अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in भटकंती
20 Jun 2014 - 6:46 pm

अविस्मरणीय ग्रीस प्रस्तावना

सकाळी लवकर उठून , मस्तं नाश्ता करून आम्ही नऊला हॉटेलमधून बाहेर पडलो. थेट टॅक्सी करून आम्ही अ‍ॅक्रोपोलीसला गेलो. तिथे पोहोचताच आम्हाला दुरूनच Parthenonचे दर्शन झाले. भराभर थोडे वर चढून तिकिट काढायला गेलो , तिथे थोडी रांग होतीच शिवाय नऊनंतर अनेक पर्यटक बसमधून Parthenon बघायला मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दी होतेच. पटापटा तिकिटं काढून आम्ही वर चढायला सुरुवात केली, वातावरण मध्येच ऊन मध्येच ढगाळ असे होते त्यामुळे पाऊस येतो की काय असे उगाच वाटून गेले. १५-२० मिनिटांत आम्ही अ‍ॅक्रोपोलिसची चढाई पूर्ण केली.

.

अ‍ॅक्रोपोलिसच्या पायथ्याशी दिसणारे Parthenon

ग्रीक भाषेत अ‍ॅक्रो म्हणजे टोक, परामावधी आणि पोलिस म्हणजे शहर. शहराच्या संरक्षणासाठी अ‍ॅक्रोपोलिस डोंगरावर किंवा उंच टेकडीवर(एका प्रकारचे किल्लेच जिथे अनेक इमारती असत) बांधले गेले. अ‍ॅक्रोपोलिस समुद्रसपाटीपासून १५० मि. उंच असलेल्या एका टेकडीवर वसलेले आहे. तिथेच Parthenon बांधले गेले आहे.

वर चढत असताना दिसणारे Theatre of Dionysus Eleuthereus (Dionysus चे रंगमंच). Dionysus हा द्राक्षापासून बनणार्‍या वाईनचा देव असे मानले जाते. ग्रीक पुराणानुसार तो झ्युस राजा व सेम्हलीचा मुलगा होता. त्याच्या सन्मानार्थ हा रंगमंच बनवला गेला.

.

Parthenon हे ग्रीक लोकांनी अथेना देवीच्या सन्मानार्थ बांधलेले आहे. अथेन्स शहराला नावदेखील अथेनादेवीच्या नावावरुन दिले गेले आहे. Parthenonचे बांधकाम ४३८ BC मध्ये पूर्ण झाले पण त्याचे सुशोभिकरणाचे काम ४३२ BC पर्यंत सुरु होते. Parthenon चा वापर खजिना ठेवायला ही होत असे. ५ADच्या शतकात Parthenon वर ख्रिस्तींचे आक्रमण होऊन त्याचे चर्चमध्ये रुपांतर करण्यात आले होते. १४६० च्या दशकात तुर्कींनी Parthenon वर विजय मिळवून त्याचे मशीदीत रुपांतर केले. मग काही काळाने व्हेनेशीयन साम्राज्यातील लोकांनी घडवून आणलेल्या स्फोटात Parthenon चे बरेच नुकसान झाले.

.

थोडे पुढे येताच उजव्या बाजूला दिसते Parthenon. Parthenon ला समोर आणि मागे असे आठ खांब आहेत तर बाजूला सतरा खांब आहेत. समोर आणि मागच्या खांबांवर त्रिकोणिका आहे ज्याला पूर्व त्रिकोणिका आणि पश्चिम त्रिकोणिका असे म्हटले जाते. पूर्व त्रिकोणिकेवर झ्युस राजाच्या शिरातून अथेनादेवीचा जन्म झाला ह्यांचे शिल्प होते तर पश्चिम त्रिकोणिकेवर अथेनादेवी, राजा Poseidon, घोडे व इतर देवांचे शिल्प होते. आता तिथे फक्त त्रिकोणिकेचे काही अवशेष उरलेत.

.

.

डाव्या बाजूला दिसते ते Erechtheionचे मंदिर. ग्रीक पुराणानुसार हे मंदिर राजा Erechtheion च्या स्मर्णार्थ बांधले गेले होते, असे मानले जाते की राजा Erechtheion ला तिथे जवळपास पुरण्यात आले होते. धरतीपुत्र Erechtheion चा सांभाळ अथेनादेवीने केला होता. ह्याच्या मंदिरा च्या दक्षिणेला सहा खांब आहेत ज्यांना "Porch of the Maidens" असे म्हटले जाते. ह्या खांबाना स्त्रीरुपात कोरले गेले आहे ज्यांना Caryatid म्हणतात.

.

"Porch of the Maidens"

.

Parthenon वरून दिसणारे अथेन्स शहराचे मोहक दृश्य.

.

Parthenon वरून दिसणारा Lycabettus डोंगर.

.

Parthenon वरून दिसणारे The Temple of Olympian Zeus चे भग्नावशेष.

.

