मिपा ची सवत!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
2 Feb 2014 - 11:20 am
गाभा: 

मी आणि माझ्यासारखे अनेक लोकं मिपाचे फार पूर्वीपासूनचे सभासद आहेत. मी मिपावर नाही म्हंटलं तरी बर्‍यापैकी लेखनही केलेलं आहे. पण पूर्वीपासून इथे लेखन करण्यातली एक अडचण म्हणजे तुमच्या लेखनात जर फोटो टाकायचे असतील तर ते डायरेक्टली इथे टाकता येत नाहीत. त्यासाठी मग प्रथम फ्लिकरवर जा, तिथे फोटो लोड करा, आणि मग इथे त्या फोटोंची लिंक द्या वगैरे सव्यापसव्य करावं लागतं....
पूर्वी हे सगळं केलंही. पण आता स्वतःच्या ब्लॉगवर किंवा फेसबुकावर सरळ डायरेक्टली आपल्या लॅप्टॉपवरून फोटो अपलोड करता येतात. काम खूप सुटसुटीत होतं.....
तर प्रश्न असा आहे की हे ब्लॉग आणि विशेषतः फेसबुक ही मिपा किंवा इतर तत्सम संस्थळांची सवत ठरतेय का? त्यांच्याकडे अशी काय टेक्नॉलॉजी आहे की जी ही संस्थळं उपयोगात आणू शकत नाहीत? अणि त्याबाबतीत या सर्व संस्थळांनी काही अ‍ॅक्शन घेऊन फेसबुकाच्या बरोबरीला येणं आवश्यक आहे का?
माझा स्वतःचा अनुभव म्हणाल तर गेल्या काही महिन्यात मी फोटो सीरीज असलेले तीन धागे फेसबुकावर टाकले, एक अलास्कावर, एक (पाच अंकी)हवाई बेटांवर, आणि एक एका चॉकोलेट प्रदर्शनावर. त्यात लिहिण्यासारखं फारसं काही नव्हतं, फोटो हेच मुख्य आकर्षण होतं, अ पिक्चर स्पीक्स फॉर अ थावजंड वर्ड्स, म्हणतात तसं...
इथेही ते द्यायची इच्छा तर होती पण खरं सांगतो, त्या इतक्या फोटोंसाठी ते फ्लिकरचं सव्यापसव्य करणं जिवावर आलं...
याला काही उपाय आहे का?
की फेसबुक हे या संस्थळांची सवत होऊन कानामागून तिखट होणार हेच भविष्य आहे?
मी स्वतः काही आयटीवाला नाही पण इथे अनेक आयटी तज्ञ आहेत म्हणून जाहीर विचारतो, मंडळी, यावर काही उपाय सुचतोय का?

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

2 Feb 2014 - 12:23 pm | चौकटराजा

मी पण आय टी वाला नाही त्यामुळे माझा अंदाज तज्ञाचा अंदाज नाही. मला अस वाटते की जाहिरातीच्या लिंकांमुळे फेसबुकाला पावरफूल व मोठी साठवण शक्ती असलेला सर्व्हर परवडत असेल.पण मिपाची गोडी तिथे नाय राव !

मराठीप्रेमी's picture

2 Feb 2014 - 12:53 pm | मराठीप्रेमी

फेसबूक वरूनही फोटोची लिंक देता येते. फेसबूकवर फोटो चढवल्यावर त्यावर राईट क्लिक करून "Copy Image Location" करा आणी ती लिंक इथे द्या. याप्रकारे कोणत्याही फोटोची लिंक देता येते, त्या फोटोच्या प्रायव्हसी सेटिंगमुळे फरक पडत नाही. खालील फोटो फेसबूकवरूनच टाकला आहे.
माझ्या मते या किंवा इतर संस्थळावर फोटो टाकण्याची प्रमुख अडचण म्हणजे हे सगळे साठवून ठेवण्यासाठी लागणार्‍या जागेची किंमत असावी.
a

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2014 - 1:21 pm | पिवळा डांबिस

https://scontent-a-sjc.xx.fbcdn.net/hphotos-prn2/t31/1486002_10201383382...

