ऑटीझमचे फायदे

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
11 Jan 2015 - 10:47 pm

एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ

शीर्षक वाचून दचकायला झाले ना? मलाही लिहीताना अवघड गेले. पण मुलाच्याबरोबरीनेच माझाही पर्स्पेक्टीव्ह बदलत चालल्याचे लक्षण असावे हे.

मी हा लेख लिहीत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. ऑटीझमच्या बरोबर येणारे त्रास काही कुठे जात नाहीत. इन फॅक्ट त्या त्रासाबद्दलच मी इतके दिवस लिहीत आहे इतक्या लेखांमधून. पण आज जरा वेगळ्या अँगलने विचार करू.

माझ्या मुलाला ऑटीझम आहे म्हणूनच :

  • त्याचा इनोसंस वयाच्या ३-४ वर्षापर्यंत टीकून राहीला आहे. अजुनही त्याच्याकडे पाहील्यावर, त्याचे खेळणे पाहील्यावर एखादे बाळच वाटते ते. आम्हाला मनापासून आनंद देते हे बाळ! :)
  • पूर्णपणे शुद्ध्/प्युअर मन आहे त्याचे. त्याला खोटं बोलायला कधीही जमणार नाही. लबाडी, कोणाची फसवणूक कधीही जमणार नाही.
  • तो कधी फारसा रडत नाही. हे खरंतर फारसं चांगले नाही त्याच्या दृश्टीने. परंतू आमच्या आधीच चिंतेने ग्रासलेल्या घरात सतत मुलाचं व्हायनिंग व रडणं असतं तर अवघड गेलं असतं आम्हाला कायम सॅनिटी टिकवणं!
  • तो कधीच दमत नाही! (कदाचित त्याला कळत नसेल.) परंतू तो कायम हसतमुख असतो. आमच्यासाठी रोजचा धडा असतो तो. काहीही होऊदे, सगळं जग मनाविरूद्ध चालत राहूदे, पण मन कायम आनंदी असले पाहीजे.
  • त्याच्या सेन्सरी इंटीग्रेशनच्या प्रॉब्लेममुळे आम्ही अचानक स्वतःला मिळालेल्या पाचही, नाही सातही इंद्रियांच्या दैवी देणगीबाबत ऋणी झालो आहोत. आपला मेंदू एकाच वेळेस गाडी चालवतो आहे, सिग्नल्स पाळतो आहे, पेडेस्ट्रियन येत असेल तर ते टिपतो आहे, फायर इंजिन आले तर तो आवाज ऐकून लगेच गाडी बाजूला घेत आहे, त्याचवेळेस शेजारी बसलेल्या नवरा/बायकोशी पुढील महीन्यातील महत्वाच्या कामांची यादी करत आहे,त्याचवेळेस नाकाला खाज सुटली तर नाक खाजवत अहे. सगळं विदिन २ मिनिट्स! किती मल्टीटास्कींग करतो आपण!! we should really be thankful to our brains!
  • वयाच्या १.५व्या वर्षीपासून माझ्या मुलाला सर्व अल्फाबेट्स, शेप्स, कलर्स, नंबर्स पूर्णपणे येतात. ऑक्टॅगॉन, ट्रॅपेझॉईड सुद्धा! त्याच्या वयानुसारच्या अ‍ॅप्स्/व्हीडीओज मध्ये नंबर्स केवळ १ ते १० असतात. त्यामुळे मी त्याला १ ते ५० आकडे शिकवले. माझी खात्री आहे त्याला ३० पर्यंत नक्की येतात आकडे. हे झाले माझ्याकडून. तो स्वतः युट्युबवर १००,१००० इत्यादी आकड्यांबद्दलची गाणी शोधून ऐकत असतो. असल्याबाबतीत एकपाठी असल्यामुळे ते ही येत असावे त्याला. मला पत्ता नाही. शिवाय अ‍ॅप्स व व्हीडीओजवरून तो गणिताचे बेसिक्स पण शिकतोय सध्या. २+२=४ , १२+२=१४ इत्यादी. त्याच्यादृष्टीने तो मजा करतोय. परंतू त्याचा ब्रेन त्या कन्सेप्ट्स रजिस्टर करून घेत असतो.
