आहे रे नाही रे , हिरावणे आणि तुलना उपदेश या बाबत थोडेसे ...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
28 Nov 2014 - 11:51 am

मला सुचलेले काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. आपल्याला पटले किंवा नाही ते कळवा:

(१) आहे रे आणि नाही रे...!!

(अ) "आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे" - इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका. नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय??
(ब) "आपल्याजवळ जी गोष्ट आहे पण इतरांजवळ नाही" - आपल्याकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि इतरांना मिळावी यासाठी प्रार्थना करा. पण ती गोष्ट आपल्याजवळ असल्याचा अभिमान व गर्व बाळगून इतरांना कमी लेखू नका. ती गोष्ट तुमच्यापासून हिरावून घेतली गेली तर काय कराल??

(२) हिरावून घेणे

तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्ती ची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेते.

(3) तुलना आणि उपदेश:

दोन व्यक्तींमध्ये तुलना करणाऱ्या तुलनाबाज लोकांचा कोणताही उदात्त हेतू कधीच नसतो. तसेच उपदेश करणाऱ्या व्यक्तींचा हेतू कधीच उदात्त नसतो. कारण तुलना करून त्या दोन व्यक्तींपैकी कुणीच सुधारत नाही पण त्या दोघांमध्ये द्वेष भावनाच वाढीस लागते. लोक तुलनेतून नाही तर प्रेरणेतून सुधारतात आणि लोक उपदेशातून नाही तर तुम्ही कसे वागता त्या उदाहरणातून शिकतात कारण उपदेश करणारा सुद्धा स्वत: कधीच बिनचूक बागात नाही.
तुलनाबाज लोकांचा हेतू एकच असतो: दोन्ही व्यक्तींची तुलना करून त्या दोघांवर अंकुश ठेवणे. उपदेशबाज लोकांचा एकच हेतू असतो: समोरच्या व्यक्तीच्या सतत चुका काढून उपदेश करून त्याचे मानसिक खच्चीकरण करणे आणि त्याचेवर अंकुश ठेवणे.

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

28 Nov 2014 - 12:04 pm | प्रसाद१९७१

हम्मा.....

निमिष सोनार's picture

28 Nov 2014 - 1:48 pm | निमिष सोनार

ये लवकर ...

तुषार काळभोर's picture

28 Nov 2014 - 2:26 pm | तुषार काळभोर

माझं या वाक्यांकडे लक्ष गेलं:
१. उपदेश करणाऱ्या व्यक्तींचा हेतू कधीच उदात्त नसतो.
२. लोक उपदेशातून नाही तर तुम्ही कसे वागता त्या उदाहरणातून शिकतात कारण उपदेश करणारा सुद्धा स्वत: कधीच बिनचूक बागात नाही.
३. उपदेशबाज लोकांचा एकच हेतू असतो: समोरच्या व्यक्तीच्या सतत चुका काढून उपदेश करून त्याचे मानसिक खच्चीकरण करणे आणि त्याचेवर अंकुश ठेवणे.