगात! ...मग???? .. बसले कि नै एकूण एक हलकट गप्प? मेल्या ..देवी काय ह्यांच्या एकट्याच्याच बापाची इश्टेट आहे कि काय..त्यांच्याच अंगात-यायला!? तेंव्हा तुमच्या धर्माचा खराटा मी पण हाती-घेतला..अगदी निर्विवाद घेतला..पण घाण-काढायला घेतला,घाणिला आधार द्यायला नव्हे...! काय समजलांस?

गुरुजि:- तुझ्या पुढे मी काय बोलणार? साक्षात आमचं ब्रम्ह देखिल तुला अंकित आहे!

काका:- हे बघ चिडू नकोस.आणि नाराज तर मुळीच होऊ नकोस. तुला तुझी पोश्टं आडवी येते पुढारलेपणानी वागायला..तशी मी तिच पोश्टं उभी करून वापरतो...मागासलेपण दूर करायला..! त्यात तुझ्या सारखा माणूस सावली म्हणून बरोबर असला ..,की जरा अज्जुन बरं! काय समजलास? .. नाय तं..होमात लाह्या-सोडणं आंम्हास काहि अवघड नव्हे अगदी! (ह्या ह्या ह्या ..)

गुरुजि:- ......... धन्य तू __/\__ आणि तुझि ती एकंजाती संघटना..! पण काय य्रे? तिथे..-ही असली झ्येंगटं शिकवतात कि काय तुम्हाला?

काका:- म.......ग? अरे धर्मश्रद्धेच्या खड्डयातून हे समाजाचं गाडं नुस्तच काढायचं नाही..तर -पुढे पण न्यायचं... म्हटल्यावर त्याला प्ल्यान ग्येमा लागतात.. पाठिशी सगळ्या टैपचं बळं-उभं लागतं.. नुसता मेंदू नाही..मन आणि मनगट पण तयार लागतं.. नायतर हे धर्मसुधारणेचे धंदे काय सोपे आहेत होय? ह्या सनातनी माकडांना नुसत्या पत्र्याच्या डब्यांच्या घंटा झाडांवर टांगवून पळवून लावता येत नाही.. इतरंही सगळी तयारी लागते. बजरंगंही लागतो,आणि बलीहि लागतो..(ह्या ह्या ह्या ह्या ह्या... ) काय समजलास..?

गुरुजि:- हम्म्म.. पण हे करताना तुला,या ना त्या मार्गानी.. धर्म वापरावा लागणारच.. हे माझं मत कै सुटत नै... ह्याची तोड काय?

काका:- अरे........जोपरेंत ..ह्या तुमच्या कायश्या म्हणतात त्या..(सामाजिक)वस्तुस्थितीचा खडखडीतपणानी आणि जसाच्या तसा स्विकार(समाजाकडून..) होत नाय ना,तोपरेंत हे असले कल्पनांचे शेले अंगावर घ्यायला लागणारच हो!...आंम्हालाही...आणि त्यांनाही!!! (ह्या ह्या ह्या ह्या ह्या... ) काय समजलास..? चल....सुपारी काढ पानाला!

................