  • दुसर्‍या वर्षीपासून त्याला वाचता येऊ लागले. तेव्हा शब्द दाखवायचा बरोबर. आता स्टोरीबुक्स मधील शब्दांवर स्क्रोल होत वाचणॅ खूप आवडते. व्हेजीटेबल, एलिफंट, हार्वेस्ट, झायलोफोन इतक्या मोठाल्या शब्दांचे स्पेलिंग त्याला अचूक येते. वॉटर, मिल्क, डान्स, सिंग, वॉक, बेबी आईनस्टाईन, सुपर व्हाय, कुकीज इत्यादी शब्दांचे कार्ड्स तो माझ्याकडे आणून देतो - जेव्हा त्यातली अमुक गोष्ट त्याला हवी असते. मी त्याच्याशी संवाद साधताना कायम त्याच्या मॅग्नेटीक पाटीवर ऑप्शन्स लिहून देते. Eat - Poli or Oatmeal. तो त्यातील हव्या त्या शब्दावर बोट ठेऊन तो पदार्थ खातो.
  • रंगामध्ये रमायला तर आवडतच आले आहे त्याला. त्यामुळे चित्रकलेत बराच वेळ रमतो. नवीन स्किल, स्मायली फेस काढणे. ते बर्‍याचदा ग्रम्पीच येतात. परंतू तो प्रयत्न करतोय!
  • लिहायला शिकतो आहे तो- वयाच्या ३.५ वर्षी! अक्षरं सुबक व छोटी नाही येत त्याला काढता. परंतू A to Z पर्यंत सर्व अक्षरं त्याला लिहीता येतात. त्याची पेन/ मार्कर धरायची ग्रिप्/होल्ड जरा चुकत असल्याने त्रास होत आहे. मी त्याला सध्या हेच शिकवते. मार्कर्स पुढे धर. व्यवस्थित मोठ्या माणसांसारखा तीन बोटात धरतो तो. पण मार्करच्या शेवटी धरल्याने काम सोपे होते. मला घाई काहीच नाही आहे. त्याला लिहीता येते हेच माझ्यासाठी वरदान आहे! अक्षर कसं का असेना!
  • एव्हढुस्सं बाळ. परंतू एक नंबर 'फ्रेंडस मधील मोनिका" आहे! घरात फिरताना कुशन खाली पडलेले त्याला चालत नाही. तो उचलून ठेवतो. डब्याचे झाकण उघडे राहीले - जमत असेल तर बंद करतो. भिंतीवरील आर्टवर्कची जागा बदलेली लगेच कळते त्याला. बेडची चादर अस्ताव्यस्त तर मुळीच खपत नाही. रात्री ३ वाजता पाणी पिताना देखील झोपेत ती चादर नीट करतो. तो दुध पीत असताना जरा खाली सांडले तर लगेच वाकून साफ करतो! (ऑटीझमबरोबर ओसीडी वागणूक येते हे ऐकले होते. आता प्रॅक्टीकल समोर दिसते आहे. ह्याला आवर घालण्यासाठी मी कधीही घरात अमुक एक गोष्ट अमुक ठिकाणी असं करत नाही. माझ्या घरातील आर्टवर्क, फर्निचर या गोष्टी सतत जागा बदलत असतात, याच कारणासाठी!)
  • कुठलेही नवीन जिगसॉ पझल त्याला झरकन सोडवता येते. हे तो कसं करतो माहीत नाही. जिगसॉ पझलच्या पीसेसच्या आकारावरून त्याला कळत असावे कदाचित, तो कुठे जाणार ते. बहुधा, visual - spatial intelligence
  • आयपॅड, आयफोन ही तर अगदी सोपी उपकरणं झाली. या मुलाला टाईप करता येते. २-३ वेळेस त्याने टाईप करून 'Eat" असे लिहीले आहे. कधी प्राण्यांची नावं लिहीली आहेत. नेक्स्ट गोल : माऊस वापरता येणे.
  • संगीताबद्दल अतोनात ओढी. मी त्याला सारेगमप वाजवायला शिकवते. तो कान देऊन ऐकतो. माझी खात्री आहे काही दिवसातच तो स्वतः वाजवू लागेल.
  • ही मुलं फारशा भावना चेहर्‍यावर दाखवत नाहीत. पण माझे मत उलटे आहे. एक्स्ट्रीम संवेदनशील असावीत ही मुलं कदाचित.
  • ऑटीझम जर आमच्या घरात आला नसता, तर मला माझी ओळख कधीच झाली नसती! माझ्यामध्ये किती अमाप मानसिक ताकद असू शकेल हे मला आधी माहीत नव्हते. मी उत्तम शिक्षिका, प्लॅनर, रिसर्च स्टुडंट, काउन्सेलर, थेरपिस्ट आहे हे मलाच माहीत नव्हते. आणि हो, लेखिका देखील! या मुलाने मला किती किती दिलंय त्याची गणती करणं अवघड आहे.

