बयो !! - भाग २

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
15 Oct 2014 - 9:10 am

बयो !! - भाग 1

एकदा नेहमीप्रमाणे कोमल ऑफिस मध्ये नसताना तिचे बाबा आले.
मी म्हणालो, "काय काका?"
"काही नाही सहजच. मी काय म्हणत होतो…"
"काय?"
"आमची बयो ग्रजुएट झालेली आहे" (बहुतेक कोमलला घरी बयो म्हणत असावेत)
"हो माहित आहे मला"
"दिसायला हि सुंदर आहे"
"…………" (आता हे नवीन काहीतरी सान्गीतल्यासारखे काय सान्गताय? काय ते विचारा)
"तर मी म्हणत होतो कि…… "
"काय?" (मला आता धडकी भरली. एखाद्या गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात असेल आणि आता ती मिळण्याची वेळ जवळ आल्यावर जसा माणूस नर्वस होतो तसे झाले. अजून किती वेळ घेणार आहेत हे?)
"आम्ही परब, कणकवलीजवळ आमचे गाव आहे"
"ओके(????)"
"मी बयोसाठी स्थळ शोधत होतो"
"ओके" (अहो विचारा काय ते लवकर)
"तुम्ही एकदा बयोला घरी येउन बघून गेलात तर बरे होईल."
"अहो रोजच तर बघतो मी तिला इथे"
"अहो बयो, कोमलची धाकटी बहिण"

"काय??????"

-------------------------------------------------------------------------------

फक्त चक्कर यायची बाकी राहिली होती. कोणीतरी माझ्याकडे बघून जोरात खदाखदा हसतय असा भास होत होता. माझा खर्रकन उतरलेला चेहरा बघून काका थोडे अस्वस्थ झाले. आणि चुळबूळ करू लागले. मी काही बोलत नाही हे बघून स्वत:च म्हणाले. "ठीक आहे, तुम्ही काय ते सांगा सावकाश." आणि निघून गेले.

मी गप दुकान बंद केले आणि घरी गेलो. जेवायची तर इछाच नव्हती. झोप पण लागेना. काय करावे समजत नव्हते. कोमल ला फोन करावा का? तिला हे माहित असेल का? हे तिच्या संमतीने तर होत नाही ना? डोकं गरगरायला लागलं. शेवटी उपाशीपोटी क्रोसिन घेऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी थोडा उशिरा उठलो. दुकानावर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण जावं तर लागणारच होतं. विलासचे दोन फोन येउन गेले होते. ११:०० वाजता दुकानावर पोहोचलो. विलास एकटाच बसला होता. कोमल आली नव्हती. ती अशी सहजासहजी दांडी मारत नसे. का आली नसावी? आजारी असेल का? का तिला हे सर्व माहित झाल्यामुळे येण्याचे टाळत असेल? काही कळायला मार्ग नव्हता.
मी आलोय हे बघून विलास बाहेरचे कॉल करायला निघून गेला. मी आपला एकटाच भकास ऑफिसमध्ये बसून होतो. ती नसताना ऑफिस नुसते खायला उठत होते. मला आणि ऑफिस दोघांना तिची सवय लागली होती. तिच्याशिवाय ऑफिसमधले पान हलत नव्हते. मी तिच्यावर एवढा अवलंबून आहे हे मला आता कळालं. माणूस नसतानाच त्याचं महत्व कळतं. दोन तीन वेळा कोमलला फोन करायचा प्रयत्न केला. रिंग वाजल्यावर ठेऊन दिला. धीर होत नव्हता बोलायचा. काय बोलणार, काय विचारणार.

