भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल

यसवायजी's picture
यसवायजी in भटकंती
25 Dec 2013 - 2:31 am

--------------------------------------------------------------------------
भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
भ्रमण जर्मनी.. ०४ - कलोन
--------------------------------------------------------------------------

बेंगाली बाबू फक्त दोन आठवड्यासाठी आला होता. त्यामुळे आमच्या टोळीतला सर्वाधीक रसीक (रंगेल?) भिडू परतीच्या वाटेवर होता. हो..रसीकच! कारण वय वर्ष ४०+ आणी आम्हा जवानाना लाजवतील असे चाळे असायचे.(काही किस्से आधी लिहिले आहेतच). त्याला चक्क मराठी लावण्यापण आवडायच्या. 'लागली कुणाची उचकी' ही त्याची फेवरेट होती. मग एकदा त्याला 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' ऐकायला दिली. गर्भीत अर्थ सुद्धा सांगितला आणी म्हटलं, " घे.. खास तुझ्यासाठीच आहे" ;)
पण बाबा बेंगालींची एक शिकवण आवडली. आपण ताजमहालाचा फोटो का काढतो? तर म्हणे सौंदर्य!!
त्याचं तत्वज्ञान आपल्या संदीप खरेसारखं होतं.
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर.. मज अब्रूचे थिटे बहाणे- नामंजूर.. :)

पहिल्या विकांताला म्युनिक आणी साल्झबर्ग ह्या अनुक्रमे जर्मनी व ऑस्ट्रियातील सुंदर शहरांना भेटी दिल्या. त्या शहरांचा हवाहवासा वाटणारा गोंगाट, कार्स, बाइक्स, इमारती,मोठे रस्ते, अन ती जीवनपद्धती थोडीफार अनुभवल्यावर म्हटलं की आता 'चेन्ज मंगता है'. जरा शांत, निवांत, नयनरम्य, निसर्गरम्य अशा नॉयश्वानस्टाईन कॅसल (Neuschwanstein Castle) ला जायला सगळेच बाय डिफॉल्ट सहमत होते.

नॉयश्वानस्टाईन कॅसल- Neuschwanstein Castle

पुन्हा एकदा विकेंड पास काढला. पहाटे ४.१५ ची ट्रेन होती. हॉटेलमधुन चालतच Hauftbahnhauf (स्टेशन) ला जायचे ठरवले. रात्री-अपरात्री नविन शहरात फिरायची भिती वाटत नव्हती. रस्त्यात कुत्री नव्हती. बर्‍याच हॉटेलांबाहेर मुलं-मुली अगदी टाईट होउन वाईट अवस्थेत पडली होती. त्यांच्या बाजुला सिगरेट्ची थोटकं आणी बर्गर पडले होते. असो.
न्युरेम्बर्ग ते फ्युसन जवळपास ३२० किमी चा प्रवास होता. फ्युसन (Fussen) पासुन Hohenschwangau १० किमी. म्हणजे एका दिवसात जवळपास ७०० किमी प्रवास आणी थोडेफार चालणे होणार होते. पण हे सगळं हेक्टीक होणार नाही याची खात्री होती. थॅन्क्स टू DB-Bahn. (जर्मन रेल्वेला डॉएच्च बान म्हणतात)
वाटेत म्युनीकला ट्रेन बदलायची होती. न्याहारीचा उत्तम पर्याय होता- McD. स्वस्तात मस्त.. २ युरोत १ बर्गर आणी १ कॉफी मिळायची.
फ्युसन ते Hohenschwangau या खेड्याला जायला बस मिळतात. कॅसल याच खेड्यात आहे. आम्ही पोहोचलो तेंव्हा रिमझीम पाउस पडत होता. छत्र्या घेऊन फिरणार्‍या लोकांचा थोडा रागच येत होता.
१. इंट्रो म्हणुन एक फोटो बघुन घ्या.

P1010725

प्रत्येक ठिकाणी प्रवासी मदत केंद्र असतात. (त्यांना इंग्रजी येतं).काही चुकायचा प्रश्नच नाही. मोफत माहिती व नकाशे घेतले.
Hohenschwangau गावातल्या दोन टेकड्यांवर नॉयश्वानस्टाईन आणी Hohenschwangau असे दोन कॅसल आहेत. दुसर्‍या लुडवीग राजाने १८८६ साली नॉयश्वानस्टाईन कॅसल बांधला. या स्थळाला Fairytale Destinations म्हणतात.
जगातला सर्वात सुंदर समजला जाणारा हा कॅसल उंचीवर असल्याने दुरुनच नजरेत भरतो. आजुबाजुची झाडी आणी त्यात हा चमत्कार.

