अत्तरायण..! भाग - १

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
2 Dec 2014 - 6:17 pm

अत्तर म्हटलं..की..
रमझानचे दिवस आहेत. संध्याकाळची वेळ आहे.शाळेतल्या मित्रांच्या कंपूनी "दिवट्या...चल..आज मोमिनपुर्‍यात जायचय..यायचं हां तू...ते भटजी वगैरे गेलं तेल लावत.लै नाटकं नाय करायची" ..अशी धमकी मैत्री खात्यात दिलेली आहे.मी ही आज ते तहुरा कोल्ड्रिंक्स,तो इराणी श्टाइल चाय, ती मोठ्ठी तळलेली पोळि/पुरी आणि तो सत्यनारायणाच्या प्रसादाशी स्पर्धा करणारा शिरा, काळेजामुन्,डब्बल का मिठ्ठा,वेगवेगळे अरेबिक खजुर-(काहि अत्यंत गोड,पण तोंडात सालं चिकटवणारे,तर काहि अत्यंत मधाळ चवीचे..खाता खाता 'बी' कधी तोंडातून बाहेर आली,याचा पत्ताहि न लागू देणारे..), असं भरपूर चरल्यावर नंतर साधं पत्ता तंबाखुचं अत्यंत सालस किक देणारं पान चघळून झालेलं आहे..अश्यात पुढे एक सुरम्याचा श्टॉल लागतो आहे. मग साधा नाहितर स्पेशल सुरमा डोळ्यांना चढवून्,दोन्/तीन मिनिटं त्याच खुर्चीत डोळ्यांना थो......डं झोंबत गार गार वाटवत्,निपचीत त्या खुर्चीत पडून रहातो आहे..कडेनी मिनारावर लावलेल्या भोंग्यातून.... असदुल्ल लल्ला...आ...हु..अकबर... असे काहि तरी सूर कानावर पडत आहेत..सुरमेवाला पुढची गिर्‍हाइकं पाहाता..मला, अब उठो भै! ..म्हणतो आहे... आणि....

तिथुन उठल्यावर पुढे मला एक अत्तराचा स्टॉल बोलावतो आहे.. हे चित्र अजुनंही दिसतं. माझी अत्तरांशी ओळख तशी सर्वसामान्यपणे लहानपणी होते ती झालेली होतीच. त्यातंही कोकणातल्या घरगुती सोहळ्यांमधले..लावलेल्या (आणि ल्यालेल्या.. ;) ..) अत्तरांचे काहि खास वास, मेंदूत रजिस्टरंही झाले होते.अजुनंही आहेत. पण अत्तरांशी दोस्ती सुरु झाली ती आमच्या न्यू इंग्लिश स्कूल मधल्या मित्रांच्या टोळक्यामुळेच. म्हणजे आमच्या टोळीत कुणिही अत्तरांचा खासा शौकिन नाही. रमझानच्या सिझनला सगळे मोमिनपुर्‍यात जायचे ,ते प्रामुख्यानी खाटखुट खायलाच. पण त्यांचं खाणं,आणि माझं अत्तरांबरोबर गाणं,त्याच एका वक्ताला सुरु झालं.नंतर पुढे अशीच ३/४ वर्ष गेली. बाकिचे सर्व मित्र अनेक कारणानी बंद झाले.पण मी सुरु-राहिलो ते अत्तरांमुळेच.

मोमिनपुर्‍यात मध्यभागी डाव्या बाजुला एक अत्तरांचा भला मोठ्ठा स्टॉल तेंव्हा लागायचा. अताही तो आहे,पण एका बाजुच्या कोपर्‍यात पानटपरी सारखा तो दिवंगत झालाय. बाँबस्फोट/हल्ले इत्यादी प्रकरणं सुरु झाल्यापासून,मोमिनपुर्‍यातला सगळाच तो जोस एकंदरीतच ओसरलेला आहे. पण तेंव्हा मात्र तो स्टॉल एखाद्या फटाक्यांच्या स्टॉल इतका मोठ्ठा असायचा. असाच एकदा मी रात्री ११ नंतर ,करंट आल्यासारखा मोमिनापुर्‍यात गेलो होतो.दिवस रमझानचेच होते..आधी गेल्या गेल्या ते तहुरा कोल्ड्रिंक्स वाल्याकडचं एक दाट दुध कोल्ड्रिंक लावलं,आणि बार मळत मळत..अत्तर वाल्याकडे गेलो. त्यानी गेल्या गेल्या पहिलं मजमुआचं फ्री सँपल माझ्या हातावर चढवलं. मीही मग ते गा....र श्वासासह ,बिडीचा झुरका मारवा तसं मनगटावरून नाकात-घेतलं आणि पहिली किक बसली. मग क्क्काय??? माझे दोन्ही हात भरेपर्यंत त्यानी त्या काचेच्या शलाकेनी माझ्या अंगावर मस्त रंगपंचमी केली. (करणार का नै मेला!? ;) मी त्याचं दरवर्षीचं ,संपूर्ण रमझान-मिळून्,चांगलं पाचशे ते हजाराचं-गिर्‍हाइक होतो! ) मग मी हिना ,जन्नत उल फिरदोस, मस्क, अशी काहि अत्तरं घेतली. और तब से ये सिलसिला शुरु रहा है,वो आजतक.