दुपारी ऑफिसचा फोन घरच्या फोनवर डायवर्ट करून घरी आलो. थोडंसं खाल्लं आणि परत क्रोसिन घेऊन झोपलो. संध्याकाळी ५ वाजता उठलो. आईने मस्तपैकी चहा करून दिला. बरे वाटले. आईने ओळखले काहीतरी बिनसलंय,
आई म्हणाली "काय रे काय झालं?, दुपारी घरी आलास तो?"
"काही नाही, डोकं दुखत होतं"
"नक्की?"
"हो गं. गोळी घेतली बघितलीस ना."
"बरं"
"मला एक विचारायचे आहे"
"काय?"
"तुझे आणि बाबांचं लग्न पत्रिका बघून झाले होते का?"
"काय रे, बरा आहेस ना? झोप पूर्ण झाली नाही का?"
"तू सांग ना"
"अरे बघितलेली चांगली असते, म्हणजे आपल्यात बघतात.आपल्यात म्हणजे आपल्या जातीत. बाकीच्यांचे मला माहित नाही"
"जात…. (हे एक मोठं गौडबंगाल आहे)
"पडलास विचारात?"
"हम्म"
"अरे माझ्या जन्मतारखेचाच घोळ होता. शिवाजी महाराजांसारखा… त्यामुळे कसली पत्रिका आणि कसलं काय… "
"ओके"

आता गौडबंगाल काय आहे ते सांगतो - माझ्या आई आणि बाबांचा प्रेमविवाह. आई ब्राह्मण, बाबा मराठा. त्यामुळे कागदोपत्री माझी जात मराठा. त्यात आईची आई मराठा, आणि आईचे बाबा ब्राह्मण. माझी आत्या एका नवबौद्ध माणसाबरोबर लग्न करून अमेरिकेत स्थायिक झालीय. माझ्या सख्ख्या भावाने एका ख्रिचन मुलीशी लग्न केले आहे. त्यामुळे आमच्या घरात जातींची मस्त भेळ झाली होती आणि जातीची कोणाला पडली नव्हती.
परत आईने विचारले "पण काय रे, आजच एवढे प्रश्न का पडलेत तुला?"
"काही नाही सहजच"
आमची आई म्हणजे उडत्या पाखराचे पंख मोजणारी. तिने परत विचारले, "कोणी आहे का मनात?"
"छे गं"
तो विषय तिथेच संपला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेलो, दुसऱ्या दिवशीसुद्धा मैडमचा पत्ता नव्हता. आता माझा धीर सुटत चालला. सरळ फोन केला. तिनेच उचलला. "हेलो"
"मी विवेक बोलतोय."
"बोल"
"काय झालं?"
"कुठे काय"
"मग येत का नाहीस ऑफिसला?"
"अरे तब्येत बरी नव्हती"
"मग एक फोन करून सांगता येत नाही का?"
"अरे खूप ताप होता. बाबांनी सांगितले नाही का?"
"बाबा आले होते पण ते तर भलतंच काहीतरी बोलत होते"
"………."
"काय गं"
"………."
"हेलो, काय बोलतोय मी? ऐकतेस ना?"
"अरे मी काय बोलते, मी उद्या येतेय न ऑफिसला, मग आपण बोलू"
"हम्म, नक्की या पण"
"हो"
"काळजी घे"
"हम्म" (स्वर कातर)
फोन ठेवला.

विलास ला फोन केला आणि ऑफिस ला बोलावून घेतला. लगेच आला बिचारा. त्याला विचारले, "तुला कोणता चांगला बार माहिती आहे?"
"का?" विलास
"चल ना यार, आज वैताग आलाय"
बारमध्ये गेलो, मस्तपैकी ढोसली. विलासला विचारले, "काय रे विलास, तुझे कुठे अफ़ेअर वगैरे आहे का?"
"नाही रे, वेळ कुठे मिळतोय?"
"तेही खरच आहे. करू हि नकोस"
"काय रे विवेक, ती कोमल येत का नाहीये ऑफिस मध्ये दोन दिवस"
"अरे आजारी आहे"
"ओके, अरे सांगायचे विसरलोच. ते साहेब भेटले होते कंपनीत. त्यांना आपल्याकडून सर्व्हर्स हवे आहेत."
"सर्व्हर्स? किती?"
"दहा बोलत होते"
"हे तू मला आत्ता सांगतोयस?"
"अरे सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिले, पण मी कोमल ला बोललो होतो. कोमल बोलली नाही तुला?"
"आलीय कुठे दोन दिवस?"