२. नॉयश्वानस्टाईनच्या टेकडीवरुन दिसणारे Hohenschwangau खेडं. या फोटोत जो दिसतोय तो आहे Hohenschwangau कॅसल आहे. आणी एका सुंदर तलावाचं (Swan lake) दर्शन पण घडतंय.
(माफ करा. थोडे उलट-सुलट क्रमाने फोटो दाखवतोय. पण तशी गरज वाटली)

DSC05782

३. Hohenschwangau कॅसल म्हणजेच High Swan County Palace. असं नाव पडण्याचं कारण म्हणजे या दोन्ही कॅसल्स मधे असणारे हंस. म्हणजे सजीव हंस नव्हे, पण चित्रात, छोट्या प्रतिकृती, अगदी दरवाजच्या हॅन्डलवर सुद्धा हंस आहेत. बवेरीयाचा राजा दुसरा मॅक्सीमिलीयन याने हा कॅसल बांधला. खरंतर एका जुन्या कॅसलला परत बांधले. या राजाचा मुलगा म्हणजेच दुसरा लुडवीग. हे कुटुंब Hohenschwangau कॅसलमधेच रहायचं. १८६४ मध्ये मॅक्सीमिलीयनचा मृत्यु झाल्यावर दुसरा लुडवीग राजा झाला.

DSC05780

DSC05749

४. हा कॅसल पहायला टेकडीवर गेलो. याच्या आपल्या बाजुला बरीच चित्रे आहेत. विशेषतः युद्धाची. लुडवीगला एक शुर्-वीर योद्धा करायचे मॅक्सीमिलीयनचे स्वप्न होते. पण झाले काही वेगळेच. लुडवीगला यापेक्षा जास्त संगीत,कला, वाचन आणी काव्य याची आवड होती. त्याचमुळे त्याला फेअरी टेल किंग म्हणतात.
'रोमॅन्टीक रोडवरच्या वॉकवाली जर्मनी' ती हीच.

Hohenschwangau कॅसलच्या आतले फोटो.

DSC05755

DSC05760

५. कुठल्यातरी आडवाटेने उतरत असताना Swan lake चा एक अतीसुंदर देखावा पहावयास मिळाला.
इथले पाणी अगदी स्थीर वाटत होते. कसलाही आवाज नाही. सगळं कसं शांत.. शांत..

इतकं सुंदर हिरवंगार दृष्य होतं.. नजरेत आणी कॅमेर्‍यात फक्त भरुन घेतलं..

DSC05766

DSC05775

P1010710

रच्याकने, हे अगदी पर्फेक्ट हनिमून डेस्टीनेशन वाटतय की नाही? (लग्नानंतर) इकडेच जायचा विचार आहे.. इच्छुक कॅन्डीडेट्सनी व्यनीतुन संपर्क करावा. (नियम व अटी लागू) ;)

६. ही वाट दूर जाते.. स्वप्नामधील गावा..

DSC05781

DSC05772

DSC05743

इथल्या तलावाच्या काठाला बसुन थोडं खाउन घेतलं. निवांत चार गाणी ऐकली.. मग पुढचा कॅसल बघायला तय्यार..

७. इथल्या जंगलातुन फिरताना, इथला धबधबा पाहताना, त्याच्या पुलावरुन जाताना छोट्या लुडवीगला नेहमी वाटायचं की इथे एक घर बांधायचंय, की ज्यासारखं जगात दुसरं घर कुठेच नसेल. आणी त्याने ते याच आल्प्सच्या भागात बांधलं. त्याला नाव दिलं New Hohenschwangau castle. (इंग्रजी- New Swanstone Castle). लुडवीगच्या मृत्युनंतर याला नॉयश्वानस्टाईन म्हणु लागले. याचं बांधकाम युद्धाच्या दृष्टीने केलं गेलं नाही. मित्र आणी संगीतकार रिचर्ड वॅग्नर याला एकांतात राहण्यासाठी हे बांधण्यात आलं. १९६९ ला बांधकाम सुरु झालं, पण पुर्ण व्हायच्या आत लुडवीगचा संशयास्पदरित्या मृत्यु झाला. (दुसर्‍या मजल्यावरचं काम अर्धवट राहिलय. त्यामुळे सध्या इथे एक हॉटेल चालवतात)

प्रवेशव्दार- फोटो पाहिल्यावर लक्षात येइल की, सुरक्षेपेक्षा सौंदर्यावर जास्त भर दिला गेलाय.

