मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ठाणे-मुंबई-कल्याण मधील मिपाकर आणि टवाळ कार्टा यांचा मिपा कट्टा....

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.) श्री. टवाळ कार्टा, १० मे ते २५मे दरम्यान ठाण्यात येत आहेत. इथल्या आसपासच्या मिपाकरांना भेटण्याची त्यांना ओढ आहे.तसा त्यांचा मला व्य.नि. आला. तरी आता इथेच काय ते ठरवा. म्हणजे ठिकाण आणि वेळ, इ. इ. दुर्दैवाने, मी नेमका यानबुवलीत अडकल्याने, माझा हा पण कट्टा हुकणार. कळावे, आपल्या मिपाकरांचा एकमेकांवर लोभ आहेच, हे असे कट्टे करत आपण तो अज्जुन व्रुध्धींगत करू या.

वाचने 12588 वाचनखूण प्रतिक्रिया 78

भाते Sun, 05/11/2014 - 15:25
१७ किंवा १८ ला शनिवार/ रविवार असल्याने इतर मिपाकरांच्या सोयीने, ठाण्यातल्या साईकृपा मध्ये कट्टा करायला हरकत नाही. जेडीबरोबरच्या तिथल्या कट्टयानंतर आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या हॉटेलचे रिनोव्हेशन पुर्ण झाले असेल अशी आशा आहे. फक्त मिपाकरांनी कामात वेळ काढुन यावे हि अपेक्षा. नाहीतर "नक्की येतो, येण्याचा प्रयत्न करतो, उशिर होईल पण येईन इ." कारणे देऊन आयत्यावेळी टांग देऊ नये ही नम्र विनंती. हे वाक्य खासकरून ठाण्याच्या जवळपास राहुनही कट्टयाला न येणार्यांसाठी आहे. ह. घ्या. :) इतरांच्या सोयीनुसार दुसरे एखादे हॉटेल/ ठिकाण ठरले तरी हरकत नाही.

मुक्त विहार्‍या,हे टवाळ कार्टा म्हणजे कोणी रिटायर्ड आय.सी.एस. हापिसर्,गवर्नर जनरलसारखे प्रस्थ दिसते आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा Sun, 05/11/2014 - 17:44
तुम्ही जाणार काय झाडू घेऊन? *wink* नाही म्हणजे आता निवडणुका संपल्या परत प्रचार सुरू करायला हरकत नै!

In reply to by आत्मशून्य

पैसा Sun, 05/11/2014 - 19:46
आत्मशून्याचे अंदाज बरोबर असतात बरेचदा! @माई, मी ठाण्याच्या आसपास पण नाही आणि कधी कमळ घेऊन फिरत पण नाही. पण तुम्ही मात्र सगळीकडे झाडू घेऊनच फिरताना दिसता नेहमी!

In reply to by पैसा

भाते Sun, 05/11/2014 - 20:20
या माई बहुदा साठी किंवा सत्तरीच्या पुढच्या आजीबाई (जेष्ठ नागरिक) असतील म्हणुन सगळ्यांना अरेतुरे करत असतील. :)

टवाळ कार्टा Sun, 05/11/2014 - 23:39
फक्त १६ ते १८ मी पुण्यात असेन पण पुण्यातले रस्ते काहिच माहित नाहित त्यामुळे तिथे जमणार नाही आणि मी फक्त "पक्षी" वाला पण "तिर्थ"वाल्यांबरोबर असणारा ;)

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Mon, 05/12/2014 - 14:43
भेंडी, इथे दुपारी जेमतेम अर्धा तास मिळतो.कसाबसा वेळात वेळ काढून ४ शब्द टाईप करावे म्हटले तरी, बोंबाबोंब... असो,

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 21:44
मी फक्त आयोजक... खरे कट्टा सम्राट म्हणजे, त्या कट्ट्याला जमणारे मिपाकर. आयोजकाचे काम फक्त फोना-फोनी आणि व्य.नि, करणे.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Wed, 05/14/2014 - 23:10
अस्सल मिपाचा कट्टा इव्हेंट ते सुधा मुवींच्या कसल्याही सपोर्टशिवाय कधी घडलाय ? अशक्य, तुम्ही मिपावकरांच्या कट्याचे माफिआया आहात. बोल्लेतो गॉड्फादर.

In reply to by दिपक.कुवेत

आमचा अभिषेक सांगू शकेल तो खर्या खुर्या मुंबईचा रहिवाशी ,त्याला नक्की ठाऊक असेल. इचारून पहा

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 15:43
धावता धावता भेट्णार का सगळ्यांना का भेटता भेटता धावणार???? कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!! (तीन टिंब आणि दांड्यांसकट)

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 14:59
कट्ट्याला आमची कधीच ना नसते.... खाणे-पिणे-गप्पा मारणे (चकाट्या पिटणे) आणि उत्तम इंग्रजी सिनेमे बघणे ह्या ४ पायांवरच मी जगतो. (हे, टीच भर पोट नसते ना, तर नक्कीच आलो असतो. आता ह्या "टीच भर पोटावर" पण एखादा लेख लिहावा म्हणतो.)