वर श्री. मराठीप्रेमी यांनी सुचवल्याप्रमाणे प्रयत्न करून बघितला आहे...
आई भवानी पाव!!!

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2014 - 1:27 pm | पिवळा डांबिस

Test

मुक्त विहारि's picture

2 Feb 2014 - 3:46 pm | मुक्त विहारि

जरा व्यवस्थित सांगता का?

(अज्ञानी) मुवि.

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2014 - 1:30 pm | पिवळा डांबिस

श्री. मिसळप्रेमी, अनेक धन्यवाद!!!

प्रशासकांनी श्री. मिसळप्रेमी यानी सांगितलेला मार्ग वाविप्र मध्ये टाकून हा धागा आता उडवल्यास माझी हरकत नाही....

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2014 - 1:32 pm | पिवळा डांबिस

मला श्री मराठीप्रेमी म्हणायचं होतं, माझी दिलगिरी...

मराठीप्रेमी's picture

2 Feb 2014 - 2:06 pm | मराठीप्रेमी

you are welcome.

नंदन's picture

2 Feb 2014 - 1:36 pm | नंदन

हेच लिहायला आलो होतो. मराठीप्रेमींनी टंकनश्रम वाचवले :)

अवांतर - कदाचित, ज्यांचे फेसबुक खाते नाही त्यांना फेसबुकावरून लिंकवलेले फोटो पाहण्यात अडचण येऊ शकते.

मराठीप्रेमी's picture

2 Feb 2014 - 2:07 pm | मराठीप्रेमी

अवांतर - कदाचित, ज्यांचे फेसबुक खाते नाही त्यांना फेसबुकावरून लिंकवलेले फोटो पाहण्यात अडचण येऊ शकते.

नाही येत, फेसबुकवरून लॉगाआऊट करुन बघा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Feb 2014 - 3:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

हापिसात चेपु ब्लॉक असल्या मुळे वरचे फोटो बघता आले नाहित.

सर्वसाक्षी's picture

2 Feb 2014 - 1:44 pm | सर्वसाक्षी

इथे दिलेला मार्ग म्हणजे चेपु चा दुवा. पण म्हणजे आधी चेपु वर चढविणे भाग आहे. समजा जर फोटु चेपुवर नसले आणि इथे द्यायचे असले तर?
जर चेपुवर नसलेले फोटु इथे द्यायचे असले तर 'खेचा आणि डकवा' असा चेपुसारखा काही मार्ग आहे का?

मुक्त विहारि's picture

2 Feb 2014 - 2:00 pm | मुक्त विहारि

पण आता फेसबूकच्या लिंकचा वापर करुन बघतो...

(जाता जाता...पिडा काकांना ह्या निमीत्ताने तरी का होईना, पण एक लेखक म्ह्णून परत एकदा मिपावर बघून मस्त वाटले.

पिडा काकांना नम्र विनंती.आता मिपावर परत लेखनाला तुम्ही सुरुवात केलीच आहे, तर आता थांबू नका.होवु दे शाब्दिक खर्च.)

आदूबाळ's picture

2 Feb 2014 - 2:11 pm | आदूबाळ

पण एक शंका: चेपुच्या या दुव्यावरून हा फटु कोणी अपलोड केलाय हे समजू शकत असेल का?

पिडांकाकांच्या लेखनाबाबत मुविंसारखेच म्हणतो.

मराठीप्रेमी's picture

2 Feb 2014 - 2:28 pm | मराठीप्रेमी

नाही, ही माझ्या फोटो ची लिंक. यातून कुठलीही खाजगी माहिती मिळत नाही.
https://scontent-b-mia.xx.fbcdn.net/hphotos-frc3/t31/258931_101521411240...