DSC05789

कॅसलच्या आतले फोटो काढण्यास मनाई असल्याने...

DSC05790

८. लुडवीगने स्वखर्चाने बांधलेल्या या कॅसलवर खूप पैसा खर्च केला होता. या कॅसलने इतकं वेड लावलंय की, जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल म्हणुन हा प्रसिद्ध आहे. Sleeping Beauty Castle of Disneyland चं मॉडेल यावरुनच तयार झालंय. वर्षाला १३ लाख तर उन्हाळ्यात रोज ६००० लोक भेट देतात. इतक्या गर्दीला मॅनेज करण्यासाठी फक्त ४० मिनीटाची 'गाइडेड टूर' हा एकच पर्याय आहे. जर्मन, इंग्रजी, फ्रेंच भाषांचा पर्याय आहे. त्यामुळे
१४ युरोचं तिकीट काढावं लागतं.
तिन मजली इमारत पाहिली. १८८० च्या काळात सुद्धा त्यावेळेच्या सगळ्या सुखसोई इथे होत्या.टॉयलेटमधे फ्लश सिस्टीम, गरम आणी थंड पाण्याची व्यवस्था, बॅटरीवर चालणारी बेल, एवढेच नव्हे तर टेलीफोन लाईन सुद्धा. हे सगळं आत पहावयास मिळतं. लुडविगची रसिकता सुद्धा जागोजागी दिसते.

(धुकं जास्त होतं त्यामुळे हा थोडा एडीट केलाय.)

P1010726

आतले फोटो नाहीत त्यामुळे तो राजेशाही थाट इथे दिसणार नाही. पण विकीवरचा एक फोटो देतोय.. यात Swan दिसतोय. इतर माहिती व फोटो इथे पाहता येतील.

swan
---------------
|| SYG ||
---------------

प्रतिक्रिया

ते कॅमेर्‍यात भरून घेतलेलं घर / रिसॉर्ट / स्पीडबोटचा धक्का जबरदस्त आहे!

कॅमेरा कोणता हो..?

चौकटराजा's picture

25 Dec 2013 - 4:17 am | चौकटराजा

हा वाडा पाहण्याचे स्वप्न मनांत बाळगून आहे. म्युनिक पासून हे काहीसे जवळ आहे ना ? बाकी १४ युरो जरी असले तरी चीज लाजबाब आहे. हनिमून साठी साठीच्या वरची लोकं चालतील का ?
एकूणात फोटू देखील मस्त आलेयत.

सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर.. मज अब्रूचे थिटे बहाणे- नामंजूर.. +१
यसवायजी मस्त प्रवास

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Dec 2013 - 11:13 am | llपुण्याचे पेशवेll

वाचतोय वाचतोय.

फोटो आणि लिखाण दोन्ही आवडले.

दिपक.कुवेत's picture

25 Dec 2013 - 1:16 pm | दिपक.कुवेत

६ नं आणि त्या पुढचे दोन हे तर खुपच आवडले.

यसवायजी's picture

25 Dec 2013 - 3:15 pm | यसवायजी

@ मोदक - तुम्ही म्हणताय तो फोटो सोनीच्या DSCW620 वर काढलाय. १-२ फोटो मित्रांच्या कॅमेर्‍यातले आहेत. पण ते सुद्धा बेसिक मॉडेल होते.
@ चौराकाका - १४ युरो फक्त माहिती असावी म्हणून लिहिलय. बाकी पैसा तर वसूल होतोच.
आणी हनीमूनला वयाचे बंधन कशाला पाहिजे म्हण्तो मी. चंद्र जर '18 till I die' असेल आणी 'मधू' जर राजी़ असेल, झालं तर मग. होउ दे खर्च. :)

@ तथास्तु, पुपे, यशोधरा,दिपक - धन्यावाद

सुधीर कांदळकर's picture

26 Dec 2013 - 8:11 am | सुधीर कांदळकर

मस्त, सुंदर निसर्गापुढे किल्ला फिका वाटला. स्वप्नातल्या गावाला जाणारी वाट पण लोभस. चित्र क्र. २, ७ आणि १२ जास्त आवडली.

