ठाणे-मुंबई-कल्याण मधील मिपाकर आणि टवाळ कार्टा यांचा मिपा कट्टा....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
11 May 2014 - 2:50 pm

(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.)

श्री. टवाळ कार्टा, १० मे ते २५मे दरम्यान ठाण्यात येत आहेत.

इथल्या आसपासच्या मिपाकरांना भेटण्याची त्यांना ओढ आहे.तसा त्यांचा मला व्य.नि. आला.

तरी आता इथेच काय ते ठरवा.

म्हणजे ठिकाण आणि वेळ, इ. इ.

दुर्दैवाने, मी नेमका यानबुवलीत अडकल्याने, माझा हा पण कट्टा हुकणार.

कळावे, आपल्या मिपाकरांचा एकमेकांवर लोभ आहेच, हे असे कट्टे करत आपण तो अज्जुन व्रुध्धींगत करू या.

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

भाते's picture

11 May 2014 - 3:25 pm | भाते

१७ किंवा १८ ला शनिवार/ रविवार असल्याने इतर मिपाकरांच्या सोयीने, ठाण्यातल्या साईकृपा मध्ये कट्टा करायला हरकत नाही.
जेडीबरोबरच्या तिथल्या कट्टयानंतर आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या हॉटेलचे रिनोव्हेशन पुर्ण झाले असेल अशी आशा आहे.
फक्त मिपाकरांनी कामात वेळ काढुन यावे हि अपेक्षा. नाहीतर "नक्की येतो, येण्याचा प्रयत्न करतो, उशिर होईल पण येईन इ." कारणे देऊन आयत्यावेळी टांग देऊ नये ही नम्र विनंती. हे वाक्य खासकरून ठाण्याच्या जवळपास राहुनही कट्टयाला न येणार्यांसाठी आहे. ह. घ्या. :)
इतरांच्या सोयीनुसार दुसरे एखादे हॉटेल/ ठिकाण ठरले तरी हरकत नाही.

सर्वसाक्षी's picture

11 May 2014 - 6:59 pm | सर्वसाक्षी

१७ मे संकष्टी आहे.

टवाळ कार्टा's picture

11 May 2014 - 11:40 pm | टवाळ कार्टा

मग?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 May 2014 - 4:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुक्त विहार्‍या,हे टवाळ कार्टा म्हणजे कोणी रिटायर्ड आय.सी.एस. हापिसर्,गवर्नर जनरलसारखे प्रस्थ दिसते आहे.

पैसा's picture

11 May 2014 - 5:44 pm | पैसा

तुम्ही जाणार काय झाडू घेऊन? *wink* नाही म्हणजे आता निवडणुका संपल्या परत प्रचार सुरू करायला हरकत नै!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 May 2014 - 5:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हॅ हॅ हॅ.तू हो पुढे कमळ घेवून त्यांचे स्वागत करायला.मी येतेच मागून.

आत्मशून्य's picture

11 May 2014 - 6:03 pm | आत्मशून्य

पैसातैना चक्क अरे तुरे, त्या आपल्या सुनबाइ असाव्यात त्या असा कयास आहे...

पैसा's picture

11 May 2014 - 7:46 pm | पैसा

आत्मशून्याचे अंदाज बरोबर असतात बरेचदा!

@माई, मी ठाण्याच्या आसपास पण नाही आणि कधी कमळ घेऊन फिरत पण नाही. पण तुम्ही मात्र सगळीकडे झाडू घेऊनच फिरताना दिसता नेहमी!

भाते's picture

11 May 2014 - 8:20 pm | भाते

या माई बहुदा साठी किंवा सत्तरीच्या पुढच्या आजीबाई (जेष्ठ नागरिक) असतील म्हणुन सगळ्यांना अरेतुरे करत असतील. :)

ये माई व्हो पुड. हे कट्टे प्रकरण झेपणार नाय तुमाला.