आदूबाळ's picture

2 Feb 2014 - 6:30 pm | आदूबाळ

थोडा प्रयत्न करून मिळते. तुम्हाला व्यनि केला आहे.

तर मुद्दा असा - आपलं चेपु प्रोफाईल खाजगी ठेवायचं असेल तर चेपुवरून न लिंकवणे.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2014 - 3:02 pm | बिपिन कार्यकर्ते

पहिल्या पानावर नवीन धागा व लेखक म्हणून पिवळा डांबिस असं बघूनच भरून पावलो! :)

ब्लॉगवरुन फोटो इथं द्यायला अडचण येत नाही. 'फेसबुक'वरुन फोटो इथं कसे द्यावेत हे या धाग्याच्या निमित्ताने कळलं. एक प्रयत्न करुन बघते.
narmadaa

जमलं :-)

मिपा अपग्रेड करताना नीलकांत यांनी मोठा सर्व्हर घेतला आहे. त्यानंतर काही दिवस चित्रे थेट मिपावर अपलोड करायची सुविधा दिली होती. पण आपल्याकडे डाटा प्रचंड प्रमाणात असल्याने मिपाचे पान लोड व्हायला खूपच वेळ लागायला लागला. त्यामुळे परत ती सुविधा बंद केली. सध्या मायबोलीवर थेट फोटो टाकता येतो. पण त्याला आकाराची लिमिट आहे. खूपच लहान साईजचे फोटो तिथे टाकावे लागतात.

पिडां, आता येऊ द्या तुमच्या भटकंतीचे फोटो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2014 - 6:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

आतापर्यंत "फोटो दिसत नाही" ही मिपावरची समस्या गुगलफोटो संदर्भात एकदाही आढळली नाही. अर्थात फोटो साठवायला कोणते संस्थळ वापरावे हा प्रत्येकाचा स्वतंत्र निर्णय आहे. मात्र मिपावर टाकलेले फोटो सगळ्यांना दिसावे यासाठी सद्यातरी गुगलफोटो हे सर्वोत्तम संस्थळ आहे. तेथे जवळजवळ अनिर्बंध संख्येने (माझे स्वतःचे आतापर्यंत ३२ जीबी), वेगवेगळ्या नावाच्या फोल्डर्समध्ये वर्गवारी करून फोटो ठेवता येतात. आपल्याला हवे तसे एका किंवा अनेक व्यक्तीला / गृपला प्रवेश खुला / बंद करता येतो. मिपावर टाकलेले सर्व फोटो कोणत्याही समस्येशिवाय सगळ्यांना नीट दिसतात असा अनुभव आहे.

मुख्य म्हणजे चकटफू असलेल्या या संस्थळावरच्या फोटो ठेवण्याच्या जागेचे आकारमान सेकंदागणीक वाढत राहते.

गिरकी's picture

3 Feb 2014 - 2:48 pm | गिरकी

गूगलफोटो या संस्थळाचा दुवा द्याल का?
मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मला गूगल+, गूगल ड्राइव्ह आणि पिकासा याचेच दुवे मिळाले. त्यान्ची स्टोरेज जास्तीत जास्त १५ जीबी आहे अशी माहिती मिळाली.

-जयंती

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2014 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

जीमेल उघडल्यावर वर उजव्या बाजूला तुमचे नाव व घंटेच्या चित्र (अनरेड नोटीफिकेशन्स) यांच्यामध्ये नऊ ठिपक्यांचा आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून खाली दिसणार्‍या खिडकीत स्क्रोल केल्यास सगळ्यात शेवटी फोटोचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा...

तेथेच गुगलफोटो, युट्युबसारखी अजून १५+ अ‍ॅप्सही आहेत.

गुगल+ मध्येही वरील पर्याय दिसतो.

