आयर्नमॅन : कौस्तुभ राडकर

श्रीरंग's picture
श्रीरंग in जनातलं, मनातलं
27 Sep 2014 - 7:53 pm

आजच लंकावी - मलेशिया येथे पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकरने विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत कठिण अशी ही स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याचे नववी वेळ आहे. हा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय असून, जगातील सर्व खंडांमध्ये भाग घेऊन ही कामगिरी करणार्या मोजक्या दुर्मीळ ट्रायथलीट्समध्ये त्याने स्थान मिळवले आहे.

आयर्नमॅन विषयी :
आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा जगभरात विवइध ठिकाणी भरवली जाते. जगभरात या अत्यंत मानाच्या मानल्या जाणार्या स्पर्धेसाठी नामांकित ट्राएथलीट्स वर्षभर तयारी करत असतात. नुसते पार करायचे अंतर जरी लक्षात घेतले तरी या स्पर्धेच्या दर्जाची कल्पना येईल.

पोहणे : ३.८ किमी
सायकलिंग : १८० किमी
धावणे : ४२ किमी

कौस्तुभ राडकर विषयी :
पुण्यात टिळक तलावावर लहानपणापासून सराव करणार्या कौस्तुभने जलतरणात राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत स्थाईक झाल्यानंतर तो ट्राएथ्लॉन या प्रकाराकडे वळला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा ८ आयर्नमॅन स्पर्धा त्याने पूर्ण केल्या आहेत. वर्षभरापुर्वीच कौस्तुभ भारतात परत आला असून, दर्जेदार अ‍ॅथलीट्स घडवण्यासाठी एक अ‍ॅकॅडमी त्याने नुकतीच सुरू केली आहे. अतिशय खडतर स्पर्धा पार करणार्या या विक्रमवीर खेळाडूच्या अनुभवाचा फायदा नवोदित खेळाडूंना नाकीच होईल यात शंका नाही.

काही वर्षांपुर्वी कौस्तुभच्या या क्रीडाप्रकारातील यशाबद्दल लेख मिइ मिपा वर लिहिला होता. त्याची ही विक्रमी कामगिरी सर्वांसमोर यावी म्हणून पुनश्च हा लेखनप्रपंच.

क्रीडाअभिनंदनबातमीमाहिती

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

27 Sep 2014 - 9:17 pm | धर्मराजमुटके

अभिनंदन ! कौस्तुभ राडकर आणि तुमचे देखील. ह्या वेगळ्या विषयावर लेख दिल्याबद्दल.
मुंबई पुण्याच्या धाग्यांवर दंगा घालणारी मंडळी झोपली काय ? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2014 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

कौस्तुभ राडकरचे अभिनंदन !

आजकाल क्रिडाप्रकारांत भारताला जरा बरे दिवस येऊ लागले आहेत असे दिसते.

मुक्त विहारि's picture

28 Sep 2014 - 7:54 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

कौस्तुभ राडकरचे अभिनंदन !

शिद's picture

28 Sep 2014 - 4:53 pm | शिद

+१

छान माहिती.

कवितानागेश's picture

28 Sep 2014 - 1:51 pm | कवितानागेश

ग्रेट

बाळ सप्रे's picture

28 Sep 2014 - 4:19 pm | बाळ सप्रे

कर्नल गोडबोलेंनी एक ओपन वॉटर ट्रायथलॉन (ऑलिंपिक डिस्टंस) भूगाव तलाव मुठा-लावासा रस्ता इथे आयोजित केली होती तेव्हा कौस्तुभबरोबर ओळख झाली. तो एक जबरदस्त अ‍ॅमेचर अ‍ॅथलीट आहे.
चांगल्या चांगल्या धावपटू आणि सायकलिस्ट यांचीदेखिल ट्रायथलॉन मधे तारांबळ उडते. कारण तिन्ही खूप वेगळी कौशल्ये आहेत. मी स्वतः या प्रकाराचा अनुभव घेतला आहे..
कालची स्पर्धा त्याने १३:२४:११ तासात पूर्ण केली.. याआधी त्याने १०-११ तासातही आयर्नमॅन पूर्ण केली आहे..

भारतात अजूनही आयर्नमॅन स्पर्धा आयोजित झाली नसली तरी नजिकच्या भविष्यात होउ शकेल. बरीच लोकं कौस्तुभसारख्या खेळाडूंमुळे या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. म्हैसुर, हेद्राबाद याठीकाणी हाफ आयर्नमॅन (सर्व अंतरे आयर्नमॅनच्या निम्मी ) स्पर्धा होउ लागल्या आहेत.