In reply to by मुक्त विहारि

नानबा Tue, 05/13/2014 - 17:47
आपले नंदी पॅलेस कट्टे आठवले... भारी झाले होते... काही कट्टर डोंबिवलीकर मिपाकरांनी "नक्की येतो" सांगून टांग दिली होती. नंतर "कुठूनसा बाईकवरून येताना रात्री रस्त्यात बाईक बंद पडली म्हणून येता आलं नाही" असा प्रतिसाद मिळाला. पण आपले २-३ कट्टे ब्येष्ट झाले होते. डॉ. खरे दोन्ही वेळेस खास मुलूंडवरून आले होते. मजा आली.

In reply to by नानबा

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 19:18
मी फक्त आयोजक म्ह्णूनच काम केले. बाकी कट्टा यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्ही इतर जणच पार पाडता. कट्टा रंगतो तो सभासदांमुळे, आयोजक हा फक्त फोना-फोनी करण्यापुरताच.

In reply to by नानबा

माझ्यावेळी सुद्ध्धा आले म्हणजे हेट्रिक असावी नंदी पेलेस चे जेवण आवडले. आणि माझा डोंबिवलीचा कट्टा हा माझ्या भारतभेतीमधील सर्वात स्मरणीय दिवस होता. त्या कट्यानंतर मी आणि डॉ मध्यरात्री पर्यत मुलुंड ला चर्चा करत होतो. .सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.

टवाळ कार्टा Tue, 05/20/2014 - 21:22
छोट्युश्या कट्ट्याचा छोटासा वृतांत…. पाटी - हा आजपर्यन्तचा सगळ्यात रटाळ कट्टाव्रुत्तान्त आहे … आपापल्या जबाबदारीवर वाचावा उपपाटी - डॉ खरे आणि रामदास काका यांनी वृत्तांतामध्ये मसाला घालावा ही विनंती :) आदाल्यारात्रीपर्यंत कोणाचाही व्यनी न आल्याने (बहुतेक बर्याचजणांच्या शेपटीवर पाय दिला असावा मी ;) ) मी खरेसाहेबांना मी नक्की भेटणार असे सांगीतले…तरीही थोडी सकाळी धाकधुक होतीच म्हणुन परत एकदा फोन लावला तर बातमी समजली की रामदास काका आणि किसनदेव सुध्धा येणार आहेत …. मग मात्र सुसाट निघालो (तरी थोडा वेळ लागलाच केमेर्याची ब्याटरी चार्ज करायला :D ) साईक्रूपा मध्ये पोचताच डॉक भेटले….अगदी संतूर इश्टाइल … चेहरेसे उमर का पता ही नही चलता :) तितक्यात रामादासकाका सुध्धा आले…थोडावेळ किसानदेवांची वाट बघण्यात गेल्यावर रामदास काकांनी नवीन मिसळीचे ठिकाण दाखवतो म्हणून ठाण्यातले आधीच माहित असलेले गल्लीबोळ दाखवले :D … पण नवीन मिसळीच्याठिकाणी नेले :) … पण दुकान बंद :( मग मात्र रामदास काकांनी त्यांच्या ओफीसमध्ये बसावे असे सुचवले आणि डॉकनी त्यांना अनुमोदन दिले … (इथे बसणे म्हणजे "तीर्था"साठी नाही तर "च्या"साठी :D ) मग मात्र मस्त गप्पा रंगल्या … अर्थातच डॉक आणी रामदास काकांच्या … मी फक्त ऐकत होतो (जसा मिपावर वाचनमात्र असतो तसा)… या गप्पांचे डिटेल्स डॉक आणि रा.का. यांनीच दिले तर बरे आणि मधेच किसनदेव प्रकट झाले :) …. बरोबर धनाजीराव पण आले होते (पेन्द्या??? =)) )… आणि धनाजीरावांचा पुतण्या … नंतर समजले ते तिघे नेहरू तारांगणासाठी निघाले होते अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही … हा पहिलाच कट्टा असेल ज्यात "उत्सवमुर्तीने" १ छदामसुध्धा खर्च नाही केला ;) … पण ती कसर मी भविष्यातील कट्ट्यात भरून काढेन असे "आश्वासन" देतो ;) ... आणि हो... गप्पांच्या नादात फोटो काढण्याचे राहूनच गेले :( माझ्यासाठी सुखाचे क्षण … कट्टा संपवताना आम्ही तिघेही समवयस्क होतो ;) डॉ खरे (१८ + अ वर्षे) रामदास काका (१८ + ब वर्षे) मी (१८ + क वर्षे) आणि डॉकना स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी खालील औषधे सुचवली ;) २ and half men the big bang theory FRIENDS yo \m/

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Tue, 05/20/2014 - 22:05
नशीबवान आहात, तुम्हाला, रामदास काका आणि डॉ. खरे ह्यांना एकाच ठिकाणी भेटायला मिळाले आणि किसन्देव व धनाजी राव यांना पण त्याच वेळी भेटायला मिळाल्यामुळे, तुम्हाला नक्कीच मिपा कट्टा एंजॉय करता आला असेल. चला, आता आमची बियर प्यायची वेळ झाली.निघावे म्हणतो. चियर्स...टू मिपा कट्टा...