सुहास झेले's picture

11 May 2014 - 5:16 pm | सुहास झेले

कट्ट्याची तारीख कळवा नक्की... भेटूच :)

यशोधरा's picture

11 May 2014 - 8:24 pm | यशोधरा

कट्ट्यासाठी शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

कट्ट्यासाठी शुभेच्छा ! फोटोंसकट कट्ट्याच्या वर्णनाच्या प्रतिक्षेत !

शिद's picture

12 May 2014 - 5:23 pm | शिद

असेच म्हणतो.

टवाळ कार्टा's picture

11 May 2014 - 11:39 pm | टवाळ कार्टा

फक्त १६ ते १८ मी पुण्यात असेन पण पुण्यातले रस्ते काहिच माहित नाहित त्यामुळे तिथे जमणार नाही
आणि मी फक्त "पक्षी" वाला पण "तिर्थ"वाल्यांबरोबर असणारा ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 May 2014 - 12:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

ठाण्याला कट्टा असेल तर माझे येणे कठीण आहे.

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2014 - 1:03 am | प्रभाकर पेठकर

माझेही.....

प्यारे१'s picture

12 May 2014 - 1:15 pm | प्यारे१

माझेही..... (टिंबांसकट) ;)

प्रमोद देर्देकर's picture

12 May 2014 - 9:53 am | प्रमोद देर्देकर

टवाळ कार्टा कुठुन ठाण्याला येत आहेत कळव्याहुन?. कारण ते तर कळव्यातच राहतात म्हणुन म्हटलं.

कंजूस's picture

12 May 2014 - 10:49 am | कंजूस

यादिवसांत लोणावळ्याला कुणाच्याही(टवाळ /मवाळ) नावाने चहा/नीरा पिणे सुध्दा गारगार वाटेल .

टवाळ कार्टा's picture

12 May 2014 - 12:25 pm | टवाळ कार्टा

(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.)

आक्षरास हसू नये याची आठवण झाली :)

मुक्त विहारि's picture

12 May 2014 - 2:43 pm | मुक्त विहारि

भेंडी,

इथे दुपारी जेमतेम अर्धा तास मिळतो.कसाबसा वेळात वेळ काढून ४ शब्द टाईप करावे म्हटले तरी, बोंबाबोंब...

असो,

टवाळ कार्टा's picture

13 May 2014 - 1:01 pm | टवाळ कार्टा

जाहिर ठ्यांकू... पण कट्टासम्राट नसतील तर वो कट्टा ....कट्टा नही होता :(

मुक्त विहारि's picture

13 May 2014 - 2:49 pm | मुक्त विहारि

हे कट्टासम्राट कोण?

टवाळ कार्टा's picture

13 May 2014 - 9:31 pm | टवाळ कार्टा

तुमच्याशिवाय आहेच कोण ;)

मुक्त विहारि's picture

13 May 2014 - 9:44 pm | मुक्त विहारि

मी फक्त आयोजक...

खरे कट्टा सम्राट म्हणजे, त्या कट्ट्याला जमणारे मिपाकर.

आयोजकाचे काम फक्त फोना-फोनी आणि व्य.नि, करणे.

आत्मशून्य's picture

14 May 2014 - 5:15 am | आत्मशून्य

कट्टा माफिया आहात तुम्ही...!

मुक्त विहारि's picture

14 May 2014 - 9:37 am | मुक्त विहारि

कट्टा व्यसनी म्हणाला असतात तरी चालले असते.

माफिया व्हायचे भाग्य आमच्या कपाळी नाही.

आत्मशून्य's picture

14 May 2014 - 11:10 pm | आत्मशून्य

अस्सल मिपाचा कट्टा इव्हेंट ते सुधा मुवींच्या कसल्याही सपोर्टशिवाय कधी घडलाय ? अशक्य, तुम्ही मिपावकरांच्या कट्याचे माफिआया आहात. बोल्लेतो गॉड्फादर.

चित्रगुप्त's picture

16 May 2014 - 6:23 pm | चित्रगुप्त

कट्टेबा़ज ???

किसन शिंदे's picture

12 May 2014 - 12:52 pm | किसन शिंदे

ठाण्यात कट्टा असल्याने शुभेच्छा! ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 May 2014 - 2:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुला कुठे हवा होता??

