भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक

यसवायजी's picture
यसवायजी in भटकंती
15 Dec 2013 - 12:13 am

--------------------------------------------------------------------------
भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
भ्रमण जर्मनी.. ०४ - कलोन
--------------------------------------------------------------------------

जर्मन कलीग रिसिव्ह करायला आला होता.. आज 'आवडी'त बसायची हौस पुर्ण झाली. सुरुवात चांगली झाली.

पुढे..

थोड्या वेळामागे पाउस झाला होता. 'क्षणात येते सरसर शिरवे…' टाईप वातावरण होते. तशी हिरवळ तर वर्षभर असतेच म्हणा..
थोड्याच वेळात कुकरच्या शिट्ट्यांनी हॉटेल Maximilian दणाणून गेले. मसालेभाताच्या आणी पंजाबी तडक्याच्या घमघमाटाने Nuremberg चा Gostenhof परिसर दरवळून गेला. जेवल्यावर मस्त झोप लागली.
पहाटे ४.३० ला सूर्योदय, अन रात्री ९.३० ला सुर्यास्त व्हायचा. त्यानंतरही प्रकाश असायचाच. म्हणजे १७-१८ तासांचा दिवस. सहीच ना?.
सोमवारपासुन ऑफिसची गडबड सुरु झाली. आठवड्याचा Travel पास २१ युरो मध्ये होता. महत्वाचं म्हणजे हाच पास कोणत्याही लोकल-बस, ट्राम, मेट्रोला चालतो.
लगेच दुसर्‍याच दिवशी जाम उकडायला लागले होते. आणी प्रॉब्लेम असा होता, की हॉटेलात किंवा ऑफिसमध्ये 'हिटर' तर होते, पण AC किंवा Fan यातले कुठेच, काहीच नव्हतं. जर्मन लोक्स 'समर' एन्जोय करत होते. पण आम्हाला ३०-३२ डिग्रीत कासावीस व्हायला लागलं होतं. Room service ला फोन करून AC ची व्यवस्था करायला सांगितलं, पण त्यांनी चक्क नकार दिला. आम्ही चौघेही अगदी तिसर्‍या महायुद्धाच्या तयारीत रिसेप्शनवर जाऊन धडकलो. पण तिथल्या सुबक ठेंगण्या बघताच आम्ही शरणागती पत्करली. दोघीतली १ सु.ठें. बाजूलाच कळफलक बडवत होती. दुसरीने आमची समस्या ऐकून घेतली आणी "२ मिनिट" म्हणुन ती फोनवर व्यस्त झाली.
आता आमचा बेंगॉली बाबू वैतगलाच. तीला उद्देशुन हिंदीतच म्हणाला, "साला एक तो तेरी ये जर्मनी इतनी गरम.. और उपरसे तू इतनी गरम.. चोलबे ना.."
आम्ही लगेच "ख्या..ख्या..ख्या.."
तेवढ्यात कळफलकवाली समोर येत म्हणाली "We have arranged table fan in your room"
अक्सेंट ओळखीचा वाटला, चौघांच्याही माना सिंक्रोनाईझ होउन तीच्याकडे वळल्या. अरे ही तर आपल्यातलीच..
नेमप्लेट-"दिव्याराणी".. गरमी अजुनच वाढली.
ऊ तेरी.. ये तो सब समझती है यार..
आम्ही फक्त Danke म्हणालो आणी कलटी मारली. (थॅन्क्यु)
च्यायला हे इंडियन्स ना.. कुठेही भेटतात. ;)

१ चित्र हजार शब्द बोलून जातं म्हणे.. तर तिथला Summer काहीसा असा होता..

DSC01901

पहिला विकेंड - म्युनिक.
'न्युरेम्बर्ग' दक्षिण जर्मनीत आहे. या भागाला 'बवेरीया' म्हणतात. बवेरीयान स्टेटची राजधानी 'म्युनिक'चा दौरा ठरला. म्युनिकला जर्मन्स 'München- म्युन्शेन' म्हणतात. ऑक्टोबर्-फेस्ट इथे म्युनिकमधेच असतो.
४२ युरोत ५ जणांचा विकेंड पास मिळतो. रात्री १२ पासुन २१ तास पुढे जर्मनीत कुठेही ट्रेनने फिरता येते. युरोपात एकंदरीतच कनेक्टीव्हिटी उत्तम.ट्रेनचा प्रवास अत्युत्तम..
1.जाताना मस्त हिरवेगार नजारे, चर्च, आणी अशी घरे दिसत होती. या घरांवर खापर्‍यांऐवजी सोलार पॅनल आहे. व्हॉट अ‍ॅन ऐडीया सरजी..