अनुष्ठानाचे पहिले सहा दिवस, दररोज त्या पहिल्या दिवसाच्याच क्रमाने अगदी व्यवस्थित पार पडले. आमची ध्यान-धारणाही अटोक्यात आली. आणि मग उजाडला तो फायनल म्याच'चा दिवस.. अगदी स्पेशल डे .. एकतर दर्शनाला आणि प्रसादाला झाडून अख्खि पंचक्रोशी आमच्या पाठशाळेत येत असे. त्यामुळे गर्दीचा महापूर जसा असायचा,तसा शेवटच्या दिवशी काहि ज्ञानी विद्यावंत आणि गुरुजिंचे मित्र असलेले असे पुण्या मुंबै कडले वैदिकंही आपणहून यायचे... त्यामुळे हल्लीच्या भाषेत म्हणतात..तो स्यालिब्रेटी टच-लाभायचा! आंम्ही सर्वच विद्यार्थी सकाळी ७ ला यज्ञमंडपात आहुती-वर जायचो. कारण मुख्यत्वे असणारं हवन..हे १० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असायचं. नंतर पुढे बलिपूजा आणि भलीमोठी पूर्णाहुती(लांबलचक मंत्रपठण चालणारी!) त्यानंतर देवतांचे उत्तरपूजन..महानैवेद्य आणि आरती.. एव्हढ सगळं अवरेपर्यंत १ वाजायचा. त्यामुळे सकाळ पासून अगदी शिस्तबद्ध खेळ चालायचा. आणि एकदा का दहा वाजता मुख्य हवन संपलं ..की मग मी आणि सुर्‍या सकाळी ८ वाजल्या पासून कलाकुसर करुन केलेला बळिचा-भाताचा मुखवटा घेऊन यायचो. सगळी गर्दी आमच्या दोघांकडे पाटावर करुन आणलेला तो शंकासुर आणि वासुदेवाच्या चेहेर्‍याचे मिश्रण असलेला मुखवटा पहाण्यात दं.................ग व्हायची. मग रितसर बलिपूजा वगैरे झाली..तो आमचा गुरुजिंचा हुश्शार गडी.. बळी-काढून लांब घेऊन गेला...की, मग सगळी गर्दी यज्ञकुंडाभोवती जमायची..आणि मग सदाशिव दादानी मोठ्ठ्यांदी "सर्व कर्मप्रपूर्णीं भद्रद्रव्यदां पूर्णाहुतिं आज्येन होष्ये...अग्ने त्वं इड नामासि" असा संकल्प म्हणून कुंडाच्या कोपर्‍यावर अक्षता वाहिल्या कि त्या रॉकेटलाँचर सारख्या मोठ्ठ्या लांबलचक पळीतून होमात तूपाची संतत धार सोडायला सुरवात व्हायची... हीच ती पूर्णाहुती!

मग बराच वेळ वेदातली निरनिराळी सूक्त सर्व जण अतीशय तन्मयतेनी म्हणायचे. गुरुजिंचे आलेले वैदिक मित्र देखिल विद्यार्थ्यांच्या बरोबरीनी-राहुन वेगवेगळ्या शाखांचे मंत्र ठणकावित असायचे. मग एकदा का ती पूर्णाहुती झाली ..की मी ,सुर्‍या आणि किश्या भोजनमंडपाकडे ..त्या व्यवस्थेला.. पळायचो. इकडे महानैवेद्य आणि आरती होइपर्यंत तिकडे आमची पन्नास पानांच्या हिशोबातल्या चार पंगतींची - रांगोळ्या काढून जय्यत तयारि झालेली असायची! नाहि म्हणायला भोजन व्यवस्थेतलं काम करण्यात आणखिही एक मज्जा होतिच..! ती म्हणजे अनुष्ठानाला येणार्‍या लोकांमधली.., बरीचशी हौशी-गर्दी ( :D ) तिथे त्या दिवशी मदतीला येत असे. त्यामुळे किश्या (नेहमी सारख.. ;) ) आलवेज आणि मी व सुर्‍या बर्‍यापैकी फॉर्मात-असायचो. किश्याचं शेजारच्या एका गावातल्या एका हरणिशी अगदी छाsssssssssssन सूतंही जमलवतं..(पुढे दोघं विवाहितंही झालेच! )त्याचा उगम , ह्या अनुष्ठानातल्या शेवटच्या दिवशीच्या भोजन-वाढप नियोजन कमिटीमधे झालेल्या ओळखित होता..हे आंम्हाला 'ठाऊक' होतं. ( ;) ) एकदा सुर्‍यानी त्यांना विहिरिच्या मागे असलेल्या सुर्वेकाकांच्या वाळूच्या ट्रॉलिजवळ गुलुगुलु..गुलुगुलु करताना पकड्लन... ति गोरि घारी सरळ नाक असलेली अत्यंत देखणी - सुश्रुषा नेने.. ह्यानी त्यांना बघता क्षणीच (लाजुन आणि भिऊन..) पळून गेली. (सुर्‍या तिला पांढरं- बदक म्हणायचा! ) आणि मग नंतर सुमारे महिनाभर गुरुजिंना बातमी न लागू देण्याच्या बोलिवर किश्या सुर्‍याची धोत्रं धुवत होता! ( =)) )