बयोच्या लफड्यात धंद्याकडे दुर्लक्ष होत होते. ताबडतोब साहेबांना फोन लावला. प्रांजळपाने सांगितले कि "मला सर्व्हर चे तांत्रिक ज्ञान आहे पण खरेदी विक्री कधी केली नाही. तरी बघतो."
"अरे आमचा नेहमीचा वेण्डर आहे तो बरोबर सर्व्हिस देत नाहीये. म्हणून मला वेण्डर बदलायचा आहे. माझा एक मित्र एच पी मध्ये आहे तो तुला डिलरशिप मिळवून देईल. पण त्यासाठी तुला आणि विलासला बंगलोरला जाउन एक आठवड्याचे ट्रेनिंग घ्यावे लागेल. त्यानंतर तू एच पी चे सर्व्हर्स ची विक्री करू शकशील."
"एक आठवडा…कठीण वाटतंय?"
"का रे? इकडे तुझी बायको बघेल ना सगळं"
"बायको?"
"ती ऑफिस मध्ये असते ना?"
"सर, ती माझी कोणीही नाहीये"
"……… "
"सर ती माझ्याकडे कामाला आहे"
"ओह, सॉरी, ठीक आहे आता विलासला पाठवू नंतर तू जा"
"ओके सर"
"हे बघ विवेक, चांगली संधी आहे, दवडू नकोस. डेस्क्टोप मध्ये किती दिवस डील करत बसणार?"
"बरोबर सर"

विलासला सर्व सांगितले, तोहि खुश झाला. या घडामोडींनी मनाला उभारी आली.

तिसऱ्या दिवशी चित्त थोडे थाऱ्यावर आले. ऑफिसमध्ये गेलो. आजतरी येतेय का? थोडी उशिरा आली पण आली. चेहरा थोडा सुजल्यासारखा वाटत होता. जास्त झोपल्यामुळे किंवा रडल्यामुळे असावा. पहिला एक तास कोणीच कोणाशी बोलेना. माझे तिच्याकडेच लक्ष होते. वाट बघत होतो आत्ता बोलेल, नंतर बोलेल. बोलणे तर दूर नजरेला नजर द्यायला तयार नाही. शेवटी कोंडी फोडण्यासाठी मीच विचारले. "चहा पिणार का?"
"घेईन थोडासा"
"ठीक आहे, एकच मागवतो"
वातावरण एकदम टेन्स होते थोडंसं खेळकर वातावरण करणं गरजेच होतं. हिला बोलतं करायचे म्हणजे काहीतरी विचारावे लागणारच. नाहीतर हि अशीच घुम्यासारखी बसून राहणार. घाबरत घाबरत विषय काढला, "काय गं, हि जी बयो आहे, काय नाव काय तीचं?"
"प्रीती"
"अरे किती सुंदर नाव आहे. तुम्ही लोकांनी बयो करून टाकलीत."
"……"
"कशी आहे ती? तुझ्यापेक्षा सुंदर आहे का?" (इथे माझ्या हातून चुकून मोठा बॉम्ब पडला)
रागाने फणफणत म्हणाली, "घरी जाउन बघना !!! मला कशाला विचारतोस? आमंत्रण आलंय ना तुला?"
डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागल्या. हमसून हमसून रडायला लागली. आयला, मी घाबरलो. मी हे कधी अनुभवलं नव्हतं. मी कावरा बावरा होऊन बाहेरून कोणी बघत तर नाहीना हे पाहिलं. मी म्हटलं,
"हे बघ, आधी रडणं थांबव, बाहेरून कोणी बघितलं तर काय म्हणेल?"
तिचे अश्रू काही थांबेनात. मी पुढे होऊन तिचा चेहरा वर केला आणि तिचे अश्रू पुसले. खूप सुंदर दिसत होती. हा मी तिला केलेला पहिला स्पर्श. मनात बरंच काही होतं पण स्वत:ला आवरलं.
म्हणालो, "आधी फ्रेश होऊन ये जा"
तिलाही ते पटलं. गेली आणि १५ मिनिटांनी आली. बहुतेक तिकडे अजून रडून घेतलं असणार. डोळे लाल झाले होते. चहावाला चहा देऊन गेला होता. त्याला सांगितले "वाटी लेनेको शामको आना." दोघेही चहा प्यायलो. बरे वाटले.
मी म्हणालो, "बोल आता"
"काय बोलू"
"तुला हे सगळं माहित होतं ना? बाबा विचारायला येणार ते"
"नाही रे, मला काहीच माहित नव्हतं, तुझी शपथ" परत रडायला सुरवात.
"तू अशी दिवसभर रडतच बसणार आहेस का? मग आपण न बोललेच बरं"
"………."
"हे बघ, यातून काही मार्ग काढायला पाहिजे कि नको?"
"……………."
"काय गं"
"हो रे, पण आता काय करायचं?"
"करू काहीतरी, पण त्याआधी मला तुझ्या मनात काय आहे ते ठामपणे सांग"
"तुला काय सगळं सांगाव लागतं का?
"ओके बाबा"
"विवेक, तू बाबांना काय सांगणार आहेस?"
"ते मी काय सांगायचे ते सांगतो, आधी मला बयोची भानगड काय आहे ते सांग"
"भानगड?"
"अगं म्हणजे हेच कि ती लहान असून बाबांना तिच्या लग्नाची घाई का?"
"अरे खूप प्रोब्लेम आहेत रे"
"मग मला ते सर्व माहित असावेत असं वाटतं का तुला?"
"हम्म"
"मग काय ते सविस्तर सांग"