DSC01779

2. म्युनिकमधे फिरायला आम्ही हा ऑप्शन सेलेक्ट केला.२० युरोत एका दिवसाचा पास होता. याला Hop-on-hop-off बस म्हणतात. अशा दिसणार्‍या कुठल्याही बसमधे कुठेही hop-on- कुठेही hop-off व्हा.

DSC01825

बाल्कनीत बसुन म्युनीक बघायची मजाच काही और..

DSC05477

हे पहा..

DSC01806

3. दुसरा ऑप्शन हा होता.. यांना सेगवे टुर्स म्हणतात. गावभर या मुंग्यांची रांग असते. मोटर बसविलेल्या, बॅटरीवर चालणार्‍या या गाड्या. आजकाल दिल्लीत पण हे चालु आहे असं ऐकलंय..

DSC01807

4. पण एक समजत नव्हतं.. स्साला, एवढी गर्दी का आहे? माणसंच्-माणसं चोहीकडे होती. असं वाटत होतं की, ज्योतीबाची जत्राच भरलीय.. सगळीकडे गाणी, बॅन्ड, नाच, धिंगाणा अन बियरचा तर महापूर..

DSC01837

शेवटी एकाला पकडुन विचारलंच, "काय रे बाबा.. का एवढी गर्दी ?"
तेंव्हा समजलं.. म्युनीक वॉज सेलेब्रेटींग इट्स 855th बर्थडे.
१५-१६ जुन.
काय भाग्य.. काय भाग्य.. गेल्या जन्मीचं पुण्य मोठं, म्हणुन म्युनिकचा 'बर्डे' साजरा करायला मिळाला..

५. एका परफॉर्मन्समधे 'बॉन्ड थिम' ऐकण्यात गुंतलेली चिमुरडी-

DSC01841

6. चौकात बियरची व्यवस्था अशा झोपड्यांत करण्यात आली होती.. खायची प्यायची चंगळ होती.

IMG_3638

7. Angle of peace- इ.स. १८७० च्या फ्रॅन्को-जर्मन युद्धानंतर हे उभारण्यात आलं होतं.

DSC01867

8. एक चर्च-

DSC01826

DSC01847

IMG_3658

9. जवळच्याच एका होटेलबाहेर हे कुत्रं बांधलं होतं.

P1010404

German Shepherd तर फेमस आहेतच. जर्मनीत एखाद्या शिंगराएवढी (शिंगरु) कुत्री पहायला मिळाली.
तिथला प्रत्येक भिकारी १-२ कुत्री पाळतो. बेघर, की ज्याच्याकडे ते कुत्रं पाळण्याचा परवाना आहे त्यांना सरकार भत्ता देते असे समजले. ते काहिही असेल,पण त्या बिचार्‍या माणसाकडे आपलं असं, जीव लावणारं कुणीतरी आहे ना.. बास झालं..

10. मेरीयनप्लाट्झ. Marienplatz- इथे सर्वात जुना चौक आहे. सेंट मेरी'ज/ ओल्ड लेडी'ज चौक. सायकल रिक्षा सुद्धा मिळतात इथे..

DSC01907

11. बवेरीयन नॅशनल मुझीयम-

DSC01862

12. लुडविग-I

DSC01829

13. जर्मन पारंपारीक वेशभूषेतले आजी-आजोबा

DSC01925

14. आणी या पारंपारीक पोरीला 'फोटु काढु का?' म्हणताच लगेच मॅडमने ही पोज दिली..

DSC05464

15. कदाचीत फेस्टिवलमुळे जागोजागी असले जिवंत पुतळे दिसत होते.. आणी मागे 'जत्रा'..

DSC01926

16. आणी रस्त्यांवर सुद्धा कला बहरली होती. यातला पहिलं चित्र ज्या कॅसलचं आहे, तो Neuschwanstein castle आमचं पुढचं टारगेट ठरलं. जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल आहे हा..

DSC01931

17. Nymphenburg Palace- बवेरीयन राजांचं गतवैभव. मोठं पॅलेस आहे.. १६६४ ला बांधण्यात आलं होतं.
वेळ अपुरा पडल्याने जास्त पाहता नाही आलं.

DSC05489

18. त्यावेळेस एक राजेशाही लग्न चालु होतं. त्यांची गाडी-

DSC05482

19. ऑलिंपिक स्टेडियम- इथे १९७२ चे आयोजन झाले होते. इथेच एक अ‍ॅक्वेरीयम पण आहे. BMW village च्या अगदी जवळ आहे हे.