फिरून खाली येत असताना हलकीच पावसाची एक सर येऊन गेली आणि त्या उकाड्यात आम्हाला शितल, शांत, प्रसन्न वाटू लागले. खाली उतरून एका सोव्हेनियरच्या दुकानात गेलो व सोव्हेनियर खरेदी करुन आम्ही तिथूनच थोडे चालल्यावर The New Acropolis Museum ला गेलो.

.

तिथे जाताना अगदी मेन एंट्रेंसपाशी खाली भग्नावशेष जतन करुन ठेवलेले दिसतात. त्यात एक विशींग वेल सारखी छोटी विहिर होती ज्यात असंख्य नाणी पडलेली दिसत होती.

.

.

विशींग वेल

संग्रहालयात शिरताच क्लोकरुम मध्ये बॅगपॅक्स ठेवून आम्ही संग्रहालय फिरायला सुरुवात केली. संपूर्ण ग्रीक इतिहासाबद्दल येथे माहिती उपलब्ध आहे. उतखननात सापडलेल्या अनेक वस्तू येथे काचेच्या कपाटात जतन करुन ठेवल्या आहेत. अनेक प्रकारचे शिल्पं, मातीची भांडी, फुलदाणी, पुतळे, भग्नावशेष अशा अनेक वस्तू संग्रहीत केल्या आहे. संग्रहालयात फ्लॅश फोटोग्राफीला परवानगी नाही शिवाय इतके मोठले संग्रहालय बघण्याचा आनंद मला घ्यायचा होता त्यामुळे थोडेच फोटो काढले :)

.

.

.

.

संग्रहालयाच्या तिसर्‍या मजल्यावर एक व्हिडियो क्लिप दाखवतात ज्यात Parthenon बद्दल माहिती दिली आहे.

आताशी भुक ही कडकडून लागली होती म्हणूनच संग्राहलयाच्या एका रेस्टॉरंटमध्ये मस्तंपैकी पिटा-चिकन कबाब, ग्रील्ड चिकन विथ पटेटो व्हेजेस, चिकपी सॅलॅड विथ सन ड्राईड टोमॅटो सॉस आणि ग्रीक फ्रॅपे असे जेवून आम्ही तिथून The Temple of Olympian Zeus ला निघालो.

.

वाटेत आम्हाला आर्क ऑफ हॅड्रियन लागले. हा आर्क रोमन राजा हॅड्रियनच्या सन्मानार्थ १३२ AD मध्ये बांधण्यात आला होता. संपूर्ण आर्क Pentelic संगमरवरापासून बनविला आहे.

.

The Temple of Olympian Zeus चे फक्त भग्नावशेषच बघायला मिळतात. संपूर्ण परीसराला दोरीचे कुंपण घातले गेले आहे. हे मंदिर राजा झ्युसला समर्पित केले आहे.

.

The Temple of Olympian Zeus आणि मागे दिसणारा अ‍ॅक्रोपोलिस.

.

तिथून पुढे चालत गेलो की एक दहा मिनिटात आपण अथेन्सच्या Panathenaic स्टेडियमला येऊन पोहोचतो. ह्या स्टेडियमला Kallimarmaro असे ही म्हटले जाते ज्याचा अर्थ Beautifully marbled असा आहे. ३२९BC मध्ये ह्याचे पुर्नःबांधकाम करुन हे पूर्णपणे संगमरवराचे बांधले गेले. ह्याच स्टेडियम मधून ऑलिम्पिकची सुरवात झाली होती.

.

तिथून आम्ही नॅशन्ल गार्डन ऑफ अथेन्सच्या बागेतून रमतगमत Apollonosला आलो आणि मस्तपैकी एका हॉटेलात जेवलो. जेवण झाल्यावर आम्ही थेट हॉटेल गाठले आणि अंघोळ करुन ताजे तवाने होऊन हॉटेलच्या गच्चीवर म्हणजेच रुफटॉप गार्डनवर सहज चक्कर मारायला गेलो. आजचा दिवस मस्तं गेला होता , इतके फिरलो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता :)

गच्चीवरून अम्हाला खुणावत होता तो Lycabettus डोंगर.

.

उद्या सकाळी Lycabettus डोंगर बघायला जायचे होते :)

क्रमशः

प्रतिक्रिया

मस्त झालाय हा पण भाग. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

मुक्त विहारि's picture

20 Jun 2014 - 8:03 pm | मुक्त विहारि

लवकरच तुमच्या कडून अजून काही पा.क्रु. लिहीणे आणि बनवणे (आणि मिपाकरांना जळवणे होईल ) असे वाटत आहे.

बहूदा पुढील पा.क्रु.

पिटा-चिकन कबाब, ग्रील्ड चिकन विथ पटेटो व्हेजेस, चिकपी सॅलॅड विथ सन ड्राईड टोमॅटो सॉस आणि ग्रीक फ्रॅपे असाव्यात.

हा ही भाग मस्त!! पुभाप्र.

अजया's picture

20 Jun 2014 - 9:11 pm | अजया

सुरेख फोटो,मस्त वृत्तांत !