त्यानंतरच्या दहा ते बारा वर्षांचा हिशेब पहाता मी अत्तरांच्या प्रांतात आज आहे, तो ही केवळ हौशी! शौकिन नाही..अट्टल शौकिन तर मुळीच नाही. कारण अत्तरांशी दोस्ती जमते..तशीच जमवत जावी.उगीच नसती सलगी करायला जाऊ नाही. नाहितर अत्तरांची नावं कळतात..अत्तरं काहि कळत नाहीत अशी अवस्था होते. अत्तरं हुंगावी नाकानी,वेध घ्यावा तो मेंदुनी आणि जानपेहेचान करवावी ती स्मृतींनी..
म्हणूनच मी माझी अत्तर ओळख मांडणार आहे ती स्मृतींच्या आधारे. :)

१) हीना:- हे एक अत्यंत कॉमन अत्तर आहे. दाट वास असलेलं.त्यामुळेच ह्याचे जितके शौकिन सापडतात्,तितकेच तिरस्कार करणारेही अढळतात. माझ्या एका मित्रानी तर या अत्तराची 'पेश्ट कंट्रोलचं औषध" अशी संभावना केलि होती. त्यावर त्याची कंपुतल्या इतरांकडून..नरकात जाशील रे मेल्या... किडे पडतील किडे ( =)) ) अशी उलट संभावना झालेलीही मला अठवते. मी मात्र पहिल्यांदा हे अत्तर टेस्ट केलं ते एका खास प्रसंगात. पुणे वेदपाठ शाळेत शिकत असताना एकदा संध्याकाळी आमचा एक असाच अत्तरवेडा मित्र माझ्या समोर आला. आणि मला दम दिल्या सारखं.."हात कर पुढे!!!" असं म्हणाला मी गपगुमान मनगट त्याच्या कडे रोखलं. त्यानी एक अ‍ॅल्युमॅनिअमची छोटी बुधली काढली,आणि वरचं काळं-रबरी बुच बाजुला करून चांगलं बोटभर अत्तर माझ्या दोन्ही हातांना लावलं. मी ती बुधली उघडल्यापासूनच डोळे मिटले होते...असा काहि धुं................................द करणारा वास श्वासातून वहायला लागला होता,की बा...स! नंतर ते हाताला लागलेलं अत्तरं मी भुकेलेल्या माणसानी भराभरा गरम अन्नावर तुटून पडावं, तसं ५ मिनिटं नाकावरनं दोन्ही हात फिरवत आत घेतच राहिलो होतो. नंतर आमचा तो मित्र - " एकदम जहरी माल आहे,मला माहित होतं तुला लागू पडणार!" - असं म्हणून हसत हसत(तो हसला का ते माहित नाही अजुनंही..दुष्ष्ट! :-/ ..) तो तसाच निघून गेला. नंतर मला कळलं की ते 'हीना' त्यानी खास लखनौ का कुठून तरी मागवलं होतं. अजुनंही मला थंडीचे दिवस आले की ज्या अत्तरांची अठवण होते..त्यातलं हे एक आहे.. हीना... ग्गार हवेवर याचा भरभरून वास घेतल्या नंतर का कोण जाणे प्रचंड उबदार वाटतं... आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा...

इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा।

====================
क्रमशः....

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

2 Dec 2014 - 6:19 pm | प्रशांत

आवडल्या गेला आहे.
पुभाप्र.