गिरकी's picture

3 Feb 2014 - 3:38 pm | गिरकी

धन्यवाद !! :)

विकास's picture

2 Feb 2014 - 7:07 pm | विकास

उत्तरायण चालू झालेले दिसते. :)

पैसाताईंनी म्हणल्याप्रमाणे जर येथे अपलोडकरायचे ठरवले तर ते आत्ता अथवा नंतर अधिक जाचक ठरू शकते.

फ्लिकर ची फिकर करू नका. :) मराठीप्रेमी-अतिवास यांच्या प्रतिसादात आल्याप्रमाणे तुमच्या ब्लॉगवरून अथवा फेसबुकवरून येथे फोटो चिकटवू शकता. फ्लिकर ऐवजी तुम्ही इतरत्र कुठेही फोटो साठवत असाल (उदा. गुगलप्लस, त्याआधीचे पिकासावेब-गुगल, याहू, मायक्रोसॉफ्ट, ड्रॉपबॉक्स पिक्चर डिरेक्टरी वगैरे) तर तेथून देखील असाच व्यक्तीगत छायाचित्राचा दुवा वापरून असेच करू शकाल.

जयंत कुलकर्णी's picture

3 Feb 2014 - 10:41 am | जयंत कुलकर्णी

पैसा's picture

3 Feb 2014 - 11:08 am | पैसा

"इन्सर्ट/एडिट इमेज" हा ऑप्शन वापरावाच लागतो. फक्त थेट फेसबुकवरच्या किंवा गुगलवरच्या फोटोंची लिंक वापरता येते. त्यासाठी फ्लिकर किंवा गुगल प्लस्/पिकासावर जायची गरज नाही.

ऋषिकेश's picture

3 Feb 2014 - 10:46 am | ऋषिकेश

छ्या!
धाग्याचं शीर्षक आणि लेखक वाचुन आनंदीत होऊन कित्ती कित्ती अपेक्षा केल्या होत्या. ;)

असो. लिहिते झालाच आहात तर येऊ दे काही!

नमस्कार

मला माझ्या फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते या धाग्यात मराठी विकिपीडियातील https://mr.wikipedia.org/wiki/चित्र:लेखन_चक्र.png हे चित्र चढवून डकवायचे होते.पण ऐनवेळी जमू शकले नाही तर विकिपीडिया आणि https://commons.wikimedia.org/ येथील चित्रे कशी दाखवावीत हे समजल्यास लेख लिहिणे सोपे होईल.

धन्यवाद

पैसा's picture

3 Feb 2014 - 11:19 am | पैसा

http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यात दिलेल्या पद्धतीने कोणत्याही वेबसाईटवरचे चित्र मिपावर चिकटवता येते. विकिमिडियावर असलेले चित्र तिथे ओपन करायचे आणि उजवी क्लिक करून "कॉपी इमेज युआरएल" ऑप्शन सिलेक्ट करायचा. बाकी पद्धत या उल्लेख केलेल्या गणपाच्या धाग्यात दिलेल्याप्रमाणेच.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 11:25 am | माहितगार

abc

खूप खूप धन्यवाद

नावातकायआहे's picture

3 Feb 2014 - 11:07 pm | नावातकायआहे

`

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2014 - 11:28 pm | पिवळा डांबिस

एक प्रश्न, त्याला एक उत्तर आणि ३१ प्रतिसाद!!!
च्यामारी, काय मेंबरं हाईत का मस्करी!!! :) ह. घ्या...

आता आमचा अनुभवः
श्री मराठीप्रेमी यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही फेबु वरच्या चित्रावर [सॉरी, सॉरी फोटोवर! उगाच कुणाला तरी ठसका लागायला नको!! ;) ] राईट क्लिक केलं. मग ती लिंक कॉपी करून मिपावर फोटोचा आयकॉन उघडून त्यात युआरएल च्या जागी पेस्ट केली. फोटो साईझ अ‍ॅडजेस्ट केली आणि पब्लिश केलं. अजूनही कुणाला जर अडचण येत असेल तर हे करुन पहा...