DSC05549

20. BMW Headquarters- अप्रतीम.
'बालाजी मोटर वर्क्स' नाही हां.. बवेरीयन मोटर वर्क्स. जगातल्या काही ३-४ लिडिंग कार्सपैकी एक..

DSC05541

21. या इमारती समोरच त्यांच्या 'कार' आणी 'बाईक्स' शो साठी ठेवल्या आहेत. मी BMW च्या 'बायका' पहिल्यांदाच पाह्यल्या.

शोरुम मधील Phantom car-

DSC05532

22. BMW, फोक्स्वॅगन, 'मर्सी'वाली जर्मनी.. फरारी, पोर्श, लॅबोर्गिनी.. सगळ्या डोळं भर्रुन बघितल्या..
DSC01832..P1010418
DSC01823

यातली एखादी घ्यायचा विचार केला होता.. पण यांचा ग्राउंड क्लियरंस एवढा कमी होता की पुण्यात चालणार नाहीत म्हणुन..
नाहीतर असल्या बाबतीत मी खर्च करायला मागे-पुढे बघतच नाही.. होऊ दे खर्च. ;)

23. FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..
Allianz Arena football stadium. (हे एकच चित्र जालावरुन साभार)

alnz

24.घरी/शेजारी फोटु दावताना म्हटलं, बघा किती स्वच्छ आहे पाणी.. तुमच्यासारखं निर्माल्य टाकत नाहीत ते लोक..
तर बायकांचं उत्तर- "असायचंच.... देवाला फुलं वाहुन माहित आहे काय त्यांना??"
बायका रॉक.. SYG shox..

DSC01864

25. लास्ट बट नॉट द लिस्ट..
आपल्याकडे ट्रॅक्टरचा उपयोग माल वाहुन न्यायला करतात. आणी जर्मनीत पण?? :D

P1010476

या मुलींनी नुसता उच्छाद मांडला होता.. एका म्हातार्‍याला 'बकरा' करुन छुपं व्हिडिओ शूटींग चाललं होतं.

--------------------------------

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

15 Dec 2013 - 12:19 am | संजय क्षीरसागर

SYG लगे रहो!

एका लेखात किती माहिती दिलीय दादा......
एकदम गावभर भटकवून आणलंत. प्रत्येक ठिकाणाचे एकोळी ओळख देण्यापेक्षा थोडी आणखी माहिती द्याकी.
तुम्ही इष्ट जर्मनीत भटकलात का? तेथे सध्या कशी परीस्थिती आहे? एखाद्या खेडेगावात गेलात तिथल्या?

@ एका लेखात किती माहिती दिलीय दादा......>>
मला कल्पना आही की, माहिती कमी दिलीय. पुढे जास्त द्यायचा प्रयत्न करेन.

@ एकदम गावभर भटकवून आणलंत
त्याचसाठीतर चाल्लय ना.. तेवढाच फेरफटका.

@तुम्ही इष्ट जर्मनीत भटकलात का? तेथे सध्या कशी परीस्थिती आहे? एखाद्या खेडेगावात गेलात तिथल्या?
इस्ट नाही पण वेस्ट मधे गेलो होतो.. कलोनला. जिथे गेलो तिथलीच माहिती देउ शकेन.
खेडेगावात गेलो होतो.

मधुरा देशपांडे's picture

15 Dec 2013 - 4:20 am | मधुरा देशपांडे

वर्णन आणि फोटो दोन्ही झक्कास. म्युनिक दर्शन मस्त झाले.

जर्मनीत एखाद्या शिंगराएवढी (शिंगरु) कुत्री पहायला मिळाली.

+१
बाकी नॉयश्वानस्टाईन तर सुंदरच आहे. त्यामुळे पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

15 Dec 2013 - 6:34 am | मुक्त विहारि

पहिल्या फोटो पासुन ते थेट शेवटच्या फोटो आणि शेवटच्या वाक्या पर्यंत मस्त लेख...

मजा आली....

Atul Thakur's picture

15 Dec 2013 - 8:01 am | Atul Thakur

सुरेख चित्रे :)कुठला कॅमेरा वापरता राव?

यसवायजी's picture

16 Dec 2013 - 6:52 pm | यसवायजी

सोनीचे साधे मोडेल होते. DSCW620 & W530.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2013 - 8:07 am | अत्रुप्त आत्मा

पहिला फोटू मंजे.. फ्रेश...फ्रेश.... फ्रेश...!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-love-smileys-883.gif

जिकडे तिकडे चोहिकडे...आनंदी आनंद गडे!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-841.gif
लै मंजे लैच भारी ...!

