विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2014 - 3:34 pm

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

Pandharpur

बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

अभंगअभय-काव्यकविता

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

10 Jul 2014 - 12:33 am | आयुर्हित

आजच्या या आषाढि एकादशीच्या शुभ पावन दिवशी भक्तीरसात भिजलेले "अरविंद" श्री गंगाधरजी मूटे पाहून मन तॄप्त झाले.
जय हरी विठ्ठल...!जय हरी विठ्ठल...!!

माहितगार's picture

10 Jul 2014 - 10:25 am | माहितगार

--/\--

जाहले आज बढीया रसपान
'अरविंदा'ने दिले आम्हा आत्मभान !!

धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2014 - 11:21 am | प्रसाद गोडबोले

ऑफीसात चित्र दिसत नाहीये
...
पण धाग्याचे नाव विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! वाचुन एका खास मिपाकराची आठवण झाली ....

=))

भृशुंडी's picture

10 Jul 2014 - 10:49 pm | भृशुंडी

शीर्षक भयानक आहे.

माहितगार's picture

11 Jul 2014 - 8:19 am | माहितगार

शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे.

काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.)

हे असूनही भरकटणार्‍या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.

गंगाधर मुटे's picture

12 Jul 2014 - 6:08 pm | गंगाधर मुटे

विश्लेषणाबद्दल आभारी आहे.

गंगाधर मुटे's picture

12 Jul 2014 - 6:22 pm | गंगाधर मुटे

काव्यतंत्राचा प्रभाव जाणवण्याचे कारण गीत लयीत आणणे, हे आहे.
गीत गाताना शब्दांची ओढातान होनार नाही, याची काळजी घ्यावीच लागते. :)

माहितगार's picture

13 Jul 2014 - 7:52 pm | माहितगार

होय, ते समजण्या सारखे आहे.

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 9:35 am | गंगाधर मुटे

मात्र हे गीतरचना ओघवती झाली नाही, हे खरेच!

तुमचं टोपण नाव का बदललं? अभय होतं ना?

गंगाधर मुटे's picture

12 Jul 2014 - 6:06 pm | गंगाधर मुटे

अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो.

अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या आणि वैचारिक मांडणी करणार्‍या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो.

भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2014 - 6:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या ! विठठलाला बसायला कंपनी पाहिजे असेल तर कळवावे.

दिलीप बिरुटे

माहितगार's picture

11 Jul 2014 - 8:54 am | माहितगार

आम्हाला तर कळल तो तुमच्या क्लास मध्ये बसतो ! अन तुम्ही त्याला मिपाच्या कंपनीला बोलावताय ? ( गंमत :) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2014 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंढरपूरच्या वेशीबाहेर
आहे एक छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा

दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल!
-
विंदा करंदीकर

अनुप ढेरे's picture

11 Jul 2014 - 10:03 am | अनुप ढेरे

हा हा... मस्तं कविता!

माहितगार's picture

11 Jul 2014 - 11:10 am | माहितगार

दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल!

कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jul 2014 - 11:30 am | अत्रुप्त आत्मा

@मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल!>>>. मस्स्स्त...! *i-m_so_happy*

बॅटमॅन's picture

11 Jul 2014 - 12:12 pm | बॅटमॅन

हायला!

जबरीच हो कविता. :)

यशोधरा's picture

12 Jul 2014 - 6:24 pm | यशोधरा

क्या बात! मस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2014 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त कविता !

गंगाधर मुटे's picture

12 Jul 2014 - 6:19 pm | गंगाधर मुटे

त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला.
शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का!

जमेल तुम्हाला? ;)

गंगाधर मुटे's picture

12 Jul 2014 - 6:35 pm | गंगाधर मुटे

बिरुटे सर,

ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही,
ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही,
ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही,

अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे.

त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 9:18 am | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/blank-expression-smiley-emoticon.png

माहितगार's picture

13 Jul 2014 - 8:29 pm | माहितगार

...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य

शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते.

पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही.

माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्‍या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ?

कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ?

म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा

साधच बघायच झालं तर,विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

माहितगार's picture

13 Jul 2014 - 8:49 pm | माहितगार

हाही अँगल नक्कीच शक्य आहे. धन्यवाद.

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 9:40 am | गंगाधर मुटे

विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे.
मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)

माहितगार's picture

14 Jul 2014 - 12:01 pm | माहितगार

मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 12:29 pm | गंगाधर मुटे

माहितगारजी,
'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेल्या अध्यात्मविचारांचा या कवितेत लवलेशही नाही.

मेघवेडा's picture

13 Sep 2014 - 4:22 pm | मेघवेडा

हे असं ठाम कसं काय बरं सांगू शकता तुम्ही?

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 9:45 am | गंगाधर मुटे

खट्याळ आणि खोडकरपणा हे विठोबाचे स्वभावगूण नाहीत.
फक्त तो पोरगा "काळा" आहे, एवढ्या एका कारणासाठी मास्तरला त्याच्यात विठ्ठल दिसतो!

अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना?
हा काळा, तो काळा.
खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील.

बाकी कीस बाई कीस चालू द्या!

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 3:13 pm | गंगाधर मुटे

अशा तर्‍हेनेच समर्थन करायचे झाले तर

ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D

बॅटमॅन's picture

14 Jul 2014 - 3:17 pm | बॅटमॅन

बरं तसं करता येईल.

सो व्हॉट???? ततः किम्???

कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 9:47 am | गंगाधर मुटे

मास्तरला "गोर्‍या" पोरांमध्ये विठ्ठल दिसत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2014 - 10:17 am | अत्रुप्त आत्मा

*dirol*

अनुप ढेरे's picture

14 Jul 2014 - 10:34 am | अनुप ढेरे

अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2014 - 10:41 am | अत्रुप्त आत्मा

दृष्टी-सापेक्षतेनुसार...तुमचं बरोबर आहे! ;)

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 11:26 am | गंगाधर मुटे

अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.

अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय!

साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला.
गांधीजींना जनसेवेत देव दिसला.
गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला.
तुकडोजींना मानवतेत देव दिसला.
भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला.
संतांना भूतदयेत देव दिसला.
साधूपुरूषांना चरचरात देव दिसला.
.
.
.
.
या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो!

बरोबर?

अनुप ढेरे's picture

14 Jul 2014 - 11:34 am | अनुप ढेरे

काळ्या मुलात दिसला.

माहितगार's picture

14 Jul 2014 - 12:07 pm | माहितगार

हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्‍याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले.

@ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2014 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेवर उत्तम चर्चा झाली पाहिजे, मजा येते. आवडली चर्चा.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

13 Jul 2014 - 9:43 am | मदनबाण

वाह...
माहितगार आणि बिरुटे सरांचा प्रतिसाद आवडला ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 4:03 pm | गंगाधर मुटे

कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.

याला मुस्कटदाबी म्हणतात.
प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे.

कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही.
तरी पण इथेच थांबतो.

या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही.

तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!

>>या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही'

जशी तुमची इच्छा!!

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2014 - 8:27 pm | गंगाधर मुटे

@ सूड,
तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D

माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :)

शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती!

जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*

अनुप ढेरे's picture

14 Jul 2014 - 8:37 pm | अनुप ढेरे

अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.

माहितगार's picture

15 Jul 2014 - 8:30 am | माहितगार

विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्‍या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्‍याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?

प्यारे१'s picture

14 Jul 2014 - 4:09 pm | प्यारे१

विंदांना आज अम्मळ हसू आलं असेल. :)

सामाजिक बांधिलकी नसलेल्या, केवळ भक्तीभाव असलेल्या या अरविंदांच्या कवितेला अभय द्या.

आशिष दा's picture

15 Jul 2014 - 2:27 pm | आशिष दा

विंदांची कविता भारीच.

बाकी कोणालातरी उगाच मिरची झोंबण्याचा प्रकार वाटतो :)

गंगाधर मुटे's picture

15 Jul 2014 - 7:29 pm | गंगाधर मुटे

@ सूड,
धन्यवाद.
परत धन्यवाद एवढ्यासाठी की बरं झालं वेळीच तुम्ही माझं तोंड दाबून धरलं. नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि मग काही प्रतिसादकांनी माझी हजामत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नसती. :)

कवितेचा मध्यवर्ती अर्थ किंवा कवितेचा उलगडा कुणीच करायला तयार नाही. मात्र मिळेल तो वस्तरा घेऊन माझ्यावर तुटून पडू पाहात आहेत.

आनंद आहे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2014 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रे वा...! कवितेवरील चर्चा बरीच पुढे गेली.
चालु द्या. :)

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

15 Jul 2014 - 8:44 pm | यशोधरा

बरीच, बरीच. पुढच्या वेळी योग्य सल्ला घेऊन, योग्य कवींच्या कविता पोस्टा न विसरता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2014 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवीच्या कवीतेत कवीला विचारल्याशिवाय कविता टाकणार नाही. फक्त तेवढं ”कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास” तर नाही ना असा शेरा मारु नका बॊ. मग कविता डकवेन, चालेल ना ?

मुटे साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व.

-दिलीप बिरुटे

मला तर एकदम आवडली होती तुम्ही टाकलेली कविता. तसेही विंदा माझे आवडते कवी आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2014 - 9:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छ्या.... तुम्हाला नाय कल्ला आमचा प्रतिसाद मग. :)
(पहिल्या प्रतिसादात मी हसरी स्मायली टाकायला हवी होती वाटतं)

-दिलीप बिरुटे

म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली. म्हनलं, तुमास्नी समजंल. हाय का आता? समदाच सावळा (विठूरायाचा)गोंधळ की!

प्यारे१'s picture

15 Jul 2014 - 10:35 pm | प्यारे१

>>> सावळा
कवितेत सावळा 'बसला' असता काय?