आम्ही त्याच्याबरोबर सतत काम करतो. त्याला आपले नॉर्म्स सांगतो कारण त्याला त्याचे आयुष्य जरा सोपे जाईल, समाजात वावराताना. तो कुठे 'कमी' आहे म्हणून नाही. 'नॉर्मल' काय असते ते आम्ही आमच्या आयुष्यावरून पाहीले आहे. नॉर्मल म्हणजे चारचौघांसारखे. परंतू तो 'स्पेशल' आहे. चारचौघांपेक्षा वेगळा. त्या त्याच्या क्वालिटीज आम्हाला ऑटीझममुळेच मिळाल्या आहेत -हे विसरून चालणार नाही. तो खरोखर आमचा 'बेबी आईनस्टाईन' आहे!

http://marathi.journeywithautism.com/

समाजविचार

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

11 Jan 2015 - 11:06 pm | मधुरा देशपांडे

निशःब्द!!! तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. 'बेबी आईनस्टाईन' ला खूप खूप शुभेच्छा!

सखी's picture

11 Jan 2015 - 11:23 pm | सखी

निशःब्द!!! तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. 'बेबी आईनस्टाईन' ला खूप खूप शुभेच्छा! - अगदी हेच मनात आलं.

श्रीरंग_जोशी's picture

11 Jan 2015 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी

मधुराने मांडलेल्या भावनांशी सहमत.

खटपट्या's picture

11 Jan 2015 - 11:42 pm | खटपट्या

परत एकदा सलाम !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2015 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्यात खूप मानसीक प्रगल्भता आली आहे याचे हा लेख सबळ पुरावा आहे. केवळ तुमच्या मुलासंबंधातच नाही तर एकंदरीत सर्वच जीवनात ती फार दूरवर उपयोगी पडेल हे नि:संशय आहे !

तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि अर्थातच उत्सवमूर्ती 'बेबी आईनस्टाईन'ला अनेकानेक शुभेच्छा !!

"मी उत्तम शिक्षिका, प्लॅनर, रिसर्च स्टुडंट, काउन्सेलर, थेरपिस्ट आहे हे मलाच माहीत नव्हते. आणि हो, लेखिका देखील! या मुलाने मला किती किती दिलंय त्याची गणती करणं अवघड आहे."

सुंदर विचारसरणी....

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

नाखु's picture

28 Jan 2015 - 2:04 pm | नाखु

शिल्पकाराचे हात आहेत ते !!!

किती सकारात्मकतेनं लिहिलयत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jan 2015 - 8:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या पाहण्यामधे दोन ऑटीझम ची उदाहरणं आहेत. हा आजार असणार्‍या लोकांना कलेचं अंग उपजतचं असतं का? कारण त्यातला एक (वय ११-१२) अगदी प्रोफेशनल लेव्हलची चित्र काढतो, त्याची अनेक प्रदर्शनही झालेली आहेत. दुसरी मुलगी (वय ३०-३२) छान गाते, पण तिच्या मनात आलं तरचं अदरवाईज दिवसच्या दिवस काही बोलतही नाही.