किसन शिंदे's picture

12 May 2014 - 2:12 pm | किसन शिंदे

दक्षिण-मध्य मुंबईत ;-)

सूड's picture

12 May 2014 - 3:27 pm | सूड

दक्षिण-मध्य मुंबईत

म्हंजे कुठे ??

उत्तर पुर्व मुंबईच्या बाजुला.

सूड's picture

12 May 2014 - 3:45 pm | सूड

आता ती कुठे आली?

आता नाही आली! आधीपासूनच होती.
-स्पेशल फॉर यु! ;)

तू गप रांव मरे!! वशाड मेलो!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 May 2014 - 2:13 am | निनाद मुक्काम प...

आमचा अभिषेक सांगू शकेल
तो खर्या खुर्या मुंबईचा रहिवाशी ,त्याला नक्की ठाऊक असेल.
इचारून पहा

सस्नेह's picture

12 May 2014 - 2:59 pm | सस्नेह

१६ ला असेल तर मी धावती भेट देऊ शकेन.

कवितानागेश's picture

13 May 2014 - 3:16 pm | कवितानागेश

१६ ला नाहिये. तु मला भेट धावत.. :)

दिपक.कुवेत's picture

12 May 2014 - 3:43 pm | दिपक.कुवेत

धावता धावता भेट्णार का सगळ्यांना का भेटता भेटता धावणार???? कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!! (तीन टिंब आणि दांड्यांसकट)

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2014 - 11:56 am | अत्रुप्त आत्मा

@ (तीन टिंब आणि दांड्यांसकट)>> =))
... =)) आमच्याही शुभेछा! =))

टवाळ कार्टा's picture

13 May 2014 - 11:13 am | टवाळ कार्टा

तारीख २४ मे...१७-१८ मे मी ठाण्यात नाही

मुक्त विहारि's picture

13 May 2014 - 2:47 pm | मुक्त विहारि

२४ मे...

हा पण कट्टा जोरदार होउ द्या.

खा , प्या , मजा करा.

कट्यात अजुन धमाल घडली असती.

मुक्त विहारि's picture

13 May 2014 - 2:59 pm | मुक्त विहारि

कट्ट्याला आमची कधीच ना नसते....

खाणे-पिणे-गप्पा मारणे (चकाट्या पिटणे) आणि उत्तम इंग्रजी सिनेमे बघणे ह्या ४ पायांवरच मी जगतो.

(हे, टीच भर पोट नसते ना, तर नक्कीच आलो असतो. आता ह्या "टीच भर पोटावर" पण एखादा लेख लिहावा म्हणतो.)

आत्मशून्य's picture

13 May 2014 - 3:06 pm | आत्मशून्य

तुमचा लेख तरी येऊद्या, तेव्हडीच दुधाची तान ताकावर.

नानबा's picture

13 May 2014 - 5:47 pm | नानबा

आपले नंदी पॅलेस कट्टे आठवले... भारी झाले होते...
काही कट्टर डोंबिवलीकर मिपाकरांनी "नक्की येतो" सांगून टांग दिली होती. नंतर "कुठूनसा बाईकवरून येताना रात्री रस्त्यात बाईक बंद पडली म्हणून येता आलं नाही" असा प्रतिसाद मिळाला.
पण आपले २-३ कट्टे ब्येष्ट झाले होते. डॉ. खरे दोन्ही वेळेस खास मुलूंडवरून आले होते. मजा आली.

मुक्त विहारि's picture

13 May 2014 - 7:18 pm | मुक्त विहारि

मी फक्त आयोजक म्ह्णूनच काम केले.

बाकी कट्टा यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्ही इतर जणच पार पाडता.

कट्टा रंगतो तो सभासदांमुळे, आयोजक हा फक्त फोना-फोनी करण्यापुरताच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 May 2014 - 2:17 am | निनाद मुक्काम प...

माझ्यावेळी सुद्ध्धा आले म्हणजे हेट्रिक असावी
नंदी पेलेस चे जेवण आवडले.
आणि माझा डोंबिवलीचा कट्टा हा माझ्या भारतभेतीमधील सर्वात स्मरणीय दिवस होता. त्या कट्यानंतर मी आणि डॉ
मध्यरात्री पर्यत मुलुंड ला चर्चा करत होतो. .सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.

