कोण जिंकणार दिल्ली?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
29 Jan 2015 - 8:43 pm
गाभा: 

अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.

प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.

दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.

परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.

बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.

सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया

सर्व वाचत आहे.. बरेच बोलायचे मनात होते.. पण आता इतका वेळ निघुन गेला आहे , त्यामुळे फक्त वाचतो आहे. नविन धागा काढला तरी तेच तेच बोलण्यात अर्थ नाही.

केजरीवाल मात्र जिंकले पाहिजेत..
दिल्लीची निवडनुक मुद्द्यांवर आणण्याचे काम आणि आमदार म्हणजे पण एक सेवक असतो हा प्रकाश पाडण्यात ते यशस्वी झाले आहेत.

बाकी इतर बोलले आहेतच

आम आदमी पार्टी ..वयक्तीक रित्या आप ला माझी सहानभुती आहे.. राजकारणात लायक उमेदवार आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढा देण्यात केजरीवाल योग्य ठरले आहेत. भाजप .. कॉन्ग्रेस .. राजकारणात नवख्या असणार्‍या आप ला कोंडित पकडत आहेतच.. तरीही त्यांना योग्य उत्तर निवडनुकीत मिळेल असेच सध्या आप वागते आहे असे वाटते.

गेल्या निवडनुकीच्या वेळेस केजरीवाल नी टोपी फिरवली आणि कॉन्ग्रेस बरोबर हात मिळवणि केली हे बोलणे सोप्पे आहे.
परंतु आपल्याला ३२ जागा मिळणुही आपण युद्धात जिंकुनही हार मानली आहे हे भाजपने ही लक्षात ठेवले पाहिजे होते.
भाजप आणि कॉन्ग्रेस दोघांनीही.. केजरीवल्ने कोणाअचा पाठिंबा घेणाअर नाही आणि देणार नाही म्हणुन बोलल्याने पहिल्यांना अनकंडिशनल पाठिंबा आप ला जाहिर केला होता. आप ने पाठिंबा घेवा असा लोकांचा कल दिसताच ह्यांनी काही कंडिशन वर पाठिंबा जाहिर केला. आणि आपला राजिनामा द्यावा लागला तो कॉन्ग्रेस ने ज्या १८ मुद्द्यांवर पाठिंबा दिला होता त्यातील जनलोकपाल या महत्वाच्या बिलाला विरोध केला म्हणुन. ती चुक आप ने मान्य केली.

आपने पुन्हा निवडनुका लादल्या.. जनतेला खर्चात पाडले ही सगळी शो बाजी वाटते,, निवडनुकीत एकट्या मोदिईंच्या एका सभेसाठी करोडो रुपये खर्च आले आहेत हे न्युज ला सांगितले जात होते.

दिल्लीतील निवडनुका नकारात्मक जाहिरातींपेक्षा मुद्द्यांवर लढवल्या जाव्यात हे आपचे म्हणने मला एकदम बरोबर वाटले..

आज पर्यंत केजरीवाल ला राजकारण जमनार नाही त्यांनी आंदोलन करावे म्हणणार्या भाजप्ने बेदिंना मुख्यमंत्री उमेदवार घोषीत केले.. मग त्यांना होता का राजकारणाचा अनुभव ? पोलीस यंत्रणेत होत्या तर केजरीवाल पण उपायुक्त का असेना पण प्रशासकिय सेवेतच होते..
मुद्दा हा नाही की कोणी राजकारणात यावे.. मुद्दा हा आहे की आपल्या विचारांवर प्रामाणिक पणे ठाम राहणे राजकारणात आता हवे आहे आणि त्याची सुरुवात अरविंद केजरीवाल यांनी केली. लोक भगोडा म्हणु द्यात.. पण आपल्या विचारांशी प्रतारणा करण्यापेक्षा आणि असला पाठिंबा घेवुन कायम हाजी हाजी करण्यापेक्षा राजीनामा देणे कधीही योग्य होते असे माझे वयक्तीक मत आहे. आणिक तसेही लोकसभे नंतर कॉंग्रेस पाठिंबा काढुन घेणारच होती. हे भाजप कॉन्ग्रेसचे राजकारणच होते.. आणि हेच राजकारण केजरीवाल यांना खेळता येत नाही.. अनुभव नाही असे बोलले जाते या पक्षांकडुन.

भाजप आणि कॉन्ग्रेस यांचे निवडनुक मुद्दे हे आपकडुन घेतलेले मुद्देच वाटतात मला , जरी चुकुन आप बहुमतात आली नाही आणि भले भाजप सत्तेत आली तरी जनतेचे जे काम होयील ते अप्रत्यक्ष आपच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांप्रमाणेच होईल असे वाटते, आणि युद्धात हारु नाहितर जिंकु ज्या मुद्द्यांवर निवडनुक लढली गेली ते जर प्रत्यक्षात येणार असतील तर आपचाच तो विजय असेन.
तरीही भाजप, वीज आणि गॅस या गोष्टीत खुप काही करु शकेन असे वाटत नाही कारण या गोष्टी भाजपच्या औद्योगीक धोरणात येत असल्याने फायदा उद्योगधंद्यावाल्यांचाच पाहिला जाईन असे मला वाटते.

मागील निवडनुकीत विनोद बिन्नी मंत्री न केल्याने आप विरुद्ध बोलत होता.. आता त्याचा बोलावता धनी कोण होता हे जनतेला कळालेच असेन.. भाजप ला स्वताच्या पक्षाचे उमेदवार नाहित काय काही ठिकाणी हेच कळत नाही.

देल्ही चे पोलीस पण मंत्र्यांच्या खिशातले भावले बनलेले आहेत, आणि प्रत्येकजन नेत्याच्या ओळखीनेच तेथे चिकटला आहे असे वाटते. देल्हीला राज्याचा दर्जा आणि पोलिस राज्याच्या अंडर असणे ही केजरीवाल यांची आनखिन एक बरोबर मागणी आहे. छोट्या छोट्या राज्यनिर्मितीला भाजप नेहमी पाठिंबा देते मग येथेच काय त्यांना प्रोब्लेम आहे माहीत नाही.

आप बद्दल महाराष्ट्रात खुप नकारात्मकता आहे.. कदाचीत मेडिया ही ह्यास जबाबदार आहे..केजरीवाल निवडनुकीपर्यंत काही तरी चांगले कोठे करतो आहे हे कोठेच कधी दाखवले जात नाही.. एखादी चुक किंवा पक्षातील कोणी काही तरीए वेगळॅ बोलले की लगेच न्युज तयार.. अश्या प्रकारे मेडियाने वागु नये असे वाटते.. उलट आप च्या प्रभावाने मोठ्या पक्षांना ही राजकारण पुन्हा निट सुरु करावे लागत आहे ही सद्द्य स्थीती आहे. महाराष्ट्रात आप सारखी पार्टी नसल्याने नकारात्मक आणि खळ्ळ खट्ट्याक पद्धतीनेच निवडनुक आणि राजकारण झाले. मुद्द्यांवर तेआले नाहीच निटसे.. आणि आले तेंव्हा भविष्य घड्याळावर ठेवुन लोक आणखिन राजकारण करत बसली.. आपण कोणाचे बरोबर कोण चुक करत बसलो आणि राजकारणात संधीसाधु पणाचाच पुन्हा विजय झाला.. निदान संधीसाधु पणा तरी आप कडे नाही असे वाटते, जे आहे ते हे आहे, पाहिजे तर स्विकारा नाहीतर नको .. उगाच आज एक उद्या एक असे तर नाही.
किरण बेदी यांच्याबद्दल आदर होता, पण त्यांच्या बोलण्याचा ..मुलाखतींचा सूर आता वेगळाच भासतो आहे.

खेडूत's picture

2 Feb 2015 - 7:31 pm | खेडूत

ऐकावं ते नवलच!
आता चार तारखेला या महाराजांचं भवितव्य ठरणार!

http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-elections-2015-can-outsid...

त्यांच्या विरोधात निकाल लागला तर फायदा काँग्रेसला होईल असं दिसतंय .

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2015 - 8:00 pm | श्रीगुरुजी

>>> त्यांच्या विरोधात निकाल लागला तर फायदा काँग्रेसला होईल असं दिसतंय .

इतक्या फुसक्या कारणावरून उमेदवारी रद्द होणे शक्य नाही. आपल्यावरील नोंदलेले गुन्हे, आपली एकूण संपत्ती इ. ची खरी माहिती न देणार्‍या उमेदवारांची उमेदवारी रद्द न होता ते निवडूनही येतात. त्यामुळे मतदारयादीत नाव नाही किंवा पत्ता चुकलेला आहे अशा किरकोळ कारणावरून उमेदवारी रद्द होणार नाही.

क्लिंटन's picture

2 Feb 2015 - 9:56 pm | क्लिंटन

इतक्या फुसक्या कारणावरून उमेदवारी रद्द होणे शक्य नाही.

वरकरणी असे वाटत आहे. पण तरीही...

इंदिरा गांधींची लोकसभेवर निवडणुक अशाच फुसक्या कारणांवरून हायकोर्टाने रद्द केली होती. ती कारणे होती:

१. त्यांनी ज्या स्टेजवरून निवडणुक प्रचार सभेत भाषण केले त्या स्टेजची उंची नियमांमध्ये दिली आहे त्यापेक्षा जास्त होती.
२. ते स्टेज उत्तर प्रदेशातील पब्लिक वर्क्स डिपार्टमेन्ट कडून करून घेतले होते.
३. त्या स्टेजसाठीची आणि सभेसाठीची वीज उत्तर प्रदेश वीजमंडळाकडून घेण्यात आली होती.
४. त्यांच्यासाठी प्रचार करणार्‍यांमध्ये असलेल्या यशपाल कपूर हा गृहस्थ सरकारी नोकरीत होता.त्याने सरकारी नोकरीचा राजीनामाही दिला होता पण त्याचा राजीनामा विधीवत मंजूर केला जायच्या आधीच त्याने प्रचाराला सुरवात केली.

इंदिरा गांधींवरील इतर महत्वाचे आरोप-- मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न करणे वगैरे कोर्टाने नाकारले पण वरकरणी फुसक्या वाटणार्‍या आरोपांवरून त्यांना दोषी ठरविले होते.इंदिरा गांधींची निवडणुक रद्द करायच्या या प्रकाराला लंडनमधील 'द टाईम्स' या वर्तमानपत्राने Firing the Prime Minister for a traffic ticket असे म्ह्टले होते.

अनेकदा अशा वरकरणी लहान वाटणार्‍या गोष्टी सर्वात जास्त डोकेदुखी निर्माण करतात.

असे होऊ शकेल का? शक्यता कमी आहे हे मान्य.तरीही ती शक्यता शून्य आहे का?

अवांतरः अरविंद केजरीवालांना हे राजकारणाचे गेम समजून घेणे गरजेचे आहे असे दिसते. २०१२ मध्ये मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. १९९३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने हरियाणाच्या दोन माजी मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेवर एखाद्या राज्यातून निवडून जाण्यासाठी सुध्दा त्या राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवले असणे गरजेचे असते.या अटीतून कशी पळवाट काढली जाते ते अगदीच जगजाहीर आहे. मनमोहन सिंग आसामातून, अरूण जेटली गुजरातमधून, व्यंकय्या नायडू मध्य प्रदेशातून, गुलाम नबी आझाद महाराष्ट्रातून निवडून गेले. इतकेच नव्हे तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संरक्षणमंत्रीपदाची शपथ घेतली आणि लगेचच उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरला. म्हणजे या सगळ्या नेत्यांनी त्यांचे नाव त्या राज्यातील एखाद्या मतदारसंघात मॅनेज केले होते हे नक्कीच.ते अरविंद केजरीवालांनी केले नसेल आणि त्या कारणासाठी त्यांची उमेदवारी रद्द झाली तर मात्र ती एक दुर्दैवी गोष्ट असेल. हे माझ्यासारखा आआपचा कट्टर विरोधक लिहित आहे हे विशेष. कायदा ही गोष्ट बघू शकणार नाही.तरीही टू बी फेअर टू हिम, या कारणावरून त्यांची उमेदवारी रद्द होऊ नये असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2015 - 12:30 pm | श्रीगुरुजी

इंदिरा गांधींनी सरकारी वाहने (जीप्स) प्रचाराकरीता वापरल्या हेही एक कारण त्यांची निवडणुक रद्द करण्यामागे होते.

उदयकुमार महाजनी's picture

2 Feb 2015 - 7:42 pm | उदयकुमार महाजनी

पुन्हा त्रिशंकु होणार आणी हात चोळीत बसावे लागणार.निवडुन आलेले आमदार यांची जबाबदारी आहे चांगले सरकार देणेची पण पक्षीय पध्द्तीमुळे बोंबाबोंब आणि जनतेला भुर्दंड .

विलासराव's picture

2 Feb 2015 - 11:45 pm | विलासराव

माझं मतः
आपला एकदा संधी मिळावी असंच आहे.

दुश्यन्त's picture

3 Feb 2015 - 3:44 pm | दुश्यन्त

काहीही असो आपने भाजपच्या तोंडच पाणी पळवल आहे हे मात्र खर. ३-५ राज्याचे मुख्यमंत्री,केंद्रातले -राज्यातले मंत्री, आमदार, खासदार यांच्या जोडीला प्रधानसेवक , अमित शहा, किरण बेदी सगळे जोर लावत आहेत मात्र मफलरवाला यांना जोरात टक्कर देत आहे. केंद्रात सत्ता येवून अजून ८-९ महिने झाले नाहीतरी असे का होतेय याचा विचार भाजपेयीनी करावा. चमकदार भाषणे फार झाली आता लोकांची कामे करा म्हणाव.

दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये बोगस कंपन्या स्थापन करून त्याद्वारे २ कोटी रूपये पक्षाला एका मिनिटात मिळाले हा प्रकार कालच जाहिर झाला. या कंपन्यांचे पेड-अप शेअर कॅपिटल एक लाख, टर्न-ओव्हर शून्य त्यामुळे अर्थातच नफाही शून्य तरीही देणगी दिली ५० लाख प्रत्येकी. यात काहीतरी गौडबंगाल नक्कीच दिसते.एकूणच काय की आआप जो सात्विकतेचा आव आणत आहे आणि धर्मराजाचा रथ जमिनीच्या चार बोटे जात असे त्याप्रमाणे आपल्याइतका शुध्द कोणीच नाही हा आव आआपवाले आणत आहेत ती परिस्थिती नक्कीच नाही-- निदान प्रश्न तरी नक्कीच उभा करायला वाव आहे हे स्पष्टच आहे.त्यातही आम्ही २० कोटींमध्ये २०१३ ची निवडणुक लढवली अशा गमजा आआपवाले मारत होते.दोन कोटी म्हणजे त्या तुलनेत १०% इतकी मोठी रक्कम झाली. काल न्यूज चॅनेलवर ज्या पध्दतीने या प्रकाराचे समर्थन चालू होते ते बघून खरोखरच आआप या सर्कशीविषयी आणखी तिटकारा उत्पन्न झाला आहे.

म्हणजे काय की सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत. पण या आआपवाल्यांमध्ये (कम्युनिस्ट वगळता) इतर कोणत्याही राजकीय पक्षात नसलेले दुर्गुण आहेत--ते म्हणजे रस्त्यावरचे राजकारण आणि धरणे हा प्रकार, कमालीचा अहंमन्यपणा, नाटकीपणा इत्यादी इत्यादी.

असो पण या स्वयंघोषित सद्गुणांच्या पुतळ्यांकडून उत्तरांची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.

(आआपचा कट्टर विरोधक आणि दिल्ली विधानसभेतील फेसबुक आणि मिपावरील भावी विरोधी पक्षनेता) क्लिंटन

नांदेडीअन's picture

3 Feb 2015 - 8:09 pm | नांदेडीअन

माफ करा, इथे रिप्लाय करणार नाही म्हणालो होतो, पण राहवले नाही म्हणून शेवटी आलोच इथे 'उत्तर' द्यायला.
प्रश्न तर विचारणारच नाही, कारण उत्तर कुणाकडूनही मिळणार नाही याची जाणीव आहे मला.

आपल्याकडे दुर्दैवाने खरी माहिती जाणून घेणार्‍यांपेक्षा खोट्या प्रचाराला बळी पडणार्‍यांची संख्याच जास्त आहे.
हे एक कारण आहे परत येऊन तुम्हाला रिप्लाय करण्याचे.

- या कंपन्या रजिस्टर्ड आहेत.
- त्यांचे बॅंक अकाऊंट आहे.
- त्या टॅक्स भरतात.

या तीन गोष्टींची खातरजमा करूनच चेक घेतलेला आहे.
‘आप’ने या कंपन्यांचे बँक बॅलंस चेक करायला हवे होते किंवा त्यांचा टर्नओव्हर, प्रॉफिट इत्यादी तपासायला हवे होते म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहे.

नावामध्ये ‘आम आदमी’ ठेवले म्हणून हे आपचे कार्यकर्ते ठरत नाहीत.
प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या व्यक्तीची फेसबुक प्रोफाईल Open To All आहे.
कृपया त्या प्रोफाईलवर जाऊन मागचे फक्त १०-१५ स्टेटस चेक करावेत, तो कोण आहे हे कळून जाईल. (बिचार्‍याने ते पोस्ट किंवा प्रोफाईल डिलिट करून टाकायला हवी होती, पकडल्या गेला नसता.)
काही दिवसांपूर्वी तो BJP जॉईन करण्याचे आवाहन करत होता सगळ्यांना.
त्याचे BJP च्या नेत्यांसोबत फोटोसुद्धा आहेत त्याच्याच प्रोफाईलवर.

आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये यांनी ५० लाखांचे दोन चेक दाखवले.
हे चेक तुम्हाला कुठून मिळाले असे जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले, तेव्हा या बिचार्‍यांची झालेली अवस्था बघण्यासारखी होती. (भाजपने थोडी अजून चांगली ट्रेनिंग द्यायला हवी होती यांना.)

गंमत म्हणजे स्वतः या AVAM चेच ४-५ महिन्यांपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=-Q3Ck-KOCpM
हा व्हिडिओ बघून ठरवा तुम्हीच हे लोक कोण आहेत.

काल भाजपचे एक केंद्रीय मंत्री म्हणत होते की हे सरळ सरळ Money Laundering चे प्रकरण आहे.
या भाजपवाल्यांना सांगा हो कुणीतरी की आता तुम्ही विरोधी पक्षात नाही आहात, तुमचे सरकार आले आहे, तुमच्याकडे सगळे अधिकार आहेत, पॉवर आहेत.
Money Laundering हा काही साधासुधा अपराध नाहीये.
भाजपने चौकशी करून या सगळ्या आपवाल्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे.

