'पर्समधील गणूचे लॉकेट शाबूत मिळाले' - हरवले ते गवसले का? व कसे? - १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
5 Apr 2014 - 3:24 pm

हरवले ते गवसले का? व कसे?

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.
काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.
--------
१. पर्समधील गणूचे लॉकेट शाबूत मिळाले

मोबाईल वाजायला लागला. विवाहित मुलीचा आहे असे सांगणारे संगीतमय सूर साद द्यायला लागले.
बाबा, पर्स... अन् एकदम मोठ्ठ्यावाहनाच्या हॉर्नचा आवाज येऊन गोंगाटात पुढचे बोल विरून गेले. क्षणभर आजकालच्या प्रतिस्पर्धेच्या निकालाच्यावेळी प्रेक्षकांची उत्सुकता ताणायला व स्पर्धकांच्या ‘दिल की धडकन’ वाढवायला जसा पॉझ टाकतात तसे मनातील प्रेक्षकागारात उभ्या स्पर्धकासारखे मला वाटले.
‘पर्स मिळाली’...तिने तिसऱ्यांना ओरडून सांगितले ... अन हायसे वाटले!
काल ती सांगत होती. तिला बसमधून उतरताना तिकिटासाठी विचारणा केली गेली, तेंव्हा तिने आपल्या जवळच्या मोठ्या पर्समधून छोटी पर्स काढायला हात घातला, पण ती पर्स सापडेना म्हणून शोधाशोध सुरू झाली. ‘बाई तिकीट दाखवा चटकन’ म्हणत, त्वरा करायला भाग पाडत अन्य चेकर लोक जमून तगादा करायला लागले. ‘पर्स मिळत नाहीये. ती कोणी तरी लंपास केलेली दिसतेय. त्यात माझे अन्य महत्वाचे सामान व पैसे आहेत. आत्ता माझ्याजवळ पैसे नाहीत.’
‘ठीक आहे पैसे मागवून घ्या’ म्हणत तिकीट चेकरांनी त्याच्या सोईचा मार्ग दाखवला. तिने तात्काळ आपल्या पतिराजांना फोन करून बँकेच्या कार्डांना ब्लॉक करायला सांगितले अन पैशासाठी आम्हाला कळवले. लगेच तिच्या आईने वाहन काढून जायची तयारी केली. तेवढ्यात 'मी रिक्षाने येतेय.' असा निरोप आला अन आम्ही तिची घरी वाट पहायला लागतो. अपरात्री तिच्या पतिराजांचे ऑफिसमधून आगमन झाले. ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, वगैरे नव्याने काढायला काय काय करावे लागेल आदिची चर्चा रंगली. ‘अशी कशी पर्स हरवलीस तू?’ अशा पेटंट प्रश्नाच्या शाब्दिक आघाताने सुरवात होणारी संभावना आमच्यासमोर त्यांनी चतुरपणे टाळली. याचे कौतुक आम्हा पतिपत्नीला झाले.
‘बरं, आता मी बघते काय करावे लागेल ते. तू ऑफिसात जा.’ असे खमकेपणाने म्हणत, मुलीने पोलिस स्टेशनवर केस लिहायला जायला वाहन चालू केले. काही तासात सही शिक्क्यानिशी दाखला मिळवलेला मी पाहिला अन् मुलीने हवाईदलाच्या तत्परने केलेल्या कारवाईचे समाधान व्यक्त केले.
‘आई आता मी माझ्या घरी जाते व जरा आराम करते’ म्हणून ती निघाली. तेवढ्यात जरा गावठी भाषेत बोलणाऱ्याचा फोन आला की ‘या या ठिकाणी भेटा. मला आपल्याला काही द्यायचे आहे!’
‘काय? कोण बोलतोय?' वगैरे समजून यायच्या आत फोन बंद झाला!
पर्स मिळाली म्हणत आलेल्या फोनवरून मग नंतर जे तिने सांगिलते ते फार अद्भूत होते! तो माणूस म्हणाला, ‘ही पर्स माझ्या मैत्रिणीने काल सहज तिचे कचऱ्याच्या पेटीकडे लक्ष गेल्यामुळे पाहिली व आपल्या ताब्यात घेतली. उघडून पाहिली तर पैसे काही नव्हते पण बरेच अन्य महत्वाचे सामान असल्याचे तिच्या लक्षात आले, म्हणून तिने मित्राला ती पर्स दिली की शोधून काढ त्या व्यक्तीला व दे परत म्हणून. काही काही चुरगाळलेल्या कागदातून एका मोबाईलला फोन लावला. तो होता एका मैत्रिणीचा. तिने आपला नंबर दिला व मी आपल्याला फोन करून बोलावले! पहा आपले सर्व महत्वाचे सामान आहे ना?'
‘हो पहाते’ म्हणत मुलीने पर्स उघडली. हवे ते सर्व मिळाल्याचे पाहून ती म्हणाली, ‘अहो दादा, आपल्यामुळे मला माझी पर्स मिळाली आहे.’ मी मनात म्हणाले, ‘पैसे वा इतर कार्डे गेल्याचे मला इतके वाईट वाटले नाही जितके माझ्या गणूचे एक लॉकेट पर्सच्या एका भागात होते ते गेल्याची हळहळ होती!
'हे घ्या आपल्यासाठी दादा', असे म्हणून तिने काही नोटा पुढे केल्या. ‘नाही नाही, नको’ म्हणून हाताने नकार दिला व म्हणाला, ‘आपण त्या पर्समधला शेवटचा कप्पा पाहिला नाहीत!'
मी घाईत ते राहून गेल्याचे म्हणत ती झीप उघडली. माझ्या गणपतीच्या मुद्रेचे लॉकेट हातात आले! त्याला हळूवार ओठ लावून मी त्या व्यक्तिकडे पहात म्हणाले, ‘थँक्स’!
पण होते कोण समोर? कोणीच नाही! मी इकडे तिकडे पहात एक दोघांना विचारले, ‘आत्ता एक माझ्याशी बोलत होते ते कुठे गेले पाहिलेत का? ‘नाही, आम्ही नाही पाहिले’ आसपास रस्त्यावर रेंगाळणारे म्हणाले.
‘बाबा ते लॉकेट मला मिळाले आणि तुम्हाला फोन केला. पर्स मिळाली, त्या लॉकेटसह म्हणून ’. पर्स सामानासकट परत करणारे लोक आहेत. त्यांच्या सचोटीचा असा अनोखा अनुभव.
पुढे चालू .......