आठवणी ताज्या करणारे फोटो आणि सुंदर लेखन !
पुढचा भाग लवकर टाक :)

प्रचेतस's picture

20 Jun 2014 - 10:14 pm | प्रचेतस

काय भव्य मंदिरे आणि अफाट संस्कृती आहे ही.

भाते's picture

20 Jun 2014 - 10:32 pm | भाते

छान. सचित्र माहिती आवडली.

प्यारे१'s picture

20 Jun 2014 - 10:46 pm | प्यारे१

सुंदरच!
इतिहासाचं जतन नि त्याचं मार्केटींग करणं युरोपियन लोकांना छान जमतं.

मुक्त विहारि's picture

20 Jun 2014 - 11:23 pm | मुक्त विहारि

+१

पैसा's picture

20 Jun 2014 - 10:56 pm | पैसा

आता पुढचा भाग येऊ दे पटापट!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...लवकर येऊ दे... *smile*

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2014 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो आणि वर्णन !

अवशेष इतके भव्य वाटतात तर त्या इमारती पूर्णरुपात किती मोठ्या आणि सूंदर असतील !

चांगली माहिती व चित्रे आहेत. क्र. २ व क्र. ८ची चित्रे जास्त आवडली. संग्रहालयातील बायकांचे पुतळे हे स्त्रीरुपात कोरलेले खांब वर दाखवलेत त्यातले आहेत का? म्हणजे जुने होऊन पडलेले. सगळच भव्य वाटतय.

सुरेख. देखणे फोटो आणि उत्तम माहिती. धन्यवाद!

मृत्युन्जय's picture

21 Jun 2014 - 10:31 am | मृत्युन्जय

छान माहिती. सध्या मिपा पर्यटनमय झाले आहे :)

स्वाती दिनेश's picture

21 Jun 2014 - 4:12 pm | स्वाती दिनेश

सुरेख फोटो, छान माहिती,
स्वाती

ह भ प's picture

21 Jun 2014 - 4:28 pm | ह भ प

जबरा.. आयुष्यात कधी भारताबाहेर जायचं मनात आलं..तर अथेन्सला'च्च' जाईन..
.
.
.
आता Lycabettus डोंगरचं पण येउद्या..

केदार-मिसळपाव's picture

21 Jun 2014 - 4:30 pm | केदार-मिसळपाव

खुप छान माहिती.
इथे एक्दा एकदा सपत्निक जायचे आहे.

अन हॉटेल कोणंतं आहे हो तुमचं??

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2014 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा

अफाट...अद्भुत !

दिपक.कुवेत's picture

21 Jun 2014 - 6:47 pm | दिपक.कुवेत

सचित्र माहिती आवडली.

सस्नेह's picture

21 Jun 2014 - 8:29 pm | सस्नेह

मस्त सफर अन वर्णन !

मदनबाण's picture

22 Jun 2014 - 10:06 pm | मदनबाण

वाचतोय... पाहतोय. :)

p>मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones "Misirlou" 1963

मस्तच सानिका... अजुन टाक फोटो. पुभाप्र. :)

आमच्या अथेन्सचे वर्णन आवडले. ट्रॉयच्या युद्धात इकडूनही काही जहाजे भरून लोक गेल्ते पण यांचे मेन काँट्रिब्यूशन म्हणजे ग्रीकोपर्शियन युद्धे आणि अख्ख्या ग्रीसचे सांस्कृतिक केंद्र असणे. इसपू ४६० ते इसपू ४३० या काळात अथेन्सचे जे वर्चस्व होते, जो वरचष्मा होता, जो दरारा होता, त्याला तोड नाही. पेरिक्लेसच्या आधिपत्याखाली अथेन्स अख्ख्या ग्रीसमध्ये सर्वांत प्रबळ नगरराज्य बनले होते. बरं प्रबळ म्हणजे नुस्तं सैनिकीदॄष्ट्या नव्हे. त्यांचे आरमार जगातभारी होते, पेरिक्लेससारखा कुशल प्रशासक तिथे होता, युरिपायडिससारखा फेमस नाटककारही तिथेच आणि फिदिआससारखा विश्वकर्मा शिल्पीही तिथेच. काय नव्हतं तेव्हाच्या अथेन्समध्ये?

वर फटू दिलेला पार्थेनॉन हाही पेरिक्लेसच्या काळातच बांधलेला आहे. ऑलराउंड ग्रेटनेस म्हणजे काय हे पहायचं झालं तर पेरिक्लीअन काळातल्या अथेन्सकडे पहावे.

सानिकातै, येऊद्या अजून लेख लौकरात लौकर. आमच्या ग्रीसबद्दल कितीही वाचलं तरी थोडंच आहे.

प्रचेतस's picture

23 Jun 2014 - 4:49 pm | प्रचेतस

भारी प्रतिसाद रे.

बॅटमॅन's picture

23 Jun 2014 - 5:27 pm | बॅटमॅन

धन्स रे. :)

सानिकास्वप्निल's picture

23 Jun 2014 - 6:31 pm | सानिकास्वप्निल

मस्तं प्रतिसाद...खूप आवडला
उत्तम माहिती :)