आपने या सगळ्या विषयावर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले की ते आता सुप्रिम कोर्टात जाणार आहेत हा विषय घेऊन.
कॉंग्रेस, भाजप आणि स्वतः आपच्या फंडिंगसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर SIT तर्फे चौकशी व्हावी अशी आपची मागणी आहे.
लगेच अरूण जेटली कॅमेर्‍यापुढे येऊन बोलले, "अशा डर्टी पॉलिटिक्सपासून आपण कोर्टांना दूर ठेवायला हवे."

का हो ?
बुमरॅंग झाले का परत ?
तिघांचीही चौकशी व्हावी म्हणणे म्हणजे डर्टी पॉलिटिक्स का ?
कोर्टातली ट्रायल का नकोय तुम्हाला ? मिडिया तुमच्या हाताशी आहे म्हणून मिडिया ट्रायलच करणार का ?
तुम्ही अर्थमंत्री आहात हो देशाचे, मनोरंजन मंत्री नाही !

भक्त असोत किंवा अंध विरोधक, किमान एका गोष्टीचे तरी 'आप'ला क्रेडिट द्या की त्यांच्यामुळे आज आपण राजकीय पक्षांच्या फंडिंगबद्दल चर्चा करतोय.
आप हा एकमेव पक्ष आहे जो आलेल्या प्रत्येक देणगीचा हिशेब देतो. मग देणगी १ रूपयांची का असेना.

या सगळ्या प्रकरणावर फेसबुकवर आलेले एक वाक्य आठवले.
भाजपाका आम आदमी पार्टी को चंदे को लेकर सवाल पुछना ठिक वैसे ही है जैसे सनी लियॉन किसी और को कह रही हो, "बहन जी आपका दुपट्टा सरक रहा है ।"

^^ या वाक्यावरून मला स्त्रीविरोधी वगैरे ठरवून सगळ्यांनी खुशाल मोकळे व्हावे, पण मुद्द्यावर बोलू नये.
आयुष्यभर जी गोष्ट केली नाही, ती आज कशाला करायची ?

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2015 - 11:21 pm | श्रीगुरुजी

जरा सत्य जाणून घेऊया.

इन्फोलॅन्स सॉफ्टवेअर, गोल्डमाईन बिल्डकॉन, सनव्हिजन एजन्सीज आणि स्कायलाईन मेटल्स व अ‍ॅलॉइज या ४ कंपन्यांनी प्रत्येकी ५० लाख असे २ कोटी रूपये आआपला देणगीदाखल दिले. हेमप्रकाश शर्मा, धर्मेंद्र कुमार व मुकेश कुमार हे तिघेजण या चारही कंपन्यांचे संचालक आहेत.

(१) इन्फोलॅन्स सॉफ्टवेअर - गांधीनगर भागात अत्यंत अरूंद गल्लीत या कंपनीचा पत्ता नोंदलेला आहे. या पत्त्यावर एक शिवणाचे दुकान आहे. झारखंडहून आलेले काही शिंपी हे दुकान चालवितात. त्या शिंप्यांना इन्फोलॅन्स सॉफ्टवेअर या कंपनीबद्दल काहीच माहिती नाही.

या कंपनीच्या अधिकृत कागदपत्रांनुसार यांच्याकडे रू. ५० कोटी कॅश रिझर्व्हज् आहेत, कंपनीचे ऑपरेशनल एक्सपेन्सेस रू. २२,०७७ असून ३१/३/२०१३ ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न शून्य होते.

(२) गोल्डमाईन बिल्डकॉन - या कंपनीने दिलेल्या पत्त्यावर गोकुळपुरीतील एका खोलीतले दुकान असून ते बंद आहे. शेजार्‍यांच्या सांगण्यानुसार मित्तल साहेब नावाच्या कोणाचे तरी हे दुकान असून तो दोन महिन्यांपासून बाहेर आहे. तिथल्या कोणीलाही गोल्डमाईन बिल्डकॉन नावाची कंपनीची माहिती नाही. या दुकानावर पांढर्‍या रंगात "अंडी मिळतील" अशी पाटी लिहिलेली आहे.

या कंपनीच्या आर्थिक रेकॉर्डनुसार ३१/३/२०१३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीचे शेअर्स रू. ५०० प्रतिशेअर या दराने विकले असून रू. ६१,२३७ इतका नफा झालेला आहे. शेअर्स प्रिमियम घेऊन विकल्याने कंपनीला रू. ४.५० कोटींचा फायदा झाल्याचेही दाखविण्यात आले आहे.

(३) सनव्हिजन एजन्सीज - करवाल नगर मधील मुकुंद विहार हा या कंपनीचा पत्ता आहे. या भागात अनेक अनधिकृत निवासस्थाने आहेत. दिलेल्या पत्त्यावर तळमजल्यावर एक पोस्ट ऑफिस असून त्यावर ४ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या मालमत्तेचे मालक कंवर सिंग व बिरपाल सिंग आहेत अशी बाहेर पाटी आहे. या पत्त्यावर सनव्हिजन एजन्सीज नावाची कोणतीही कंपनी नाही असे बिरपाल सिंगच्या धाकट्या भावाचे म्हणणे आहे.

अधिकृत रेकॉर्डनुसार या कंपनीने शेअर्स विकून रू. ९४.९५ लाख मिळविले होते. या कंपनीचे ऑपरेटिंग एक्स्पेन्सेस फक्त रू. १०,००० दाखविलेले आहेत.

(४) स्कायलाईन मेटल्स अ‍ॅण्ड अ‍ॅलॉइज - अधिकृत माहितीनुसार या कंपनीने आपले शेअर्स काही अज्ञात गुंतवणुकदारांना रू. १.५७ कोटी ला विकले होते. याही कंपनीचे ऑपरेटिंग एक्स्पेन्सेस फक्त रू. १०,००० दाखविलेले आहेत.

ज्या कंपन्यांनी प्रत्येकी रू. ५० लाख इतकी घसघशीत देणगी दिलेली आहे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर शिवणाचे दुकान, बंद पडलेले एका खोलीत चालणारे किराणा कम बेकरी दुकान, पोस्ट ऑफिस इ. इतरच गोष्टी आहेत. एकंदरीत सर्वच कंपन्या बनावट दिसताहेत. चारही कंपन्यांचे संचालक एकच आहेत हाही योगायोग नसावा. यांच्याकडून मिळालेल्या देणग्यांमध्ये नक्कीच गडबड दिसते.

>>> आपल्याकडे दुर्दैवाने खरी माहिती जाणून घेणार्‍यांपेक्षा खोट्या प्रचाराला बळी पडणार्‍यांची संख्याच जास्त आहे.

एकंदरीत तुम्हीच आआपच्या खोट्या प्रचाराल बळी पडलात असं दिसतंय.

>>> या सगळ्या प्रकरणावर फेसबुकवर आलेले एक वाक्य आठवले.
भाजपाका आम आदमी पार्टी को चंदे को लेकर सवाल पुछना ठिक वैसे ही है जैसे सनी लियॉन किसी और को कह रही हो, "बहन जी आपका दुपट्टा सरक रहा है ।"

वरील वाक्यात भाजपच्या जागी आआप व आम आदमी पार्टीच्या जागी भाजप हे शब्द टाकून वाक्य परत वाचा. तोच अर्थ लागेल.

>>> या वाक्यावरून मला स्त्रीविरोधी वगैरे ठरवून सगळ्यांनी खुशाल मोकळे व्हावे, पण मुद्द्यावर बोलू नये.

भाजपने आआपला रोज ५ प्रश्न विचारत आहे. त्यातल्या एकालाही आजतगायत उत्तर न देता "अण्णांच्या फोटोला हार घालून त्यांचा अपमान केला", "माझ्या अग्रवाल जातीच्या गोत्राचा अपमान केला" असा कांगावा केजरीवाल करत आहेत. ते कधी मुद्द्यावर बोलणार?

आणि कालपासून तर त्यांनी भाजपने मतदान यंत्रात फेरफार केले आहेत असा टाहो फोडायला सुरूवात केली आहे. काय बोलणार आता?

असो.

हाडक्या's picture

4 Feb 2015 - 4:43 pm | हाडक्या

गुर्जी, खरं सांगु का? एवढं ढळढळीत सत्य आजकाल दुर्लभ आहे हो. तुमच्याकडे (अथवा तुम्ही समर्थन करत असलेल्या पक्षाकडे) इतके अगदी ताकावरच्या लोण्यासारखे सत्य पाहून आमच्यासारख्या सामान्यजनांचे (ज्यांना आपची कायपण पडलेली नाय) डोळे दिपले आहेत.

आपचे हे देणगीदार एकतर अतिमूर्ख असावेत किंवा हा बनाव असावा असे वाटण्याइतपत हे सगळे straightforward आहे.

तरीही जर हे खरेच असेल आणि ज्या कुणी हे संशोधन इतक्या तत्परतेने तडीस नेले असेल त्यांना एका चौकशी समितीवर नेमावे आणि याच पद्धतीने देशातील सर्वच गैरव्यवहार (जे काय कोळश्यापासून २जी पासून आणि टोलपासून काळ्या पैशापर्यंत) आहेत त्यांचीपण लगे हात वासलात लावून टाकावी. म्हंजे हाकानाका.
आपल्या सरकारला ही येक विंनंतीये बघा.

कपिलमुनी's picture

4 Feb 2015 - 7:16 pm | कपिलमुनी

झोपलेल्याला जागे करता येते पण सोंग घेणार्‍याला नाही !
म्हणून जे सामान्यांना दिसते ते भक्तांना दिसत नाही !

कितीबी आपटा ! कायसुदिक फर्क नाय बगा ..

क्लिंटन's picture

4 Feb 2015 - 10:40 am | क्लिंटन

आता कशी मिरची झोंबली?इतके दिवस कसे होते की हे आरोप करणार आणि पुरावा वगैरे द्यायच्या भानगडीत न पडता पळून जाणार आणि सगळ्या जगाने यांचे म्हणणे ब्रम्हवाक्य समजून उचलून धरावे अशा स्वरूपाची देहबोली आणि यांचेच कडू औषध यांनाच कोणी पाजले तर मात्र तो माणूस भाजपच्या पेरोलवरचा, अडाणी-अंबानी यांचा एजंट वगैरे वगैरे. बरं हे आरोप नक्की कोणी केले आहेत? पूर्वी आआपमध्ये असलेल्यांनीच. आणि या लोकांना आआपमध्ये प्रवेश दिला गेला होता म्हणजे त्यांच्याकडे KCHP (Kejriwal Certified Honest Person) हे अत्यंत कव्हेटेस असे सर्टिफिकेशन होतेच.मग काही महिन्यातच ते लोक भाजपच्या पेरोलवर जातील, अडाणी-अंबांनींचे एजंट होतील असे म्हणणे म्हणजे अत्यंत अहंमन्यपणाचेच द्योतक आहे. तीच गोष्ट विनोदकुमार बिन्नी, शाझिया इल्मी यांची. यांना तुम्ही उमेदवारी दिली होती. बिन्नी निवडून आले तर इल्मी विधानसभेत आर.के.पुरम मधून तर लोकसभेत गाझियाबादमधून पराभूत झाल्या.तुम्ही जर प्रश्न विचारू शकता की शाझियाकाकूंचे पूर्वीचे ट्विट बघा आणि त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश कसा दिला तर तुम्हाला उलटा प्रश्न विचारला जाणारच-- पूर्वी ज्या शाझियाकाकूंकडे KCHP सर्टिफिकेशन होते त्याच रातोरात अंबानी एजंट कशा काय झाल्या? शाझिया इल्मींना तुम्ही (पक्ष) अंबानी-अडाणी एजंट म्हणत आहात की नाही याची कल्पना नाही पण एकंदरीतच आआपला विरोध करणारा प्रत्येक माणूस एकतर भाजपच्या पेरोलवर असतो नाहीतर अडाणी-अंबानींचा एजंट असतो असे तुमच्याच आशिष खैतान आणि आशुतोष यांच्या न्यूजचॅनेलवरील चर्चांवरून समजते.

हे आरोप आआपवर झाले आहेत तेच प्रकार सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केले आहेत त्यामुळे त्या एका कारणासाठी आआपला सुळीवर चढवायला पाहिजे असे अजिबात नाही. पण आआपचे ट्रान्झिशन बघणे मनोरंजक ठरेल. म्हणजे सुरवातीला आम्हीच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) तेवढे स्वच्छ बाकीचे भ्रष्ट, मग आम्ही इतरांपेक्षा अधिक स्वच्छ आणि आता इतरपण अस्वच्छ आहेतच की असे म्हणणे. फक्त हाच दोन कोटींचा प्रकार इतर कोणत्याही पक्षाच्या बाबतीत झाला असता तर यांनी किती तमाशा केला असता याची कल्पनाही करवत नाही. अमित शहांना घेराव घाला, मोदींच्या घरापुढे धरणे धरा इत्यादी प्रकार यांनी केलेच असते.पण आता त्यांचाच पक्ष आहे ना त्यात. मग काय स्वयंघोषित प्रामाणिक पक्षाला कोण काय विचारणार?

हिंमत असेल तर मला अटक करा हे म्हणणे एक इलेक्शन जिमिक म्हणून ठिक आहे. मतदान होईपर्यंत जे काही ३-४ दिवस आहेत त्यात तपास पूर्ण होऊन कुणालाही अटक होणे अगदीच अशक्य आहे.हर्षद मेहताचे प्रकरण उघडकीस आले होते २३ एप्रिल १९९२ रोजी आणि प्रत्यक्षात त्याला अटक झाली जून १९९२ च्या पहिल्या आठवड्यात यावरून या गोष्टी किती स्पीडने होतात याची कल्पना यावी.अरूण जेटलींना वाटले म्हणून ते केजरीवालांना अटक करूच शकत नाहीत. सोमनाथ भारती तोंडी आदेशावरून कुणालाही अटक करायचे फर्मान सोडू शकतात.पण हे अरूण जेटली आहेत.देशाचे कायदेकानू,नियम त्यांना लागू आहेत. तेव्हा हिंमत असेल तर अटक करून दाखवा हे म्हणणे केजरीवालांनी निवडणुकीच्या तोंडावर आलेली परिस्थिती नक्कीच एका राजकारण्यासारखी हाताळली याचेच लक्षण आहे. असो.

(अडाणी-अंबानींचा एजंट आणि भाजपच्या पेरोलवर असलेला) क्लिंटन

असंका's picture

4 Feb 2015 - 11:23 am | असंका

परत परत तेच तेच चालू आहे. नांदेडीअन यांची माहिती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. ते म्हणतात तसे, आपवर नुसते आरोप चाललेत. जर ते खरंच इतका काळा कोळसा आहेत, तर का उगाळताय पुन्हा पुन्हा?

आपला एक संधी मिळणार आहे. एक दोन चुकांनी कुणीही आपला राइट ऑफ करू शकत नाही .

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2015 - 1:57 pm | श्रीगुरुजी

आआपला बहुमत मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. बहुमत मिळाले नाही तरी निदान आआप सर्वाधिक मोठा पक्ष असेल हे आता स्पष्ट आहे. जवळपास सर्वच मतचाचण्यांचे असेच अंदाज आहेत.

विजयाची इतकी खात्री असताना स्वतःच्या जातीचे कार्ड खेळणे, मतदानयंत्रावर अविश्वास दाखविणे अशा टिपीकल काँग्रेसी स्ट्रॅटेज्या केजरीवाल का खेळत आहेत? अखिल ब्रह्मांडात आपण एकमेव स्वच्छ, प्रामाणिक व पारदर्शी आहोत आणि जे आआप मध्ये नाहीत ते सर्वजण कमालीचे भ्रष्टाचारी, अप्रामाणिक व अपारदर्शी आहेत असा दावा करणार्‍या आआपला डमी कंपन्यांकडून का देणग्या घ्यावा लागल्या? ह्या देणग्या म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा राजमार्ग तर नव्हे?

एकंदरीत आआप हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष नसून भारतातील इतर कोणत्याही राजकीय पक्षासारखाच अजून एक पक्ष आहे. आआपची व केजरीवालांची वाटचाल १९८७-९० या काळातल्या जनता दल व वि.प्र.सिंगांच्या मार्गानेच सुरू आहे असे दिसतेय.

सुनील's picture

4 Feb 2015 - 2:27 pm | सुनील

रोचक चर्चेत आतापावेतो वाचनमात्र होतो. पण आता अगदीच रहावले नाही -

एकंदरीत आआप हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष नसून भारतातील इतर कोणत्याही राजकीय पक्षासारखाच अजून एक पक्ष आहे.

खरय.

पण, आम्ही इतरांपेक्षा वेगळे, असे म्हणणारे कुणी दुसरेच होते. नै का? ;)

दुश्यन्त's picture

4 Feb 2015 - 3:40 pm | दुश्यन्त

एकेकाळी 'पार्टी विथ डीफरन्स'चा ढोल पिटायचे..

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2015 - 10:41 pm | श्रीगुरुजी

जसे आता आआपवाले स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिकपणाचे व पारदर्शीपणाचे ढोल पिटताहेत तसेच ना!

दुश्यन्त's picture

4 Feb 2015 - 1:25 pm | दुश्यन्त

प्रधान सेवकांची दिल्ली प्रचारसभेतील भाषणे टीवीवर पाहिली. अजूनही ते लोकसभा २०१४ च्या मोडमध्ये आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती असूनही प्रचारात तेच बाष्कळ टोमणे, नाटकीय हावभाव, वल्गना .केजरीच्या दिल्ली-दुबई विमान प्रवासाचे हे दाखले देत आहेत हा एक विनोद. यांच्या परवाच्या एका सूटच्या किमतीत असल्या किती प्रवास फेर्या होतील ते यांना विचारा . बस करा म्हणाव. तेव्हा ठीक वाटत होत आता तुम्ही सत्तेत आला आहत पंतप्रधान आहात तरी भाषणे आणि मुद्दे एखाद्या दुसर्या फळीतील नेत्यांसारखीच आहेत. तुम्ही आधी दिलेली वारेमाप आश्वासने किती पाळली ते दिसलय ८ महिन्यात. कॉंग्रेस आणि विरोधक मोदींना टार्गेट करून मोठे बनवत होते तोच प्रकार आता भाजप केजरीवाल यांच्या विरुद्ध करत आहे. भाजप , कॉंग्रेस का नाही स्वताच्या देणगी आणि देणगीदारांची माहिती खुली करत?दिल्ली महापालिका किती वर्षे भाजपच्या ताब्यात आहे त्यांनी केलेला कारभार लोक पाहत आहेतच. कितीही टीका करा, खिल्ली उडवा मफलरवाल्याने यांना घाम फोडला आहे हे खरेच आहे. सामान्य लोकांची सहानुभूती आपकडेच वळत आहे.