विजुभाऊ's picture

2 Dec 2014 - 6:37 pm | विजुभाऊ

खान गुर्जी झकास लिवलय भो......

जेपी's picture

2 Dec 2014 - 6:45 pm | जेपी

आवडल....

जे.पी.मॉर्गन's picture

2 Dec 2014 - 7:10 pm | जे.पी.मॉर्गन

अत्तरायणाच्या प्रवासाला आम्हीपण तयार आहोत! वेगळा विषय रोचक ठरणार!

जे.पी.

सगळ्यात आवडता प्रकार आहे हा माझा... परफ्युम, अत्तर खुप आवडतात.
खुप छान लिहले आहे. पु.भा.प्र.

प्रचेतस's picture

2 Dec 2014 - 7:26 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच भारी.
मोमीनपुर्‍यात रमझानात तुमच्याबरोबरच एक चक्कर झाली होती तेव्हा हे उत्सवी आतावरण अनुभवलेच होते.

बाकी आमच्या सध्या गायब असलेल्या एका मित्राला पाण्यात मिसळण्यासाठी हवे असलेल्या अत्तराचाही किस्सा येऊ द्यात.

रेवती's picture

2 Dec 2014 - 7:29 pm | रेवती

भारी लिहिलयत.

आवडलं अत्तरायण.पुभाप्र.

किसन शिंदे's picture

2 Dec 2014 - 7:46 pm | किसन शिंदे

मस्तच!

आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा...

आँ!! लब्बाड गुरूजी...याचा अनुभव कुठे तरी घेतलेला दिसतोय. ;) :P

सूड's picture

2 Dec 2014 - 7:56 pm | सूड

खिक्क !!

आँ!! लब्बाड गुरूजी...याचा अनुभव कुठे तरी घेतलेला दिसतोय.

ये लगा दनदनाता छक्का !!! =))

सुबोध खरे's picture

2 Dec 2014 - 8:56 pm | सुबोध खरे

चामड्याच्या वासाचे अत्तर पण मिळते आणि ते भरपूर खपते.
कारण बर्याच थंड आणि दमट देशांमध्ये चामड्याला बुरशी लागते किंवा कुबट वास येऊ लागतो. आपल्याकडे न खपलेला माल पावसाळ्यानंतर बाहेर काढल्यावर तसेच होते. (किंवा पावसाळ्यात चार महीने माळयावर टाकलेले चामड्याचे बूट जसे होतात) परत ती पादत्राणे किंवा पर्सेस साफ करून त्याला पॉलीश लावून हे अत्तर मारून एकदम चकाचक नवीन बूट (किंवा पर्सेस) म्हणून तुम्हाला विकता येतात.

अत्तर आवडत नाही परंतु तुमचा अनुभव वाचणार आहे. पहिलेच "अत्तरांशी दोस्ती -- जान पहेचान करावी स्मृतिंनी" या वाक्याने उत्सुकता वाढवली आहे .या सूचनेवजाआज्ञा शिरसावंद्य प्रमाण मानून दक्षतेने वाचणार आहे.
पहिलाच धडा जड जाणार असं दिसतंय. पहिली मिठी वगैरेच्या स्मृतिंना आठवल्याशिवाय हीनाचा वास चुकलो गंध नाकातून मेंदूपर्यंत जाणार नाही. दुसरं म्हणजे उर्दु फारसी शब्दही समजवा.
आता आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना अत्तर गळी उतरवणे पेक्षा नाकाने गंधज्ञान करवणे म्हणजे अरसिकेशु कवित्व -- असो यापुढे हाताची घडी तोंडावर बोट आणि नाक उघडे.
अत्तरायण +१०

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2014 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा

@यापुढे हाताची घडी तोंडावर बोट आणि नाक उघडे.>>> =)) __/\__ =))

तुषार काळभोर's picture

2 Dec 2014 - 9:35 pm | तुषार काळभोर

सत्यनारायण ते अत्तरायण :)

प्यारे१'s picture

2 Dec 2014 - 9:48 pm | प्यारे१

यह महफिल (इतर मेहफिलींच्या वरचढ) रंग जमायेगी.
मान गये बुवा!

खटपट्या's picture

3 Dec 2014 - 12:02 am | खटपट्या

वाचतोय !!
माझ्या एका मित्राचे आड्नाव "अत्तरदे" आहे. हे अत्तराच्या व्यवसायावरुन पड्ले असावे का? त्याला याबद्द्ल काहीच माहीती नाही.