तरं... एकंदर अनेक अर्थानी उत्साहपूर्ण असलेला हा लाश्टं डे .., महाप्रसादाची सगळी गर्दी ओसरून दुपारी ४ ला संपायचा.. मग पुन्हा सगळे जणं ६ पर्यंत जिकडे जागा मिळेल तिकडे "विश्रांती मोड" मधे जायचे. आणि मग संध्याकाळी हळूहळू.. पाट/भांडी परतीला-लावणे.. दुपारच्या उरलेल्या अन्नाचा गोशाळेत विनियोग करणे. (कारण गुरुजिंच्या नियमाप्रमाणे सांगते'च्या दिवशी रात्री सगळ्यांना कंपलसरी उपास!) यज्ञशाळा स्वच्छ करणे. अश्या निरनिराळ्या इतर कामात सगळ्यांचा वेळ जायचा.. आणि गुरुजिंचे बाहेर गावहुन आलेले वैदिक मित्र.. रात्री ८ची शेवट्ची रातराणी (येश्टी..) धरायला
स्टँडच्या दिशेनी जायला लागायचे. सदाशिवदादा हतात सायकल घेऊन्,त्यावर यांच्या पिशव्या लाऊन त्यांना सोडवायला जायचा. आणि काकू व गुरुजि आंम्हा मुलांसह शांतपणे त्या आंगणात विसावल्या सारखे बसायचे.. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर एकच भाव.. "हुश्श्श्श्श्श्श्श.......... झालं बाबा एकदाचं नीट..सर्व..पूर्ण! "

ह्या भावनेत काहि काळ स्तब्ध गेला..कि मग गुरुजि..हेमंतादादा..काकू..तो नोकर..आणि जरा वेळानी परत आलेला सदाशिवदादा..ह्या सगळ्यांची मिळून एक सुपरमिटिंग व्हायची.. हिशोबाची! मग, सदाशिवदादा वहि घेऊन बसलेला..काकू कडेनी पायाला तेल लावता लावता.."ह्या वेळेला तेलात भारीच पैसे गेले हो..तरी मी म्हणत होते..तळणिचं रोज-नको म्हणून!" असल्या प्रकारची तक्रार करत असलेली..आणि गुरुजि तिला काहिबाही सांगून शांत करित असलेले..त्यावर मग नोकरानी काकूला अनुमोदन दिलेलं,गुरुजि त्याच्यावर उखडलेले.. " असलं एक दृष्य पूर्ण व्हायचं.. आणि आंम्ही मुलं त्याच आंगण्यात मिळेल त्या चटई चादरीवर निद्रेची आराधना करायला लागायचो. पण माझी आणि सुर्‍याची मात्र अनेकदा बोंब उडायची. कारण आंम्ही दोघं मूळचे खादाड..आणि त्यात त्या दिवशी त्या वाढण्याच्या..गर्दीतल्या नादामुळे.. स्वतः उडत उडत काहिबाही खाऊन न जेवलेले...! म्हणजे जवळ जवळ उपाशीच. मग आमच्या दोघांच्या लोळण्याचा मूला"र्थ काकूला (लांबुनच..) कळायचा. आणि मग त्या मिटिंगमधून उठून आत जाऊन पुन्हा ती एका भांड्यात चिवडा आणि ठेवलेल्यातले (अनुष्ठानातलेच) लाडू ..असं आणून द्यायची.. आणि आंम्ही गुरुजिंकडे घाबरून पहायला लागलो.. की काकू आंम्हाला.. "काहि नकोयत हो नाटकं करायला..तुमच्या गुरुजिंनाही माहितीये..गेल्या वर्षी शेवटच्या दिवशी उपाशी झोपलेले कोणते दोन अजगर मध्यरात्री स्वयंपाक खोलिकडे गेलेवते ते!" अशी आमची जाहिर धिंड काढून आंम्हाला ते खायला लावायची. गुरुजि ,तो नोकर्,आणि बाकि सगळे (दुष्ट किश्या सह! :-/ ) आमच्या या अवस्थेवर मनमुराद हसायचे. आणि आंम्ही (खाऊनंही..) हिरमुसले झालो. की नेमाप्रमाणे आमच्याकडे गुरुजि यायचे आणि आंम्हाला " अरे कार्ट्यांनो.. ती काय फक्त सदाशिव दादाचीच आई आहे होय रे!? " असं आंम्हाला प्रेमानी समजवायचे.. मग आमच्या डोळ्याला..अजुन पाण्याच्या धारा लागायच्या .. आणि मग खाल्ल्या पोटानी, आंम्ही तसेच चटया घेऊन.. काकूच्या मांडीची उशी करून झोपायचो. मग जरा वेळानी काकूचा आंम्हाला.. मांडीवरून डोकि उशिला ठेवता ठेवताचा, एक शेवटचा संवाद कानावर यायचा.. " दुष्ट आहेत ही कार्टी मेली..आता अजुन तिनेक वर्ष मला असच छळतील..रडवतील आणि जातील उडून आपापल्या गावाला..! "