गंगाधर मुटे's picture

15 Jul 2014 - 9:57 pm | गंगाधर मुटे

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर,

तुम्हाला कविता डकवता आली पण कवितेचा अर्थ काही डकवता येत नाहीये! :) हरकत नाही, सगळ्याच सगळंच जमत्येच असं नाही. :)

पुढच्या वेळेस कोणाची आणि कुठेही कविता डकवायची झाल्यास संपूर्ण अर्थासहित डकवावी, एवढे तरी माझ्यासारख्यावर उपकार करणार काय? :)

मला कविता डकवता येते पण अर्थ लागेलच हे काही सांगता येत नाही, हे खरं आहे. मी कवितेवर बोलतो म्हणजे मला कविता खूप कळते असंही नाही. मला दुसर्‍यांच्या कवितेवर आणि कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही. मला कविता अर्थासहित डकवावी वाटली तरी कवितेचा अर्थ तोच असेल हेही सांगता येणार नाही, वरील सर्व सबबीवरुन एकच सांगतो. मी यापुढे कविता डकवणार नाही. चुक झाली. :)

-दिलीप बिरुटे

कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही.

सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्‍या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.

प्यारे१'s picture

15 Jul 2014 - 10:05 pm | प्यारे१

आखिर केहना क्या चाहते है अभयारविंद मुटे साब????

नक्की काय अर्थ असू शकेल विंदा करंदीकरांच्या कवितेचा?
-(ह्यावेळी शतक होऊनच जाऊ दे!)

गंगाधर मुटे's picture

15 Jul 2014 - 10:07 pm | गंगाधर मुटे

पंढरपूरच्या वेशीबाहेर एक छोटी शाळा आहे. सर्व मुले गोरी पण एक मुलगा कुट्ट काळा आहे. दंगा करतो, मस्ती करतो खोड्या करण्यात अट्टल आहे, न जाणो तो विठ्ठल असेल, करणार काय असे मास्तर म्हणतात.

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, असा अर्थ आहे का हो कवितेचा? :)

गंगाधर मुटे's picture

15 Jul 2014 - 10:10 pm | गंगाधर मुटे

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुमचा वरील प्रतिसाद येण्यापूर्वीच हा प्रतिसाद मी टाकला. क्षमस्व.
चर्चा लांबवण्यात हशिल नाही.

प्यारे१'s picture

15 Jul 2014 - 10:22 pm | प्यारे१

विन्दांनी लिहीलेल्या बालकवितांमधली ही एक कविता असावी असा माझा समज आहे.

तज्ज्ञ लोकांनी बॅटरी/विजेरी/मर्क्युरी/हॅलोजनची लाईट मारावी ही विनंती.

पंढरपूरच्या "वेशीबाहेर" ह्या शब्दामुळे विंदांची कविता अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवित आहे, असे वाटते.

त्याकाळी (सानेगुरुजींच्या आंदोलनाआधी)विठ्ठल मंदिरात प्रवेश करायला परवानगी नसल्याने विठ्ठलाला हात कसा लावायचा/काळ्या विद्यार्थ्याला शिक्षा कशी करायची "करणार काय" हाच प्रश्न पडलाय मास्तरांना.

फक्त विठ्ठल हाच एकमेव शब्द हेच साम्य आहे, परंतू दोन्ही कविता दोन वेगळ्या आशयाच्या आहेत.

मुलांनो, पाहा पाहा हत्तीचा (नसलेला) पाय/शेपूट/सोंड/कान वगैरे वगैरे....!!!

'वेशीबाहेर' असलेल्या शाळेतली सगळी मुलं 'गोरी' नि एकच पोरगा काळा??????? मुळात सगळी 'गोरी' मुलं वेशीबाहेर का जातील शाळेत? जर तशी 'सगळीच' जात असतील तर ती शाळा 'वेशीबाहेर'ची कशी?

अर्थात माझ्या गावची शाळा गावाबाहेर म्हणजे वेशीच्या पलिकडच्या पण पलिकडं आहे (हा *हारवडा, तो मां*वडा (हो, अजूनही हीच नावं आहेत.) मग 'वडा' (ओढा) मग शाळा) पण त्या शाळेत अलिकडची, पलिकडची, अलिकडून पलिकडची नि पलिकडून अलिकडची अशी सगळी मुलं जातात. ;)

आशिष दा's picture

16 Jul 2014 - 11:18 am | आशिष दा

सगळ्याच गोष्टींचं "रसग्रहण" आवश्यक असतं का?

अतिशय गोड कविता आहे विंदांची. तेवढं बास नाही?

अविनाशकुलकर्णी's picture

13 Sep 2014 - 7:03 pm | अविनाशकुलकर्णी

सुंदर कविता मुटे साहेब

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Oct 2015 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला, आन् चित्रगुप्तसाहेब उगा अजून कायकाय झाडापाल्याचा रस काढून प्या म्हंतेत ! ;)

प्यारे१'s picture

30 Oct 2015 - 2:50 pm | प्यारे१

झाला का बल्ल्या आता?
मार्गदर्शक तत्त्वात नाही बसत ओ जुना धागा वर काढणं. ;)
-प्यारंग जोशी