सूड's picture

13 May 2014 - 2:49 pm | सूड

२४ असेल तर शुभेच्छा!!

टवाळ कार्टा's picture

16 May 2014 - 6:07 pm | टवाळ कार्टा

मी १७-१८ ठाण्यातच आहे...२४ ऐवजी १८ ला करायचा का कट्टा???

तुम्ही 'उत्सवमूर्ती' आहात तेव्हा तुम्ही ठरवा काय ते !! ;)

टवाळ कार्टा's picture

16 May 2014 - 11:29 pm | टवाळ कार्टा

२४ लाच करु...मला व्यनि करा जे येत आहेत त्यांनी...जागा हॉटेल साईक्रूपा...तलावपाळी जवळ...वेळ संध्याकाळी ६:३०

मुक्त विहारि's picture

16 May 2014 - 11:45 pm | मुक्त विहारि

मस्त शनिवार आहे.

पक्षी-तीर्थ कट्ट्यासाठी एकदम योग्य वार.

मज्जा मज्जा करा.

टवाळ कार्टा's picture

17 May 2014 - 11:44 am | टवाळ कार्टा

प्लान मे लाश्ट मोमेंट चेंज होना

कट्टा उद्या १८ मे ला सकळी ९:०० वाजता ठाण्यात साईक्रुपा हॉटेलमधे

सुबोध खरे's picture

17 May 2014 - 12:08 pm | सुबोध खरे

मी येणार. सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.

टवाळ कार्टा's picture

17 May 2014 - 1:09 pm | टवाळ कार्टा

कट्ट्याला फक्त १ नियम.... राजकारणावर कोणीही काहीही बोलायचे नाही

मुक्त विहारि's picture

17 May 2014 - 2:40 pm | मुक्त विहारि

तोच तर आमचा अलिखित नियम आहे...

कट्ट्याचा वृत्तांत येऊ द्या लवकर !!

छोट्युश्या कट्ट्याचा छोटासा वृतांत….

पाटी - हा आजपर्यन्तचा सगळ्यात रटाळ कट्टाव्रुत्तान्त आहे … आपापल्या जबाबदारीवर वाचावा

उपपाटी - डॉ खरे आणि रामदास काका यांनी वृत्तांतामध्ये मसाला घालावा ही विनंती :)

आदाल्यारात्रीपर्यंत कोणाचाही व्यनी न आल्याने (बहुतेक बर्याचजणांच्या शेपटीवर पाय दिला असावा मी ;) ) मी खरेसाहेबांना मी नक्की भेटणार असे सांगीतले…तरीही थोडी सकाळी धाकधुक होतीच म्हणुन परत एकदा फोन लावला तर बातमी समजली की रामदास काका आणि किसनदेव सुध्धा येणार आहेत …. मग मात्र सुसाट निघालो (तरी थोडा वेळ लागलाच केमेर्याची ब्याटरी चार्ज करायला :D )
साईक्रूपा मध्ये पोचताच डॉक भेटले….अगदी संतूर इश्टाइल … चेहरेसे उमर का पता ही नही चलता :)
तितक्यात रामादासकाका सुध्धा आले…थोडावेळ किसानदेवांची वाट बघण्यात गेल्यावर रामदास काकांनी नवीन मिसळीचे ठिकाण दाखवतो म्हणून ठाण्यातले आधीच माहित असलेले गल्लीबोळ दाखवले :D … पण नवीन मिसळीच्याठिकाणी नेले :) … पण दुकान बंद :(
मग मात्र रामदास काकांनी त्यांच्या ओफीसमध्ये बसावे असे सुचवले आणि डॉकनी त्यांना अनुमोदन दिले … (इथे बसणे म्हणजे "तीर्था"साठी नाही तर "च्या"साठी :D )
मग मात्र मस्त गप्पा रंगल्या … अर्थातच डॉक आणी रामदास काकांच्या … मी फक्त ऐकत होतो (जसा मिपावर वाचनमात्र असतो तसा)… या गप्पांचे डिटेल्स डॉक आणि रा.का. यांनीच दिले तर बरे
आणि मधेच किसनदेव प्रकट झाले :) …. बरोबर धनाजीराव पण आले होते (पेन्द्या??? =)) )… आणि धनाजीरावांचा पुतण्या … नंतर समजले ते तिघे नेहरू तारांगणासाठी निघाले होते
अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही … हा पहिलाच कट्टा असेल ज्यात "उत्सवमुर्तीने" १ छदामसुध्धा खर्च नाही केला ;) … पण ती कसर मी भविष्यातील कट्ट्यात भरून काढेन असे "आश्वासन" देतो ;) ... आणि हो... गप्पांच्या नादात फोटो काढण्याचे राहूनच गेले :(