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2014 - 3:41 pm | प्रकाश घाटपांडे

छान कथा. एखादी गोष्ट हरवली कि डोक भंजाळून जाते.हे आपण अनुभवतोच. असो तो माणुस साक्षात गणपती तर नव्हता ना! अशी शंका यावी इतपत कथेचा बाज मस्त घेतला आहे.

माणसे आहेत म्हणायची.

बाबा पाटील's picture

5 Apr 2014 - 8:20 pm | बाबा पाटील

तुम्हाला नक्की काय म्हणाचय्,माणसास चांगली होती का तुमच्या लॉकेटचा प्रभाव.का साक्षात गणरायाच तुम्हाला दर्शन देवुन गेले ? ? ? ? ?

शशिकांत ओक's picture

5 Apr 2014 - 10:55 pm | शशिकांत ओक

की पर्स परत मिळाली...

यसवायजी's picture

6 Apr 2014 - 11:55 pm | यसवायजी

इतकेच??? असं कसं? असं कसं??
@ "पण होते कोण समोर? कोणीच नाही! "
>> नक्कीच काहीतरी विन्टरेष्टीन्ग येणार आहे पुढच्या भागात. :cool:

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 12:03 am | आत्मशून्य

एक कुटकथा म्हणून प्रकार फार वाचायला मिळायचा, अथवा इन्सेप्शन सारख्या चित्रपटांचा शेवटही "कूट" गणला जातो. म्हणजे गोष्ट नक्किच संपलेली असते, सांगण्यासारखे काहीच उरलेले नसते, पण Ambiguity मात्र अजुनही असते...!

