अविस्मरणीय ग्रीस !!

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in भटकंती
16 Jun 2014 - 10:38 pm

फेब- मार्च मध्ये नेदरलॅड्स ट्रिपबद्दल मैत्रीणीशी बोलत असताना ग्रीसला कधीतरी जायची इच्छा आहे असे म्हटले होते तेव्हा समजले की मैत्रीणीला ही तिथे जायचे आहे मग काय आम्ही लगेच ग्रीसबद्द्ल माहिती गोळा करु लागलो. किती दिवसांसाठी जाता येईल, काय-काय बघता येईल, सुट्ट्या कधी घ्याव्या लागतील आणि मुख्य म्हणजे तिथे जाण्यासाठी कुठला सीझन बरा असेल वगैरे वगैरे.

मैत्रीणीने तिच्या ग्रीक सहकर्मचारार्‍याला बरीच माहिती विचारली, त्याच्या म्हणण्यानुसार मे-जून किंवा सप्टेंबर महिन्यात ग्रीसला जाणे बरे, जुलै-ऑगस्ट्मध्ये वातावरण अधिक उष्णं असतं, उन्हाचा त्रास होऊ शकतो शिवाय समुद्राची वाळू इतकी तापलेली असते की पाय भाजतात.

मी ही मिपाकर निशांतला व्यनि टाकून माहिती विचारली. त्याने खूप छान माहिती दिली. त्याची आठवणीतले ग्रीस ही लेखमाला वाचून काढली. त्याप्रमाणी शोधा-शोध करुन बेसीक itinerary तयार केली. एप्रिल महिन्यात आम्ही नेदरलँड्सला जाणारचं होतो तेव्हा तिथे आलो की पुढचे बोलूच असे ठरले.

तिथे गेलो तेव्हा समजले की कदाचित ही ट्रिप लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण मैत्रीणीने नुकतेच पासपोर्टवर नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता आणि नवा पासपोर्ट आल्यावर तिला तिच्या रेसिडेंस पर्मिटवर ही नाव बदलून घ्यायाला लागणार होते. ह्या सर्व प्रोसिजरला निदान दोन महिने तरी लागणार असे तिचे म्हणणे पडले. मग काय आम्ही हताश होऊन ग्रीसचा विचार तात्पूर्ती बाजुला ठेवला :( , म्हटले बघुया जूनच्या आधी आले तर ठिक नाहीतर सप्टेंबरला जाऊन येऊ.

मेच्या साधारण पहिल्या आठवड्यात मैत्रीणीचा व्यनि आला की तिचे पासपोर्टचे काम झाले होते आणि पर्मिटसाठी तिने अर्ज केला होता आणि ते यायला फार दिवस लागत नाही तर आपण पुन्हा ग्रीस ट्रिपबद्दल ठरवायला घेऊया, निदान तारखा ठरवायला घेऊया व त्याप्रमाणे हॉटेल्स बघायला सुरु करुयात. आता मुख्य प्रश्न होता तो सुट्ट्यांचा, नवर्‍याचे आणि मित्र-मैत्रीणीचे रूटीन वेगळे होते. त्याच्या शिफ्ट्स असल्यामुळे अशा एकत्र सुट्ट्या मिळणं जरा कठिणचं होते.

जुनच्या पहिल्या आठवड्यात जायचे त्याप्रमाणे प्रत्येकाने आप-आपल्या ऑफिसात सुट्ट्यांसाठी अर्ज केला. जून म्हणून नशीबाने त्या मिळाल्या ही :) . अनेक स्काईप चॅटिंग झाले, चर्चा झाल्या व शेवटी बुकिंग.कॉमवरून आम्ही हॉटेल्स बुक करुन ठेवली. आता विमानाची तिकिटं बघायची होती , आम्ही दोन वेगळ्या देशातून जाणार होतो त्याप्रमाणे एकाच दिवशी ग्रीसला पोहोचलो तर बरं होईल असे वाटत होते. ट्रिपला इतके कमी दिवस असताना तिकिटं बघत असल्यामुळे तिकिटं कैच्याकै महाग होती. त्यात आम्हाला लंडनवरून थेट विमान पकडायचे तर त्यासाठी किमान ३-४ तास आधी प्रवास करावा लागणार होता. मँचेस्टरवरुन थेट विमान होतं तर त्याचे आणी आमचे वेळापत्रक जुळत नव्हते. शेवटी बर्मिंगह्म विमानतळावरुन फ्रँकफुर्टमार्गे अथेन्ससाठी आम्हाला बुकिंग मिळाले. हॉल्ट ही फार वेळ नव्हता त्यामुळे लगेच तिकिटं बुक केली. मैत्रीणीला थेट विमान मिळाले व ते आमच्या काही तासचं आधी अथेन्सला पोहोचणार होते.

निशांत ने सांगितल्याप्रमाणे आम्ही अथेन्स- नॅक्सोस- सँटोरेनी - अथेन्स अशी फेरीची तिकिटं ही ब्ल्यू स्टार फेरीजच्या वेबसाईटवरून आधीच बुक करुन ठेवली. आता वाट बघायची होती ती सात जूनची.