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा Tue, 05/20/2014 - 23:15
मस्त व्रुत्तांत
हे उगाचच लिहिले...मी लिहिलेला व्रुत्तांत मी स्वताच एंजॉय नाही केला बाकी बियरला "तीर्थ" म्हणावे का?? हा द्वीशतकी धाग्याचा विषय होउ शकतो ;)

सुबोध खरे Tue, 05/20/2014 - 23:44
गमतीची गोष्ट अशी कि टवाळ कार्टा(उत्तम कैमेराDSLR -- निकोन D ३१००) आणि मी (बरा कैमेरा kodak z ८६१२(८ मेगा पिक्सेल आणि १२ X झूम ) अशा दोघांकडे कैमेरा असूनही आणि चार तास असूनही गप्पांच्या नादात एकही फोटो काढला गेला नाही. असो गप्पा करता करता समोसा आणि नंतर बटाटे वडा असे चहा च्या अगोदर आणि नंतर होतेच. रामदास साहेबांचे तीन मित्र यात एक श्री चंद्रशेखर जोग ( यांनी मिपा वर पूर्वी म्युचुअल फंडावर लेख लिहिले आहेत), एक अतुल भिडे आणि त्यांचे सहभागी श्री पाटणकर असेही लोक तेथे होतेच. रामदास साहेब आणि मी आमच्यात आयुर्विमा या विषयावर जुगलबंदी झाली. अर्थात मी आयुर्विम्यावर बर्यापैकी टीका करीत होतो आणि रामदास साहेब शांतपणे किल्ला लढवत होते. ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला. साधारण दर डोई ४००-५०० रुपये खर्च होईल यावर सर्वांनी त्याला उत्साहाने अनुमोदन दिले रामदास साहेबांनी मला बोटाच्या ठशांपासून मेंदूचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले.त्यांच्या लैप टॉप वर ते मी वाचून पाहिले पण एकंदर जसे कुडबुडे ज्योतिषी गोल बोलतात तसे आढळले. मी मुळात फारसे त्याबद्दल वाचलेले नाही त्यामुळे मी मनमोहन सिंह यांचा तात्पुरता शिष्य झालो. वयाचे म्हणाल तर लोकांनी मला विचारले कि तुमचे वय किती त्यावर माझे उत्तर असे आहे कि मी अमुक वर्षाचा अनुभव असलेला अठरा वर्षाचा तरुण आहे. राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही( मी रोज दुपारी २ तास आणी रात्री ८ तास सुखात झोपतो) त्यामुळे सत्रे लेव्हल कमी करण्याचा विचार करण्याची मला अजून तरी गरज पडलेली नाही. पण अशा सीटकॉम पाहायला मी नेहेमीच तयार असतो

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Wed, 05/21/2014 - 21:20
काही दुरुस्ती :) D3200
ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला
हा शिक्रेट कट्टा असणार होता ना??? ;)
राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही
तो सल्ला तुम्हाला नव्हताच मुळी...त्या सिटकॉम तुम्ही दुसर्याला स्ट्रेस लेव्हल कमी करायला सुचवू शकता :)

आत्मशून्य Wed, 05/21/2014 - 23:23
आणि धमाल वृत्तांताच न्हवे कट्टा अन मिपाकर दोघांची अनुभव. दुर्दैवाने सध्या धन्यवाद अन लिखाण आवडले एव्हडिच प्रतिक्रिया लिहू शकान्यार्या लोकांनी मिपा कट्टा प्रकाराला ग्रहण लावले आहे, इथे पुण्यात तुलनेने नविन पण वृत्तीने अतिशय धमाल मिपाक्रांची फ़ळि तयार आहे बोल केंव्हा येतोस दंगा सॉरी एन्जॉय करायला ?

In reply to by टवाळ कार्टा

आत्मशून्य Wed, 05/21/2014 - 23:40
जे टवाळ डामरट डेम्बिस व खरे वृत्तीने दंगेखोर आहेत, थोडक्यात धमाल एंजॉय करू इच्छिणार्या प्रत्येक मनस्वी मिपाकरांणा हे निमंत्रण आहे. मग हे याधी मिपावर अथवा प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी केले नसले तरी हरकत नाही :)

भाते गुरुवार, 05/22/2014 - 15:47
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही. कट्टा छान झाला. फोटोशिवाय कट्टा वृत्तांत म्हणजे बिनसाखरेचा चहा प्यायल्यासारखे वाटते. पण एखाद्या दिवशी बिन साखरेचा चहा प्यायला तरी हरकत नाही. :)

In reply to by भाते

किसन शिंदे Sat, 05/24/2014 - 00:49
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही.
अलीकडे कट्ट्याला टांग देण्यासाठी हे कारण मी हमखास वापरतो. ;) :P

चौकटराजा Wed, 10/22/2014 - 16:42
अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही चक्क चहाचे तीन राउंड ? प्या तीन तीन वेळा चहा ! करा चैन ! होउ दे खर्च !