धार्मिक अर्थानी त्या दिवशी अनुष्ठान संपायचं खरं.. पण आमच्या पोटात या मायेचा एक अखंड यज्ञ कायमचा पेटवून ते जायचं..! यातल्या प्रेम आणि वात्सल्याच्या या आहुतीला.. सांगता कधिच नसते.असूही शकत नाही. कारण ज्या दिवशी ह्याची सांगता होइल..त्या दिवशी लौकिक अर्थानी हे जग संपलेलं असेल.!

=============================
क्रमशः...........
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 4:25 pm | प्रचेतस

मस्त.
हा भाग बराचसा अंतर्मुख करणारा वाटला.
पुभाप्र

राजाभाउ's picture

5 Feb 2015 - 4:43 pm | राजाभाउ

असेच म्हणतो.

आदूबाळ's picture

5 Feb 2015 - 4:32 pm | आदूबाळ

या ब्बात. वाटच पहात होतो.

लेख आवडला. शेवटी जरा घशात अडकल्यासारखे झाले.

सूड's picture

5 Feb 2015 - 7:33 pm | सूड

पुभाप्र्.....र्‍हस्वदीर्घाच्या चुका सुधारता आल्या तर बघा. चमचमीत नारळीभात खाताना दाताखाली खडा आल्यासारखं वाटतंय त्यामुळे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2015 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद.
नेक्ष्ट टैम नक्की! :HAPPY:

निमिष ध.'s picture

5 Feb 2015 - 8:03 pm | निमिष ध.

मागच्या भागात सुरू झालेली आत्मचिंतनाची तगमग उत्तम उदाहरण देऊन व्यक्त केलीत. तुमच्या काकाचे बोल आवडले. पुलेशु :)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2015 - 3:31 pm | अत्रुप्त आत्मा

@आत्मचिंतनाची तगमग उत्तम उदाहरण देऊन व्यक्त केलीत >> .__/\__

मुक्त विहारि's picture

5 Feb 2015 - 8:10 pm | मुक्त विहारि

उत्तम मालिका...

अजया's picture

5 Feb 2015 - 9:02 pm | अजया

भाग आवडलाच.पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2015 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भाग खास आवडला.

दर भागातली शेवटचे भाष्य करणारी वाक्ये विशेष आहेत...

अरे........जोपरेंत ..ह्या तुमच्या कायश्या म्हणतात त्या..(सामाजिक)वस्तुस्थितीचा खडखडीतपणानी आणि जसाच्या तसा स्विकार(समाजाकडून..) होत नाय ना,तोपरेंत हे असले कल्पनांचे शेले अंगावर घ्यायला लागणारच हो!...आंम्हालाही...आणि त्यांनाही!!!

धार्मिक अर्थानी त्या दिवशी अनुष्ठान संपायचं खरं.. पण आमच्या पोटात या मायेचा एक अखंड यज्ञ कायमचा पेटवून ते जायचं..! यातल्या प्रेम आणि वात्सल्याच्या या आहुतीला.. सांगता कधिच नसते.असूही शकत नाही. कारण ज्या दिवशी ह्याची सांगता होइल..त्या दिवशी लौकिक अर्थानी हे जग संपलेलं असेल.!

स्पा's picture

5 Feb 2015 - 10:13 pm | स्पा

सुरेखच

टवाळ कार्टा's picture

5 Feb 2015 - 11:10 pm | टवाळ कार्टा

_/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2015 - 10:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

घाण-काढायला घेतला,घाणिला आधार द्यायला नव्हे

हे खुप आवडलं. _/\_

पुस्तकं छापाचं एक.

अत्रन्गि पाउस's picture

20 Mar 2017 - 4:45 pm | अत्रन्गि पाउस

सगळे ...

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2017 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा

वाचा..वाचा.. धन्यवाद. :)