मस्त. पुभाप्र
धन्यवाद

चित्रगुप्त's picture

26 Dec 2013 - 8:46 am | चित्रगुप्त

बापरे, काय त्या एकेक जागा, आणि काय त्यांचे फोटो. कहर.

चित्रगुप्त's picture

26 Dec 2013 - 8:52 am | चित्रगुप्त

'नवअश्वस्थान' प्रासाद की 'नवश्वानस्थान' प्रासाद? कळेना.

चौकटराजा's picture

26 Dec 2013 - 3:33 pm | चौकटराजा

राजाच्या ईमानदार अशा नउ श्वानांचे निवासस्थान स्वान लेकाच्या सानिध्यात असावे अशी राजाची मनिषा होती. त्याचा हा परिणाम आहे.

यसवायजी's picture

26 Dec 2013 - 11:30 pm | यसवायजी

आता ही मनिषा कोण?

चौकटराजा's picture

27 Dec 2013 - 9:26 am | चौकटराजा

जर्मन भाषेत मनातल्या इच्छेला मनिषा म्हणतात !( निदान मी तरी असे जर्मन शिकलो आहे.)

कुठली बॅच? आम्च्या गुर्जींनी सांगितलव्हतं की तीला आकांक्षा म्हणतात. ;)
असतील.. जुळ्या भनी असतील..

पियुशा's picture

26 Dec 2013 - 1:31 pm | पियुशा

जियो यसवायजी जियो , फोटो अशक्य सुंदर आहेत :)
नशिबवान आहात ,इतकी छान, डोळ्यांची पारणे फिटणारे सॉंदर्य (निसर्ग ;) ) पहायला मिळणार्या लोकांचा हेवा वाटतो मला ( आमच्या भाग्यात असा योग आहे की नै देवाला म्हैत )

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Dec 2013 - 1:52 pm | लॉरी टांगटूंगकर

सहीच़ बे!!

युगन्धरा@मिसलपाव's picture

26 Dec 2013 - 2:18 pm | युगन्धरा@मिसलपाव

सही...... अती सुंदर.........
महालांचे फोटोज परी कथेतल्या महालांसारखे भासत आहेत.......आणि त्यात धुकं म्हट्ल्यावर तर फॅण्ट्सी स्टोरी वाचल्यासारखं वाटत आहे.
भरपुर फोटोज काढा आणि पाठवा...........

यसवायजी's picture

26 Dec 2013 - 4:39 pm | यसवायजी

हे घ्या..

DSC05778

P1010733

P1010704

IMG_4288

DSC05774

DSC05737

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Dec 2013 - 9:05 pm | लॉरी टांगटूंगकर

दुसरा, तिसरा फोटो अशक्य आवडले आहेत. अन् वॉलपेपर साठी डाऊनलोडवले गेले आहेत.

आत्यंतिक सुंदर! बेष्ट. फोटोज अगदी वॉलपेपर्/फ्रेम करुन लावण्याइतपत सुंदर आले आहेत.

मृत्युन्जय's picture

26 Dec 2013 - 2:42 pm | मृत्युन्जय

वरुन सातव्या फोटोसाठी पैसे वसूल झाले तुमचे. बाकी सगळा बोनस होता असे म्हणेन.

सुधीर कांदळकर's picture

26 Dec 2013 - 7:18 pm | सुधीर कांदळकर

आवडली. पहिले तर लाजबाब.

खेडूत's picture

26 Dec 2013 - 8:04 pm | खेडूत

फार वर्षांपूर्वी (१९९६) तिथे गेलो होतो, सगळे अगदी तस्सेच आहे हे बघून आनंद वाटला!
त्या वेळी ३ डॉईच मार्क्स (७० रु.) इतकेच तिकीट होते.
तो दुसऱ्या फोटू मध्ये जलाशय आहे तो कृत्रिम आहे, राजाला हवा होता म्हणून बनवला असे गाईड ने सांगितले होते. शिवाय लुडविग ला त्याच्या बालपणी कडक शिस्तीत रहावे लागले. त्या कटू आठवणी विसरण्या साठी त्याने हे घर बांधले. . . असं काहीतरी आठवतंय.

'होऊ दे खर्च' हेच खरे! :)

येनो मराया, काय अशक्य सुंदर फटू आहेत बे!! लैच आवडले. सगळे एकदम परीकथेतल्यासारखे. तासंतास खिळवून ठेवणारे.

arunjoshi123's picture

27 Dec 2013 - 4:47 pm | arunjoshi123

Honestly speaking, आयुष्यात एवढ्या सुंदर सुंदर जागा पाहायला मिळालेल्या लोकांवर जळायला होतं.

