गोंधळ
लेखनविषय:
सखे तू जवळ नसतांना
तुझे डोळे फार गोंधळ घालतात
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
------
गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र
आणि थंड पडलेल्या
इवलाश्या खिडकीतून दिसणारी
ती लोभस चंद्रकोर...
तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात
आणि मग फार गोंधळ होतो...
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
--------
सखे तू जवळ नसतांना
बघता बघता कोर्या कागदाची कविता होते
झरझर लेखणी शब्द पाझरते...
कविता तुझे वर्णन करायला लागते
तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते
मग तिचाच गोंधळ होतो, आणि
सगळीच आंधळी कोशिंबीर होऊन बसते
नुसताच गोंधळ, आणि मग
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
--------
सखे तू जवळ नसतांना
माझा सगळाच नाईलाज असतो
कधी अचानक एखादा चुकार अश्रु
पापण्यांची सिमारेषा ओलांडतो
तर कधी एखादा उसासा निसटतो
अश्या डबडबलेल्या अवस्थेत
चुकुन आरशाकडे लक्ष गेले
तर परत तुझे डोळे...
माझी समजूत काढत असतात
तेव्हा तर मी अजूनच बावरतो
मला तर ती नजर चुकवायची असते
पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही
असा सगळा गोंधळ होऊन बसतो...
अन् मग
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(एक जुनीच रचना, जुनी आहे जे जाणवल्यास मंडळ जबावदार नाही ;) )
वाचने
3878
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
मस्त कविता!
छान आहे रे..
In reply to छान आहे रे.. by गवि
द्येवा __/\__!!
In reply to द्येवा __/\__!! by मिसळलेला काव्यप्रेमी
चढवू नको मेल्या उगाच.. जमली
कातिल
मस्त रे मिका,
खूप आवडली कविता!
आवडली हेवेसांनल
बाबौ !
In reply to बाबौ ! by सस्नेह
वा वा वा! काय सोप्पं करून
मस्तच!
खरोखरच उत्कट होत जातेय कविता.
मस्त रे! एकदम आवडली.
मस्तच रे मिका!
In reply to मस्तच रे मिका! by प्यारे१
खरय
In reply to मस्तच रे मिका! by प्यारे१
उगीचच.
In reply to उगीचच. by प्रभाकर पेठकर
+१४३ उगीचच उत्कट..
आवडली
क्लास
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बेकार!!!
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}मस्त ...!