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

15 Oct 2014 - 9:17 am | नेत्रेश

एकदम रंगतदार

आणी मी पतला!

नेत्रेश's picture

15 Oct 2014 - 9:18 am | नेत्रेश

* पयला !

पैसा's picture

15 Oct 2014 - 9:23 am | पैसा

कथा मस्तच चाललीय! लवकर लिहा पुढचा भाग!

शिद's picture

15 Oct 2014 - 12:07 pm | शिद

+१

प्रचेतस's picture

15 Oct 2014 - 9:26 am | प्रचेतस

मस्त.
कथा एकदम उत्कंठावर्धक झालीय.

जेपी's picture

15 Oct 2014 - 9:47 am | जेपी

जल्दी आंदो अगला भाग.

हा भाग वाचतांना स्पीड एकदम वाढला आणि क्रमशः वाचून अगदी करकचून ब्रेक दाबावा लागला!! काय राव..लवकर लिहा पुढचा भाग!!

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Oct 2014 - 10:12 am | लॉरी टांगटूंगकर

+१ लवकर लिहा राव.

अंतु बर्वा's picture

15 Oct 2014 - 8:41 pm | अंतु बर्वा

अगदी हेच वाटलं. छान चालू आहे कथा... पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

बयोच्या यंट्रीची वाट पाहतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुख्यमंत्र्यांकडूनच सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली!

अनंत छंदी's picture

15 Oct 2014 - 11:59 am | अनंत छंदी

खटपटराव शादी होना मंगता हां. ये जुदाई पसंद नही अपुनको..

कानडाऊ योगेशु's picture

15 Oct 2014 - 12:04 pm | कानडाऊ योगेशु

उत्कंठा ताणायला लावताय तुम्ही खटपट्याराव!
नॉट फेअर.
अवांतरः लिखाणाची शैली बर्यापैकी गविंच्या जातकुळीतील वाटतेय.

काय हो ,अाज काय ते सांगुन टाकायचं ना राव,उगा जीव टांगणीला लावताय क्रमशः लिहुन!लवकर टाका पुढचा भाग.

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2014 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

हम्म्म! फारच हळुवार आहे कथा. नायक-नायिकेचे अव्यक्त आणि भावनिक प्रेमसंबंध वाचकाला, कथेला बांधून ठेवत आहेत. सर्वांनाच, 'पुढे काय?' ही उत्सुकता लागली आहे. आशा करूया की कथेचा पुढचा भाग शेवटचा असेल आणि सर्वांच्याच उत्सुकते समोर एक गोड शेवट येऊन, उत्सुकतेचा सुखद शेवट होईल.

राहून राहून 'सायबर कॅफेतील एक दिवस' या मकालेंच्या अजरामर कथेची आठवण येतेय. ;)

खटपट्या's picture

16 Oct 2014 - 1:00 am | खटपट्या

मला माहित नाही ही कथा. लिन्क असेल तर द्या.

काही गरज नाही. ही गोष्ट दोन हजार पट चांगली आहे.