बहुदा ऑटिझम मुळे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत होतं असावं असा मला वाटतयं.

बाकी लेख मस्तं आहे. लिहित रहा.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Jan 2015 - 11:31 am | स्वमग्नता एकलकोंडेकर

हो, असं असावं कदाचित. मीही अशी बरीच उदाहरणं वाचली आहेत. माझाही मुलगा मला बर्‍याच बाबतीत एक्सेप्शनल किंवा गिफ्टेड वाटतो. पण 'आपला तो बाब्या' असंही कारण असू शकेल. :)

अजया's picture

12 Jan 2015 - 9:11 am | अजया

_/\_

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 9:21 am | स्पंदना

__/\__!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jan 2015 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार

खर म्हणजे हा भाग वाचल्यावर माझ्या कडे प्रतिक्रीया देण्यासाठी शब्दच नाहीत.

तुमच्या प्रत्येक लेखा मधुन सकारात्मक दृष्टीकोनाचा एक आदर्श तुम्ही उभा करत आहात.

लिहित रहा.

अनेक अनेक शुभेच्छा आणि छोट्या आइन्स्टाईनच्या डोक्यावर माझ्या वतीने एक हळूच टपली मारा.

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2015 - 11:43 am | टवाळ कार्टा

माझी प्रतिक्रिया लिहिण्याइतकीही पात्रता नाही :(

नित्य नुतन's picture

12 Jan 2015 - 12:10 pm | नित्य नुतन

__/\__
दंडवत ... तुम्ही खुप छान आणि सकारात्मक लिहिता ...

मित्रहो's picture

12 Jan 2015 - 12:49 pm | मित्रहो

असे म्हणतात की मोझार्ट, आइनस्टाइन हे ऑटीस्टीक होते. हे सिद्ध करता येत नाही कारण त्यावेळेस या विषयी माहीती नव्हती. हल्लीच्या काळात सातोशी ताजीरी (ज्याने पोकेमॉन बनविले) हे एक सिद्ध झालेले उदाहरण आहे.
मला वाटत मोनोटोनी हे जसे लक्षण आहे तशी ताकत सुद्धा आहे. एकच गोष्ट सतत करीत राहणे फार सोपे नाही पण अशा मुलांना ते कदाचित सहज जमत असावे.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Jan 2015 - 11:29 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

मी आईनस्टाईन व न्यूटनबद्दल ऐकले आहे. न्यूटन फार कमी बोलणारा होता व आईनस्टाईनचे तर माहीतच असेल. हे इंटरनेटवर मिळाले:
IS IT TRUE THAT EINSTEIN WAS A LOUSY STUDENT?
In some ways, yes. When he was very young, Einstein’s parents worried that he had a learning disability because he was very slow to learn to talk. (He also avoided other children and had extraordinary temper tantrums.) When he started school, he did very well-he was a creative and persistent problem-solver-but he hated the rote, disciplined style of the teachers at his Munich school, and he dropped out when he was 15.

मला कधी कधी खरेच वाटते की ही मुलं कदाचित असामान्य कलागुण घेऊन आलीदेखील असतील. पण आपण मात्र ठोकून ठोकून त्यांना समाजामध्ये 'फिट' करण्याच्या मागे लागतो. square peg in a round hole. :)

कौतुक आहे तुमचे आणि मुलाचे !
सध्या वय किती आहे त्याचे ?

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Jan 2015 - 12:58 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

धन्यवाद. आता सव्वा चार वर्षाचा आहे तो.

डब्याचे झाकण उघडे राहीले - जमत असेल तर बंद करतो. भिंतीवरील आर्टवर्कची जागा बदलेली लगेच कळते त्याला. बेडची चादर अस्ताव्यस्त तर मुळीच खपत नाही. रात्री ३ वाजता पाणी पिताना देखील झोपेत ती चादर नीट करतो. तो दुध पीत असताना जरा खाली सांडले तर लगेच वाकून साफ करतो!

