घेऊन जा

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in जे न देखे रवी...
31 Oct 2014 - 10:22 am

गंध मातीत, पहिल्या सरीत
भिजल्या रानात, घेऊन जा ||

श्रावणसरीत, रंगल्या नभात
सोनेरी उन्हात, घेऊन जा ||

साजणवेळात, भिजल्या क्षणात
रंगल्या गाण्यात, घेऊन जा ||

चिंब रातीत, मंद ज्योतीत
धुंदल्या मिठीत, घेऊन जा ||

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 10:55 am | टवाळ कार्टा

घेऊन जा च्या ऐवजी "घेऊन टाक" असे वाचले तरी चालेल ;)

मी पयला :)

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 10:56 am | टवाळ कार्टा

"घेऊन टाक" मुळे धग वाढते ;)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2014 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा

लिहुन जा
प्रेषक, (अ)सह्यमित्र,

लक्ष रचनेत,पहिल्याच फटक्यात
फड..मारला मी, पाहून जा ||

एकं'दरीत, चांगल्या शब्दात
मनातल्या मनात, वाचुन जा ||

उपलब्ध वेळात,घरच्या बाथरुमात
चांगल्या पाण्यात, धुऊन जा ||

काव्य जातीत, शब्द मातीत
कुंथा-कुंथीत, चाऊन जा ||

काव्यरस:
शृं(नाही वाटलं)गार :-/
लेखनविषय::
प्रेम की काव्य??? :p

उपलब्ध वेळात,घरच्या बाथरुमात
चांगल्या पाण्यात, धुऊन जा ||

अरे आय .... =))

मदनबाण's picture

31 Oct 2014 - 4:53 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की

एस's picture

31 Oct 2014 - 6:21 pm | एस

कविता आणि त्यातले अल्पाक्षरत्व आवडले.

खटपट्या's picture

1 Nov 2014 - 2:35 am | खटपट्या

कविथा आवडली "घेउन जा" पुढे काय ?