मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा ची सवत!

पिवळा डांबिस · · काथ्याकूट
मी आणि माझ्यासारखे अनेक लोकं मिपाचे फार पूर्वीपासूनचे सभासद आहेत. मी मिपावर नाही म्हंटलं तरी बर्‍यापैकी लेखनही केलेलं आहे. पण पूर्वीपासून इथे लेखन करण्यातली एक अडचण म्हणजे तुमच्या लेखनात जर फोटो टाकायचे असतील तर ते डायरेक्टली इथे टाकता येत नाहीत. त्यासाठी मग प्रथम फ्लिकरवर जा, तिथे फोटो लोड करा, आणि मग इथे त्या फोटोंची लिंक द्या वगैरे सव्यापसव्य करावं लागतं.... पूर्वी हे सगळं केलंही. पण आता स्वतःच्या ब्लॉगवर किंवा फेसबुकावर सरळ डायरेक्टली आपल्या लॅप्टॉपवरून फोटो अपलोड करता येतात. काम खूप सुटसुटीत होतं..... तर प्रश्न असा आहे की हे ब्लॉग आणि विशेषतः फेसबुक ही मिपा किंवा इतर तत्सम संस्थळांची सवत ठरतेय का? त्यांच्याकडे अशी काय टेक्नॉलॉजी आहे की जी ही संस्थळं उपयोगात आणू शकत नाहीत? अणि त्याबाबतीत या सर्व संस्थळांनी काही अ‍ॅक्शन घेऊन फेसबुकाच्या बरोबरीला येणं आवश्यक आहे का? माझा स्वतःचा अनुभव म्हणाल तर गेल्या काही महिन्यात मी फोटो सीरीज असलेले तीन धागे फेसबुकावर टाकले, एक अलास्कावर, एक (पाच अंकी)हवाई बेटांवर, आणि एक एका चॉकोलेट प्रदर्शनावर. त्यात लिहिण्यासारखं फारसं काही नव्हतं, फोटो हेच मुख्य आकर्षण होतं, अ पिक्चर स्पीक्स फॉर अ थावजंड वर्ड्स, म्हणतात तसं... इथेही ते द्यायची इच्छा तर होती पण खरं सांगतो, त्या इतक्या फोटोंसाठी ते फ्लिकरचं सव्यापसव्य करणं जिवावर आलं... याला काही उपाय आहे का? की फेसबुक हे या संस्थळांची सवत होऊन कानामागून तिखट होणार हेच भविष्य आहे? मी स्वतः काही आयटीवाला नाही पण इथे अनेक आयटी तज्ञ आहेत म्हणून जाहीर विचारतो, मंडळी, यावर काही उपाय सुचतोय का?

वाचन 11963 प्रतिक्रिया 0