आम्हाला एक प्रोफेसर होते अत्तरदे नावाचे, मॅथ्स का फिजिक्स काहीतरी शिकवायचे, त्याच्याआधी आणि त्यानंतर कुणाचेच हे आडनाव ऐकले नाही, आज तुम्ही लिहिपर्यंत.

नाही ते प्रोफेसर नाहीत. आणि माझे मित्र डोंबिबली (मध्यवर्ती ठीकाण) येथे राहतात.

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 9:52 am | सुबोध खरे

तुम्ही ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजचे का? आम्हाला पण अत्तरदे सर अकरावी बारावी ला (१९८२) भौतिकशास्त्र( फिजिक्स) शिकवायला होते. अत्तरदे आणी आढळी सर असे दोन प्राध्यापक होते आणी फार छान शिकवत असत.

तुषार काळभोर's picture

3 Dec 2014 - 8:35 pm | तुषार काळभोर

माझा एक मित्र होता इंजिनियरिंगला.. जळगावचा...

मुक्त विहारि's picture

3 Dec 2014 - 2:41 am | मुक्त विहारि

मदनबाण ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

नाखु's picture

3 Dec 2014 - 8:52 am | नाखु

"अत्रंगी"## मनुक्श आणि अतरंगी निरूपण.

## "अत्रंगी" ची शब्दफोड: अत्तरासारखी फक्कड दोस्ती जमवणारा आणि "रंगीला"(पुण्यातल्या खादाडीच्या अनवट पण एक वेगळी ऐट असलेल्या जागांचा शौकिन मनुक्श)
उगा नवीन अर्थ काढून "संध्यानंद" करू नये.

बोका-ए-आझम's picture

3 Dec 2014 - 9:21 am | बोका-ए-आझम

मस्तच बुवा! एकदम सुगंधी लेख!

सौंदाळा's picture

3 Dec 2014 - 10:12 am | सौंदाळा

अत्तरायण मस्तच.
मी काही अत्तराचा शौकीन नाही पण लेख मात्र एकदम कडक
घारापुरी कट्ट्याला बोटीत अत्तराची कुपी काढुन अत्तर तुम्ही सर्वाना लावले होते ते आठवलं
मिपा कट्टा, समुद्रातली सफर गप्पाटप्पा आणि त्या अत्तराचा सुगंध मस्त माहौल होता.

रमझानच्या सिझनला सगळे मोमिनपुर्‍यात जायचे ,ते प्रामुख्यानी खाटखुट खायलाच

अजुनही जातो.
तीन का चार? वर्षापुर्वी स्वाईन फ्लुच्या साथीच्या वेळी रमजानला हे स्टॉल लागले नव्हते ते वर्ष सोडले तर माझा पण हा सिलसिला (खाण्याचा) चालु आहे.
तंदुरी चिकन, मटन दालचा, बिर्यानी, बटेर मसाला आणि नंतर फालुदा, फिरनी आणि शाही तुकडा खाऊन डुलत डुलत ईस्ट स्ट्रीट्वर यायचे निवांत १-२ तास गप्पांचा अड्डा जमवुन मध्यरात्रीनंतर घरी पोचायचे

स्पंदना's picture

3 Dec 2014 - 10:27 am | स्पंदना

आई शप्पथ!!
सुरुंग लावला तुम्ही गुर्जी तुमच्या प्रतिमेला. चक्क चक्क भटजी शेंडी सांभाळत मोमिनपुर्‍यात?
चरण कमल इकडे करा गुर्जी, माझा नवरा मुंबईत सुद्धा मला त्या मुस्लिम हलवायाच्या दुकानात जाउ देत नव्हता. पण माझ मन ओढायच त्या भल्या मोठ्या पुर्‍या पाहून. एकदापण नाही मिळालं खायला, अन मज्जा बघायला.
नेक्सट टाईम गुर्जी तुम्ही टुर काढा असल्या सगळ्या गोष्टींची. आपण मनसोक्त हादडत फिरु.
अत्तरांबद्द्ल काय सांगावं? तरीही "मिट्टी" हा सुगंध कुणाला माहित आहे का?

