मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोंधळ

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
सखे तू जवळ नसतांना तुझे डोळे फार गोंधळ घालतात सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं ------ गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र आणि थंड पडलेल्या इवलाश्या खिडकीतून दिसणारी ती लोभस चंद्रकोर... तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात आणि मग फार गोंधळ होतो... सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना बघता बघता कोर्‍या कागदाची कविता होते झरझर लेखणी शब्द पाझरते... कविता तुझे वर्णन करायला लागते तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते मग तिचाच गोंधळ होतो, आणि सगळीच आंधळी कोशिंबीर होऊन बसते नुसताच गोंधळ, आणि मग सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना माझा सगळाच नाईलाज असतो कधी अचानक एखादा चुकार अश्रु पापण्यांची सिमारेषा ओलांडतो तर कधी एखादा उसासा निसटतो अश्या डबडबलेल्या अवस्थेत चुकुन आरशाकडे लक्ष गेले तर परत तुझे डोळे... माझी समजूत काढत असतात तेव्हा तर मी अजूनच बावरतो मला तर ती नजर चुकवायची असते पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही असा सगळा गोंधळ होऊन बसतो... अन् मग सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (एक जुनीच रचना, जुनी आहे जे जाणवल्यास मंडळ जबावदार नाही ;) )

वाचने 3880 वाचनखूण प्रतिक्रिया 23

एस 26/08/2014 - 14:44
आणि मग ना घेणं ना देणं, फुकाचे कंदिल लागणार... मस्तच! आणि मी पयला!

In reply to by गवि

मिसळलेला काव्यप्रेमी 26/08/2014 - 14:50
अलभ्य लाभ!! गविंची प्रतिक्रिया आली... कविता सार्थकी लागली... द्येवा __/\__!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

चढवू नको मेल्या उगाच.. जमली नाहीसे वाटले की तसेही लिवतोच की.. येऊ दे दिवाळीसाठीही एकदम फटाका कविता एक.

स्पा 26/08/2014 - 15:00
अश्या डबडबलेल्या अवस्थेत चुकुन आरशाकडे लक्ष गेले तर परत तुझे डोळे... माझी समजूत काढत असतात तेव्हा तर मी अजूनच बावरतो मला तर ती नजर चुकवायची असते पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही
कातिल __/\__

सस्नेह 26/08/2014 - 16:28
इतका गोंधळ माजत असेल तर आपलं त्या डोळ्यांसमोरच रहावं ना नेहमी ! मुक्त कविता मस्त आहे !

पैसा 26/08/2014 - 17:00
वाचायची मागे ठेवली होती. धन्याबाबांच्या किरपेमुळे आधी वाचावीच लागली! कविता झक्कास!

प्यारे१ 27/08/2014 - 12:27
मस्तच रे मिका! माझी मस्जिदची दौड : विनाकारण ऐवजी दुसरा कुठला शब्द वापरता येईल का? तेवढाच 'जास्त' गद्य वाटतोय. गद्यच हवाय हे ठाऊक आहे. 'अकारण' शोभेल?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 28/08/2014 - 06:30
सखे तू जवळ असतांना माझा सगळाच नाईलाज असतो. :) -दिलीप बिरुटे (उत्कट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस 28/08/2014 - 14:15
ठसका लागला! :-)) शेमशेम!

रुमानी 30/08/2014 - 12:27
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं:) कविता आवडली..!