सव्वाचार वर्षे वयात इतके सुव्यवस्थित वागणे ?
अभिनंदन ! नॉर्मल मुलेपण नाही वागत इतकी. तुमचा मुलगा extra-ordinarily sharp आहे ! *smile*

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Jan 2015 - 8:50 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

हो, पण मला काळजीच वाटते. हे नुसता सुव्यवस्थितपणा नसून ओसीडीची लक्षणे देखील आहेत. पुढचा लेख त्याबद्दलच आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jan 2015 - 3:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही एक तोत्तोचान नावाचं पुस्तक नक्की वाचा. खुप सुंदर आहे.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Jan 2015 - 8:51 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

माझेही आवडते पुस्तक!

मदनबाण's picture

13 Jan 2015 - 4:06 am | मदनबाण

शब्दच नाहीत...
__/\__
दंडवत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 12:05 pm | सविता००१

_________/\_________

तुमची विचारसरणीही फार आवडली

आतिवास's picture

13 Jan 2015 - 12:14 pm | आतिवास

+१००

सुधीर कांदळकर's picture

29 Jan 2015 - 12:13 pm | सुधीर कांदळकर

आपल्या सकारत्मक दृष्टीला सलाम.

सर्वच स्वमग्न माणसे एवढी बुद्धिमान असतील की नाही कोण जाणे. 'ऑटिस्टीक सॅव्हर्न' अशा बुद्धिमान व्यक्तीनाच म्हणत असावेत. सॅव्हर्न = '२५० पेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेली व्यक्ती' असे कुठेतरी वाचलेले आठवते.

काही वर्षापूर्वी एक कादंबरी की कथा वाचली होती. नंतर त्यावर एक सिनेमा पण आला होता. त्यात एक माणूस आपली सर्व इस्टेट त्या सॅव्हर्नला देतो कारण दुसरा मुलगा उनाड असतो. तो उनाड मुलगा याच्या बुद्धीचा उपयोग करून जुगारात पैसे कमावतो वगैरे वगैरे. कदाचित हीच गोष्ट यापूर्वीच्या आपल्या याच विषयावरील पूर्वीच्या लेखाला मी दिलेल्या प्रतिसादात लिहिलेली असू शकते.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

30 Jan 2015 - 7:08 am | स्वमग्नता एकलकोंडेकर

नाही, सर्वच मुलं बुद्धीमान असतील, किंवा त्या इंटेलिजन्सचा फायदा करून घेतील असं नसते. शिवाय ऑटीझमच्या बाबतीत 'रिग्रेशन' ही भिती कायमच बागुलबुवासारखी पालकांच्या डोक्यात असते. माझा मुलगा फॉर सम रिझन एखादं स्किल डेव्हलप केले की काही दिवस खूपदा ते स्किल वापरतो, त्याला आवडते तसे. म्हणजे उदा: तो मध्यंतरी 'ओ' खूप मस्त म्हणायचा. म्हणजे हाकेला ओ नाही, एल एम एन ओ पी मधला ओ. किती तरी दिवस तो ओ म्हणायचा. मग 'गो' , 'मोअर', 'नो' सगळ्याला ओ म्हणायचा. आणि एके दिवशी अचानक ते थांबले. आता तो 'ओ' हा शब्द्/आवाज म्हणत नाही. :( त्यामुळे मला तरी त्याच्या स्किल्स मिस होऊ नयेत , किंवा निदान ती आहेत हे मला कळावीत म्हणून प्रयत्न करावे लागतात. (तरीही मला १००% आयडिया नाही, की याला एखादं स्किल विसरायला झाले आहे (रिग्रेशन) की, तो असंच मुद्दाम, कंटाळा आला म्हणून करत नाही ते.)

पण, मुद्दा हा आहे, की ऑटीझम स्पेक्ट्रमवरील सर्वच मुलं सॅवन्ट सिंड्रोम एक्झिबिट नाही करत. बर्याच मुलांचा ब्रेन बर्यापैकी अफेक्टेड असतो. माझा मुलगा शार्प आहे, बुद्धीमान आहे असं मला वाटते, परंतू तो सॅव्हंट सिंड्रोम आहे असं अजुन वाटत नाही.