हा लेखनप्रकारही तसाच असावा.

वेल्लाभट's picture

5 Apr 2014 - 8:23 pm | वेल्लाभट

:) खूप छान ! अशी माणसं आहेत... आणि चांगल्या माणसांना चांगली माणसं नक्कीच भेटतात....
छान वाटलं वाचून....

शशिकांत ओक's picture

6 Apr 2014 - 1:10 am | शशिकांत ओक

वेल्ला भट,
नुसते मनाने चांगले असून चालत नाही ते वर्तनाने सिद्ध करावे लागते...

जोशी 'ले''s picture

5 Apr 2014 - 10:05 pm | जोशी 'ले'

खरच अशी खुपशी चांगली माणसे आहेत त्या मुळेच जगरहाटी चालु आहे, हि अशी माणसे भेटली कि खात्री पटते
माझ्या मिसेच्या पर्स मधुन अशीच छोटी पर्स ज्यात हजार बाराशे रुपये ,सोसायटीच्या बसचा पास ज्यात काहि फोन नंबर वगेरे नाही व काहि तिच्या द्रुष्टीने महत्वाच्या वस्तु होत्या ती रिक्षा पकडतांना पडली नंतर तब्बल 2 महिन्यां नंतर परत मिळाली .... झाले असे कि पर्स पडतांना एका फर्निचर च्या दुकानातील कारागीराने पाहिली त्याला वाटंल कि येतील त्या पर्स शोधत त्याने ती पर्स त्याच्या मालकाला दिली मालकानं ड्राॅवर मधे ठेउन दिली व विसरुन गेला तिकडे हा कारागीर 2 दिवसां नंतर यु पि ला गावी निघुन गेला ...परत आल्या वर त्याने पर्स बद्दल मालकाला विचारले ...नंतर हा भला मानुस सोसायटी आॅफिस मधे येउन घर नंबर घेउन पर्स देउन गेला. त्याला सगळेच पैसे देउ केले पण त्याने घेतले नाहि,

शशिकांत ओक's picture

5 Apr 2014 - 10:57 pm | शशिकांत ओक

मित्रा, असेच आणखीन कोणी कोणी आपले अनुभव सादर करतील तर वाचायला आवडेल.

पैसा's picture

6 Apr 2014 - 9:56 am | पैसा

आज २ असे छान वाटणारे अनुभव वाचायला मिळाले!

आत्ता नुकता साबांचा फोन आला. जानेवारीत आम्ही सगळे तेथे असताना गडबडीत कचरा (केळाची साले कचर्‍यात न टाकता खाली मोकळ्या जागेत चरणार्‍या म्हैशींना टाकायचा उद्योग करतात त्या) टाकताना यांनी कानातले पण हातात असावे ते फेकुन दिले. काल रात्री त्यांच्या स्वप्नात ते कानातले त्या खालच्या मोकळ्या जागेत असल्याचे दिसले. माताजी सकाळी उठुन गेल्या अन तेथे जाळलेल्या गवतातुन कानातलं घेउन्च वर आल्या. :))
वर आणि सांगताहेत, आता मी कुठलीतरी "अम्मा" व्हायला हरकत नसावी.
ते काहीही असू दे. सापडल ना एकदाच बस. मी स्वतः किती शोधल होतं. कितीदा तो मंत्र म्हंटला होता. काय सांगु? कसल घणघणीत कानातल सोन्याच. मिळाल फार बर वाटलं.

शशिकांत ओक's picture

6 Apr 2014 - 9:59 pm | शशिकांत ओक

कचऱयाच्या डब्यातील किस्सा! येईल नंतर...