अनुप ढेरे's picture

16 Oct 2014 - 9:38 am | अनुप ढेरे

चांगली होती काय ती गोष्ट!

हाडक्या's picture

16 Oct 2014 - 3:43 pm | हाडक्या

हॅ हॅ हॅ .. ती गोष्ट चांगली होती असे कोण म्हणालेय.. हे सगळे वातावरण आणि इथवरचा हा कथाभाग गोष्टीचा प्री-क्वेल असावा अशीच एक (चावट) कल्पना मनात येवून गेली. ;)

(बघा कल्पनाशक्ती लढवून !! )

[अवांतर : कथा चांगली रंगतेय हो, ती चालू द्या. उगीच ती गोष्ट वाचून तुमचा मनस्ताप व्हायचा म्हणून लिंक देत नाही तुम्हे पण शोधू नये अशी विनंती..]

आदूबाळ's picture

17 Oct 2014 - 12:07 am | आदूबाळ

मयने कब णा कहा? ही जास्त चांगली आहे असं म्हणतोय.

प्यारे१'s picture

16 Oct 2014 - 2:59 am | प्यारे१

हे हाडक्या काय बि काय बोलते. ते सायबर कॅफेचा आनि बयोचा काय पन समंध हाय काय रे?
ते खटपट्या भो एकदम गुलाबचा फूल सार्का काय तर ल्हिवतो आनि तू तेला केक्ट्स बनवते काय रे ?
तू तर एकदम मॅडच हायेस हाडक्या भो. ए पन ते दिल पर नको घेऊ हा तू. मॅडसारकं.

आमी हल्लूच केक्टस सारते हिते तिथे.. ;)

ते सायबर कॅफेचा आनि बयोचा काय पन समंध हाय काय रे?

संमंध सांगितलंय बग वरती प्यारेभौ.. आक्षी प्रीक्वेल शोबेल हा.. जर्रा इम्याजिन तर करून बग नी.

अगदी खरं आहे हो!! मलापण आठवली होती!!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2014 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा

:)

रेवती's picture

15 Oct 2014 - 4:22 pm | रेवती

वाचतिये.

अनुप ढेरे's picture

15 Oct 2014 - 7:01 pm | अनुप ढेरे

मस्तं! आवडली गोष्ट.

एस's picture

15 Oct 2014 - 7:57 pm | एस

पुढील भाग येऊ द्यात लवकर!

किसन शिंदे's picture

15 Oct 2014 - 8:51 pm | किसन शिंदे

मस्तच लिहिलाय हा भागही. उत्कंठा वाढली आहे फार.

स्पंदना's picture

16 Oct 2014 - 6:09 am | स्पंदना

ह्या बयोला दुसर्‍याच सगळं हडपावस वाटणारी आहे का हो ती?
मी असली माणस पाह्यलेत म्हणुन विचारलं.

खटपट्या's picture

16 Oct 2014 - 6:34 am | खटपट्या

असं नाही म्हणता येणार कारण बयो आणि विवेक अजून भेटले नाहीयेत एकमेकांना.

छान कथा. चपखल उत्कंठावर्धक मान्डणी

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद !!

स्नेहल महेश's picture

16 Oct 2014 - 11:46 am | स्नेहल महेश

छान कथा
पण पुढचा भाग लवकर टाका उत्कंठा वाढली आहे फार.

सौंदाळा's picture

16 Oct 2014 - 2:37 pm | सौंदाळा

सहीच
क्रमशः एकदम रंगतदार वळणावर टाकलय.
पुभाप्र

संचित's picture

16 Oct 2014 - 2:41 pm | संचित

मस्त लिहिलय परत. पुढचा भाग येड्या परत.

आसिफ's picture

16 Oct 2014 - 9:21 pm | आसिफ

कथा पकड घेत आहे, पुढचा भाग लवकर येऊदे.

मला वाटतयं की कोमल आणि बयो सावत्र बहिणी आहेत, वडिलांना वाटत असेल की कोमल चे लग्न व्हावे पण
सावत्र आई मुळे कोमल मोठी असुन देखील बयो चे स्थळ सुचवले जात आहे.

~आसिफ.