विवेकपटाईत's picture

4 Feb 2015 - 7:23 pm | विवेकपटाईत

आमच्या उत्तम नगर भागात गेल्या तीन निवडणूकीत निवडून आलेले कांग्रेसचे दबंग नेते मुकेश शर्मा (गेल्या निवडणूकीत पराजित झाले होते- भा ज प चे प्रवेश वर्मा जिंकले होते) , संपूर्ण भागात त्यांचे एक ही पोस्टर दिसत नाही आहे. तसेच जनकपुरीत ही कांग्रेसच्या उम्मेदावरचा प्रचार कमीच दिसत आहे. एक शंका बहुत लोकांच्या मनात येत आहे, कुठे कॉंग्रेस आपला 'walk over' तर देत नाही आहे ना.... दुसर्या आम्ही हरलो तरी चालेल भा ज प जिंकली नाही पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2015 - 10:45 pm | श्रीगुरुजी

बादवे, या निवडणुकीत केजरीवाल निदान अजूनतरी स्वतःलाच आआपच्या कार्यकर्त्यांकडून थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून शाई उडवून घ्यायचे स्वयंआयोजित व स्वयंव्यस्थापित कार्यक्रम का आयोजित करीत नाहीत याचे कारण कळेल का? मागील निवडणुकीत त्यांनी असे बरेच कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले होते. पण यावेळी अजून एकही नाही याचं आश्चर्य वाटतंय.

आजानुकर्ण's picture

4 Feb 2015 - 10:52 pm | आजानुकर्ण

अडवाणींनाही एके काळी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रात फ्रॉड होतो असे वाटत होते. आता ते आप आणि काँग्रेसला वाटते. दिवस भले-बुरे येत जात राहतात. एवढा काय विचार करता. दिल्लीत कुठलंही सरकार आलं तरी पुण्यामुंबईला काय फरक पडणार आहे का?

नांदेडीअन's picture

5 Feb 2015 - 10:29 am | नांदेडीअन

दिल्लीच्या लोकल केबल ऑपरेटर्सनी NDTV ब्लॉक केले आहे म्हणे.

NDTV ने मोदींच्या रॅलीमध्ये ‘गर्दी’वर कॅमेरा फिरवायला नको होता. :(
रविश कुमारने किरण बेदींचा इंटरव्ह्यू घ्यायला नको होता. :(
NDTV च्या पत्रकाराने AVAM ला प्रेस कॉन्फरन्समध्ये अवघड प्रश्न विचारायला नको होते. :(

भुमन्यु's picture

5 Feb 2015 - 11:02 am | भुमन्यु

आप वाले म्हणतील, रवीश कुमार ने केजरिवालला पण प्रश्न विचारायला नको होते काल, ढोंगी पणाचा कळस होते कालचे प्रश्नोत्तरे.. (असो लोकसभेच्या निवडणुकिच्या वेळेसचे आज-तक बरोबरचा ईंटरव्ह्यु लोक विसरलेत का?)

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2015 - 2:22 pm | श्रीगुरुजी

>>> दिल्लीच्या लोकल केबल ऑपरेटर्सनी NDTV ब्लॉक केले आहे म्हणे.

असं कोण म्हणे? असं केजरीवाल म्हणे का? पण मतदान यंत्रात भाजपने गडबड केली आहे असेही केजरीवाल म्हणे. भाजपने माझ्या अग्रवाल जातिच्या गोत्राचा अपमान केला असेही केजरीवाल म्हणे. मागील वर्षी भाजप कार्यकर्ते माझ्या थोबाडीत मारत आहेत आणि माझ्या अंगावर शाई उडवत आहेत असेही केजरीवाल म्हणे.

>>> NDTV ने मोदींच्या रॅलीमध्ये ‘गर्दी’वर कॅमेरा फिरवायला नको होता.

मी पाहिलेल्या सर्व १३-१४ वाहिन्यांनी मोदींच्या रॅलीमधील 'गर्दी'वर कॅमरा फिरविला होता. मग फक्त एनडीटीव्ही वरच राग का? इतर वाहिन्याही ब्लॉक व्हायला पाहिजेत ना. बादवे, मोदींच्या १ तारखेपासूनच्या सर्व सभा 'फेल' गेल्या म्हणे!

>>> रविश कुमारने किरण बेदींचा इंटरव्ह्यू घ्यायला नको होता.

किरण बेदींचे इतर अनेक वाहिन्यांनी इंटरव्ह्यू घेतले आहेत. मग फक्त एनडीटीव्ही वरच राग का? इतर वाहिन्याही ब्लॉक व्हायला पाहिजेत ना.

>>> NDTV च्या पत्रकाराने AVAM ला प्रेस कॉन्फरन्समध्ये अवघड प्रश्न विचारायला नको होते.

अवाम ला सर्वच वाहिन्यांचे पत्रकार 'अवघड' प्रश्न विचारत होते. मग फक्त एनडीटीव्ही वरच राग का? इतर वाहिन्याही ब्लॉक व्हायला पाहिजेत ना.

असो. आआपची रूमर फॅक्टरी जोरात दिसतेय.

नांदेडीअन's picture

5 Feb 2015 - 2:45 pm | नांदेडीअन
श्रीगुरुजी's picture

5 Feb 2015 - 2:53 pm | श्रीगुरुजी

माझ्या घरीसुद्धा काहीवेळा अचानक काही वाहिन्या काही काळ दिसेनाश्या होतात व नंतर काही काळाने परत दिसायला लागतात.

संपूर्ण दिल्लीतून या २ वाहिन्या दिसेनाश्या झाल्या का फक्त काही भागांमध्येच, यामागे काही तांत्रिक समस्या होती का राजकीय कारण, हे कोठे स्पष्ट झालंय का? जर गर्दीवरच कॅमरा फिरविण्याचा मुद्दा असेल किंवा किरण बेदींची मुलाखत हा मुद्दा असेल तर जवळपास सर्वच वाहिन्या ब्लॉक व्हायला हव्या होत्या. नाही का?

बादवे, एनडीटीव्ही ने या निवडणुकीत सर्वेक्षण केलेले नाही. इतर अनेक वाहिन्यांनी ते केले आहे. त्यातल्या ज्या वाहिन्यांनी आआपला झुकते माप दिले आहे त्या सर्वच ब्लॉक व्हायला पाहिजेत ना?

नांदेडीअन's picture

5 Feb 2015 - 2:59 pm | नांदेडीअन

इतक्या लवकर बॅकफुटवर येत जाऊ नका हो.
थोडा वेळ घेत चला.

फारच प्रेडिक्टेबल होताहेत ब्वा तुमचे प्रतिसाद.
असो, हॅव अ ग्रेट डे अहेड !

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2015 - 3:08 pm | श्रीगुरुजी

तुम्ही काहीही समजूत करून घ्यायला मोकळे आहात. आपण फ्रंटफूटवर आहोत व इतर बॅकफूटवर आहेत ही तुमची समजूत मला खूप आवडली. अगदी टिपीकल 'आआप'वाली समजूत आहे ही.

मतदान यंत्रात गडबड, गोत्राचा अपमान यापाठोपाठ आआपच्या रूमर मिलमधून आता नवीन पुडी सोडण्यात आलीये. भाजप मतदारांना पैसे, दारू आणि मांसाहारी जेवण वाटतोय आणि गरीब मतदारांची, निवडणुक आयोगाने दिलेली ओळखपत्रे काढून घेतोय म्हणे. (इति आशुतोष) आआपने जोरदार फ्रंटफूट ड्राईव्ह मारलाय आणि भाजपला बॅकफूटवर ढकललंय.

By: Press Trust of India | New Delhi | Posted: February 5, 2015 12:05 pm | Updated: February 5, 2015 12:13 pm

The AAP-BJP bitter spat on Thursday saw the Aam Aadmi Party accusing the saffron party of trying to “buy votes” ahead of February 7 Assembly polls by distributing money and free liquor.

We have information that BJP is distributing money, liquor and non-vegetarian food to the public and they are also seizing voter identity cards of poor,” AAP leader Ashutosh alleged.

कपिलमुनी's picture

5 Feb 2015 - 4:31 pm | कपिलमुनी

मोदींनी पण "मुझे नीच जातीका कहा" जातीचे कार्ड खेळले होते ते आठवते आहे का गुर्जी ?

http://navbharattimes.indiatimes.com/lok-sabha-2014/narendra-modi-target...

हवा तर हि लिंक बघा !

भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के प्रधानमंत्री पद के उम्मीदवार नरेंद्र मोदी ने कांग्रेस की स्टार प्रचारक प्रियंका गांधी पर पलटवार करते हुए कहा कि निचली जाति से होने की वजह से उनकी राजनीति को नीचा कहा जा रहा है। प्रियंका ने सोमवार को एक जनसभा में कहा था कि बीजेपी उनके 'शहीद' पिता पर नीच राजनीति कर रही है।

बीजेपी के पीएम कैंडिडेट ने ट्विटर पर बिना किसी का नाम लिए कहा, 'सामाजिक रूप से निचले वर्ग से आया हूं, इसलिए उन लोगों के लिए मेरी राजनीति नीच राजनीति ही होगी।'

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2015 - 9:51 pm | श्रीगुरुजी

ते बरोबर आहे हो. पण ही तुलना करून तुम्ही केजरीवालांना मोदींच्या पातळीला आणून ठेवलंत. केजरीवाल म्हणजे अखिल ब्रह्मांडातले एकमेव स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी, जातीयवादापासून पूर्ण दूर असलेले, फक्त विकास आणि जनतेच्या समस्यांसाठीच झगडणारे अशा असंख्य गुणांचा सागर असलेले अवतारी महापुरूष. त्यांना इतकं खाली आणायचं!

काही दिवसांपूर्वी केजरीवालांची एक मुलाखत पहात होतो. त्यात ते म्हणत होते की "वो गालीगलोच की राजनीती करते है और हम विकास और मुद्दोंकी राजनीती करते है|". स्वतःच्या जातीच्या गोत्राचे कार्ड खेळणे हीच केजरीवालांची "विकास और मुद्दोंकी राजनीती" असावी बहुतेक.

कपिलमुनी's picture

6 Feb 2015 - 12:12 am | कपिलमुनी

दोघे या बाबतीत सारखेच !
मोदींनी तो विषय भरकटवून स्वतच्या जातीचा फायदा करून घ्यायची खेळी केली होती आणि आता केजरीवालपण तशीच खेळी करत आहे . जी चुकीची आहे .
पण मोदींचा चुकला होताचहे मान्य करा ना !

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2015 - 12:46 pm | श्रीगुरुजी

त्यावेळी मोदी चुकले होते हे मान्य आहे.

अरविंद केजरीवाल हे अत्यंत प्रामाणिक नेते आहेत असे गृहीत धरून माझे मत मांडतो .

१. मागच्या वेळी नेत्रदीपक यश संपादन करून सुद्धा ते इतर पक्ष्यांच्या जाळात अलगद फसले असं वाटतं .
२. आंदोलन करणे आणी सरकार चालवणे ह्यात जमीन आसमानचा फरक आहे हे त्यांनी ओळखावे .
३. जनतेला प्रत्येक गोष्ट फुकट किंवा अतिशय कमी दरात देणे म्हणजे काही शहाणपणाचे काम नव्हे .
४. दीड लाख CCTV लावल्याने महिला सुरक्षित होतील असं वाटत नाही. त्यासाठीचा अंदाजे १००० कोटींचा खर्च कसा करणार ?
५. दिल्ली सरकारला केंद्र सरकार सोबत समन्वय साधूनच काम करावे लागते. उठसुट केंद्र सरकारवर टीका करणे योग्य नाही . अशाने AAP चं सरकार येउन सुद्धा काहीही फायदा होणार नाही . कधी नव्हे ते केंद्रात स्थिर सरकार आले आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा.
६. आम्ही सोडून जगात सगळेच भ्रष्टाचारी हा विचार अपरिपक्वपणाचे लक्षण आहे.
७. मी प्रामाणिक या सबबीखाली मनमानी कारभार करणे योग्य नाही. अशाने स्वपक्षीय नेते विरोधात जातील.
८. विकास ही एक निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया आहे. तडकाफडकी निर्णय घेण्याआधी सर्व बाजूनी विचार करावा.
९. आपला पक्ष नवीन आहे. पक्ष बांधणी सुरु करावी.

ऋषिकेश's picture

5 Feb 2015 - 12:04 pm | ऋषिकेश

सहमत आहे.
खरंतर आआपने आपले नेतृत्त्व योगेंद्र यादव सारख्या संतुलीत व्यक्तीकडे दिल्यास पक्षाचे भले व्हावे. केजरीवाल यांच्यासारखे आक्रस्तळे नेतृत्त्व पक्षाला एकवेळ अल्पकाळ फायदा करून देईलही दूरगामी विचार केल्यास अहिताचे आहे.

क्लिंटन's picture

5 Feb 2015 - 12:27 pm | क्लिंटन

हा नऊ कलमी प्रतिसाद (विशेषतः २,३,६ आणि ७) तर अगदीच बिनतोड आहे. यापुढे आआपवर कोणतीही चर्चा असेल तर या एका प्रतिसादाची लिंक दिली की झाले :) एकूणच प्रतिसाद प्रचंड आवडला गेला आहे.

त्यातही आणखी दहावा मुद्दा (किंवा सहाव्या मुद्द्यात भर): आम्हाला प्रश्न विचारणारे अडाणी किंवा अंबानींचे एजंट किंवा भाजपच्या पेरोलवर असतात असे म्हणणे अतिशय अपरिपक्वपणाचे आहे.

चिनार's picture

5 Feb 2015 - 12:46 pm | चिनार

१०. निवडणुकीतली हार-जीत खुल्या मनाने स्वीकारावी.

चिनार's picture

5 Feb 2015 - 12:48 pm | चिनार

http://www.misalpav.com/node/27867

एक जुना लेख (लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाशित केलेला )

भुमन्यु's picture

5 Feb 2015 - 1:29 pm | भुमन्यु

पर्फेक्ट प्रतिसाद.... १०१% सहमत

कपिलमुनी's picture

5 Feb 2015 - 4:33 pm | कपिलमुनी

राज ठाकरेंना पण हा दुवा पाठवून देतो ;)

गणेशा's picture

5 Feb 2015 - 2:37 pm | गणेशा

सर्व रिप्लाय वाचले... नांदेडिअन यांचे रिप्लाय एकदम बरोबर वाटतात.
सामान्य माणुस राजकारणात आला की त्याला कसेही करुन आपली ताकद/अनुभव वापरुन बाजुला कसे सारता येवु शकते हे भाजप करतो आहे, परंतु तसे होणार नाही.
पोल वर माझा विश्वास नाही.. भले आप निवडुन येवु किंवा भाजप कामे जनतेची होतील कारण दोघांपैकी कोणीही विरोधक झाले तरी ते रस्त्यावरच उतरणार आहेत. भाजप सुद्दा.

केजरीवाल अतिशय योग्य आणि लायक माणुस आहे दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यास, जरी तो अनुभव्हिन असला तरी इतर भ्रष्ट नेत्यांपेक्षा तो बरा.
भले सगळे भ्रष्ट नाहित असे म्हणता येते.. पण ते ज्या पार्टीचे काम करतात त्यातील सहयोगी जर भ्रष्ट असतील तर तुम्हीही त्यांचेच साथीदार.

अरविंद केजरीवाल ला बरीचशी महाराष्ट्रीय जनता नावे ठेवते, पण दिल्लीतील सर्वेत जेंव्हा अरविंद केजरीवाल ला जास्त पसंदि मिळते तरी ती बुद्धु जनता आपणच काय ते बरोबर असे नसु नये असे माझे मत. मान्य कोणत्या तरी एका बाजुला आपले झुकते माप असते म्हणुन इतर बाजुचा कसला ही विचार न करता जायचे.

मागचेच काढायचे झाल्यास, महाराष्ट्रात रिलायन्स वाढायला आणि बिएसएनएल कमी व्हायला कोण कसे आणि किती रुपयानी जबाब्दार आहेत हे माहीती आहेच.

मला तरी एका आंदोलन कर्त्या साफ व्यक्तीमत्वाच्या व्यक्तीचे राजकारण आवडेल.. कारण ह्या बाकीच्यांचा विट आलेला आहे.

केजरीवाल ला भगोडा म्हणणारे म्हणुन द्यात हो.. त्यात काही होत नसते. त्याच्याकडे कॉन्ग्रेस चे १८ मुद्यावर पाठिंबा होता आणि त्यातील एका मुद्द्यावर कॉन्ग्रेस खरी उभी नाही राहिली म्हणुन त्याने राजिनाम दिला होता हे मला योग्य वाटते. काय चुक आहे ?
तुम्ही म्हण्ताल पाठिंबा का घेतला ?
घेतला नव्हता तेंव्हा हेच भाजप वाले आणि कॉन्ग्रेस वाले आमव्चा अनकंडिशन्ल पाठिंबा आहे आप ला, त्यांना राज्य चालवयचेच नाहीये म्हणुन ते कोणाचा पाठिंबा घेत नाहित असे म्हणत होती..
मग काय करायला पाहिजे होते आप ने तेंन्व्हा असे म्हंटल्यावर ?
दुसरी गोष्ट नकारात्मक जाहिराती महाराष्ट्रात चालल्या तेच दिल्लीत चालल्या नाही तेथेच भाजप पुन्हा पिछाडीवर आला.
त्याचा फायदा आप ने का घेवु नये, तुम्ही पैसे देवुन वयक्तीक लेवल वर जाहिराती करता मग फुकटात त्यांनी त्याचा विपर्यास का करु नये.

जश्यास तसे उत्तर दिलेच पाहिजेत.. उद्यागधंद्यावाल्याना फक्त प्रोत्साहन आणि त्यांचीच पाठराखन करुन कसे चालेल बाकी कोणी आहे की नाही ?
काही वेळेस आप पण थोडे जास्त करत आहे तेंव्हा त्यांनी ही थोडेसे सबुरीने घ्यावे नाहितर राईचा पर्वत बनवला जातो हे आता पर्यंत त्यांच्या लक्षात आले असेनच.

भाजप आणि त्यांचे भक्त आताच हरल्यासारखे का बोलतात.. कदाचीत भाजप बहुमत हाशील ही करु शकेन ..
आणि असे झाले तर जे लोक केजरीवाल ला तमाशा करतो म्हण्त होते त्यांना किरण बेदींचा ही तमाशाच पाहिला मिळेल असे वाटते.
किरण बेदींच्या मुलाखती तर खरेच नकोश्या वाटतात..