माझ्यासाठी सुखाचे क्षण …

कट्टा संपवताना आम्ही तिघेही समवयस्क होतो ;)
डॉ खरे (१८ + अ वर्षे)
रामदास काका (१८ + ब वर्षे)
मी (१८ + क वर्षे)

आणि डॉकना स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी खालील औषधे सुचवली ;)

२ and half men
the big bang theory
FRIENDS

yo \m/

मुक्त विहारि's picture

20 May 2014 - 10:05 pm | मुक्त विहारि

नशीबवान आहात,

तुम्हाला, रामदास काका आणि डॉ. खरे ह्यांना एकाच ठिकाणी भेटायला मिळाले आणि किसन्देव व धनाजी राव यांना पण त्याच वेळी भेटायला मिळाल्यामुळे, तुम्हाला नक्कीच मिपा कट्टा एंजॉय करता आला असेल.

चला, आता आमची बियर प्यायची वेळ झाली.निघावे म्हणतो.

चियर्स...टू मिपा कट्टा...

टवाळ कार्टा's picture

20 May 2014 - 11:15 pm | टवाळ कार्टा

मस्त व्रुत्तांत

हे उगाचच लिहिले...मी लिहिलेला व्रुत्तांत मी स्वताच एंजॉय नाही केला
बाकी बियरला "तीर्थ" म्हणावे का?? हा द्वीशतकी धाग्याचा विषय होउ शकतो ;)

सुबोध खरे's picture

20 May 2014 - 11:44 pm | सुबोध खरे

गमतीची गोष्ट अशी कि टवाळ कार्टा(उत्तम कैमेराDSLR -- निकोन D ३१००) आणि मी (बरा कैमेरा kodak z ८६१२(८ मेगा पिक्सेल आणि १२ X झूम ) अशा दोघांकडे कैमेरा असूनही आणि चार तास असूनही गप्पांच्या नादात एकही फोटो काढला गेला नाही.
असो गप्पा करता करता समोसा आणि नंतर बटाटे वडा असे चहा च्या अगोदर आणि नंतर होतेच. रामदास साहेबांचे तीन मित्र यात एक श्री चंद्रशेखर जोग ( यांनी मिपा वर पूर्वी म्युचुअल फंडावर लेख लिहिले आहेत), एक अतुल भिडे आणि त्यांचे सहभागी श्री पाटणकर असेही लोक तेथे होतेच. रामदास साहेब आणि मी आमच्यात आयुर्विमा या विषयावर जुगलबंदी झाली. अर्थात मी आयुर्विम्यावर बर्यापैकी टीका करीत होतो आणि रामदास साहेब शांतपणे किल्ला लढवत होते.
ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला. साधारण दर डोई ४००-५०० रुपये खर्च होईल यावर सर्वांनी त्याला उत्साहाने अनुमोदन दिले
रामदास साहेबांनी मला बोटाच्या ठशांपासून मेंदूचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले.त्यांच्या लैप टॉप वर ते मी वाचून पाहिले पण एकंदर जसे कुडबुडे ज्योतिषी गोल बोलतात तसे आढळले. मी मुळात फारसे त्याबद्दल वाचलेले नाही त्यामुळे मी मनमोहन सिंह यांचा तात्पुरता शिष्य झालो.
वयाचे म्हणाल तर लोकांनी मला विचारले कि तुमचे वय किती त्यावर माझे उत्तर असे आहे कि मी अमुक वर्षाचा अनुभव असलेला अठरा वर्षाचा तरुण आहे.
राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही( मी रोज दुपारी २ तास आणी रात्री ८ तास सुखात झोपतो) त्यामुळे सत्रे लेव्हल कमी करण्याचा विचार करण्याची मला अजून तरी गरज पडलेली नाही. पण अशा सीटकॉम पाहायला मी नेहेमीच तयार असतो

