सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले.
भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते.
११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले.
भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली.
४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली.
नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते.
दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले.
युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या.
याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले.
तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते.
ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले.
भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली.
ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.
वाचने
122342
प्रतिक्रिया
256
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी प्रचंड आशावादी... भविष्य माझ्या हाती .. मी राष्ट्रवादी...
आँ?
In reply to मी प्रचंड आशावादी... भविष्य माझ्या हाती .. मी राष्ट्रवादी... by गणेशा
कोणाचे काय आणि यांचे काय ?
In reply to आँ? by प्रदीप
पुन्हा एकदा अफझलखान
+१
>>> फडणवीसांना असे धूर्त
In reply to +१ by क्लिंटन
सहमत.. भाजपा आता राष्ट्रवदीला
In reply to >>> फडणवीसांना असे धूर्त by श्रीगुरुजी
भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे
In reply to सहमत.. भाजपा आता राष्ट्रवदीला by आनन्दा
+१
In reply to भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे by मालोजीराव
>>> साहेब धक्क्याला लावणार
In reply to भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे by मालोजीराव
साहेबांनी...
In reply to भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे by मालोजीराव
सध्या तरी किपिंग फिंगर्स क्रॉस्ड
In reply to >>> फडणवीसांना असे धूर्त by श्रीगुरुजी
मला वाटते यासाठीच
In reply to सध्या तरी किपिंग फिंगर्स क्रॉस्ड by क्लिंटन
पटले नाही
In reply to मला वाटते यासाठीच by अनुप ढेरे
भाजपावाले निवडणूकी आधी स्पष्ट
In reply to पटले नाही by क्लिंटन
बरोबर .. मतदान न करणे खरेच
In reply to भाजपावाले निवडणूकी आधी स्पष्ट by अनुप ढेरे
भाजपाला नाहीच म्हणून काँग्रेस
In reply to भाजपावाले निवडणूकी आधी स्पष्ट by अनुप ढेरे
आँ...
In reply to मला वाटते यासाठीच by अनुप ढेरे
महाराष्ट्राचा तामिळनाडू व्हायला नको
In reply to आँ... by डॉ सुहास म्हात्रे
शिवसेना फुटणार हे नक्की !
In reply to >>> फडणवीसांना असे धूर्त by श्रीगुरुजी
जर का सिंचन घोटाळा आणि
In reply to +१ by क्लिंटन
>>अन्यथा राष्ट्रवादीसमोर
In reply to जर का सिंचन घोटाळा आणि by खटपट्या
+१
In reply to >>अन्यथा राष्ट्रवादीसमोर by नितिन थत्ते
जे भाजपला मत देतात ते भाजपलाच
In reply to >>अन्यथा राष्ट्रवादीसमोर by नितिन थत्ते
>>> भाजप की शिवसेना असा विचार
In reply to जे भाजपला मत देतात ते भाजपलाच by खटपट्या
घरीच बसून राहिले तर?
In reply to >>> भाजप की शिवसेना असा विचार by श्रीगुरुजी
बहुसंख्य मतदार १-२ घटनांवरून
In reply to घरीच बसून राहिले तर? by पैसा
राष्ट्रवादीचा स्पष्टपणे न
In reply to बहुसंख्य मतदार १-२ घटनांवरून by श्रीगुरुजी
>>"पार्टी विथ डीफरन्स" या
In reply to राष्ट्रवादीचा स्पष्टपणे न by खटपट्या
भाजप की शिवसेना असा विचार
In reply to जे भाजपला मत देतात ते भाजपलाच by खटपट्या
भाजप की शिवसेना असा विचार
In reply to जे भाजपला मत देतात ते भाजपलाच by खटपट्या
याचे उत्तर श्री दुष्यंत यांनी
In reply to भाजप की शिवसेना असा विचार by आनन्दा
शिवसेना हरली नाहि
संत तुकाराम सांगून गेलेत या दिवसाबद्दल
लव्हाळे की लव्हासे?
In reply to संत तुकाराम सांगून गेलेत या दिवसाबद्दल by आयुर्हित
+१
In reply to लव्हाळे की लव्हासे? by क्लिंटन
मी प्रचंड आशावादी... भविष्य माझ्या हाती .. मी राष्ट्रवादी...२
@ शरद पवार आणि बाळासाहेब
In reply to मी प्रचंड आशावादी... भविष्य माझ्या हाती .. मी राष्ट्रवादी...२ by गणेशा
सहा महिन्यांचे जीवदान
In reply to @ शरद पवार आणि बाळासाहेब by निनाद मुक्काम …
शंका
In reply to सहा महिन्यांचे जीवदान by क्लिंटन
उत्तर
In reply to शंका by माहितगार
क्लिंटन सर,
In reply to सहा महिन्यांचे जीवदान by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to क्लिंटन सर, by सव्यसाची
वाचत आहे...
अगदी बरोबर विश्लेषण
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर
In reply to अगदी बरोबर विश्लेषण by ओंकारा
याव्यतिरिक्त मला अजून एक
हा भाबडा आशावाद आहे,
In reply to याव्यतिरिक्त मला अजून एक by आनन्दा
>>> हा भाबडा आशावाद आहे,
In reply to हा भाबडा आशावाद आहे, by गणेशा
तुम्ही दिलेल्या पॅरेग्राफ
In reply to >>> हा भाबडा आशावाद आहे, by श्रीगुरुजी
कहर आहे हा !!
In reply to >>> हा भाबडा आशावाद आहे, by श्रीगुरुजी
+१
In reply to कहर आहे हा !! by चिगो
मराठी संघराष्ट्र....
In reply to +१ by कपिलमुनी
योग्य कारण
In reply to मराठी संघराष्ट्र.... by प्रभाकर पेठकर
उत्तम विश्लेषण !
कधे कधी मला वाट्ते , पवार
In reply to उत्तम विश्लेषण ! by विटेकर
ह्म्म्म.... वेळ मिळताच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipमाझे मत
महाराष्ट्र विधानसभेत १९८८
परीस्थिती
In reply to महाराष्ट्र विधानसभेत १९८८ by श्रीगुरुजी
सरकारे अल्पमतात होती की
In reply to परीस्थिती by कपिलमुनी
संपूर्ण बहुमत
In reply to सरकारे अल्पमतात होती की by श्रीगुरुजी
कपिलमुनीसाहेब, श्रीगुरुजींशी
In reply to संपूर्ण बहुमत by कपिलमुनी
.
In reply to कपिलमुनीसाहेब, श्रीगुरुजींशी by अनुप ढेरे
+१
In reply to कपिलमुनीसाहेब, श्रीगुरुजींशी by अनुप ढेरे
नाही हो. कपिलमुनी हे
In reply to कपिलमुनीसाहेब, श्रीगुरुजींशी by अनुप ढेरे
>>> अगोदर राज्यपालांना
In reply to संपूर्ण बहुमत by कपिलमुनी
घटनेत तरतूद
In reply to >>> अगोदर राज्यपालांना by श्रीगुरुजी
>>> सरकार पूर्ण बहुमतात आहे
In reply to घटनेत तरतूद by कपिलमुनी
मस्त
In reply to >>> सरकार पूर्ण बहुमतात आहे by श्रीगुरुजी