प्रमोद देर्देकर's picture

27 Dec 2013 - 5:20 pm | प्रमोद देर्देकर

पियुशा - Thu, 26/12/2013 - 13:31
जियो यसवायजी जियो , फोटो अशक्य सुंदर आहेत Smile
नशिबवान आहात ,इतकी छान, डोळ्यांची पारणे फिटणारे सॉंदर्य (निसर्ग Wink ) पहायला मिळणार्या लोकांचा हेवा वाटतो मला ( आमच्या भाग्यात असा योग आहे की नै देवाला म्हैत )

>>>
पहायला गेलं तर आप्ल्या भारतात ही अशा जागा आहेत. पण त्याचे संवर्धन उदासीन शासन व्यवस्था असल्यामुळे व्यवस्थीत होत नाही. दुसरे असे की शासनाने कितिही प्रयत्न केले तरी लोकांनी स्वछता राखणे ही अती महत्वाचे हे ध्यनात घ्यावे. नाही तर आपणच लोक कुठेही खावुन, कुठेही थुंकुन घाण करणे यात पुढे आहोत. त्या बाबतीत ती लोकं काटेकोर आहेत.

Honestly speaking, आयुष्यात
arunjoshi123 - Fri, 27/12/2013 - 16:47
Honestly speaking, आयुष्यात एवढ्या सुंदर सुंदर जागा पाहायला मिळालेल्या लोकांवर जळायला होतं.

>>> जळायला काय झाले भारत भ्रमण करा एवढ्या क्षमतेच्या सुंदर सुंदर जागा भारतातही आहेत.

येस वाय जी राग मानु नका तुम्ही पाठलेले फोटो खुप खुप आवडलेत. पण हे टॉनिक पाजणे जरुरीचे आहे.

एक विनंती तुम्ही फक्त चांगले फोटो टाकलेत ती दारु पिवुन तट्ट झालेली मुले यांचा पण फोटो टाकायाचा ना मग ते ही अंमळ भारतातील दारुड्यांशी बरोबरी करणारे वाटले असते.

यसवायजी's picture

27 Dec 2013 - 7:46 pm | यसवायजी

@ आप्ल्या भारतात ही अशा जागा आहेत. >> +१

पण दर्दु काका, ते दोघेही असे म्हणतच नाहीएत की भारत वाईट आहे, कशाला उगाच देताय टॉनीक?
आणी दारुड्यांचे फोटो कशाला? आपण चांगली फळं तेवढी खाऊन साली आणी कुजकी फळं फेकतो की नाही?? तसंच इथे पण करायचं..

अभ्या..'s picture

28 Dec 2013 - 3:06 am | अभ्या..

हांगाश्शी.
.
.
बाकी एस्वाय्ज्या फोटू भाळ सुंदर रे. भाळ मत्तु भाळलोच एकदम बघ. ;)
मस्त मस्त मस्त :)

यसवायजी's picture

28 Dec 2013 - 11:35 am | यसवायजी

'भाळ भाळलोच' हे लैच भाळल्या गेल्यालं इदे..

@अभ्या & ब्याट्या- यावागले वंद स्वल्प बॅक कोडबेकू.. अदक्के अवरीगे प्रेमाने कोट्ट बिट्टे.. ;)

बॅटमॅन's picture

28 Dec 2013 - 8:14 pm | बॅटमॅन

हौदप्पा, तसे माडलेच बेकु यावागरे ;)

बॅटमॅन's picture

28 Dec 2013 - 3:24 am | बॅटमॅन

निनजोते खंप्लीट सहमत रे यसवायजी!!

चौकटराजा's picture

28 Dec 2013 - 12:14 pm | चौकटराजा

भारतात मुन्नार, कशमीर, दोडाबेट्टा, कोडईकनाल पचमढी, कुर्ग, चैल ई रम्य जागा आहेत. पण कोणी असे म्हणत असेल की
काश्मीर स्वीस पेक्षा सुंदर आहे तर आय माय स्वारी !

काश्मीर स्वीस पेक्षा सुंदर आहे तर आय माय स्वारी ! >> यू नीड नॉट बी. काश्मीर स्विसपेक्षा सुंदरच नव्हे, कांकणभर सरस आहे. स्वानुभव.