आप सत्तेत आली तरी हे विरोधक आता बघतोच तुमच्याकडे कसे काम करतायेत ते अश्या अर्थाने मागे लागेल असे वाटते, आनि हे चुकीचे वाटते.

असो..

भाजपच्या या नवीन प्रवक्त्यावर खूप दया येत होती काल. :(
https://www.youtube.com/watch?v=vcuDb875RFI

या डिबेटमध्ये एक गोष्ट पाहिली की, एक व्यक्ती पत्रकार परिषद घेते, आणि काही दावा करते, मग म्हणते हिंमत असेल तर मला कोर्टाची नोटिस द्या नाहीतर तोपर्यंत मी पत्रकार परिषदा घेणार आणि आरोप करणार आहे.

उ.दा.
१. माझे लग्न चार दिवसावर आले आहे. एकजण म्हणतो की तू गुन्हा (गंभीर असा) केला आहेस आणि त्यासाठी मी तुझी बदनामी करणार (त्यामुळे माझे लग्न मोडू शकते), जर तुला असे म्हणायचे आहे की तू गुन्हा केलेला नाहीस तर तू माझ्याविरुध्द कोर्टात जा आणि मला तुरुंगात टाक.
२. आता मी माझे हातातील काम सोडून कोर्टात जायचे आणि वकिलास खर्च करायचा आणि त्यास नोटिस पाठवायची.
३. मग जेव्हा तारिख येईल तेव्हा सिद्ध करायचे की हे सर्व दावे फोल आहेत आणि त्याने माझी बदनामी केली आहे, त्यानंतर त्याल कोर्टाने जी काही सजा मिळेल ती मिळेल (त्या व्यक्तीस माहित आहे की फार फार तर त्याला तुरुंगवास आणि दंड होईल).
४. आता हे काही चार दिवसात होणार नाही (हे अर्थातच त्या व्यक्तीला मव्यक्तीला, मग लग्न मोडले आणि या प्रसंगामुळे माझी सध्यातरी बदनामी होतेय आणि जोवर कोर्टाचा निकाल येत नाही तोवर माझे लग्न अडकतेय तर एकप्रकारे त्या व्यक्तीचा हेतू माझा गुन्हा सिद्ध करण्याचा नाही हे दिसत नाही काय ?
५. भले मी गुन्हा केला असेल अथवा नसेल पण या घडीला त्या व्यक्तीने पुरावे न देता जर फक्त आरोप केले असतील आणि मी माझ्या निरपराधपणाचे पुरावे समोर मांडत असेन (जे ती व्यक्ती म्हणतेय की तू कोर्ट केस कर आणि माझ्याविरुद्ध कोर्टात वापर) तर सरळ सरळ त्या व्यक्तीचा हेतू संशयातीत वाटत नाही काय ?

आपने केलेलेही असेल हवाला, पण कोणी गुरकीरत नावाच्या कॅनडास्थित व्यक्तीच्या नावाने दावे करायचे आणि तिला म्हणायचे की मी काही तुझ्याविरुद्ध कोर्टात जाणार नाही तुला तुझ्या निर्दोषत्वाची सिध्दता भारतातल्या कोर्टात येऊन, मला नोटिस देवून करावी लागेल.
हे जरा अतिच मूर्खपणाचे नाही का वाटत ? आणि यावर विसंबून भाजपा किंवा मिडियाने बातम्या द्याव्यात म्हणजे आपण कसला थिल्लरपणा चालवला आहे ??
आप शतमूर्ख असेल (नव्हे आहेच), पण हे जे काही इतर लोक करतायत ते सार्वजनिक मूढतादर्शक म्हणायचे की सार्वजनिक दांभिकता हेच समजत नाही.

नांदेडीअन's picture

5 Feb 2015 - 11:49 pm | नांदेडीअन

The Delhi Elections

I strongly recommend all Delhi voters to vote for the Aam Admi Party in the coming elections for the Delhi Assembly.
Before I give my reasons, I wish to make one thing clear, and this clarification is necessary because some people commented on some of my previous posts asking how much has been given or offered to me by Mr. Kejriwal.

My answer is : nothing.
Nothing has been offered or given to me by him.
In fact I have never even met Mr. Kejriwal in my life.
Any one can verify this from Mr. Kejriwal.

I have studied Mr. Kejriwal ( through the media ), and my opinion about him, which I have expressed earlier also, is that he is an upright man, who genuinely wishes to do good.
He was earlier impulsive and impatient, but he has realized his mistakes and has learnt from them.

As regards the BJP, I have already given my views in my articles ' The Party is Over' and ' Why Delhiites should vote for AAP ' on facebook and my blog justicekatju.blogspot.in

My reasons why Delhi voters should vote for AAP are as follows :

1. As explained in my article ' Why Delhiites should vote for AAP ', Delhi is mainly a city of shopkeepers and traders i.e. small and middle level businessmen. Earlier, the Jan Sangh, which later became the BJP represented these classes, while Congress represented big business. Now Congress has been decimated ( largely due to its own misdeeds ), and now BJP has become the party of big business ( or at least a section of it ), while in Delhi AAP represents small and middle businessmen. So it is in the interests of Delhiites to vote for a party which will represent them.

2. One of the main problems of Delhiites is electricity and water bills, and AAP is the only party which has shown an inclination to address this issue seriously

3. As regards BJP, everybody now realizes that the slogan of 'vikas' was bluff, illusion and sham rhetoric for winning the votes of the Indian youth who were unemployed, or who had the prospect of unemployment staring at them, and thought that vikas meant creation of millions of jobs for them. Instead, the Indian economy is stagnant, and there are lay offs ( see my articles ' The Party is Over ' and ' The Dream has Evaporated ' on fb and my blog )

4. All that BJP has is hatred of minorities. It pretends to be a party representing Hindus, but that is a sham and a pretence. In fact the BJP leaders have no idea of the great Hindu intellectualism, the real contribution of Hindus in science, literature, law, grammar, etc and instead by substituting falsehood for truth dilute the latter and make us a laughing stock before the whole world ( see my articles ' Mixing the True with the Untrue ' and ' Making us a laughing stock ' on fb and my blog ).

5. As regards Congress, the less said about it the better. During the rule of UPA scam followed scam, and Sonia Gandhi has yet to render accounts about them. As regards Rahul Gandhi, is any comment necessary for this boy ?

- Markandey Katju

गणेशा's picture

6 Feb 2015 - 12:55 am | गणेशा

My all team members in delhi will be vote for AAP.

5 sal kejarival..............................

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2015 - 12:53 pm | श्रीगुरुजी

धन्य आहे. काटजूंचं आवाहन इथे दिलंत. काटजू भाजपला पाठिंबा न देता आआपला पाठिंबा देताहेत त्यात नवल काय! किरण बेदींपेक्षा सुंदर असलेल्या शाझिया इल्मींना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न केल्यानेच रागावून त्यांनी आआपला पाठिंबा जाहीर केला असावा. शाझिया इल्मी किरण बेदींपेक्षा सुंदर असल्याने भाजपने त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायला हवं होतं असं आचरटपणाचं विधान त्यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. कतरिना कैफला राष्ट्रपती करायला हवं असा अर्थाचं अजून एक आचरट विधानही त्यांनी मागच्याच महिन्यात केलं होतं. अत्यंत बाष्कळ व आचरट विधान करणारे अशी त्यांची प्रसिद्धी आहे.

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आचरट वक्तव्ये करणार्‍या काटजूंनी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ड्रामेबाजी करणार्‍या केजरीवालांना पाठिंबा जाहीर करावा यात काहीच आश्चर्य नाही. शेवटी 'समान शीलेषु व्यसनेषु सख्यम्' हेच खरं.

कपिलमुनी's picture

6 Feb 2015 - 12:15 am | कपिलमुनी

४९ दिवसांमध्ये केजरीवालला भगोडा म्हणणारे सोयीस्कररीत्या वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार विसरतात..

श्रीरंग_जोशी's picture

6 Feb 2015 - 12:32 am | श्रीरंग_जोशी

वाजपेयींना बहुमत सिद्ध करता आले नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. हे एक घटनादत्त कर्तव्य होते. ते पार न पाडल्यास राष्ट्रपतींनी त्यांचे सरकार बरखास्त केले असते.

अरविंद केजरीवाल यांच्याकडे बहुमत होते. बाहेरून पाठिंबा देणार्‍या पक्षाने पाठिंबा काढून घेतलेला नसताना स्वेच्छेने त्यांनी राजीनामा दिला. केजरीवाल यांच्याकडे उरलेले ५८ महिने व ११ दिवस किंवा काँग्रेसने त्याआधीच पाठिंबा काढून घेतल्यास तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहण्याचा पर्याय होता.

वाजपेयी यांना सरकार सोडावे'च' लागले असते.
४९ दिवसानंतर सरकार सोडून जायची गरज होती असे वाटत नाही.

क्लिंटन's picture

6 Feb 2015 - 10:39 am | क्लिंटन

४९ दिवसांमध्ये केजरीवालला भगोडा म्हणणारे सोयीस्कररीत्या वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार विसरतात..

:) आआपला पाठिंबा कशामुळे मिळतो हे समजले. खरोखर काय घडले होते वगैरे विचार करायच्या भानगडीत न पडता कशाचाही कशाशीही बादरायण संबंध जोडून नुसती फेकुगिरी करायची आणि इतक्या मोठ्याने ओरडायचे की हाच मुद्दा खरा असे सगळ्या जगाला वाटायला लागावे. असो.

अनुप ढेरे's picture

6 Feb 2015 - 10:42 am | अनुप ढेरे

सहमत. ती तुलना कायच्या काय आहे.
रच्याकने, ते सरकार पडलं, तेव्हा वायपेयींनी लोकसभेत केलेल भाषण लेजंडरी आहे.

कपिलमुनी's picture

6 Feb 2015 - 2:04 pm | कपिलमुनी

वाजपेयींनी बहुमत नसताना सरकार सोडला हे योग्य आणि घटनेला अनुसरुन होते . त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये जे बिल मांडले ते पास झाले नाही . हा कोणत्याही सरकारचा नैतिक पराभव असतो ( ज्या प्रमाणे कपात सूचना ) त्याला अनुसरून त्यांनी राजीनामा दिला होता !

त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये जे बिल मांडले ते पास झाले नाही . हा कोणत्याही सरकारचा नैतिक पराभव असतो

सगळे रामायण झाल्यानंतर रामाची सीता कोण!! हे बिल विधानसभेत मांडण्यासंदर्भात उपराज्यपालांनी सॉलिसिटर जनरलचे मत घेतले.सॉलिसिटर जनरलनी मत दिले की उपराज्यपालांच्या शिफारसीशिवाय हे विधेयक विधानसभेत मांडता येणार नाही.तरीही केजरीवालांनी हे बिल मांडायचा प्रयत्न केला आणि तसे करणे घटनाबाह्य होते.वर 'हे बिल मांडावे का' यावर सभागृहाचे मत घेतले. उपराज्यपालांची परवानगी नाही म्हणून हे बिल मांडणे घटनाबाह्य आहे या (भले तांत्रिक) कारणावरून भाजप आणि काँग्रेसने हे बिल मांडायला विरोध केला.त्यावर 'सब मिले हुए है' असे म्हणत हे महाशय राजीनामा देऊन पळून गेले.एकूणच काय तर पहिल्या दिवसापासून हे महाशय पळून जायला कारण शोधत होते ते त्यांना या बिलाच्या निमित्ताने मिळाले.

उद्या हे सत्तेवर आले आणि विधानसभेत केंद्रातील मोदी सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव मांडला तर विधानसभेला केंद्र सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि जरी असा प्रस्ताव विधानसभेने मंजूर केला तरी त्याचा तिळमात्र उपयोग होणार नाही या कारणासाठी जर भाजप आणि काँग्रेसने त्याला विरोध केला तरी परत म्हणणार का की 'सब मिले हुए है'??

वाजपेयींना राष्ट्रपतींनी ३१ मे १९९६ पूर्वी बहुमत सिध्द करायला सांगितले होते.त्यामुळे वाजपेयींचा विश्वासप्रस्ताव आणणे आणि त्यावर चर्चा होणे पूर्णपणे घटनेतील तरतुदींना धरून होते. केजरीवालांनी मुळात अशा तरतुदींचा भंग करून बिल मांडायचा प्रयत्न केला. तेव्हा वाजपेयींची केस आणि केजरीवालांची केस पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्या एकाच तागडीत कशा काय तोलू शकता?

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2015 - 2:44 pm | श्रीगुरुजी

>>> उद्या हे सत्तेवर आले आणि विधानसभेत केंद्रातील मोदी सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव मांडला तर विधानसभेला केंद्र सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि जरी असा प्रस्ताव विधानसभेने मंजूर केला तरी त्याचा तिळमात्र उपयोग होणार नाही या कारणासाठी जर भाजप आणि काँग्रेसने त्याला विरोध केला तरी परत म्हणणार का की 'सब मिले हुए है'??

हे भारी!

यावेळी आआपला स्पष्ट बहुमत जरी मिळाले तरी दिलेली अत्यंत अव्यावहारीक आश्वासने पूर्ण करता येत नाही असे दिसले की केंद्राकडे बोट दाखवून आणि असेच काहीतरी फुसके कारण काढून हे पुन्हा एकदा राजीनामा देऊन पलायन करतील हे नक्की.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2015 - 2:55 pm | श्रीगुरुजी

>>> त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये जे बिल मांडले ते पास झाले नाही . हा कोणत्याही सरकारचा नैतिक पराभव असतो ( ज्या प्रमाणे कपात सूचना ) त्याला अनुसरून त्यांनी राजीनामा दिला होता !

केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत 'जनलोकपाल' विधेयक मांडलेच नव्हते. त्यामुळे ते मंजूर किंवा नामंजूर होण्याचा प्रश्नच नाही. उपराज्यपालांनी हे विधेयक मांडण्यास परवानगी दिलेली नव्हती. त्यांच्याशी बोलून मार्ग काढण्याऐवजी केजरीवालांनी 'जनलोकपाल' विधेयक मांडावे का नाही या विषयी सभागृहात मतदान घेतले होते. काँग्रेस व भाजपने त्याला विरोध केला.

केजरीवालांना खरोखरच 'जनलोकपाल'विषयी प्रामाणिक कळकळ असती तर त्यांनी ते विधेयक मांडू का नको असा ठराव मताला टाकण्यापेक्षा थेट विधेयकच सभागृहात मांडून विधेयकावर मतदान घ्यायला हवे होते. सभागृहात विधेयक मांडू का नको या प्रश्नावर जरी सरकारचा पराभव झाला होता, तरी त्या मताकडे दुर्लक्ष करून ते विधेयक सभागृहात मांडायला कोणतीही कायदेशीर अडचण नव्हती कारण 'विधेयक मांडू का नको' या प्रश्नावरचे मतदान आणि प्रत्यक्ष विधेयकावरचे मतदान हे दोन वेगळे ठराव आहेत.

परंतु तसे न करता त्यांनी थेट राजीनामा देऊन टाकला कारण त्यांना पलायन करण्यासाठी कारण हवेच होते. ते कारण आयतेच मिळाले. त्यांना खरं तर आपले सरकार बरखास्त करायला लावून हुतात्मा व्हायचे होते व सहानुभूती मिळवायची होती. प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी पदपथावर झोपून आंदोलन करून त्यांनी केंद्र सरकारच्या हातात कोलीत दिलेही होते. परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांचा हुतात्मा होण्याचा डाव उधळून लावल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे शेवटी विधेयक मांडू का नको या प्रश्नावरील मतदानाचे निमित्त करून त्यांनी पलायन केले.

भविष्यात सत्ता मिळाली तर ते पुन्हा एकदा अगदी असेच करतील याची खात्री आहे.

आजानुकर्ण's picture

6 Feb 2015 - 12:23 am | आजानुकर्ण

काळ्या पैशाबाबत निवडणुकीच्या काळातील मोदींची वाक्ये या 'म्हणी' होत्या म्हणे! http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EC9BL

उद्या 'अच्छे दिन आनेवाले है!' ही देखील म्हण असल्याचे कळाल्यास नवल वाटणार नाही.

बाकी आप आणि भाजप म्हणजे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती झाली आहे.

पिंपातला उंदीर's picture

6 Feb 2015 - 8:57 am | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

ज्योति अळवणी's picture

6 Feb 2015 - 12:24 am | ज्योति अळवणी

विषय गहन आहे... आप 'ण' विचार करण्यासारखा. पण बी. जे. पी. मारून नेईल बहुतेक

सुनील's picture

6 Feb 2015 - 8:36 am | सुनील

वॉट्सअ‍ॅपवर फिरत आलेला विनोद -

दिल्लीतील सभेनंतर मोदी जमावला उद्देशून विचारतात, "किसे वोट करेंगे?"
जमाव एकसुरात म्हणतो, "आपको"

बॅटमॅन's picture

6 Feb 2015 - 1:33 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =))

नांदेडीअन's picture

6 Feb 2015 - 9:18 am | नांदेडीअन

namorugna

विशाल चंदाले's picture

6 Feb 2015 - 11:14 am | विशाल चंदाले

*lol* *LOL*

केजरीवालांना कोण कोण पाठिंबा देत आहेत? मला वाटते की मला न आवडणार्‍या लोकांचे 'हूज हू' अशी ही यादी असेल.

१. असदुद्दिन ओवेसी (एम.आय.एम)
२. ममता बॅनर्जी
३. डावे पक्ष
४. मार्कंडेय काटजू

इतरही आहेतच.पण सगळ्या लिंका शोधायला आता वेळ नाही आणि उत्साह त्याहूनही नाही. तरीही आणखी एका लिंकेशिवाय हा प्रतिसाद पूर्ण होऊच शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरसंबंधीचा पाकिस्तानातील मंत्री बरजीस ताहिर म्हणतो की भारताने आम आदमी पक्षाचे म्हणणे ऐकावे आणि काश्मीरात सार्वमत घ्यावे.

बाकी कोणीही काहीही म्हटले तरी असल्या पक्षाला पाठिंबा देऊन मी माझ्याच देशाच्या इंटरेस्टविरूध्द काहीही करूच शकणार नाही.

दिल्ली निवडणुकांचा निकाल काहीही लागला तरी आम आदमी पक्ष या बोगस प्रकाराविरूध्दचा माझा लढा चालूच राहिल.

क्लिंटन's picture

6 Feb 2015 - 4:28 pm | क्लिंटन

या लीस्टमध्ये आता जामा मशिदीच्या सय्यद अहमद बुखारीचाही समावेश झाला आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2015 - 5:54 pm | श्रीगुरुजी

>>> या लीस्टमध्ये आता जामा मशिदीच्या सय्यद अहमद बुखारीचाही समावेश झाला आहे.

वा! आआपच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेलाय.