मदनबाण's picture

3 Dec 2014 - 10:36 am | मदनबाण

गंधाचा आणि स्मॄतीचा अगदी गाढा संबंध आहेच...पण त्या बरोबरच तो एक अनुभव सुद्धा आहे. :)
अत्तरांचा आणि माझा संबंध नरसोबाच्या वाडीमुळेच आला... महापुजेच्या वेळी दत्तपदकमलांना लावले गेलेल्या अत्तरांचा घमघमाट काय वर्णावा ? माझे वडिल मांटुंग्याला आणि इतर ठिकाणी जाउन उदबत्या घेउन येतात,दादर ला फुलाबाजारातुन फुले घेउन येतात आणि याच प्रमाणे अत्तरे देखील. हे सर्व वाडीला दत्त चरणी अर्पण करण्यासाठीच { त्यांचा हा अनेक वर्षाचा क्रम आजही चुकलेला नाही.} आपल्याला जर सर्व उत्तम गोष्टी लागतात, तर मग देवालाही का नको ? ही त्यांची मूळ भावना... त्यांमुळेच चांगली अत्तर वापरण्याची,अनुभवण्याची आणि शोधण्याची सवय मला देखील लागली. :)
आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा...
काय गुरुजी ? ही संथा कधी मिळाली तुम्हाला ? जर सांगा बर... ;)
हीना हे प्रकॄतीला आणि गुणाला थंड आहे बरं का... ;) त्यातही हीना+मुश्क {कस्तुरी} असलेले अत्तर वापरलेत तर त्याचा प्रभाव अजुनही उच्चकोटीचा वाटतो... एकदा मुश्कहीना वापरलेत की मग फक्त हीना त्यापुढे काहीच वाटेनासे होते. {अर्थात हा माझा व्यक्तीगत अनुभव आणि आवड आहे.} तसेच उत्तम दर्जाचे मजमुआ लावले असेल तर त्याचा गंध स्त्रीयांना लगेच कळतो आणि आवडतो असा माझा आजवरचा अनुभव आहे. मजमुआ हे केवडा अत्तर+ खस अत्तर आणि दोन /तीन वेगळ्या अत्तरांचे प्रभावी मिश्रण आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

खटपट्या's picture

4 Dec 2014 - 6:26 am | खटपट्या

बाणसाहेब, तिकडे आल्यावर एक मजमुआची बाटली घेतो तुमच्याकडून. (अर्थात जे काही होतील ते पैसे दीले जातील)

मस्तच लिहिलय....पुभाप्र

सविता००१'s picture

3 Dec 2014 - 10:53 am | सविता००१

मस्तच सुरुवात हो..........

मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा शिल्लक राहीलेल्या सर्व बाटल्यातले अत्तर एकत्र करतात आणि विकतात असे मला वाटते.

मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा शिल्लक राहीलेल्या सर्व बाटल्यातले अत्तर एकत्र करतात आणि विकतात असे मला वाटते.
अत्तराचा फाया कानात घातलेले लोक कापुस बाहेर आलेल्या गादीसारखे दिसतात असे तुम्हाला वाटत असल्याने मजमुवा बद्धल असे का वाटते ते समजु शकतो ! ;)

जाता जाता :- जरा गुगुलबाबाला विचारुन तरी पहायचे होते...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

अनुप ढेरे's picture

3 Dec 2014 - 11:00 am | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय! खूप आवडलं...

लीलाधर's picture

3 Dec 2014 - 11:25 am | लीलाधर

उत्तम असा लेख वाचायला मिळणार अगदी अत्तरासारखाच आवडेल

मी लहान असतांना आमच्या घरी एक गृहस्थ आले होते.माझ्या बाबांचे सहकारी ते, घरामधे आल्या आल्या आमच्या सगळ्यांच्या नाकातून डोक्यात एक जोरदार गंध गेला..नंतर त्या गृहस्थाने बाबांना एक अत्तराची लहानशी कुपी दिली, ते गेल्यावर बाबांनी स्वतःच्या हातावर ते लावलं आणि परत एकदा आम्हा सर्वांचं डोकं त्या वासाने गरगरलं...नावाचा शोध घेता कळालं ते अत्तर 'मजमुआ' होतं!! आजतागायत आम्ही सगळेजण डोक्यात जाणा-या कोणत्याही वासाला 'मजमुआ'च म्हणतो ;)

बॅटमॅन's picture

3 Dec 2014 - 12:39 pm | बॅटमॅन

आहा! इतके कधी एक्स्प्लोअर केले नाही परंतु सुगंधाचे चाहते आहोत आपणही (पन सो नॉट इंटेंडेड). तस्मात मजा येतेय!

