शब्द छटा - खडा भाग १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
18 Jul 2014 - 12:38 am

मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!

खडा
भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे!
कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते.
ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो.
दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो. त्याला 'खडू' केला की सानेगुरूजींसारखा मवाळ होऊन होऊन सर्वांग झिजवत फळ्यावर जीव देतो.
ख नंतर 'ड' ला डा डकवला तर इतरांसाठी खणलेल्या खाईत कधी कधी आपल्याला कपाळ मोक्ष घडतो.
डी केले तर तोंड गोड करायची शर्करा मुखी येते.
पारशी बाबाजी मुंबईत उभा खडा राहीला आहे.
ख ला खा चा खो दिला तर कामाची गैरहजेरी सामोरी येते.
खा पुढे डी समुद्राशी सलगी करते.
खु शी डा ने जमवून घेतले तर फुलावर आफत येऊन झाडाशी नाते संपते.
डा मागे खो केले तर अडकाठी करून पडायची भिती वाटते.

अशी ही खड्याची शब्दार्थ छटा!

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

अनंत छंदी's picture

18 Jul 2014 - 9:11 am | अनंत छंदी

म्हटलं "खडा" टाकून पहावा :-)

नाक्यावरची खमंग आणि लज्जतदार खड़ा पावभाजी आणि त्यानंतर थंडगार फालुदा पिउन, तृप्त व्हा न भौ !

भिंगरी's picture

19 Jul 2014 - 11:24 pm | भिंगरी

आता कोणीतरी खडे बोल सुनवायच्या आधीच खडाखडी बंद करा.
.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2014 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

+१११
हां....असा खडा मारला पाहीजे! :-D

२५ वर्षांच्या यु(व)ती चे, ३-१३! खड्ड्यात जायला उत्सुक ४ही पक्ष महाराष्ट्रच्याा मुळावर उठले आहेत. भिंगरीने हे काम खडे उभे राहून निवडणुकातून खडसवावे ही
विनंती...

भिंगरी's picture

27 Sep 2014 - 10:42 pm | भिंगरी

खटिया खडी करायची आहे का?

कलंत्री's picture

21 Jul 2014 - 12:54 pm | कलंत्री

खडाजंगी, खाडाखोड, खाडा, खडक इत्यादी इत्यादी.

शशिकांत ओक's picture

21 Jul 2014 - 11:03 pm | शशिकांत ओक

हातात हात गुंफून तळव्यावर उलट सुलट तळवे करत चकायला - खेळायला — सुरुवात झाली की कोणावर तरी खंडा करायचा याची तयारी होत असे.

कलंत्री's picture

24 Jul 2014 - 11:14 am | कलंत्री

खडांखडा = सागोंपांग, परिपूर्ण माहिती असणे.

शशिकांत ओक's picture

24 Jul 2014 - 9:58 pm | शशिकांत ओक

आपण असेच नवनवीन शब्दांची क्रीडा करत करावे.

काउबॉय's picture

27 Sep 2014 - 11:07 am | काउबॉय

;)