१९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या बरोबर ७ दिवस आधी वि.प्र.सिंग बुखारीला भेटायला गेले होते. त्यांच्या भेटीनंतर लगेचच बुखारीने एक पत्रक काढून देशभरातील मुस्लिमांना जनता दलाला मत देण्याचे आवाहन केले होते. आताही अगदी तसंच घडतंय. आआपचे संजय सिंग बुखारीला गुपचूप भेटून आल्याचं सांगितलं जातंय. नंतर लगेचच बुखारीचा आआपच्या बाजूने फतवा आलाय.

वि.प्र.सिंगही केजरीवालांसारखेच नाटकी आणि प्रामाणिकपणाचा व स्वच्छतेचा बुरखा पांघरलेले होते. केजरीवाल त्याच मार्गाने चाललेले आहेत.

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 11:41 am | ग्रेटथिंकर

बुखारीने आआपला पाठिंबा दिलाय याची पोटदुखी कशाला? बीजेपीलाही उपद्रवी डेरा सच्चावाल्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

गुरुजि आणि क्लिंटन तुम्हि इतके मुद्देसुद सगळ एक्सप्लेन केलय. त्या आप कडे काहि अजेंडा तरी आहे का ? ते फक्त फुकट वाटण्याच्या गोष्टि करतायत. खेजरीवाल पे़क्षा काँग्रेस परवडेल दिल्ली कराना...

क्लिंटन's picture

6 Feb 2015 - 4:54 pm | क्लिंटन

खेजरीवाल पे़क्षा काँग्रेस परवडेल दिल्ली कराना...

याच चर्चेत मी लिहिले पण आहे की शीला दिक्षित यांच्या सरकारने दिल्लीसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या.आजही अजय माकन हे चांगले मुख्यमंत्री बनू शकतील हेच माझे मत आहे-- किरण बेदींपेक्षाही.मी केंद्रात भाजपला समर्थन देत असलो म्हणून राज्यातही भाजपलाच समर्थन द्यायला हवे असे नक्कीच नाही. विशेषतः १९९३ ते १९९८ या काळात दिल्लीत भाजपच्या मदनलाल खुराणा आणि साहिबसिंग वर्मा यांनी फारसे काही केले नसताना आणि दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये भाजपचा कारभार उत्तम आहे असे कोणी म्हणू शकेल असे वाटत नाही अशी परिस्थिती असताना.मी दिल्लीत मतदार नाही म्हणून या गोष्टीचा तितका विचार केलेला नाही पण कदाचित मी दिल्लीत मतदान करू शकत असतो तर मी भाजपलाच मत दिले असते का या प्रश्नाचे उत्तर १००% हो असे नक्कीच देऊ शकत नाही. पण आम आदमी पक्षाचा मात्र अगदी कडाडून विरोधच आहे :)

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 11:46 am | ग्रेटथिंकर

काँग्रेसचा वोट शेअर वाढण्याचा फटका आपला बसेल त्यामुळेच इथले भाजपेयी काँग्रेसचीही तळी उचलत आहेत :ROFL:

नांदेडीअन's picture

6 Feb 2015 - 6:22 pm | नांदेडीअन

3.00 pm
I Appeal all Muslims to support AAP candidates & help in forming a secular Govt in Delhi.
- Imam Bukhari

4:00 pm
We condemn and reject support of Shahi Imam.
We don't support the ideology of Imam Bukhari.
He had invited Pakistan Prime Minister Nawaz Sharif and not Indian Prime Minister Narendra Modi for his son's anointment.
- Aam Aadmi Party

On the other hand, you would have seen BJP seeking support of Baba Ram Rahim, Maulana Kalbe Jawwad and Sonia Gandhi meeting Imam Bukhari. (in the past)

This is the difference !
Proud to be an AAPtard !

आताच बुखारींच्याकडून वक्तव्य आले आहे कि आप ने असा सपोर्ट मागितला होता.
खरे खोटे कुणास ठाऊक.

नांदेडीअन's picture

6 Feb 2015 - 6:45 pm | नांदेडीअन

भाजपानेच डिल केलेली होती म्हणे बुखारीसोबत.
पण आपने यॉर्कर बॉलवर सिक्सर लगावला.
खरे खोटे कुणास ठावूक.

सव्यसाची's picture

6 Feb 2015 - 6:52 pm | सव्यसाची

आप ला मतदान करा आणि धर्मनिरपेक्ष सरकार बनवा असे आवाहन केले गेले.
भाजप यामध्ये कुठे मध्ये येतो हे कळले नाही.

तुमच्यासारखेच ‘खरे खोटे कुणास ठावूक’ म्हणालो ना.

सव्यसाची's picture

6 Feb 2015 - 7:02 pm | सव्यसाची

तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. माझ्या प्रतिसादातील पहिले वाक्य हे एका बातमी वरून आले आहे. जमले तर इंग्रजी माध्यमांमध्ये ही बातमी आपण पाहू शकता. मी काही माझ्या मनचे करून नाही सांगितले.
'खरे खोटे कुणास ठाऊक' असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा नेमके कोण खरे बोलतोय याचा उलगडा न झाल्याने म्हणालो.
तुम्ही जे भाजप बद्दल म्हणालात त्याची मला कुठलीही बातमी सापडली नाही. कमीत कमी 'अधिकृत स्रोत' वगैरे च्या नावाखाली ज्या बातम्या येतात त्यामध्येही सापडले नाही. मला अपेक्षा होती कि तुम्ही म्हणाल कि आताच बातमी आलीय किंवा टीवी वर पहा वगैरे. पण 'खरे खोटे कुणास ठाऊक' असे का म्हणता आहात ते काही कळले नाही.
जर तुमच्याकडे कुठली लिंक असेल तर मला द्या जी सांगते कि भाजपने डील केले आहे. खरे खोटे नंतर कळेलच.

नांदेडीअन's picture

6 Feb 2015 - 7:07 pm | नांदेडीअन

अहो, इतका मोठा पोपट झाल्यावर बुखारींकडून दुसरे कोणते स्टेटमेंट अपेक्षित होते तुम्हाला ?

ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन आप आणि बुखारीबद्दल बोलत होते, त्यावरून निदान मला तरी असेच वाटते की जनतेमध्ये एक चुकीचा संदेश पसरवण्यासाठी बुखारीला असे वक्तव्य करण्यासाठी भाजपानेच सांगितले असावे.
अर्थात हे माझे मत आहे, कोणत्याही न्यूज चॅनलवर वगैरे आलेले नाही.
भाजपावर इतका विश्वास तर आहेच मला !

ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन आप आणि बुखारीबद्दल बोलत होते, त्यावरून निदान मला तरी असेच वाटते की जनतेमध्ये एक चुकीचा संदेश पसरवण्यासाठी बुखारीला असे वक्तव्य करण्यासाठी भाजपानेच सांगितले
असावे.

अरुण जेटली यांनी, माझ्या माहितीप्रमाणे, पहिल्यांदा उत्तर दिले. पण त्यात फक्त हाच मुद्दा नव्हता.
आता काही वेळानी सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. कॉंग्रेस ने पण दिली आहे.

भाजपने बुखारींना सांगितले आणि बुखारींनी ते ऐकले हे आश्चर्यजनक आहे.
बाकी आपली मते बनवण्याचा आपल्याला अधिकार आहेच. असो.

क्लिंटन's picture

6 Feb 2015 - 6:40 pm | क्लिंटन

अहो हे मराठी संकेतस्थळ आहे. गरजेपुरते इंग्लिश वापरायला काहीच आक्षेप नसावा पण सगळा प्रतिसादच इंग्लिशमध्ये? आणि तो पण स्वत:चा असेल असे वाटत नाही.भाषा जरा फेसबुकी वाटत आहे. आणि वरही असाच कुठलाकुठला फॉरवर्ड झालेला फोटो डकविला आहात. असो.

आआपने बुखारींचा पाठिंबा नाकारला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरीही काही मुद्दे उपस्थित होतातच.

१. मुळात बुखारींना आआपला पाठिंबा द्यावासा वाटला.म्हणजे बुखारी ज्या तत्वांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी आआपमध्ये काहीतरी 'आशेचा किरण' नक्कीच दिसला.
२. डिसेंबर २०१३ च्या निवडणुकांपूर्वी हेच केजरीवाल तस्लीमा नसरीन यांना ठार मारणार्‍याला बक्षिस द्यायला तयार असलेल्या मौलाना तौकिर रझा खान याला का बरे भेटले असावेत?

की आपलं 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट' म्हणून काहीही खपून जातं?

नांदेडीअन's picture

6 Feb 2015 - 6:48 pm | नांदेडीअन

(परत एकदा) सुदैवाने देवाने स्वतःचे मत स्वतः बनवण्याएव्हढी सुबुद्धी दिली आहे.
मीच लिहिलेले आहे हे. :)

२००४ मध्ये बुखारींनी भाजपाला सपोर्ट दिला होता तेव्हा तेसुद्धा काही लोकांसारखे ‘स्वयंघोषित’ देशभक्त असतील ना ? ;)
बरोबर आहे, पब्लिक मेमरी नक्कीच शॉर्ट असेल.

क्लिंटन's picture

6 Feb 2015 - 7:31 pm | क्लिंटन

२००४ मध्ये बुखारींनी फतवा वगैरे जारी केला नव्हता.पूर्वी मलाही तसे वाटत होते.पण २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी जुने संदर्भ बघितले तेव्हा द हिंदूमधील हा दुवा मिळाला. त्यात बुखारीने फतवा जारी केल्याचे नाकारले आहे आणि भाजपमधील मतपरिवर्तनाचे स्वागत केले आहे. हे मतपरिवर्तन म्हणजे २००२ च्या काळात तोगाडिया स्टाईल प्रवृत्ती बेफाम दौडत होत्या त्यांना वाजपेयींनी विरोध करायचा प्रयत्न केला (त्यात यश कितपत आले ही गोष्ट वेगळी) हे असावे हा माझा तर्क. आणि त्या कारणासाठी वाजपेयींना मी पण नक्कीच श्रेय देतो. पण याव्यतिरिक्त जर का भाजपने आणखी काही करायचा प्रयत्न केला असेल तर त्याला माझा नक्कीच विरोध आहे.

एकूणच काय तर तुम्ही 'आपटर्ड' असल्याचे स्वतःच मान्य केले आहे.सर्व आपटर्डची जी लक्षणे आहेत ती तुमच्यात अगदी १००% आहेत.एकतर सर्वात १००% योग्य कुठलाही पक्ष मिळणे शक्य नाही.२००४ मध्ये भाजपचा पराभव झाला, बुखारीने भाजपाविषयी काही चांगले बोलले हे सगळे मान्य.पण भाजप जे एकूण पॅकेज देणार होते त्यात बुखारीमुळे एक डाग नक्कीच लागला पण इतर चांगल्या गोष्टी (वाजपेयींचे नेतृत्व, १९९९-२००४ या काळात अर्थव्यवस्था चांगली सांभाळणे इत्यादी) होत्या त्याचे महत्व कमी होत नाही. तुमच्या आम आदमी पक्षाचे नक्की काय पॅकेज आहे हे विचारल्यानंतर एकतर आम्ही तेवढे स्वच्छ आणि बाकी सगळे जग भ्रष्ट, प्रश्न विचारणारा अंबानी-अडानीचा एजंट किंवा भाजपच्या पेरोलवरचा इत्यादी इत्यादी बकवासच पुढे येते. म्हणजे तुमचे पॅकेज नक्की काय याचा तुम्ही पत्ता १००% कधीच लागू देणार नाही आणि तुमच्या शब्दावर सगळ्या जगाने विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करणार.जे काही थोडे थोडके पॅकेज समोर दिसते त्यात त्या सबसिड्या आणि आयुष्यात पूर्ण न करता येण्यासारखी आश्वासने!!अशा वेळी इतर काहीच नसेल तर बुखारीचा पाठिंबा हा डाग नक्कीच मोठा दिसतो. कदाचित तो तितका मोठा नसेलही. पण तो मोठा दिसतो याचे कारण आआप समर्थकांचा आक्रस्ताळेपणा.

तेव्हा परत एकदा--

१. तुमचे नक्की पॅकेज काय?
२. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात असा तुमचा दावा असेल तर ते कृतीतून सिध्द करायची जबाबदारी तुमचीच.
३. आणि तुम्हाला प्रश्न विचारले तर इतरांकडे बोट दाखवून--त्यांच्यावरही डाग आहेत असे म्हणता त्याला काहीच अर्थ नाही. डाग सगळ्यांवर आहेत.पण प्रत्येक पक्ष नक्की काय देत आहे त्या प्रमाणात डाग किती लहान/मोठे आहेत हे सगळ्यांनाच दिसते.तुम्ही मात्र तुमच्यावरील डाग इतरांनी दाखविले की तुम्ही नक्की काय देऊ शकत आहात हे अंबानी-अडाणींना मध्ये न आणता दाखविलेत तर इतर पक्षांप्रमाणे तुमचाही विचार करता यायला काहीच हरकत नाही.पण तसे करताना आअप समर्थक कधीच दिसत नाहीत.

असो. रामदास स्वामींनी जी अनेक लोकांची लक्षणे लिहिली आहेत त्याप्रमाणे मला पण आपटर्ड लक्षणे नक्कीच लिहिता येतील :)

अहो केजरीवाल आहेतच तितके सरळ... मी तर काही आप वाल्यांना हे म्हणताना ऐकलय की केजरीवाल सत्तेत आले की ते तारक मेहताचा चष्मा सुद्धा सुलटा करणार आहेत.
:)

आप वाल्यांना प्रश्न विचारायचे नसतात कारण उत्तरा ऐवजी फक्त आक्रस्ताळे पणा मिळतो. कारण आरोप करणार्‍यांना )विशेषतः 'आप' ला) तो सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. उद. गडकरी वि. खुजलीवाल

अर्धवटराव's picture

6 Feb 2015 - 9:39 pm | अर्धवटराव

हे आशुतोष वगैरे मंडळींनी केजरीसाहेबांचा परत पोपट करण्याचा चंग बांधलाय का न कळे. सपोर्ट नाकारला म्हणजे? मागे काँग्रेसचा सपोर्ट नाकारला तसाच कि काय... :(
केजरीसाहेब गुजरातचं मुल्यमापन करायला गेले असताना दिल्लीस्थीत भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेणारे हेच महाभाग होते. केजरीसाहेबांना अडचणीत आणायची एकही संधी हे साहेब सोडत नाहि.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:00 pm | श्रीगुरुजी

>>> केजरीसाहेब गुजरातचं मुल्यमापन करायला गेले असताना दिल्लीस्थीत भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेणारे हेच महाभाग होते. केजरीसाहेबांना अडचणीत आणायची एकही संधी हे साहेब सोडत नाहि.

हेच केजरीवाल गुजरातचे तथाकथित मूल्यमापन करण्याच्या दौर्‍यावर असताना कोणालाही न कळविता, कोणतीही पूर्वसूचना न देता, पूर्ववेळ न ठरविता अचानक गांधीनगरला मोदींच्या निवासस्थानी गेले आणि मला लगेच मोदींना भेटून त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे माझी त्यांच्याशी लगेच भेट घालून द्या असा हट्ट धरून बसले. पूर्ववेळ घेतल्याशिवाय मोदींना असे भेटता येणार नाही व तुम्ही पूर्ववेळ घेऊन मग भेटा असे सचिवांनी सांगताच लगेच, 'मोदी मला घाबरले' अशी आत्मप्रौढी यांनीच मिरवायला सुरूवात केली होती.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:04 pm | पिंपातला उंदीर

अमित शाह अजूनही तडीपार आहेत का हो ? टोमणा नाही मारत आहे . खर खर विचारत आहे . गुगलून बघितल पण कळत नाहीये नीट .

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:06 pm | श्रीगुरुजी

माहिती नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केल्याचे वाचले होते.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2015 - 8:43 pm | श्रीगुरुजी

>>> This is the difference !
Proud to be an AAPtard !

यालाच 'तू मारल्यासारखे कर', 'मी रडल्यासारखे करतो' प्रवृत्ती म्हणतात. बुखारी गेलाबाजार उगाच कोणालाही पाठिंबा देत नाही. १९८९ ला वि.प्र.सिंगांना दिलेल्या पाठिंब्याचे गुपित वि.प्र.सिंगांनी मुफ्ती मोहमंद सईदला गृहमंत्री केल्यावर लक्षात आले होते. संजय सिंह बुखारीला गुपचूप भेटून आल्याचे दुपारी काही वाहिन्यांवर सांगत होते. बुखारीने पाठिंबा जाहीर करायचा आणि नंतर प्रकरण तापणार असे दिसताच आआपने घाईघाईने 'आम्हाला नको बाबा तुमचा पाठिंबा' म्हणून 'होलिअर दॅन दाऊ' असा आव आणून आपण किती निधर्मी आहोत असा भास निर्माण करायचा. दरम्यानच्या काळात बुखारीकडून मुस्लिमांनी कोणाला मत द्यायचे याविषयी योग्य तो संदेश गेलेला असतो आणि इकडे हे तावातावाने पाठिंबा नाकारून दोन्ही दगडांवर पाय ठेवणार आणि तिसरीकडे आपटार्ड हा भाजपचाच डाव आहे असा प्रचार सुरू करणार.

वा! आवडलं आपल्याला हे टेक्निक.

बादवे, डिसेंबर २०१३ मध्येही केजरीवालांनी अशाच एका मौलवीचा आशिर्वाद घेतला होता हे आठवत असेलच.

पिंपातला उंदीर's picture

6 Feb 2015 - 9:17 pm | पिंपातला उंदीर

@श्रीगुरुजी- डेरा सच्च्या च्या राम रहीम ( messenger of god वाला) ने ही बीजेपी ला पाठिंबा जाहीर केलाय की.. आणि बीजेपी ने तो नाकारलाही नाहीये.

हरियाणा निवडणुकीच्यावेळी देखील त्यांनी उघड पाठिंबा दिला होता.

मुसलमान मते किती भाजप ला मिळातात हे भाजप ला पण माहिती आहे आणि आप ला पण.
त्यासाठी आदल्या दिवशी आवर्जुन पाठिंबा मागण्यासाठी कोणी आपकडुन जाईल असे वाटत नाही.
जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ?
कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते.

बाकी आप बद्दल येथे लिहिले आहे.. म्हणजे मी आपटर्ड (नविन शब्द माहिती झाला मला) असे समजु नये.
मला एकाच बाजुने (आणि विशेष करुन राजकारणात) विचार करुन आपलेच मत कसे बरोबर आणि इतर कसे चुक असे आवडत नाही.

आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच..

असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले.

भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते.

हा या धाग्यावरील शेवटचा रिप्लाय..

