बंद दरवाजा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
17 Sep 2014 - 8:43 pm

दिल्ली, मुंबई सारखे महानगर, स्वत:चा विचार करणारे स्वार्थी जीव मग प्रेमाचा वसंत कसा बहरेल कारण हृदयांची कपाटे फ्लैटचा दरवाजा सारखे सदैव बंद असतात.

कॉंक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.

टेबलवर सजलेला इथे
एक उदास कैक्टस आहे.

स्वार्थी संबंधाना इथे
बाभळीचे काटे आहे.

प्रेमाचा वसंत इथे
कधीच 'बहरत' नाही.

फ्लैटचा दरवाजा इथे
सदैव बंद असतो
.

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

अजय जोशी's picture

18 Sep 2014 - 8:07 pm | अजय जोशी

शेवटच्या ओळीत
'बहरणे विसरला आहे' असे केलेत तर आहे हे पालुपद कायम राहील असे वाटते.

विवेकपटाईत's picture

19 Sep 2014 - 8:44 pm | विवेकपटाईत

दरवाजा बहरू शकत नाही त्याला बंदच ठेवावे लागेल. मी कधीच यमकांच्या फंद्यात पडत नाही. शहरी जीवन स्वार्थाने भरलेले आहे, कुणालाही कुणाशी कर्तव्य नाही. त्या मुळे जीवनाचा आनंद घेणे ते विसरून गेले आहे.

यसवायजी's picture

19 Sep 2014 - 10:05 pm | यसवायजी

फ्लैटचा दरवाजा इथे
सदैव बंद असतो.

बंदच ठेवावा लागतो. नाहीतर प्याशेंजर पडंल की.
चला वाडी कोन हाय काय वाडी-वाडी
(उडणटप्पू पायलट) SYG ;)

काळा पहाड's picture

22 Sep 2014 - 3:57 pm | काळा पहाड

शिरदवाड थांबंल का?