बाकी, ऋषिकेश, मुक्तविहारी, आदूबाळ, जुनी वळख ठेवल्याबद्दल धन्यवाद.
आणि खोडसाळपणाबद्दल कार्यकर्तेसायबांना ठेंगा!!

पण आपल्याकडे डाटा प्रचंड प्रमाणात असल्याने मिपाचे पान लोड व्हायला खूपच वेळ लागायला लागला.

काय सांगतेस ज्योताय? फेबुपेक्षा जास्त? :)
नाय म्हंजे आमी आयटी-अडानी आसलो म्हनून काय अगदीच ठाकुर्लीच्या बाजारात कोतमिरी इकत नाय हां!!! :)
असो. कारण काहीही असो. सहजपणे फोटो टाकण्याची सुविधा असणं हे महत्वाचं. फेबुच्या कोंबड्यानेका होईना उजाडल्याशी कारण, काय? :)

असो. तरी सर्व सदस्यांचे मदतीबद्दल अनेक आभार...

पैसा's picture

3 Feb 2014 - 11:46 pm | पैसा

काय सांगतेस ज्योताय? फेबुपेक्षा जास्त?

फेसबुक कुठे आणि आम्ही कुठे! त्यांचे सर्व्हर्स काय कपेसिटीचे आहेत ते नीलकांतच सांगू शकेल. पण असं झालं होतं खरंच. एरवीही मोठीमोठी चित्रे असलेली पाने लोड व्हायला वेळ लागतोच बघा. त्यातून मिपावर माबोसारखी चित्राच्या साईजसाठी लिमिट ठेवली नव्हती. (मला वाटतं, मायबोलीवर जुन्या धाग्यांची आर्काईव्ह आहे. तिथे सगळेच धागे अ‍ॅक्टिव्ह नाहीत. त्यामुळे मायबोलीला हा प्रश्न येत नसावा.) आणि नेमका त्याचवेळी स्पॅमर्सचाही हल्ला सुरू होता. त्यामुळे सावधगिरी म्हणून ती सोय नीलकांतने परत बंद केली.

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 2:08 am | पिवळा डांबिस

नो वरीज.
आता फेबुवरून इथे फोटो द्यायची सोय समजलीय, तेंव्हा भविष्यात तसं करता येईल...

बहुगुणी's picture

5 Feb 2014 - 1:24 am | बहुगुणी

एक प्रश्न, त्याला एक उत्तर आणि ३१ प्रतिसाद!!!
ती सगळी तुमची पुण्याई आहे, महाराज :-) या सगळ्या उत्साहाचं कारण म्हणजे प्रश्न विचारणार्‍याचं नाव आहे ...बस नाम ही काफी है! :-) (आता आणखी लिहिते व्हा पाहू!)

खटपट्या's picture

4 Feb 2014 - 9:39 am | खटपट्या

test

खटपट्या's picture

4 Feb 2014 - 9:41 am | खटपट्या

अगागा लय मोठ झालं. नॉर्मल साईझ किती बाय किती द्यायची

विकास's picture

4 Feb 2014 - 9:45 am | विकास

500x300 करून बघा...

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 11:12 am | पिवळा डांबिस

हां, आता जरासं हंबल वाटतंय...
मघाशी पहिलं ते अगदीच अजित पवारांवाणी वाटत होतं!!!!
:)

खटपट्या's picture

4 Feb 2014 - 11:32 am | खटपट्या

*biggrin* :-D :D +D =D :biggrin:

प्यारे१'s picture

4 Feb 2014 - 1:04 pm | प्यारे१

___/\___

भारीच्च! याठिकानी हम्बलण्याचा जो प्रयत्न श्री. खटपट्या ह्यांनी केला आहे त्या बद्दल याठिकानी आम्ही त्यांचे अभिनंदन करत आहोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Feb 2014 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

फक्त रूंदी टाका. उंचीची जागा रिकामी ठेवल्यास योग्य उंची आपोपाप निवडली जाते आणि चित्र डिस्टॉर्ट होत नाही.