यसवायजी's picture

29 Dec 2013 - 3:36 pm | यसवायजी

@चौराकाका & यशोतै >>
टेंशन नको स्विसचं, काश्मीर आहे घरचं..
धाग्याचं 'स्विस' होउन जाऊ द्या.. ;)

विशाल चंदाले's picture

27 Dec 2013 - 8:00 pm | विशाल चंदाले

अप्रतिम फोटोस. वृतांत हि आवडला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Dec 2013 - 4:13 pm | निनाद मुक्काम प...

चौकटराजा
तुमचे डोळे एकदा का त्या हिरवळीला व रम्यतेला सरावले
की त्याचे इतके विशेष वावगे वाटत नाही ,
उदा स्विस आमच्या घरापासून चार तासावर
त्यामुळे जर्मनी , स्विस , ऑस्ट्रिया येथे पसरलेला आल्प पहिला तर असे आढळून येईल की जर्मनी व ऑस्ट्रिया येथे काही ठिकाणे स्विस हून चांगली आहेत मात्र स्विस ने अत्यंत नियोजनबद्धरीत्या आपल्या देशात पर्यटन हा व्यवसाय रुजवला
आमच्या हॉटेल व्यवस्थापनाचे अनेक नामांकित संस्था त्यांनी त्यांच्या देशात स्थापन केल्या ह्यामुळे स्विस मधून जगभारत हॉटेल व पर्यटन शेत्रात दिग्गज येथून जातात ह्यामुळे आपसूकच स्विस चा प्रचार होतो , तसेस बॉलीवूड व इतर देशातील सिनेउद्योग येथे चित्रीकरण करतात कारण येथील सरकार खूपच मदत करणारे आहे.
ह्या सर्व गोष्टीमुळे स्विस पर्यटन शेत्रात सरस आहे
आता प्रश्न आला काश्मीर चा
तर माझ्यामते काश्मीर हे स्विस पेक्षा काकणभर सरस आहे ,
कारण नुसते निसर्ग सौदर्य नाही तर येथील माणसे ,त्यांचे पेहेराव , भाषा , जेवण सारेच अलौकिक आहे ,
येथील केसर व पश्मीना चे लोकर जगभरात विशेतः
युरोपात प्रचंड लोकप्रिय आहे ,गरज आहे ती ह्या प्रदेश शांतता निर्माण होण्याची व पर्यटन व्यवसाय योजनाबद्धरीत्या राबवायची .
एक साधे उदाहरण भारतीयांना युरोपियन जेवण आवडणार नाही मात्र युरोपियनांना भारतीय जेवण आवडते ,
भारतातील हिमाचल प्रदेश तसेस ईशान्येची सात राज्ये
हे युरोपियन पर्यटन उद्योगाला टक्कर देऊ शकतात.

यसवायजी's picture

28 Dec 2013 - 11:09 pm | यसवायजी

भारतीयांना युरोपियन जेवण आवडणार नाही मात्र युरोपियनांना भारतीय जेवण आवडते
आमी बी भारतीयांच्या त्याच क्याट्यागरीत मोडलो. कंपनीत फक्त इटालीयन, घासफुस, फळे इतकेच खाणेबल असायचे.
सर्वीस अपार्टमेंटमधे स्वतः बनवून खायचा कंटाळा असायचाच. त्यामुळे भारतीय हॉटेलं शोधावीच लागली.
याउलट कंपनीत कधीतरी ज्या काउंटरला INDIAN अशी पाटी दिसायची, तिकडे जर्मन्सची भलीमोठी रांग असायची.

वेल्लाभट's picture

28 Dec 2013 - 7:07 pm | वेल्लाभट

केवळ खलास फोटो !! ! ! आहाहाहा! क्या बात है यसवायजी ! मस्स्स्त

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2013 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा

का एक सो एक फोटू डाले हो रे कॅसल के... http://www.sherv.net/cm/emoticons/smile/cheery-smiley-emoticon.png
जिग्रा खुस कर दिया रे.........!

यसवायजी's picture

29 Dec 2013 - 10:41 am | यसवायजी

आप सब लोगनका हम तहेदिलसे सुक्रिया अदा करते हैं... :)

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 5:27 pm | बॅटमॅन

यसवायजी, इदु बिट्टु मत्तु येनेनु नोडिदि अल्ले? बरी पा लगुनं!!!

इल्ले मत्तु येनु बेरे नोडिल्ल,माडिल्ल.
इल्लींद मुंदे कलोनिगे होगिद्दे. स्वल्प टैम सिगली, बरीतेनी..

बरी बरी, हादि नोडलिकत्तिनी. :)