आजतागायत आम्ही सगळेजण डोक्यात जाणा-या कोणत्याही वासाला 'मजमुआ'च म्हणतो
हा.हा.हा... प्रत्येकाला प्रत्येक गंध सहन /सुट होइलच असे नाही. { विशेषतः ते केमिकल बेस्ड असेल तर असा त्रास होतो.}

बाकी फार पूर्वी मी वसईला नोकरीला असताना ठाणे-मिरा-रोड बस पकडायचो, त्या बस मधे कधी तरी एक मुसलमान युवक चढायचा, तो चढला की संपूर्ण बस मधे कधी हिना तर कधी खस चा सुगंध दरवळायचा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

बाय द वे, तुम्ही न्यु इंग्लिश स्कूल मधले म्हणजे टिळक रोड कि रमणबाग ? आणि कोणती ब्याच?

{प्रोफेसर अत्तरदे यांना ओळखतो आणि ते दुसरे डोंबिंवलीचे त्यांचे सख्खे बंधू आहेत पण आता अधिक वैयक्तिक माहिती नाही देत.} अत्तराकडे वळूया.

प्रसाद गोडबोले's picture

4 Dec 2014 - 3:30 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम लेखन बुवा !

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !!

-
ऑफीसडेस्कच्या ड्रॉवरच्या कोपर्‍यात 'नाकारलेली' एक फर्फ्युमची कुपी बाळगुन असणारा
प्रगो

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2014 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

वल्ली
@बाकी आमच्या सध्या गायब असलेल्या एका मित्राला पाण्यात मिसळण्यासाठी हवे असलेल्या अत्तराचाही किस्सा येऊ द्यात.>>> सदर व्यक्तिनी आमचे कडून विवाहित होणेचे ४ दिवस आधी,नीट तेहेकिकात करून ३ अत्तरे नेली होती. तिन्ही अत्तरांचा कसा कसा आणि केंव्हा योग्य वापर करावा? यासंबंधी चर्चाहि केली होती. आंम्ही त्यांना आमच्या (केवळ ;) ) अंदाजा नुसार बरेच मार्ग-दर्शन केले होते. त्यानंतर (म्हणजे लग्न झाल्यानंतर!) पुन्हा ४ महिन्यांनी सदर व्यक्तिस आमची अठवण झाली. भेटी अंती आंम्ही उत्सुकतेने त्यांना सदर विषयावर छेडले असता,त्यांनी अत्यंत शिताफिने त्या विषयास फाटा दिला! :-/ आणि फक्त माझे बरोबर जेवणास नजिकच्या एका हाटिलात आले.
---------------------
प्र-कटन समाप्त!
=====================================================
किसन शिंदे (आणि मदनबाण यांचे साठिही..! ह्ही! ह्ही! ह्ही! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif )
@आँ!! लब्बाड गुरूजी...याचा अनुभव कुठे तरी घेतलेला दिसतोय.>>> मुरली-धर महाराज...आपला औत्सुक्यपूर्ण संशय दाद देण्याजोगा आहे. तरिही मी स्वतः (अजुनंही!!!) असा अनुभव कुठेही-घेतलेला नाही. आपण आंधी नावाचा एक प्राचीन चलचित्रपट मण लाऊन पहा. प्रेमातल्या हरेक(आलेल्या/राहिलेल्या) अवस्थेची आत्मप्रचीती आल्यासारखे वाटेल.आजही हा चित्रपट पहाताना,आमचेही तसेच काहिसे होते. शिवाय पीरेम...,या इषयावर पाहिलेल्या काहि चित्रपटांमधे तर ,ही पहिल्या प्रेमातली मंदधुंद मिठी इतकी सुरेख उलगडून दाखविली जाते..की प्रत्यक्षाहुनी........... असो!!! :D
====================================================
स्पा ये लगा दनदनाता छक्का !!! >> अस्सं!!! :-/
==============================
सौंदाळा
मी आणि अजुन १ जण वजा जाता..आमच्याही त्या कंपुतले..बाकिचे सगळे खाटखुट प्रेमीच आहेत!
यथेच्छ हादडत असतात.. :D
====================================
aparna akshay
@सुरुंग लावला तुम्ही गुर्जी तुमच्या प्रतिमेला. चक्क चक्क भटजी शेंडी सांभाळत मोमिनपुर्‍यात?
चरण कमल इकडे करा गुर्जी, >>> =))

@नेक्सट टाईम गुर्जी तुम्ही टुर काढा असल्या सगळ्या गोष्टींची. आपण मनसोक्त हादडत फिरु.>> नक्किच.