फेसबुक हे या संस्थळांची सवत होऊन कानामागून तिखट होणार हेच भविष्य आहे?
अशी शक्यता अजिबात वाटत नाही.उलट फेसबुकच्या भविष्याबाबतीत नक्कीच चिंता वाटते ! ;)
'फेसबुक' तुमचा एसएमएसही वाचते
मी फेसबुक वापरत नाही याचं मला समाधान आहे. ;)

नीलकांत's picture

4 Feb 2014 - 2:23 pm | नीलकांत

मिपावर सरळ सरळ फोटो चढवता येतील. मात्र त्याने मिपाचा स्टोरेज जास्त वाढेल आणि भविष्यात जर का नवीन सर्व्हर घ्यावा म्हटला तर मग खुप अडचणीचे होईल असे वाटते किंवा सध्याचा स्टोरेज लवकर संपेल असेही वाटते.

मात्र ही सेवा द्यावी असा विचार आहे. असे करताना फोटोचा आकार एका मर्यादेपर्यंत ठेवता येईल असे बंधन घालता येईल. मात्र अनेकांना आकार कमी करता आला नाही तर ते शक्य होणार नाही. त्यासाठीसुध्दा सर्व्हरवर एक प्रोग्राम टाकता येईल जो फोटो प्रोसेस करून इमेज साईज व क्वालीटी मध्यम आकारात आणेल. मी या विचाराने काही चाचण्या घेऊन बघतो. पण यामुळे सर्व्हरची जागा जास्त व्यापली जाईल.

असे करायचे की नाही यासाठी अन्य सदस्यांना काय वाटते ते माहिती होणे आवश्यक आहे. सर्वांनी यावर आपले मत नक्की द्या.

थेट मिपावर फोटो चढवता आले तर हवे आहे की अन्य कुठल्याही संस्थळावर चढवून येथे दूवा देणे चालेल?

बाकी पिडा काकांना परत लिहीतं झालेलं बघून आनंद झाला. मागे जून जुलैच्या काळातील डाऊनटाईम मुळे त्यांना त्रास झाला याची कल्पना आहे.
- नीलकांत

विकास's picture

4 Feb 2014 - 7:50 pm | विकास

मिपा हे खर्‍या अर्थाने स्वेच्छेने आणि उत्साहाने चालणारे संस्थळ आहे. त्याचा तांत्रिक भार किती घ्यावा याला काही मर्यादा असल्या तर काही हरकत नाही असे वाटते. सध्या आपण स्वतः जे फोटो काढतो त्या साठी अनेक ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. पिडांप्रमाणेच मला देखील फ्लिकर तितकेसे भावलेले नाही. पण गुगल पिकासा चांगले आहे. तसेच अगदी गुगल नको असेल तर फेसबुक, ड्रॉपबॉक्स ची पब्लीक पिक्चर गॅलरी वगैरे पर्याय पण असू शकतात. त्या व्यतिरीक्त उदाहरणार्थ, पिडा जसे त्यांचा ब्लॉग ठेवतात, तसा ब्लॉग असला, तर तेथून देखील प्रकाशचित्रे वर चर्चिलेल्या पद्धतीने चिकटवता येऊ शकतात...

थोडक्यात जर सर्वर लोड अथवा अन्य कारणाने ट्रबलशुटींग करताना, ज्याचे नीलकांत आणि त्याच्या तांत्रिक टीमला प्रेशर येऊ शकेल असे काम वाढवायची गरज वाटत नाही.