अवांतर :
आवडते ४ राजकारणी
१. शरद पवार २. बाळाअसाहेब ठाकरे ३. अटलबिहारी वाजपेयी ४ अरविंद केजरीवाल.
येथे देण्याचे कारण श्री गुरजी याचे मागील दोन्ही धागे खुप एकांगी आणि फक्त भाजपच कसे बरोबर काही ही होउद्या तिकडे असे असल्याने वाईट वाटते. चुक ती चुक आणि पुढच्याकडे इतक्या तुच्छ नजरेने पाहणे योग्य नाही असे मला वाटते.
असो. जसा भाजप तसेच समर्थक

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 12:54 pm | श्रीगुरुजी

>>> मुसलमान मते किती भाजप ला मिळातात हे भाजप ला पण माहिती आहे आणि आप ला पण.
त्यासाठी आदल्या दिवशी आवर्जुन पाठिंबा मागण्यासाठी कोणी आपकडुन जाईल असे वाटत नाही.

सर्व मुस्लिमांची मते आआपलाच मिळत/मिळणार असल्याने आआपला बुखारीच्या पाठिंब्याची गरजच नाही असा तुमचा गैरसमज दिसतोय. मुस्लिमांच्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. त्यात काँग्रेस आहे, आआप आहे, डावे पक्ष आहेत, बसप आहे, सप आहे, संजद आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे ... व अत्यल्प प्रमाणात भाजपसुद्धा आहे. भाजपला मुस्लिमांच्या एकूण मतांपैकी ५-६ टक्के मते नक्कीच मिळतात. ती मते पक्षाला फारशी मिळत नसून उमेदवाराच्या व्यक्तिगत संबंधांमुळे मिळतात. उर्वरीत अंदाजे ९५ टक्के मतांपैकी काँग्रेसचा वाटा किमान ३०-४० टक्के मतांचा असतो. उरलेली अंदाजे ६० टक्के मते इतर निधर्मांध पक्षात विभागली जातात. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ८ पैकी ४ आमदार मुस्लिम मतदार बहुसंख्य आलेल्या मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी दिल्लीतल्या एकूण मुस्लिम मतांपैकी आआपचा वाटा २५-३० टक्के मते असेल. उर्वरीत मुस्लिम मते काँग्रेस, बसप, डावे पक्ष, संजद, राष्ट्रवादी इ. निधर्मांध पक्षात विभागली जातील.

आआपने बुखारीचा पाठिंबा आवर्जून मागण्याचे हेच ते कारण. आआपच्या अलका लांबा २-३ दिवसांपूर्वी बुखारीच्या भावाला भेटून आल्या आणि लगेचच बुखारीने फतवा काढला हा काय योगायोग होता का? जी मुस्लिम मते काँग्रेस, बसप, डावे पक्ष इ. पक्षांना जातील ती 'आप'ल्याकडे वळविण्यासाठीच हा सारा खटाटोप होता. पण हा फतवा बॅकफायर होईल हे लक्षात येताच घाईघाईत बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको अशी संभावित भूमिका आआपने घेतली. तोपर्यंत मुस्लिम मतदारापर्यंत योग्य तो आदेश पोहोचलेला होता.

>>> जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ?

वर सविस्तर उत्तर दिले आहे. यातली ९० टक्क्यांहून अधिक मते जरी भाजपला मिळत नसली तरी आआआप हा या मतांचा सोल कस्टोडिअन नाही. त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. यातला बहुसंख्य वाटा आपल्याच पदरात यावा यासाठी ही सारी नौटंकी. गुपचूप पाठिंबा मागणे आणि नंतर जाहीररित्या पाठिंबा नाकारणे ही नौटंकी केजरीवालांच्या नाटकी स्वभावाला साजेशीच आहे.

>>> कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते.

आआपवाले तेच करत असतात. काल वर्तमानपत्रात भाजपने दिलेल्या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आणि आआपची जाहिरात म्हणजे उल्लंघन नाही हा आआपचा दावा आहे. या उदाहरणावरून हे लक्षात येईल.

>>> आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच..

आआपचे राजकारण स्वच्छ नाही. संशयास्पद देणग्यांवरून हे स्पष्ट आहे.

>>> असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले.

किरण बेदी अनेक दिवसांपासून भाजपत यायच्या तयारीत होत्या. निवडणुकीत किरण बेदींचा दिल्लीत फायदा होईल असे वाटले म्हणून त्यांचा अधिकृत प्रवेश झाला.

>>> भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते.

अखिल ब्रह्मांडात आम्हीच तेवढे स्वच्छ, नीतिमान, पारदर्शक आणि इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अनीतिमान, छुपे व्यवहार करणारे या आआपच्या अहंकाराबद्दल आपले काय मत आहे?

>>> असो. जसा भाजप तसेच समर्थक

असो. जसा आआप तसेच समर्थक.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 12:58 pm | पिंपातला उंदीर

@गुर्जी - डेरा सच्चा सौ च काय हो . त्याच्यावर तर खुनासारखे आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत . उत्तर टाळत जाऊ नका हो असे .

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:03 pm | श्रीगुरुजी

मग तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याचा फतवा काढलेल्या मौलाना ताकिर रझाच्या पाठिंब्याचं काय? एमआयएम च्या ओवेसीच्या पाठिंब्याचं काय? आणि दिल्लीत ३००० शिखांच्या हत्येतले प्रमुख आरोपी असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्याचं काय? ते बोला ना आधी.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:06 pm | पिंपातला उंदीर

म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस , भाजप , आप सगळेच एकाच थाळीचे चट्टे बट्टे . सब घोडे बारा टक्के . काय म्हणता ? *lol* *LOL*

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:15 pm | पिंपातला उंदीर

गुर्जी बोलेनात , गुर्जी उत्तर देईनात . (चाफा बोलेना च्या चालीवर वाचावे )

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:22 pm | श्रीगुरुजी

इतके उतावीळ होउ नका. जरा संयम ठेवा. लगेच निष्कर्ष काढून मोकळे होऊ नका. केजरीवालांसारखे जजमेंटल होऊ नका. मोदींना भेटायला गेल्यावर त्यांना पूर्ववेळ ठरवून या असे सांगितल्यावर लगेच 'मोदी मला घाबरले' असा सोयिस्कर निष्कर्ष काढून ते मोकळे झाले होते.

हा तुमाचा एक ओळीचा प्रतिसाद १३:१५ चा आहे. माझा प्रतिसादही १३:१५ आहे हे लक्षात आलं असेलच.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:15 pm | श्रीगुरुजी

हे मी आधी पण एका प्रतिसादात लिहिले होते. आआप हा पक्ष वर्तणुकीच्या बाबतीत भारतातल्या इतर कोणत्याही पक्षासारखाच आहे. परंतु आपटार्डना हे पटत नव्हते. आआपचे वेगळेपण फारसे नाही. फरक एवढाच आहे की आआप नेते अत्यंत अहंमन्य असून फक्त आपणच अखिल ब्रह्मांडातले एकमेव स्वच्छ, प्रामाणिक व पारदर्शी आहोत व इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अप्रामाणिक आणि अपारदर्शी आहेत या भ्रमात आहेत. कमालीचा नाटकीपणा हे आआपचे दुसरे वेगळेपण आहे.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:17 pm | पिंपातला उंदीर

Party with difference बद्दल काय मत आहे तुमच ? दुसर्यांच्या पक्षावर लई टीका करून झाली . जरा आता आपल्या पक्षावर बोला की

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:24 pm | श्रीगुरुजी

>>> Party with difference बद्दल काय मत आहे तुमच ? दुसर्यांच्या पक्षावर लई टीका करून झाली . जरा आता आपल्या पक्षावर बोला की

कोणत्या मुद्द्यावर बोलू ते सांगा.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:34 pm | पिंपातला उंदीर

हेच भाजप मधले भ्रष्टाचारी नेते , दिल्ली महानगर पालिकेतला भाजप चा भ्रष्टाचार , सीमेवर वर मारले गेलेले अनेक भारतीय जवान , (तरी नवाझ शरीफ यांच्या आईला साडी पाठवणे ), चीन ला अटकाव करण्यात आलेलं अपयश , फ़दवणिस यांचे खेडेकर सोबत स्टेज शेयर करण , विविध पक्षातून आलेले बिभीषण , काळा पैसा बाबत मारलेली थाप , स्वतःच्या राज्यातून तडीपार असणारा गुन्हेगारी प्रवृतीचा राष्ट्रीय अध्यक्ष , ई हूश . अजून लई आहे . तूर्त या मुद्द्यांची उत्तर द्या . मग अजून मुद्दे सांगतो

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:39 pm | श्रीगुरुजी

यातल्या बहुतेक गोष्टींचा दिल्ली विधानसभा निवडणुकीशी दुरूनही संबंध नाही.

या सर्व मुद्द्यांवर लोकसभा निवडणुकीच्या काळात व नंतरही महाराष्ट विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक धाग्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे. पुन्हा पुन्हा तेच टंकायची माझी इच्छा नाही. अर्थात तुम्ही काहीही सोयिस्कर निष्कर्ष काढायला मोकळे आहात.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:42 pm | पिंपातला उंदीर

सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता दरवेळेस गुरुजी.

भाजपचे दिल्लीतील महत्वाचे नेते . अपाध्याय साहबे, यांबद्दल केजरीवल यांनी पुरावा दाखवला. २४ तासात राजनिती सोडणार म्हणाले होते ते अजुन सोडलेली नाही.

केजरीवाल यांनी दाखवुन दिले की, मिटर जे वाटप झाले आहेत आणि ज्यात फॉल्टी मिटर जास्त आहेत ते सप्लाय करणारी कंपाणी उपाध्याय यांची होती. आणि उपाध्याय म्हणाले की ती मेडीया कंपणी आहे तर पुर्ण टॅक्स रेकॉर्ड च काढुन दाखवले .. आत हे ही निवडनुकीला लागु नाहीये का ?

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 5:16 pm | श्रीगुरुजी

>>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे नेते . अपाध्याय साहबे, यांबद्दल केजरीवल यांनी पुरावा दाखवला. २४ तासात राजनिती सोडणार म्हणाले होते ते अजुन सोडलेली नाही.

केजरीवाल काय गुप्तचर खात्यात आहेत का ते न्यायालयात न्यायाधीश आहेत? ते वाटेल त्या गोष्टी पुरावा म्हणून दाखवतील. त्याला काय महत्त्व? आपल्या पुराव्याबद्दल इतकी खात्री असेल तर ते उपाध्यायविरुद्ध खटला का दाखल करत नाहीत? आआपकडे शांतिभूषण, प्रशांतभूषण इ. नामवंत वकील आहेत. खटला दाखल करायला काय अडचण आहे?

बिनबुडाचे आरोप करणे हे केजरीवालांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. याआधी गडकरी आणि इतर काही नेत्यांविरूद्ध बिनबुडाचे आरोप केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटले सुरू आहेत. मे महिन्यात केजरीवाल ६-७ दिवस सरकारी पाहुणचारही घेऊन आले होते. तुरूंगात राहीन पण जामिनावर सुटण्यासाठी कोणताही बाँड लिहून देणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे केजरीवाल ६ दिवसानंतर निमूटपणे बाँड देऊन जामिनावर बाहेर आले होते. अर्थात वाटेल त्या प्रतिज्ञा करणे आणि नंतर नि:संकोचपणे त्या बिनदिक्कत मोडणे हे सुद्धा केजरीवालांचे अजून एक व्यवच्छेदक लक्षण. काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असे जाहीर सांगून शेवटी त्यांनी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला होता.

असो.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 5:21 pm | पिंपातला उंदीर

काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असे जाहीर सांगून शेवटी त्यांनी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला होता.

राष्ट्रवादी चा पाठींबा घेणार नाही , नाही , नाही अशी त्रिवार गर्जना करणारे फेकेंद्र लुबाड्वनिस आठवले

*biggrin*

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 5:37 pm | श्रीगुरुजी

घेतलाच नव्हता. याविषयी सविस्तर चर्चा शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही या धाग्यावर झाली आहे. तिथे वाचा.

बादवे, केजरीवाल हे काही फडणविसांपेक्षा वेगळे दिसत नाहीत. खरं ना?

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 5:45 pm | ग्रेटथिंकर

म्हणजे फडणवीस हे पण पलटणीस आहेत असेच ना! श्रीगुरुजी?

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 6:07 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

मघापासून बरंच काही खरडलंस. इतकावेळ मी दुर्लक्ष करत होतो. मी वर दिलेला धागा वाच. वस्तुस्थिती समजून घे. त्याच्यात तुझे स्वतःचे प्रतिसादही वाच आणि मग लिहायला लाग.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 8:01 pm | पिंपातला उंदीर

गुर्जी केजरीवाल ने कोन्ग्रेस चा पाठींबा मागितला नव्हता . कोन्ग्रेस ने स्वतः दिला . फडवाणीस सरकारला ला राष्ट्रवादी ने असाच दिला . दोन्ही मध्ये गुणात्मक फरक काय ? भाजप ने राष्ट्रवादी चा पाठींबा नाकारला होता का ? त्या धाग्यावर तुमच्या कोलांट्या उड्या लई मजेशीर होत्या . नाशिक मध्ये मनसे ने राष्ट्रवादी ने पाठींबा घेतल्यावर तुम्ही लई बोट मोडली होतीत . काही तरी एक भूमिका
ठेवा ना . बाकी तुम्ही तरी उघड भाजप चे समर्थक आहात . बाकी आम्ही नाही त्या गावचे असे दाखवणार्या छुप्या भक्तांकडून तर उत्तराची पण अपेक्षा नाही

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 5:28 pm | ग्रेटथिंकर

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही असे सांगुण त्यांचाच पाठिंबा बीजेपीने महाराष्ट्रात घेतला हे विसरलात का श्रीगुरुजी?

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 6:11 pm | श्रीगुरुजी

पुरावेच खोटे असतील तर कशी सोडणार राजनीति? आणि खरे असतील तर केजरीवाल त्यांच्यावर खटला का भरत नाहीत? खटल्यात आपण उघडे पडू म्हणूनच कचरत आहेत का?

पुरावे खरे का खोटे ते न्यायालयालाच ठरवू देत ना. केजरीवाल हे ठरविणारे कोण?

नांदेडीअन's picture

7 Feb 2015 - 1:50 pm | नांदेडीअन

असले प्रश्न विचारू नका हो.
मिपा सोडून जातील ते. :P

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 5:18 pm | श्रीगुरुजी

इतक्यात आनंदी होवू नका. केजरीवालांसारखा मी पळपुटा नाही. याउलट तुम्ही आणि अजून एक जण 'आता यापुढे या धाग्यावर लिहिणार नाही' असे लिहूनसुद्धा पुन्हा परत आलेत.

नांदेडीअन's picture

7 Feb 2015 - 5:46 pm | नांदेडीअन

अच्छा, मी परत आलो त्याचा राग आहे का ?
ठीक आहे, इग्नोरास्त्र सोडतो.
बोलू १० तारखेलाच आता. :)

तोपर्यंत जितक्या खोट्या बातम्या शेअर करायच्यात तेव्हढ्या करा.
बेस्ट ऑफ लक. ;)

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 6:03 pm | श्रीगुरुजी

नाही हो. राग कसला. उलट तुमचे सगळे मूद्दे खोडून टाकता आले याचा आनंदच आहे. मला फक्त तुमच्या वागण्यातील विसंगती दाखवून द्यायची होती इतकंच.

>>> तोपर्यंत जितक्या खोट्या बातम्या शेअर करायच्यात तेव्हढ्या करा.

तुमच्याकडच्या खोट्या बातम्या संपल्या की काय?

असो. तुम्हालासुद्धा बेस्ट ऑफ लक.

शेवटचा रिप्लाय म्हंटल होते कारण स्वतातच लिखान चाल उहोते असे वाटले होते.. असो.

>>> जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ?

वर सविस्तर उत्तर दिले आहे. यातली ९० टक्क्यांहून अधिक मते जरी भाजपला मिळत नसली तरी आआआप हा या मतांचा सोल कस्टोडिअन नाही. त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. यातला बहुसंख्य वाटा आपल्याच पदरात यावा यासाठी ही सारी नौटंकी. गुपचूप पाठिंबा मागणे आणि नंतर जाहीररित्या पाठिंबा नाकारणे ही नौटंकी केजरीवालांच्या नाटकी स्वभावाला साजेशीच आहे.

त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत हे आपल्यालच वाटते.. समस्त दिल्लीकरांना पुर्ण बहुमतातील सरकार हवे आहे आणि ते आप किंवा भाजपच देवु शकणार असल्याने, सामान्य जनता या दोन पक्षापैकीच एकाला वोटींग करेन.. इतर पक्षांना वयक्तीक लेवल वरील रिलेशन्शिप असणारेच वोट येथे मिळतील. म्हणुन इतर अपक्ष दिल्लीत जास्त निवडनु येणार नाहीत.
म्हणुन फतवा फक कॉन्ग्रेस ला वोट करु नका म्हंटले असते तरी ती मते आप लाच पडली असती.

>>> कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते.

आआपवाले तेच करत असतात. काल वर्तमानपत्रात भाजपने दिलेल्या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आणि आआपची जाहिरात म्हणजे उल्लंघन नाही हा आआपचा दावा आहे. या उदाहरणावरून हे लक्षात येईल.

हे म्हणने का सु नये, जर निवडनुकीच्या अगोदर टीव्हीवरील जाहिरातींना बंदि असेन.. प्रचार करण्यास बंदि असेन तर पेपर न्युज पण तश्याच न्युज मध्ये आले पाहिजे असे म्हणने आपणास चुकीचे का वाटते ? की अज्ञात सोर्स कडुन पैसा मिळाला म्हणुन कीती ही खर्चकरायचा का ?

>>> आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच..

आआपचे राजकारण स्वच्छ नाही. संशयास्पद देणग्यांवरून हे स्पष्ट आहे.

ज्यांना संशयास्पद देणग्या घ्यायच्या असतात ते नेट वर माहीती देणार कशाला या संशयाच्या. आणि तो चेक जर आप कडे आला असेन तर तोच चेक काय बँकेने भाजप ला दिला काय पुन्हा ?
दुसरा मुद्दा ९५२ (७३ %) करोड रुपये भाजप ला अज्ञात सोर्स कडुन मिळाअले आहेत आणि ८२ % कॉन्ग्रेस ला. तर त्यांना पहिली नैतिकताच नाही आप वर आरोप करण्याची ? त्यांनी आपला शहनिशा करायला काय झाले विचारायचे पण स्वता मात्र कॅश घ्यायची असे का ? मोदींच्या एका सभेला येणारा खर्च महाराष्ट्र निवडनुकीवेळेस ही पाहिला आहे आम्ही. त्यामुळॅ पैसे कोणाकडुन आण इकसे येतात भाजप ला हे येथे सांगण्याची गरज नाही.. कदाचीत त्यामुळॅच भांडवलदारांना सवलती चालु आहेत.