हळू हळू तयारी, नकाशे, प्रिंट- ऑऊट्स, शॉपिंग, पॅकिंग सुरु झाले. ठेपले, घारगे, लाडू असा खाऊ पण सोबत घेतला होता ;) ७ तारखेच्या सकाळी आम्ही बर्मिंगह्मसाठी रवाना झालो. आमचे विमान दुपारचे होते.

.

विमानतळावरून गेटला जाण्यासाठी एअरलिंक रेल (मोनोरेल)घेतली.

.

छायाचित्र आंजावरुन साभार.

बॅगा ड्रॉप करून सिक्युरीटीचे सोपस्कार पार पाडून आम्ही विमानाची वाट बघु लागलो. पाऊस ही नुकताच पडून गेलेला आणि अशा वातावरणातून कधी बाहेर पडु असे वाटत होते. थोड्या वेळात विमान लागले आणि आता ग्रीसला जाण्याची उत्कंठा वाढू लागली.

.

आम्ही बोर्डिंग सुरु केले आणि दीड तासात आम्ही फ्रँकफुर्टला पोहोचलो. तिथे ही सिक्युरीटी चेक-इन करुन आम्ही थोड्यावेळ ड्युटी फ्री मध्ये टाईमपास केला. प्रवासाचा एक टप्पा पार पडला होता आता फ्रँकफुर्ट - अथेन्सचे विमान पकडायचे होते. थोड्या वेळात एजीयन एअरलाईन्सचे विमान बोर्ड करायला सुरुवात केली आणि फ्रँकफुर्टला टाटा करत आम्ही अथेन्सला निघालो.

.

काही तासात अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर Eleftherios Venizelos आमचे आगमन झाले. तिथल्या वेळेप्रमाणे आम्ही रात्री साडे नऊला पोहोचलो होतो. सामान घेऊन आम्हाला लगेच विमानतळावरून हॉटेलला जायला मेट्रो पकडायची होती पण बॅगा उशीरा आल्या असल्यामुळे आमची रात्री दहाची मेट्रो चुकली आणि आता पुढची मेट्रो साडे-दहाला होती. विमानतळाच्या बाहेर येताच अथेन्स सिटी सेंटरला म्हणजेच सिंतागामा स्क्वेअरला जाणारी X९५ बस उभीच होती, पटकन दोन तिकिटं काढली आणि बसमध्ये चढलो. बस ४०-५० मिनिटांत सिंतागामा स्क्वेअरला पोहोचली. तिथून आमचे हॉटेल दहा मिनिटाच्या अतंरावर होते. हॉटेलला पोहोचलो तेव्हा मित्र-मैत्रीण आधीच आले होते व आमची वाट बघत होते. त्यांनी आमच्या रुमची चावी आधीच घेऊन ठेवली होती, पटापट रुममध्ये गेलो, सामान टाकले व दुसर्‍या दिवशी काय काय करायचे ह्यावर थोडी चर्चा केली. मस्तं फ्रेश झालो आणी ए-सी लावून गुडुप झालो. वातावराणाचा बदल जाणवत होता.

उद्या लवकर उठून अ‍ॅक्रोपोलिसला (बोली भाषेत अ‍ॅक्रोपोली) जायचे होते :)

क्रमशः

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

16 Jun 2014 - 10:47 pm | कवितानागेश

मी पयली! ;)

एस's picture

16 Jun 2014 - 10:59 pm | एस

मी दुसरा! *ROFL*

वाचतीये. आम्हालाही सहलीत सामील करून घ्या.
तू, इस्पिक एक्कासाहेब अशी प्रवास वर्णने लिहायला लागलात तर मला घरातून बाहेर पडण्याशिवाय इलाज राहणार नाही.

सचिन कुलकर्णी's picture

16 Jun 2014 - 11:03 pm | सचिन कुलकर्णी

पु.भा.प्र..

आदूबाळ's picture

16 Jun 2014 - 11:24 pm | आदूबाळ

छळाचे साधन क्र. १ - पाकृ
छळाचे साधन क्र. २ - सहलीची वर्णने

*diablo*

वा.. मस्तच गं.. मला पण जायच परत ग्रीसला.. :(
आता फोटो टाक भरपुर. :D

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2014 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा

नवनव्या देशप्रदेशी जायला मिळालं नाही,तरी पाहायला मिळणार,ही इच्छा मि.पा.वर असल्यामुळे पूर्ण होते आहे.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2014 - 12:10 am | मुक्त विहारि

एकीकडे ग्रीस तर दुसरीकडे इंडोनेशिया....

मिपा मस्त फिरवतंय आम्हाला...

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jun 2014 - 1:03 am | डॉ सुहास म्हात्रे

ग्रीसची सफर ! ... आन्दो भरपूर फोटोंसकट.

