(सारक)

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
2 Aug 2008 - 2:47 am

मिलिंद फणसे ह्यांच्या 'स्मारक' कवितेने जरा 'सारक' भावना निर्माण झाल्या त्या अशा!

कळले मला, अंधार होता जरी
तळहात होता, ओठ होते त्यावरी

निजली मुले , विझले खोलीतले दिवे
मरु देत पोथ्या आणि चर्पटपंजरी

वाटे प्रवाशांना किती कृतकृत्यसे
दिसतात जेव्हा 'मोर' हे रस्त्यावरी

विसरु शिरस्ता ग्लास भरतू सत्वरी
करुया गटारी मद्य घेऊन साजरी

पळणे नको, आसने नको अन् जोरही
त्रिफळा परी सारक असावे हे घरी

- केसुरंगा

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

2 Aug 2008 - 2:55 am | केशवसुमार

केसुरंगाशेठ,
स्वागत.. एकदम जोरदार एंन्ट्री घेतली आहेत..
विसरु शिरस्ता ग्लास भरतू सत्वरी
करुया गटारी मद्य घेऊन साजरी

एकदम प्रासंगिक विडंबन..
चालू द्या...
(निवॄत्त)केशवसुमार
स्वगतः अजून एकाची भर.. ~X(

पिवळा डांबिस's picture

2 Aug 2008 - 7:49 am | पिवळा डांबिस

केसुरंगा!
हे हायब्रिड कुठून आलं?
बाकी हायब्रिडचा 'परफॉरमन्स" मस्त आहे....
:)
चालू द्या....

चतुरंग's picture

2 Aug 2008 - 8:32 am | चतुरंग

वेन्ट्रीलाच विडंबन!!:O
चालू द्या, मस्त!

(स्वगत - रंगा, दुकानातले लाईट घालव अन् शटर ओढून घे बघू! :( )

चतुरंग

चेतन's picture

2 Aug 2008 - 10:45 am | चेतन

पळणे नको, आसने नको अन् जोरही
त्रिफळा परी सारक असावे हे घरी

सही...

मस्तच् एंट्री

चेतन

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:47 pm | विसोबा खेचर

पळणे नको, आसने नको अन् जोरही
त्रिफळा परी सारक असावे हे घरी

केसूरंगा, मस्त रे!

स्वगत : च्यामारी, आता हा नवा केसूरंगा कोण आलाय आणखी?! :)

सर्व रसिकांचे आभार!!

केसुरंगा