भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
प्रत्येक ठिकाणी प्रवासी मदत केंद्र असतात. (त्यांना इंग्रजी येतं).काही चुकायचा प्रश्नच नाही. मोफत माहिती व नकाशे घेतले.
Hohenschwangau गावातल्या दोन टेकड्यांवर नॉयश्वानस्टाईन आणी Hohenschwangau असे दोन कॅसल आहेत. दुसर्या लुडवीग राजाने १८८६ साली नॉयश्वानस्टाईन कॅसल बांधला. या स्थळाला Fairytale Destinations म्हणतात.
जगातला सर्वात सुंदर समजला जाणारा हा कॅसल उंचीवर असल्याने दुरुनच नजरेत भरतो. आजुबाजुची झाडी आणी त्यात हा चमत्कार.
२. नॉयश्वानस्टाईनच्या टेकडीवरुन दिसणारे Hohenschwangau खेडं. या फोटोत जो दिसतोय तो आहे Hohenschwangau कॅसल आहे. आणी एका सुंदर तलावाचं (Swan lake) दर्शन पण घडतंय.
(माफ करा. थोडे उलट-सुलट क्रमाने फोटो दाखवतोय. पण तशी गरज वाटली)
३. Hohenschwangau कॅसल म्हणजेच High Swan County Palace. असं नाव पडण्याचं कारण म्हणजे या दोन्ही कॅसल्स मधे असणारे हंस. म्हणजे सजीव हंस नव्हे, पण चित्रात, छोट्या प्रतिकृती, अगदी दरवाजच्या हॅन्डलवर सुद्धा हंस आहेत. बवेरीयाचा राजा दुसरा मॅक्सीमिलीयन याने हा कॅसल बांधला. खरंतर एका जुन्या कॅसलला परत बांधले. या राजाचा मुलगा म्हणजेच दुसरा लुडवीग. हे कुटुंब Hohenschwangau कॅसलमधेच रहायचं. १८६४ मध्ये मॅक्सीमिलीयनचा मृत्यु झाल्यावर दुसरा लुडवीग राजा झाला.
४. हा कॅसल पहायला टेकडीवर गेलो. याच्या आपल्या बाजुला बरीच चित्रे आहेत. विशेषतः युद्धाची. लुडवीगला एक शुर्-वीर योद्धा करायचे मॅक्सीमिलीयनचे स्वप्न होते. पण झाले काही वेगळेच. लुडवीगला यापेक्षा जास्त संगीत,कला, वाचन आणी काव्य याची आवड होती. त्याचमुळे त्याला फेअरी टेल किंग म्हणतात.
'रोमॅन्टीक रोडवरच्या वॉकवाली जर्मनी' ती हीच.
Hohenschwangau कॅसलच्या आतले फोटो.
५. कुठल्यातरी आडवाटेने उतरत असताना Swan lake चा एक अतीसुंदर देखावा पहावयास मिळाला.
इथले पाणी अगदी स्थीर वाटत होते. कसलाही आवाज नाही. सगळं कसं शांत.. शांत..
इतकं सुंदर हिरवंगार दृष्य होतं.. नजरेत आणी कॅमेर्यात फक्त भरुन घेतलं..
रच्याकने, हे अगदी पर्फेक्ट हनिमून डेस्टीनेशन वाटतय की नाही? (लग्नानंतर) इकडेच जायचा विचार आहे.. इच्छुक कॅन्डीडेट्सनी व्यनीतुन संपर्क करावा. (नियम व अटी लागू) ;)
६. ही वाट दूर जाते.. स्वप्नामधील गावा..
इथल्या तलावाच्या काठाला बसुन थोडं खाउन घेतलं. निवांत चार गाणी ऐकली.. मग पुढचा कॅसल बघायला तय्यार..
७. इथल्या जंगलातुन फिरताना, इथला धबधबा पाहताना, त्याच्या पुलावरुन जाताना छोट्या लुडवीगला नेहमी वाटायचं की इथे एक घर बांधायचंय, की ज्यासारखं जगात दुसरं घर कुठेच नसेल. आणी त्याने ते याच आल्प्सच्या भागात बांधलं. त्याला नाव दिलं New Hohenschwangau castle. (इंग्रजी- New Swanstone Castle). लुडवीगच्या मृत्युनंतर याला नॉयश्वानस्टाईन म्हणु लागले. याचं बांधकाम युद्धाच्या दृष्टीने केलं गेलं नाही. मित्र आणी संगीतकार रिचर्ड वॅग्नर याला एकांतात राहण्यासाठी हे बांधण्यात आलं. १९६९ ला बांधकाम सुरु झालं, पण पुर्ण व्हायच्या आत लुडवीगचा संशयास्पदरित्या मृत्यु झाला. (दुसर्या मजल्यावरचं काम अर्धवट राहिलय. त्यामुळे सध्या इथे एक हॉटेल चालवतात)
प्रवेशव्दार- फोटो पाहिल्यावर लक्षात येइल की, सुरक्षेपेक्षा सौंदर्यावर जास्त भर दिला गेलाय.
कॅसलच्या आतले फोटो काढण्यास मनाई असल्याने...