अत्तरांबद्द्ल काय सांगावं? तरीही "मिट्टी" हा सुगंध कुणाला माहित आहे का? >> लिहिणार आहे.
===========================================================
मदनबाण
हीना हे प्रकॄतीला आणि गुणाला थंड आहे बरं का... Wink त्यातही हीना+मुश्क {कस्तुरी} असलेले अत्तर वापरलेत तर त्याचा प्रभाव अजुनही उच्चकोटीचा वाटतो... एकदा मुश्कहीना वापरलेत की मग फक्त हीना त्यापुढे काहीच वाटेनासे होते. >>> ऐसा इच है..मेरा हणुभव भी! आगे लिख्खुंगा..इस के बारे मे।
================================================================
अत्तरायणातील सहभागीतांचे आणि सर्वांचे आभार! :)

भेटी अंती आंम्ही उत्सुकतेने त्यांना सदर विषयावर छेडले असता,त्यांनी अत्यंत शिताफिने त्या विषयास फाटा दिला! Beee आणि फक्त माझे बरोबर जेवणास नजिकच्या एका हाटिलात आले.

याचा अर्थ अपेक्षीत परीणाम साधला गेला आहे. याची पावती मिळाली.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2014 - 6:41 am | अत्रुप्त आत्मा

=)) .. =)) .. =))

पैसा's picture

10 Dec 2014 - 8:22 am | पैसा

अत्तराचा दरवळणारा सुगंध असतो तसा सुंदर लेख!

मलाही मंद वासाची नैसर्गिक अत्तरे आवडतात. सिंथेटिक 'सेंट"चा वास उग्र असेल तर मात्र सायनसचा अटॅक येतो!

वेदांत's picture

28 Jul 2016 - 4:12 pm | वेदांत

वाह.. एकदम सुगंधी लेख ..

पद्मावति's picture

28 Jul 2016 - 5:43 pm | पद्मावति

अतीव सुंदर लेखमाला. अत्तरांविषयी इतकी माहिती पहिल्यांदाच वाचतेय. तिसरा कस्तुरिविषयीचा भाग केवळ अप्रतिम.
चौथा भाग दिसला नाही:(

झेन's picture

28 Jul 2016 - 7:51 pm | झेन

गुरुजी मजा आली.
माणसाचा जन्म आणि रस रंग आस्वाद घेतला नाही तर पेरमेश्वराला तोंड कसे दाखवणार. वरती पैसा तैनी म्हटल्या प्रामाणे नैसर्गिक वासच जास्त चांगले वाटतात.
कुणीतरी कृपया बाकीचे भाग कसे शोधायचे सांगाल का.

वेदांत's picture

29 Jul 2016 - 9:50 am | वेदांत
वेदांत's picture

29 Jul 2016 - 9:53 am | वेदांत
झेन's picture

29 Jul 2016 - 10:17 am | झेन

धन्यवाद वेदांतजी

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jul 2016 - 11:14 am | अत्रुप्त आत्मा

@वेदांत, पद्मावति , झेन ››› धन्यवाद.

मारवा's picture

31 Jul 2016 - 7:11 pm | मारवा

लेख आवडला
बाकी सुगंधाने स्त्रीया आकर्षीत होतात वगैरे अजुन तरी अनुभवलेले नाही.
अर्थात माझी मर्यादा

निखिल निरगुडे's picture

1 Aug 2016 - 12:01 am | निखिल निरगुडे

मला अत्तरांबद्दल विशेष ज्ञान नसून देखील तुमच्या लेखनामुळे वाचायला मजा अली.. मस्त!

चतुरंग's picture

1 Aug 2016 - 12:30 am | चतुरंग

आत्मुगुर्जींची ही सुगंधयात्रा वाचायची राहूनच गेलेली!
सुवासिक लिहिलं आहे.
मलाही अत्तरं आवडतात परंतु नैसर्गिक आणि मंद सुगंधाची.

चाणक्य's picture

1 Aug 2016 - 11:06 am | चाणक्य

हे राहूनच गेलं होतं. गुर्जी फुडचं लिवा की. ३च भाग ?

वेदांत's picture

1 Aug 2016 - 11:13 am | वेदांत

+१