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 10:51 pm | पिवळा डांबिस

जर खर्च किंवा तुझं सव्यापसव्य वाढणार असेल तर मिपाचं स्टोरेज वगैरे वाढवण्याचा उपक्रम नको. आम्हाला फक्त फ्लिकरविना जगण्याची सोय हवी होती. आता हे कळलंय की ब्लॉग/फेबुवरून इथे फोटो चढवता येतात, तेंव्हा तो मार्ग चालेल. कुठूनही सोय असणं आणि ती सभासदांना माहिती असणं महत्वाचं...

बाकी पिडा काकांना परत लिहीतं झालेलं बघून आनंद झाला. मागे जून जुलैच्या काळातील डाऊनटाईम मुळे त्यांना त्रास झाला याची कल्पना आहे.

त्रास असं नाही, पण म्हातारपणामुळे किरकिर वाढतेय हे खरं! :)
त्याचं काय आहे की मिपा हे आता दैनंदिन कार्यक्रमाचा इतका अविभाज्य भाग झालेलं आहे की एके दिवशी जर ते डाऊन असेल तर थोडी वैतागवाडी होते इतकंच! तुम्ही लोकं मिपा सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेक परिश्रम घेताय याची कल्पना आहे. पण आमचं प्रेम हे तिच्यायला असंच!!! :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Feb 2014 - 7:26 pm | निनाद मुक्काम प...

आपण पूर्वापार चेपूवरून फोटो येथे टाकायचो. त्यामुळे डायरेक्ट फोटो टाकता येत नाही हेच माहिती नव्हते.
मात्र माझ्या जुन्या लेखांचे फोटो आता दिसत नाही , ते परत दिसण्याची सोय झाली तर खूप बरे होतील.
माझ्या प्रवासवर्णनात माझे लिहिण्याचं कौशल्य मर्यादित असल्याने फोटो नेहमीच उरली सुरली कसर भरून काढत.

विनायक प्रभू's picture

4 Feb 2014 - 9:41 pm | विनायक प्रभू

मला वाटले..........
असो

विनायक प्रभू's picture

4 Feb 2014 - 9:41 pm | विनायक प्रभू

मला वाटले..........
असो

आशु जोग's picture

5 Feb 2014 - 9:33 am | आशु जोग

फोटो इथे स्टोअर करत नाही हे उत्तमच आहे, त्याने काहीच बिघडले नाही
जोवर इतरांच्या घरट्यात अंडी घालण्याची सोय आहे तोवर मिसळीने अकारण जागा खर्च करत बसू नये

एक करता येइल
फोटो टाकताना डायरेक्ट पिकासा किंवा चेपुवर जातील असे पहावे

म्हणजे
१. आधी पिकासावर जा फोटो अपलोड करा
२. मग लिन्क मिसळीवर द्या...
हे एकाच स्टेपमधे झाले तर पहा

बाकी तुलना म्हणाल तर चेपु मिसळीशी बरोबरी करू शकत नाही, त्याला अनेक लिमिटेशन्स आहेत
सध्या तर चेपुला भयानक आजार झाले आहेत...

मिसळीइतके ते युजर फ्रेंडली नाही, पूर्ण स्क्रीनही चेपु वापरीत नाही. डावी उजवीकडची जागा चेपु वाया घालवते... बाकीही अनेक गोष्टी...

मिसळ टेक्निकली उत्तम आहे तसेच इथल्या प्रतिसादकांनीही तिला खूप श्रीमंत केले आहे

जयंत कुलकर्णी's picture

5 Feb 2014 - 1:59 pm | जयंत कुलकर्णी

महापरिनिर्वाण...........

mahaparinirvan

पैसा's picture

5 Feb 2014 - 5:24 pm | पैसा

फोटोची लिंक आल्बम मधून डायरेक्ट घेऊ नका. फोटो गुगलवर ओपन करा आणि मग तिथून फोटोची लिंक घ्या. नाहीतर लोक थेट आल्बमपर्यंत पोचतात.