८. लुडवीगने स्वखर्चाने बांधलेल्या या कॅसलवर खूप पैसा खर्च केला होता. या कॅसलने इतकं वेड लावलंय की, जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल म्हणुन हा प्रसिद्ध आहे. Sleeping Beauty Castle of Disneyland चं मॉडेल यावरुनच तयार झालंय. वर्षाला १३ लाख तर उन्हाळ्यात रोज ६००० लोक भेट देतात. इतक्या गर्दीला मॅनेज करण्यासाठी फक्त ४० मिनीटाची 'गाइडेड टूर' हा एकच पर्याय आहे. जर्मन, इंग्रजी, फ्रेंच भाषांचा पर्याय आहे. त्यामुळे
१४ युरोचं तिकीट काढावं लागतं.
तिन मजली इमारत पाहिली. १८८० च्या काळात सुद्धा त्यावेळेच्या सगळ्या सुखसोई इथे होत्या.टॉयलेटमधे फ्लश सिस्टीम, गरम आणी थंड पाण्याची व्यवस्था, बॅटरीवर चालणारी बेल, एवढेच नव्हे तर टेलीफोन लाईन सुद्धा. हे सगळं आत पहावयास मिळतं. लुडविगची रसिकता सुद्धा जागोजागी दिसते.
(धुकं जास्त होतं त्यामुळे हा थोडा एडीट केलाय.)
आतले फोटो नाहीत त्यामुळे तो राजेशाही थाट इथे दिसणार नाही. पण विकीवरचा एक फोटो देतोय.. यात Swan दिसतोय. इतर माहिती व फोटो इथे पाहता येतील.
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर.. मज अब्रूचे थिटे बहाणे- नामंजूर.. +१
यसवायजी मस्त प्रवास In reply to नवअश्वस्थान की नवश्वानस्थान by चित्रगुप्त
In reply to मला वाटले .. by चौकटराजा
In reply to ओ काका.. by यसवायजी
In reply to सरळ आहे by चौकटराजा
In reply to सही...... अती सुंदर......... by युगन्धरा@मिसलपाव
In reply to हे घ्या.. by यसवायजी
पियुशा - Thu, 26/12/2013 - 13:31
जियो यसवायजी जियो , फोटो अशक्य सुंदर आहेत Smile
नशिबवान आहात ,इतकी छान, डोळ्यांची पारणे फिटणारे सॉंदर्य (निसर्ग Wink ) पहायला मिळणार्या लोकांचा हेवा वाटतो मला ( आमच्या भाग्यात असा योग आहे की नै देवाला म्हैत )
>>>
पहायला गेलं तर आप्ल्या भारतात ही अशा जागा आहेत. पण त्याचे संवर्धन उदासीन शासन व्यवस्था असल्यामुळे व्यवस्थीत होत नाही. दुसरे असे की शासनाने कितिही प्रयत्न केले तरी लोकांनी स्वछता राखणे ही अती महत्वाचे हे ध्यनात घ्यावे. नाही तर आपणच लोक कुठेही खावुन, कुठेही थुंकुन घाण करणे यात पुढे आहोत. त्या बाबतीत ती लोकं काटेकोर आहेत.
Honestly speaking, आयुष्यात
arunjoshi123 - Fri, 27/12/2013 - 16:47
Honestly speaking, आयुष्यात एवढ्या सुंदर सुंदर जागा पाहायला मिळालेल्या लोकांवर जळायला होतं.
>>> जळायला काय झाले भारत भ्रमण करा एवढ्या क्षमतेच्या सुंदर सुंदर जागा भारतातही आहेत.
येस वाय जी राग मानु नका तुम्ही पाठलेले फोटो खुप खुप आवडलेत. पण हे टॉनिक पाजणे जरुरीचे आहे.
एक विनंती तुम्ही फक्त चांगले फोटो टाकलेत ती दारु पिवुन तट्ट झालेली मुले यांचा पण फोटो टाकायाचा ना मग ते ही अंमळ भारतातील दारुड्यांशी बरोबरी करणारे वाटले असते. In reply to पियुशा - Thu, 26/12/2013 - 13 by प्रमोद देर्देकर
In reply to @ आप्ल्या भारतात ही अशा जागा by यसवायजी
In reply to हांगाश्शी. by अभ्या..
In reply to 'भाळ भाळलोच' हे लैच भाळल्या by यसवायजी
In reply to @ आप्ल्या भारतात ही अशा जागा by यसवायजी
In reply to @ आप्ल्या भारतात ही अशा जागा by यसवायजी
In reply to अशा जागा भारतात नाहीत.. by चौकटराजा
In reply to काश्मीर स्वीस पेक्षा सुंदर by यशोधरा
In reply to चौकटराजा by निनाद मुक्काम …
भारतीयांना युरोपियन जेवण आवडणार नाही मात्र युरोपियनांना भारतीय जेवण आवडते
आमी बी भारतीयांच्या त्याच क्याट्यागरीत मोडलो. कंपनीत फक्त इटालीयन, घासफुस, फळे इतकेच खाणेबल असायचे.
सर्वीस अपार्टमेंटमधे स्वतः बनवून खायचा कंटाळा असायचाच. त्यामुळे भारतीय हॉटेलं शोधावीच लागली.
याउलट कंपनीत कधीतरी ज्या काउंटरला INDIAN अशी पाटी दिसायची, तिकडे जर्मन्सची भलीमोठी रांग असायची.
जिग्रा खुस कर दिया रे.........!
In reply to का एक सो एक फोटू डाले हो रे by अत्रुप्त आत्मा
In reply to यसवायजी, इदु बिट्टु मत्तु by बॅटमॅन
In reply to इल्ले मत्तु येनु बेरे नोडिल्ल by यसवायजी






ते कॅमेर्यात भरून घेतलेलं घर