'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
28 Jan 2015 - 8:24 am

***********************************

किती वाकुडे बोल बोलून झाले
स्वत:च्याच सत्वास गाळून झाले

धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले ?

जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले

नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

कसा रे मुरारी तुझा हा अबोला?
सुरांवर तुझ्या आज भाळून झाले

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'
पुन्हा आरशालाच टाळून झाले

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

***********************************
विशाल

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Jan 2015 - 3:45 pm | पैसा

कविता आवडली. वृत्तावर आणि शब्दावर तुझी हुकूमत आहे भावड्या!

सगळेच सुखात राहोत!!

विशाल कुलकर्णी's picture

29 Jan 2015 - 11:59 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद ताई _/\_

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 3:47 pm | प्रसाद गोडबोले

कविता आधीच आवडली आहे !!

'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

इथे 'प्रगो' रे किती 'डाव' 'खेळून' झाले ? असा बदल आधीच सुचवला आहे ;)

विशाल कुलकर्णी's picture

29 Jan 2015 - 12:00 pm | विशाल कुलकर्णी

इथे 'प्रगो' रे किती 'डाव' 'खेळून' झाले ? असा बदल आधीच सुचवला आहे

लवकरच दखल घेतली जाईल पंत ;)

दादा पेंगट's picture

29 Jan 2015 - 12:59 pm | दादा पेंगट

क्या बातहै! बहोत खूब गझल !

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 1:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला काहीच कळत नाही देवा कविता, वृत्त छन्द , गझल वगैरे मधील ! पण हे शब्द! पार भिडले!!!

विशाल कुलकर्णी's picture

29 Jan 2015 - 1:46 pm | विशाल कुलकर्णी

:)

कपिलमुनी's picture

29 Jan 2015 - 1:35 pm | कपिलमुनी

विशाल , तुमची कविता छानच आहे !

अवांतर : आय डी बदलतात तसे प्रतिसाद बदलतात याची अजून एक प्रचिती !
हीच कविता मुटेंनी टाकली असती तर वेगळ्या प्रकारे 'आस्वाद' घेतला गेला असता हे प्रकर्षाने जाणवले .

@विशाल : तुझ्या धाग्यावर अवांतराबद्दल क्षमस्व

विशाल कुलकर्णी's picture

29 Jan 2015 - 1:46 pm | विशाल कुलकर्णी

हीच कविता मुटेंनी टाकली असती तर वेगळ्या प्रकारे 'आस्वाद' घेतला गेला असता हे प्रकर्षाने जाणवले .

गैरसमज आहे बंधू हा तुमचा. मुटेंनी त्यांचे समग्र लेखन शेती या विषयाशी संबंधीतच केलेले आहे. पण त्यांचे काही हट्टाग्रही लेख सोडले तर त्यांच्या गझलेवर किंवा कवितांच्या बाबतीत कधीच कुठले आक्षेप, टीका वा तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'वेगळ्या प्रमाणे आस्वाद' हा प्रकार घडलेला नाही वा तसे माझ्या पाहण्यातही नाही. मिपाचे वाचक सुज्ञ आहेत. जिथे करायचा तिथेच गोंधळ करतात. :)
असो, बाकी आभार्स प्रतिसादाबद्दल.