बॅटमॅन's picture

17 Jun 2014 - 1:12 am | बॅटमॅन

आम्च्या अकिलीस आणि आगामेम्नॉनच्या देशाचे वर्णन कितीकदा वाचले तरी तृप्ती कै होत नै.

सस्नेह's picture

17 Jun 2014 - 9:19 am | सस्नेह

अकिलीस पुराण वाचल्यानंतर हे प्रवास वर्णन वाचायला मस्त इंटरेस्ट येतो आहे.

अर्रे मस्त! :) क्रमशः टाकायचे राहिलेय!

समीरसूर's picture

17 Jun 2014 - 10:41 am | समीरसूर

मस्त अनुभव-कथन! और आने दो!

स्वाती दिनेश's picture

17 Jun 2014 - 11:19 am | स्वाती दिनेश

छान लिहिते आहेस...
पुढचा भाग?
स्वाती

स्वाती दिनेश's picture

17 Jun 2014 - 11:24 am | स्वाती दिनेश

फक्त फ्रापोर्ट पाहून पुढे गेलात ना...

दिपक.कुवेत's picture

17 Jun 2014 - 11:32 am | दिपक.कुवेत

तरीच मनात म्हटलं अजुन एखादि जीवघेणी अशी पाकृ आली कशी नाहि. हि बाई काय छाळायचं सोडत नाहि....पाकॄ असो वा मुशाफिरी त्यातले फोटो असतात मात्र नेत्रसुखद.

इशा१२३'s picture

17 Jun 2014 - 12:11 pm | इशा१२३

वाचतेय..ग्रीस बघायच अजून.त्याआधी सुंदर फोटो आणि माहीती गोळा होइल.पु.भा.प्र.

मेजवानीची सुरुवात झालेली आहे तर!! लवकर वर्णन अन फोटो टाक गं. वाट बघतेय. *clapping*

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jun 2014 - 1:48 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं. सगळे भाग पटापटा लिहा बरे. म्हणजे कसे वाचायला बरे पडते. :-)

तुमचा अभिषेक's picture

17 Jun 2014 - 1:58 pm | तुमचा अभिषेक

वाचतोय :)

सखी's picture

17 Jun 2014 - 7:14 pm | सखी

वाचतेय +१ - अनुभव वाचायला उत्सुक.
फक्त ते शीर्षक संपादकांकडुन दुरुस्त करुन घेता येईल का? अविस्मर्णिय - अविस्मरणीय असे पाहीजे ना? चुका काढायचा उद्देश नाही पण सानिकाने निगुतिने बनवलेल्या मसालेभातात खडा आल्यासारखे वाटले.

सानिकास्वप्निल's picture

17 Jun 2014 - 8:18 pm | सानिकास्वप्निल

सातीताई दुरुस्ती करण्यात आली आहे :)
धन्यवाद.

अगं म्या सखी हाय सानिके...पण भा.पो. :)
सातीताई आजसे तुम मेरी मेलेमे बिछ्डी जुडवा बहीण बर का:)

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jun 2014 - 5:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

मीना प्रभू यांचे ग्रीकायन वाचल्यापासुन ग्रीसबद्दल उत्सुकता होतीच्..ती पुर्ण होइल

ग्रीकांजली ! इजिप्तायन ..
सानिकाने ग्रीसचा प्रवास केल्याने तिचे ग्रीसायन झालेच म्हणा !!

पुढच्या भागाची वाट पाहतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात

आता सुरुवात तर झाली .फोटो मात्र आंजावरचे नकोत .मी इकडे (गोरेगाव)प्रदर्शनातून ग्रीसची माहितीपुस्तके आणि नकाशे जमवले आहेत .वर्णन वाचतांना ते पाहून ग्रीसला जाण्याचे समाधान मिळेल इतके लिहा .
रात्री दहाला चेक इन केले तर चोवीस तासांचा एक दिवस देतात का उद्या सकाळचा चेक आउट असतो ?

मितान's picture

18 Jun 2014 - 10:54 am | मितान

आहा ! ग्रीस !!!

Maharani's picture

19 Jun 2014 - 11:29 am | Maharani

Masta lihit aahes Sanika....pu bha pra.....

सूड's picture

19 Jun 2014 - 5:39 pm | सूड

मस्तच !! पुभाप्र.

मधुरा देशपांडे's picture

19 Jun 2014 - 5:50 pm | मधुरा देशपांडे

लवकर टाक पुढचा भाग.

पैसा's picture

20 Jun 2014 - 8:27 pm | पैसा

पुढचा भाग आता वाचते!

मीना प्रभू यांचे ग्रीकायन वाचल्यापासुन ग्रीसबद्दल उत्सुकता होतीच्..ती पुर्ण होइल >> अगदी अगदी
खूप मस्त वर्णन...खर्चाचा अंदाज दिला तर बरे होइल...त्याप्रमाणे पुढील किती वर्षात जमेल त्यावर विचार करून ठेवता येईल. *scratch_one-s_head*