>>> असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले.

किरण बेदी अनेक दिवसांपासून भाजपत यायच्या तयारीत होत्या. निवडणुकीत किरण बेदींचा दिल्लीत फायदा होईल असे वाटले म्हणून त्यांचा अधिकृत प्रवेश झाला.

किरण बेदी असतील हो लाख यायला तयार पण भाजप ने त्यांना मुख्यमंत्री उमेदवार केले आहे, असे आयात उमेदवार भाजप ला का घ्यावे लागतात.. बिन्नी पण त्यातीलच एक. त्यावरुनच कळते आहे, मागिल वेळेस बिन्नीला खतपाणी कुठुन मिळत होते

>>> भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते.

अखिल ब्रह्मांडात आम्हीच तेवढे स्वच्छ, नीतिमान, पारदर्शक आणि इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अनीतिमान, छुपे व्यवहार करणारे या आआपच्या अहंकाराबद्दल आपले काय मत आहे?

आम्ही तेव्हडे स्वच्छ असे आप का माणते कारण ते असे म्हणत नाही प्रत्येक राजकारणी भ्रष्ट आहे, ते म्हणतात भाजप आणि कॉन्ग्रेस अनेक भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालते.. नावे सांगायची गरज नसावी असे वाटते. आणि त्यामुळे आप स्वताला स्वच्छ समजते. भगोडा चे जेव्हडे भांदवल केले गेले त्याच अर्थ ते स्वच्छ नव्हते असे लावता येणार नाही.

>>> असो. जसा भाजप तसेच समर्थक

असो. जसा आप तसेच समर्थक.

मी तुमच्या मागच्या धाग्यावर राष्ट्रवादी च्या बाजुने लिहिले होते.
मी एकदा भाजप ला .. एकदा शिवसेनेला ही वोट केले आहे.. कारण ते सदश्य कसे आहेत यावरुन मी वोट करतो.
मागील वेळेस ही मी भाजप लाच वोट करणार होतो . पण आमच्या चिंचवड विधानसभेत भाजप ने आयात उमेदवार राष्ट्रवादीचा घेतला आणि लोकसबेह्ला ज्या विरुद्ध मत दिले त्यांनाच मत कसे द्यायचे म्हणुन आणि ५००० रुपये धुडकावुन मी राष्ट्रवादीला वोट केले हरणार होते ते तरी.
त्यामुळॅ कोणाचे समर्थक असण्यापेक्षा स्वच्छ आणि सरळ राजकारणाला माझा पाठिंबा आहे. म्हणुन दिल्लीमध्ये आप ला माझा पाठिंबा आहे.

फक्त भाजपचीच पाठराखन किंवा फक्त आप विरोध (क्लिंटन सारखा मला जमत नाहि .

---
जाता जाता..
दिल्लीत भाजप किंवा आप कोणी ही जिंकले तरी सक्षम विरोधी पक्ष ही यापैकी एकास होता येइल त्यामुळॅ दिल्लीची कामे होतील असे वाटते.
आता पर्यंत भाजप गेल्या १६ वर्षाचा हिशेब ठेवत आहे.. पण त्याच दिल्ली महानगरपालिकेत भाजप सत्तेवर होता आणि तो हिशेब त्यांचा ही थोड्या फार प्रमाणाअत आहे.. असो तरीही शुभेच्छा .

तसे ही किरण बेदी काय अणि अरविंद केजरीवाल काय दोघे ही स्वच्छ राजकारण करतील आणि दिल्ली पुढे न्हेतील फक्त मोदी प्रतिमा किरण बेदींना आता सारखे झाकोळुन टाकणार नाहीत हे पाहिले पाहिजे.

आप सत्तेत येवो आणि जे लोक रस्त्यावर आंदोलन करणारे होते ते सत्तेत येवुन मुजोर सत्ताशीशांना जागा दाखवावी असे मनोमन वाटते.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 5:31 pm | श्रीगुरुजी

>>> त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत हे आपल्यालच वाटते.

मग तुम्हाला काय वाटते? मुस्लिमांची १००% मते फक्त आआपलाच मिळणार अशी समजूत आहे काय तुमची?

>>> समस्त दिल्लीकरांना पुर्ण बहुमतातील सरकार हवे आहे आणि ते आप किंवा भाजपच देवु शकणार असल्याने, सामान्य जनता या दोन पक्षापैकीच एकाला वोटींग करेन.. इतर पक्षांना वयक्तीक लेवल वरील रिलेशन्शिप असणारेच वोट येथे मिळतील. म्हणुन इतर अपक्ष दिल्लीत जास्त निवडनु येणार नाहीत.

परत एकदा चुकीची समजूत. आआप व भाजप व्यतिरिक्त इतर अनेक पक्ष रिंगणात आहेत. बसप व काँग्रेस प्रत्येकी ७० जागा लढवित आहेत. डावे पक्ष १० जागा लढवित आहेत. प्रत्येक पक्षाचे स्वतःचे बेसिक मतदार असतात. ती मते त्या पक्षाला मिळतातच.

>>> म्हणुन फतवा फक कॉन्ग्रेस ला वोट करु नका म्हंटले असते तरी ती मते आप लाच पडली असती.

म्हणून तर आआपने अलका लांबांना बुखारीच्या भेटीला पाठवून फतवा जाहीर करायला लावलेला दिसतोय.

>>> हे म्हणने का सु नये, जर निवडनुकीच्या अगोदर टीव्हीवरील जाहिरातींना बंदि असेन.. प्रचार करण्यास बंदि असेन तर पेपर न्युज पण तश्याच न्युज मध्ये आले पाहिजे असे म्हणने आपणास चुकीचे का वाटते ? की अज्ञात सोर्स कडुन पैसा मिळाला म्हणुन कीती ही खर्चकरायचा का ?

प्रचार संपल्यावर वर्तमानपत्रात जाहिराती देण्यास कायदेशीर परवानगी आहे. जशा भाजपने जाहिराती दिल्या तशाच आआपने दिल्या आहेत. आपण केले ते योग्य आणि भाजप करतो ते चुकीचं हा आआपचा शुद्ध कांगावा आहे.

बादवे, आआपचाही सर्व निधी ज्ञात स्त्रोतांकडून आलेला नाही. २ कोटी रूपयांचा मूळ स्त्रोत अजून अज्ञातच आहे.

>>> दुसरा मुद्दा ९५२ (७३ करोड रुपये भाजप ला अज्ञात सोर्स कडुन मिळाअले आहेत आणि ८२ % कॉन्ग्रेस ला. तर त्यांना पहिली नैतिकताच नाही आप वर आरोप करण्याची ?

आआपची तरी नैतिकता आहे का इतरांवर आरोप करण्याची?

>>> आणि त्यामुळे आप स्वताला स्वच्छ समजते. भगोडा चे जेव्हडे भांदवल केले गेले त्याच अर्थ ते स्वच्छ नव्हते असे लावता येणार नाही.

आआपवाले स्वतःला वाटेल ते समजतील. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ते स्वच्छ आहेत का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. अत्यंत चुकीच्या कारणावरून राजीनामा देऊन जबाबदारी झटकून ते पळून गेले ही वस्तुस्थिती आहे.

गणेशा's picture

7 Feb 2015 - 9:23 pm | गणेशा

मग तुम्हाला काय वाटते? मुस्लिमांची १००% मते फक्त आआपलाच मिळणार अशी समजूत आहे काय तुमची?

नाही, परंतु ९९ % मते भाजप ला पडणार नाहीत ही खात्री भाजपला ही होती आणि आप ला ही होती. कॉग्रेस ला यावेळेस जास्त मते पडणार नाहीत या साठी वेगळ्या विश्लेषणाची गरज नसावी.

बादवे, आआपचाही सर्व निधी ज्ञात स्त्रोतांकडून आलेला नाही. २ कोटी रूपयांचा मूळ स्त्रोत अजून अज्ञातच आहे.

अहो, ९५२ कोटी जेंव्हा अनक्नोन सोर्स कडुन आणि जास्त करुन कॅश म्हणुन घेतले गेले तेंव्हा कुठला क्रायटेरीआ (फिलटर) लावला गेला होता का भाजप कडुन . निदान आप ने चेक घेतला.. पॅन नं त्याच्याकडे आहेत. त्याही पुढे जाउन चुक होत असतील तर ते आनखिन काय करु शक्तील ते पाहणार आहेत असे ते बोलले.
भाजप वाले आपण कसे ही पैसे घेतो तसेच आप पण घेतोच की कुटेह वेगळे आहेत ते असे का दाखवु इच्छित आहे ? स्वता कसे वेगळे आहेत हे सांगणारेच आज आपण वेगळे नाहे तर कोणीच नाही हा प्रयत्न खरेच भाजप साठी हाश्यास्पद वाट नाही का ? जास्त एक्प्लनेशन देत नाही, वरती एक लिंक दिली आहे त्यात हे आले आहे

आआपवाले स्वतःला वाटेल ते समजतील. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ते स्वच्छ आहेत का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. अत्यंत चुकीच्या कारणावरून राजीनामा देऊन जबाबदारी झटकून ते पळून गेले ही वस्तुस्थिती आहे.

ठि काहे त्या साठी त्यांनी माफी मागितली होती. आणि चुक केली होती कुठला गुन्हा तर केला नव्हता असा त्यांचा दावा होता. चुका कोणाअकदुन होत नाहीत ? फक्त काही राजकारणी मान्य करतात काही नाही.
२००२ च्या चुका मोदींल्कडुन मान्य झाल्या नाहीतच ना. म्हणुन ती चुक नव्हती असे आपण कसे म्हणु शकता ?
आणि तरीही त्या ४९ दिवसाचे योग्य भांदवल आप ने निवडनुकित केले. आणि भाजप ला ८ महिन्याचे मुल्यांकन पण देता आले नाही.
असो...

हाय्ला! ही टेप अजुनही सुरू आहे?

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 3:25 pm | पिंपातला उंदीर

बाकी मोदी याना आमंत्रण न देऊन ज्या शाही इमाम यांनी त्यांचा अपमान केला होता त्यांनी आयोजित केलेल्या डीनर ला कोण गेल होत ? ओळखा पाहू ?

http://m.bhaskar.com/news/referer/521/UT-DEL-NEW-dinner-party-at-jama-ma...

गणेशा's picture

6 Feb 2015 - 6:54 pm | गणेशा

मस्त interview आहे केजरीवाल चा.आणि वरती जे जातीय राजकारणाबद्दल बोलले जात आहे ते तरी केजरीवाल खेळत नाही. असो.. या संभाषणात पण त्यावर पण प्रकाश टाकलेला आहे.

http://www.ndtv.com/elections/video/player/the-buck-stops-here/delhi-do-...

तसे ही माझ्या एका ही रिप्लाय ला एकही उत्तर नाहीच आहे येथे म्हणुन जास्त टंकण्याचे कष्ट घेत नाही.

नांदेडीअन's picture

7 Feb 2015 - 1:06 pm | नांदेडीअन

आज मतदान केल्यानंतर किरण बेदी भाजपाच्या काही समर्थकांना घेऊन कॅमेर्‍यापुढे आल्या होत्या.
त्यातला एक माणूस म्हणाला, "आम्हाला आपवाल्यांनी प्रत्येकी ३०० रूपये देऊन आपला वोट टाकायला सांगितले आहे, आणि टाकले नाही तर तुमच्या झोपडपट्ट्या बॉम्ब टाकून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे." *lol*

दुसरा एक माणूस कॅमेर्‍यापुढे आला, पण तो बिचारा भाजपाची टोपी काढायची विसरून गेला होता.
किरण बेदींनी लगेच त्याची टोपी बाजूला काढून टाकली. *biggrin*

आज तकवर Live सुरू होते हे.
आत्ता दाखवत नसतील तर त्यांच्या YouTube चॅनलवर जाऊन बघा, तिथे अपलोड केले असेल कदाचित.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:09 pm | पिंपातला उंदीर

दुतोंडी लोक आहेत हो हे . प्रामाणिक वैगेरे म्हणवणारी किरण बेदी कशी या तडीपार भ्रष्ट लोकांच्या हाती लागली देव जाणे .

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:10 pm | श्रीगुरुजी

>>> त्यातला एक माणूस म्हणाला, "आम्हाला आपवाल्यांनी प्रत्येकी ३०० रूपये देऊन आपला वोट टाकायला सांगितले आहे, आणि टाकले नाही तर तुमच्या झोपडपट्ट्या बॉम्ब टाकून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे."

चालायचंच. २ दिवसांपूर्वीचं आशुतोषांचं वक्तव्य विसरलात का? भाजपवाले पैसे, दारू आणि मांसाहारी जेवण मतदारांना वाटत असून झोपडपट्टीवाल्यांची मतदार ओळखपत्रे त्यांनी काढून घेतली आहेत व आआपला मत दिल्यास गंभीर परीणाम होतील अशीही धमकी भाजपवाल्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले होते. जे २ दिवसांपूर्वी आशुतोष म्हणत होते आता तेच भाजप म्हणत आहे. दोघात फरक तो काय?

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:13 pm | पिंपातला उंदीर

दोघात फरक तो काय?

अहो ते live टीवी वर नाही पकडले गेले

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:16 pm | श्रीगुरुजी

मग कोण लाईव्ह टीव्हीवर पकडले गेले? दोन्ही बाजू फक्त पोकळ आरोप करतानाच दिसताहेत.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:22 pm | पिंपातला उंदीर

दुसरा एक माणूस कॅमेर्‍यापुढे आला, पण तो बिचारा भाजपाची टोपी काढायची विसरून गेला होता.
किरण बेदींनी लगेच त्याची टोपी बाजूला काढून टाकली.

आज तकवर Live सुरू होते हे.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:25 pm | श्रीगुरुजी

पैसे देतानाचे लाईव्ह चित्रीकरण होते का?

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 4:32 pm | पिंपातला उंदीर

बाकी पैसे घेताना कुठल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पकडला गेला होता हो गुर्जी ?*lol*

प्रतापराव's picture

7 Feb 2015 - 1:20 pm | प्रतापराव

भाजपा नि कॉंग्रेस ह्या एकाच नाण्य्याच्या दोन बाजू आहेत. केजरीवाल हे प्रामाणिक व्यक्ती वाटतात. ह्यावेळी दिल्लीत आप्चे बहुमताने सरकार यायला हवे. केजरीवाल ह्यांनी ४९ दिवसात सरकार सोडले हा त्यांचा चुकीचा निर्णय होता परंतु त्यासाठी त्यांनी माफी मागितली आहे किती राजकारणी लोकांकडे एवढा मनाचा मोठेपणा असतो. भाजपा किंवा कॉंग्रेस दिल्लीत आली असती तर पाच वर्षाचे स्थिर सरकार मिळाले असते असे बर्याच जणांना वाटते पण नेमकं काय होतं हो स्थिर सरकार मिळालं तर? स्थिर आहेत पण लोकांच्या हिताविरोधी निर्णय घेत असतील, एकामागून एक घोटाळे करत असतील, स्नूपिंग, भ्रष्टाचार सगळ्यामध्ये हात रंगवून घेत असतील तर त्याचा आपल्याला कसा फायदा होणार हे काही आकलन होत नाही.
(हे सगळं सिद्ध झालेलं नाही हे लक्षात आहे. ते होईल अशी आशा बाळगणंसुद्धा वेडेपणा ठरेल इतके आपले नेते क्लीन-चिट मास्टर्स आहेत!)

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:28 pm | पिंपातला उंदीर

आता तर भाजप वाल्यांचे निवडणूक आश्वासन कोणती आणि 'जुमले ' कुठले असां प्रश्न उपस्थित झाला आहे . ज्याना नाही कळल त्यांनी अमित शाह , जुमला असा गुगल सर्च करावा .

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:32 pm | श्रीगुरुजी

निवडणुकीच्या आधीच आआपवाल्यांची निवडणुक आश्वासने म्हणजे 'जुमले' दिसताहेत. निवडून आल्यावर लगेच ५०% वीजबिलात सवलत आणि नंतर वीजकंपन्यांचे लेखापरीक्षण झाल्यावर अजून दर कमी करणार, दिल्लीत सर्व घरांना महिना २०,००० लीटर मोफत पाणी, दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही, संपूर्ण दिल्लीत मोफत वायफाय . . . काय बोलायचं आता?

आप ने हे दाखवुन दिले आहे की १००० करोड टॅक्स त्यांच्या काळात जास्त आणला गेला आणि वरील पाणि आणि विज या योजनेस ४०० करोड लागले. दिल्लीचा वार्षिक अर्थ पॅकेज ४००० करोड आहे.

दुसरी गोष्ट
भाजपने वोडाफोनचे कीती तरी कोटी रुपये (३०० + आहेत का ? लक्षात नाही आकडा) टॅक्स माफ केला .. का ?
अनेक शेतकरी पॅकेजेस जाहीत केली .. शेतकर्‍यांना ते पैसे मिळालेले नाहीत
दिल्लीत भाजप्ने ही ३० % विज कटोती सांगितली आहेच .. विजबिल कंपण्याण्चे ऑडीट भाजप ने थांबवले आहे.

असे सर्व नसावे असे मला वाटते.

सीसीटीव्ही कॅमेरा शहरात का असु नये असे वापणास वाटते ? सेक्युरीटी साठी होणाअरा हा खर्च काय फक्त आप लाच फायद्याचा आहे काय ? संपुर्णा दिल्लीला फायद्याचा आहे. जर ते निट पैश्याअभावी राज्य चालवु शकले नाही तर ते बघतील या घोषणेचे.. पण भाजप प्रमाणे कहावत होती असे ते म्हणणार नाही अशी मनोमन खात्री वाटते

लोटीया_पठाण's picture

7 Feb 2015 - 5:50 pm | लोटीया_पठाण

गणेश साहेब, वोडाफोन चे ३०० कोटी वगैरे माफ नाही केलेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार जाणार नाहीय. युपिए वाल्या सरकार ने पूर्वलक्षी प्रभावाने कर गोळा करण्या विरोधात वोडाफोन ने न्यायालयात धाव घेतलेली अन निर्णय वोडाफोन च्या बाजूने लागलेला ( जो तेव्हा अपेक्षितच होता ). मुळात जी गोष्ट unconstitutional आहे त्यासाठी परत न्यायालयात हेलपाटे घालण्यात काय हाशील ?? असा विचार सध्याच्या सरकारने केलेला दिसतोय.
या सबंध प्रकरणाचा मतितार्थ लक्षात न घेत शेतकर्याच्या आडून फालतू राजकारण करण्याचे उद्योग सध्या काही काँग्रेसी अन सैनिकांनी आरंभले आहेत.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 5:57 pm | श्रीगुरुजी

>>> आप ने हे दाखवुन दिले आहे की १००० करोड टॅक्स त्यांच्या काळात जास्त आणला गेला आणि वरील पाणि आणि विज या योजनेस ४०० करोड लागले. दिल्लीचा वार्षिक अर्थ पॅकेज ४००० करोड आहे.