टवाळ कार्टा's picture

21 May 2014 - 9:20 pm | टवाळ कार्टा

काही दुरुस्ती :)

D3200

ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला

हा शिक्रेट कट्टा असणार होता ना??? ;)

राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही

तो सल्ला तुम्हाला नव्हताच मुळी...त्या सिटकॉम तुम्ही दुसर्याला स्ट्रेस लेव्हल कमी करायला सुचवू शकता :)

टवाळ कार्टा's picture

22 Oct 2014 - 3:27 pm | टवाळ कार्टा

हा कट्टा होणार आहे काय? अनायसे कट्टाकिंग सध्ध्या इथेच मध्यवर्ती ठिकाणी आहेत :)

होऊन जाऊ द्या. दिवाळी पण आहे, एखादा झक्कपैकी लाईव्ह वृत्तांत पण येऊ द्या.

आत्मशून्य's picture

21 May 2014 - 11:23 pm | आत्मशून्य

आणि धमाल वृत्तांताच न्हवे कट्टा अन मिपाकर दोघांची अनुभव. दुर्दैवाने सध्या धन्यवाद अन लिखाण आवडले एव्हडिच प्रतिक्रिया लिहू शकान्यार्या लोकांनी मिपा कट्टा प्रकाराला ग्रहण लावले आहे, इथे पुण्यात तुलनेने नविन पण वृत्तीने अतिशय धमाल मिपाक्रांची फ़ळि तयार आहे बोल केंव्हा येतोस दंगा सॉरी एन्जॉय करायला ?

टवाळ कार्टा's picture

21 May 2014 - 11:30 pm | टवाळ कार्टा

हे आमंत्रण नक्की कोणाला??? :)

आत्मशून्य's picture

21 May 2014 - 11:40 pm | आत्मशून्य

जे टवाळ डामरट डेम्बिस व खरे वृत्तीने दंगेखोर आहेत, थोडक्यात धमाल एंजॉय करू इच्छिणार्या प्रत्येक मनस्वी मिपाकरांणा हे निमंत्रण आहे. मग हे याधी मिपावर अथवा प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी केले नसले तरी हरकत नाही :)

शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही. कट्टा छान झाला.
फोटोशिवाय कट्टा वृत्तांत म्हणजे बिनसाखरेचा चहा प्यायल्यासारखे वाटते. पण एखाद्या दिवशी बिन साखरेचा चहा प्यायला तरी हरकत नाही. :)

टवाळ कार्टा's picture

22 May 2014 - 3:55 pm | टवाळ कार्टा

हवे असलेले पाहुणे आले असते तर काय झाले असते :P

किसन शिंदे's picture

24 May 2014 - 12:49 am | किसन शिंदे

शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही.

अलीकडे कट्ट्याला टांग देण्यासाठी हे कारण मी हमखास वापरतो. ;) :P

चौकटराजा's picture

22 Oct 2014 - 4:42 pm | चौकटराजा

अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही
चक्क चहाचे तीन राउंड ? प्या तीन तीन वेळा चहा ! करा चैन ! होउ दे खर्च !

बॅटमॅन's picture

24 Oct 2014 - 3:27 pm | बॅटमॅन

चहाचे तीन राउंड??????

अरे इत्ते इत्ते तो कपां थे यारो.

टवाळ कार्टा's picture

24 Oct 2014 - 10:54 pm | टवाळ कार्टा

जान दे भै...ये लोगां पैचानते नै हाईद्राबादीयुंको