काय बोलू आता? भारतात केंद्रात आणि राज्यात सर्वाधिक करभरणा हा आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत होतो. आयकर विभागात उपायुक्त असलेल्या केजरीवालांना हे माहित असणारच. परंतु गलिबल आआपभक्तांना फसविण्यासाठी अशा गोष्टी फेकायला लागतात. केजरीवाल त्याच काळात मुख्यमंत्री होते. खरं तर चौथ्या तिमाहीतल्या ९० दिवसांपैकी फक्त ४२ दिवस ते मुख्यमंत्री होते. तरी सगळ्या तिमाहीचे श्रेय तेच घेत आहेत. आणि यात त्यांचा वाटा शून्य असून ही सगळी चौथ्या तिमाहीची करामत आहे.

२०१४ सालातल्या संपूर्ण वर्षात फक्त माझ्याच काळात दिल्लीत थंडी होती, इतर दिवसात दिल्लीकरांना उन्हाळ्याचा त्रास झाला, म्हणून आआपलाच मते द्या असेही ते सांगायला कमी करणार नाहीत आणि गलिबल आआपभक्त त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील.

>>> भाजपने वोडाफोनचे कीती तरी कोटी रुपये (३०० + आहेत का ? लक्षात नाही आकडा) टॅक्स माफ केला .. का ?

यालाच म्हणतात अपप्रचार. जरा वोडाफोनचे प्रकरण नीट वाचा. हा कर माफ केलेला नाही.

व्होडाफोन या लंडनस्थित मुख्यालय असलेल्या दूरसंचार कंपनीने २००७ साली हाँगकाँग येथील सीजीपी इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीचे संपूर्ण भागभांडवल खरेदी केले. ही सीजीपी कंपनी जरी हाँगकाँग येथे होती तरी तिची नोंदणी केमन आयलंड या करशून्य स्थानी झाली. जगात अधिकृतपणे अशी अनेक शहरे वा केंद्रे आहेत की जेथे नोंदणी झाल्यास विविध करांत मोठी सवलत मिळते. त्यात काहीही गर नाही. आपापल्या प्रांतात गुंतवणूक आकर्षून घेण्यासाठी अनेक प्रांत विविध मार्गाचा उपयोग करीत असतात. अगदी देशांतर्गत पातळीवरही विचार करावयाचा झाल्यास आपल्याकडे उत्तरांचल या राज्याचे उदाहरण देता येईल. या राज्याने गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी मोठय़ा प्रमाणावर करसुटी जाहीर केली होती. त्यामुळे टाटा, बजाजसह अनेक बडय़ा कंपन्यांनी तेथे कार्यालये थाटली. महाराष्ट्रातही वाडा आदी मागास भागांत उद्योगांनी जावे यासाठी दीर्घकाळ करसुटी दिली जाते. हे असे करणे काही गर नाही. तेव्हा याच प्रचलित नियमांनुसार सीजीपीची गुंतवणूक होती. या कंपनीने अशाच वेगवेगळ्या मार्गानी भारतातील हचिसन एस्सार या कंपनीत ६७ टक्के इतके भागभांडवल गुंतवले होते. परंतु व्होडाफोनने सीजीपी विकत घेतल्यावर तिची उपकंपनी असलेल्या हचिसन एस्सार या कंपनीवरही व्होडाफोनची मालकी प्रस्थापित झाली.

एखाद्याने बंगला खरेदी केल्यावर त्यातील कोठीची खोलीही नव्या मालकाच्या ताब्यात जावी, तसेच हे. पण हे इतके साधे ग्यानबाचे अर्थशास्त्र आपल्या आयकर खात्याला समजले नाही. या हचिसनचा व्यवहार भारतात आहे म्हणून व्होडाफोनने सीजीपी खरेदी करण्याच्या व्यवहारावर येथे भांडवल वृद्धी कर भरावा असे त्या खात्याचे म्हणणे. फेब्रुवारी २००७ साली झालेला हा संपूर्ण व्यवहार ५५ हजार कोटींचा होता. याचा अर्थ व्होडाफोनने इतकी किंमत मोजून सीजीपी आणि त्या अनुषंगाने हचिसन एस्सार या कंपनीवर आपली मालकी प्रस्थापित केली. २०१० साली आयकर खात्याला या व्यवहारात देय कर दिला गेला नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे व्होडाफोनकडे ११ हजार कोटी रुपयांच्या आयकराची मागणी केली. भारतीय कर खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की व्होडाफोन या कंपनीने सीजीपी कंपनी विकत घेतली तीच मुळात हचिसन एस्सारवर आपली मालकी प्रस्थापित व्हावी या उद्देशाने. आणि हचिसन एस्सार ही कंपनी भारतात कार्यरत आहे, तेव्हा तिच्या मालकी हस्तांतरणावर व्होडाफोनने आयकर द्यावा. त्यातही पुढे जाऊन आपल्या आयकर खात्याने या कराराचा भरणा पूर्वलक्ष्यी प्रभावाने व्हावा अशीही मागणी केली. तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी आपल्या त्या वेळच्या अर्थसंकल्पात या मागास निर्णयाचे समर्थन केले आणि वर अन्य कंपन्यांनाही हा निर्णय लागू होत असल्याचे जाहीर केले. याद्वारे सरकारने वाटेल त्या कंपनीकडे वाटेल तितक्या काळाचा पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारण्याचा अधिकार स्वत:कडे घेतला. हा निर्णय अत्यंत हास्यास्पद आणि मागास होता. हे असे करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या शाळेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने बालवाडीपासूनची शुल्कवाढ मागण्यासारखेच. परंतु सरकारला यातील विसंवाद लक्षात आला नाही वा येऊनही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. कारण काहीही असो. इतका वादग्रस्त निर्णय न्यायालयीन लढाईत अडकला नसता तरच नवल. व्होडाफोनने सरकारच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आणि पुढे सर्वोच्च न्यायालयानेदेखील याप्रकरणी सरकारचे कान उपटले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविषयी विश्वास निर्माण व्हावा असे वाटत असेल तर कर प्रणालीत सातत्य हवे असेही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले. परंतु तरीही सरकार बधले नाही. वेगवेगळ्या मार्गानी हा करवसुलीचा मुद्दा उठतच राहिला. अशाच समांतर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आयकर खात्याचा दावा फेटाळून लावला आणि व्होडाफोन कंपनीच्या बाजूने निर्णय देताना कंपनीवर सरकारने आकारलेला जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा कर अवैध ठरवला. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील. त्या निर्णयासही आव्हान देण्याची भाषा सरकारातील काहींनी सुरुवातीला केली. परंतु अखेर सरकारला शहाणपण सुचले आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याचे सरकारने ठरवले.

या विषयावर एक चांगला अग्रलेख लोकसत्ताने लिहून सरकारची भूमिका अत्यंत योग्य ठरविली होती (जुलमाचे शहाणपण).

शरद पवारांनी देखील 'भाजपने वोडाफोनचा कर माफ केला' अशी अत्यंत चुकीची टीका केली होती. आश्चर्य म्हणजे दुसर्‍याच दिवशी दैनिक सकाळने देखील याच विषयावर अग्रलेख लिहून सरकारची भूमिका योग्य ठरविली होती.

जरा वाचन वाढवा म्हणजे असे गैरसमज होणार नाहीत.

>>> दिल्लीत भाजप्ने ही ३० % विज कटोती सांगितली आहेच .. विजबिल कंपण्याण्चे ऑडीट भाजप ने थांबवले आहे.

पुन्हा एकदा अपप्रचार. ऑडीटच्या निर्णयाविरूद्ध वीज कंपन्याच नायालयात गेल्या होत्या. तेव्हा भाजप सत्तेवर नसून काँग्रेस सत्तेवर होती.

>>> सीसीटीव्ही कॅमेरा शहरात का असु नये असे वापणास वाटते ? सेक्युरीटी साठी होणाअरा हा खर्च काय फक्त आप लाच फायद्याचा आहे काय ? संपुर्णा दिल्लीला फायद्याचा आहे. जर ते निट पैश्याअभावी राज्य चालवु शकले नाही तर ते बघतील या घोषणेचे.. पण भाजप प्रमाणे कहावत होती असे ते म्हणणार नाही अशी मनोमन खात्री वाटते

सीसीटीव्ही असावेत ना. पण अवास्तव आश्वासने कशाला? दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च कोण करणार? शेवटी केंद्राचीच मदत लागणार ना? मग आम्ही यँव करू, आम्ही त्यॅव करू ही थापेबाजी कशाला?

सीसीटीव्ही असावेत ना. पण अवास्तव आश्वासने कशाला? दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च कोण करणार? शेवटी केंद्राचीच मदत लागणार ना?

हे अवास्तव अश्वासन आपल्याला वाटते आहे, मला किंवा इतर काही लोकांने ते अवास्तव वाटत नाही. आणि तो खर्च कोठुन करणार ते कळेलच. की दिल्लीची अर्थ व्यव्स्थापण फक्त भाजप आणि कॉन्ग्रेस लाच माहिती आहे ?

केंद्राची मदत शेवटी लागणार म्हण्जे फक्त पैश्यासाठी नाही तर काही निर्णय बरोबरीने घ्यावे लागतीलच.. आणि भाजप ने ते केले नाहि तर केंद्रात ही काही वर्षांनी पुन्हा निवडनुक होयील तेंन्व्हा लोक मुल्यांपण करतीलच.

>>> दिल्लीत भाजप्ने ही ३० % विज कटोती सांगितली आहेच .. विजबिल कंपण्याण्चे ऑडीट भाजप ने थांबवले आहे.

पुन्हा एकदा अपप्रचार. ऑडीटच्या निर्णयाविरूद्ध वीज कंपन्याच नायालयात गेल्या होत्या. तेव्हा भाजप सत्तेवर नसून काँग्रेस सत्तेवर होती.

भाजप्णे ३० % विज कटोती चे अश्वासन दिलेले आहे निवडनुकी पुर्वी मान्य नसेल तर शोधुन द्यावे लागेल तुम्हाला नेट वर.

राहता राहिला प्रश्न कंपण्याच ऑडीट करण्या विरोधार कोर्टात गेल्या होत्या .. का ?
ऑडिट केल्याने त्यांचे काय नुकसान होते का ? ऑडीट करु नये का ? ..

व्होडापण बद्दल ची कर माफी बद्दल मला जास्त माहिती नसल्याने आपला रिप्लाय वाचुन द्नान वाढवतो आहे, तो मुद्दा मागे घेतो .परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की अश्वासने .. खैरात भाजप पण करते. त्यामुळॅ दुसर्‍यांकडे फकत प्रशनार्थक नजरेने बघु नये

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 2:58 pm | पिंपातला उंदीर

बीजेपी - भारतीय जुमलेबाज पार्टी *lol* *LOL*

प्रतापराव's picture

7 Feb 2015 - 1:28 pm | प्रतापराव

आप विजेची बिल कमी करेल असे बोलताय ह्यात झाला तर सर्वसामान्य लोकांचा फायदाच आहे.जेची बिलं कमी केली तर तिजोरीवर ताण पडेल असं आपल्याला वाटतं ना. पण आपल्या कल्पनेपेक्षा प्रचंड जास्त पैसा ह्या खादी नेत्यांच्या दिमतीत आणि भ्रष्टाचारात खर्च होतो. तो वाचवला तर सबसिडीज देणं शक्य आहे.
मोदी म्हणतात, "मैं किसी को कुछ भी मुफ्त नहीं दूंगा, बल्कि इतने रोजगार तैय्यर करूंगा की मुफ्त लेने की जरूरत ही ना पडें"
अशी वाक्ये कानाला ऐकायला फार गोडगोड वाटतात. पण खरंच घडतात का?
बातम्या काही वेगळंच सांगतात. Jobless growth in Gujarat असा सर्च टाकला तर ढीगभर आर्टिकल्स मिळतील.
Hemantkumar Shah, an academician considered close to the Sangh ideology, says Gujarat is a classic example of jobless growth. "There has been a decline in growth rates of employment in the decade 2001-2011," he says, arguing that the state government's claim of eight lakh jobless people in Gujarat is not accurate. "There are about 16 lakh unemployed youth, double than what is on record. Data obtained from statistical department suggests that." The annual rate of growth of employment in Gujarat was 2.4% during 1999-00 - 2004-05 (2.89% in India), and it fell to 1.3% during 2004-05 to 2009-10 (1.48% in India).

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 1:35 pm | श्रीगुरुजी

ही 'जॉबलेस ग्रोथ' आहे का 'ग्रोथ विथ लेसर जॉब्ज' आहे? संगणकाचा जितका वापर वाढेल तितकी मॅनपॉवर रिक्वायरमेंट कमी होणारच. भारतात सगळ्या राज्यात हीच परिस्थिती असणार.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:40 pm | पिंपातला उंदीर

बाकी संगणक आल्याने बेरोजगारी वाढेल तेंवा देशात संगणक येऊ देऊ नका अशी मागणी 'द्रष्टे ' नेते प्रमोद महाजन यांनी तेन्वाच राजीव गांधी कडे केलेली . पण या नतद्रष्ट खान्ग्रेसी लोकांना अक्कल च नाही . आता बर्या बोलाने हि संगणक क्रांती मागे ढकलून पुन्हा सगळी काम हाताने सुरु करू . कस ?*lol* *LOL*

प्रतापराव's picture

7 Feb 2015 - 1:43 pm | प्रतापराव

इथे बरेच जन असे म्हणत आहेत कि आप हा आंदोलकी पक्ष आहे त्यांच्याकडे काही इकॉनॉमिक/इंडस्ट्रीयल पॉलिसी नाही. ते जर निवडून आले तर पुढे काय होणार ते राज्यकारभार कसा करणार?......
भाजपा किंवा काँग्रेसला समर्थन देणार्‍या किती जणांना त्या पक्षांची इकॉनॉमिक/इंडस्ट्रीयल पॉलिसी काय आहे ते माहीत आहे? भाजपाने FDI च्या निमिताने इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये घेतलेला एक मोठ्ठा यु-टर्न मी बघितला. असं असेल तर काय अर्थ आहे पॉलिसी असूना आणि नसून?
FDI चांगलं की वाईट ह्यावर प्रत्येक नागरिकाला सखोल ज्ञान असणं शक्य नाही. पण एक गोष्ट नक्कीच खटकतेय की निवडणूकीपूर्वी ४६% FDI च्या विरूद्ध निदर्शने करणारे लोक सत्तेत आल्यावर १००% FDI आणणार म्हणतात. काय कारण असावं ह्यामागे?

आता पुर्‍न रिसल इस्टेट मध्ये FDI येणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील छोट्या बिल्डरांचे पण दिवस येतेहेल छोट्या दुकानदारांसारल्हेच होईल.

FDI ला विरोध हा कॉन्ग्रेस ला विरोध होता. यांनी सत्तेत आल्यावर वेगळॅ काहे केले नाही

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 1:45 pm | पिंपातला उंदीर

अणु करार , परकीय गुंतवणूक यावर त्यांनी असेच यु टर्न घेतले आहेत

नांदेडीअन's picture

7 Feb 2015 - 1:58 pm | नांदेडीअन

U-Turn बद्दल तर बोलूच नका.
भाजपने पहिल्या १०० दिवसात घेतलेल्या ४१ U-Turns च्या बातम्या एकत्रीत करून एक पोस्ट टाकला होता मी फेसबुकवर.
आणि त्यात गेल्या ४ महिन्यात घेतलेल्या U-Turns चा समावेश नाहीये.
लिस्ट अपडेट करावी लागेल.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 2:49 pm | पिंपातला उंदीर

इथे पण टाका ती लिस्ट . कस आहे इथल्या आंधळ्या भक्ताना दुसर्या पक्षाना प्रश्न विचारताना लई मजा येते . जरा उत्तर पण देण्याची कसरत करू द्या . बाकी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष च स्वातःच्या राज्यातून तडीपार आहे त्या पक्षाच्या आंधळ्या समर्थकांना इतराना प्रश्न विचारताना लाज तरी कशी वाटत नाही ?

प्रतापराव's picture

7 Feb 2015 - 2:08 pm | प्रतापराव

लोकसभेत मी भाजपला मत दिले होते पण परंतु आता माझे असे मत होत चाललेय कि भाजपा नि कॉंग्रेस हे राजकारणाचा वापर हा फक्त सत्तेसाठी करतात त्यांना सत्तेवर राहणे महत्वाचे असते. ते स्थिर सरकार देतात परंतु ह्या स्थिर पणाच्या काळात अनेक प्रकरण घडतात. ह्या सरकारांपेक्षा ४९ दिवसाचे पण लोकांचे काम करणारे सरकार असणे महत्वाचे असे वाटू लागलेय.Political stability is not necessarily an essential pre-requisite item for good economic growth. In actual practice, it is the other way around as it can be argued, that it is good economic growth, that essentially leads to political stability.

गणेशा's picture

7 Feb 2015 - 2:14 pm | गणेशा

बरोबर .

मिटर बनवणारेच आता ठेकेदार असतील तर कसली विज कंपण्यांचे ऑडीट आणि कसले काय ? किरण बेदी किती काअम करु शकतील हे आत्ताच्या प्रचारावरुनच दिसते आहे. प्रचार नक्की मोदिंचा आहे की किरण बेदिंचा हेच जाहिरातीतुन कळत नाही.

४९ दिवसात , १००० करोड टॅक्स आप ने गोळा केला आधी आणि नंतर येव्हडा झाला नाही येव्हड्या कमी पिरिअड मध्ये.
आणि किती दिवस त्यांचेच ऐकायचे.
मला तर वयक्त्रीक रित्या बिल्डर .. ओद्योगीकरण याकडे राझ्यसरकारणे झुकते माप दिलेली बरोबर वाटत नाही. त्यांचय साठी सर्व कर असे करु न तसे.. हे चुकीचे आहे.
कॉन्ग्रेस तशीच आणि भाजप पण तशीच .. फक्त बोलबच्चन गिरी जास्त आहे यांकडे बस्स

नांदेडीअन's picture

7 Feb 2015 - 2:28 pm | नांदेडीअन

४९ दिवसात झालेली कामे.
काम करायला १ दिवससुद्धा पुरेसा आहे हो, इच्छाशक्ती पाहिजे तशी.