यशोधरा's picture

15 Dec 2013 - 8:16 am | यशोधरा

मस्त!

यसवायजी's picture

15 Dec 2013 - 12:00 pm | यसवायजी

म्युनिकचे अजुन काही फोटु..

DSC01830

DSC01860

DSC01815

DSC01891

DSC01904

DSC05548

बॅटमॅन's picture

15 Dec 2013 - 12:22 pm | बॅटमॅन

येनो यसवाञजी, खल्लास मजा माडिदी काणस्तदं!!!!!

जबराट लेख. फटू आणि वर्णन दोन्हीही मस्त आवडले. पञ्च लैन्स सगळ्यात आवडल्या, आणि आवडलेल्या फोटूंमध्ये 'पहिला' जो आहे तसे अजून आले तरी चालतीन बरं ;)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2013 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा

@आणि आवडलेल्या फोटूंमध्ये 'पहिला' जो आहे तसे अजून आले तरी चालतीन बरं>>> :D लै येळा सहमत! :D

यसवायजी's picture

16 Dec 2013 - 8:02 pm | यसवायजी

:)) अआ, धन्यवाद. फोटुबद्दल दखल घेण्यात आल्या गेल्याली हाये.
@बॅट्या- मज्जा अंद्र एन हेळली.. नोडी साकायतु..
मत्त करीनाच्या 'हाडू'सारखं, 'कण्णों'को याकु सेंके, 'कै'से माडु मनमानी.. असं फक्त मनस्सीनल्ली अनसत होतं. ;)

बॅटमॅन's picture

17 Dec 2013 - 12:58 pm | बॅटमॅन

ओहोहो...... 'कै' से माडू मनमानी!!!!!!! क्या बात क्या बात!!! हे अंद्रं जबराटच केलसा झालं की बे. काणसून काणसून तिळायचं बंद झालं असेल नै ;) बघू नम्म नशीबदल्लि असा योग यावाग बरतो ते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2013 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त प्रवास आणि फोटो. माहिती जरा अजून जास्त असती तर अजून मजा आली असती ! पण हेही मस्तच !

प्यारे१'s picture

15 Dec 2013 - 1:49 pm | प्यारे१

भन्नाटच!
ऐश केलासा म्हणा की!

दिपक.कुवेत's picture

15 Dec 2013 - 3:39 pm | दिपक.कुवेत

मजा आली बघुन. असले तर ट्रेनच्या प्रवासाचे पण फोटो टाक कि! स्वच्छ, चकचकित, आरामदायक आणि पारर्दर्शक फ्रेंच विंडो असलेल्या ट्रेन्स पहायला मजा येईल.

अभ्या..'s picture

16 Dec 2013 - 3:03 am | अभ्या..

भारीच रे एसवायज्या. :)
लैच ऐश चाललीय लका तिकडे. बेस्ट बेस्ट. मस्त आलेत फटू एकदम.

आदूबाळ's picture

16 Dec 2013 - 3:49 am | आदूबाळ

भा री ही !

इथे एक लिटरच्या गलासात बीयर मिळते, हा साक्षात्कार झाल्यावर आम्ही फारसे कुठे बोंबलत हिंडलोच नाही. आठवण म्हणून त्यांचं एक मेनू कार्ड आणि कोस्टर ढापून आणला आहे.

हिटलरच्या नाझी पार्टीचा जन्म म्युनिकचाच. १९२३ साली कुठल्याशा बीयर हॉलमध्येच त्याने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. तो फसला आणि त्याला अटक झाली. नंतर सत्तेवर आल्यावर दर नोव्हेंबर महिन्यात हिटलर त्या बीयर हॉलमध्ये भाषण देत असे. १९३९ साली त्या हॉलमध्ये टाईमबॉम्ब लावून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला, पण त्याच दिवशी नेमका अर्धा तास आगोदर भाषण गुंडाळून तो तिथून निघून गेला होता!

म्युनिकपासून अर्ध्या तासावर असलेल्या डखाऊ कॉन्सनट्रेशन कॅम्पलाही गेलो होतो. अंगावर काटा आणणारा पण आयुष्यभराची ठेव झालेला अनुभव आहे तो.

दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
डखाऊच्या कॉन्सनट्रेशन कॅम्पला जायची फार इच्छा होती. पण ४ टोकाची ४ टाळकी आणी प्रत्येकाची ४-४ मतं. त्यामुळे बर्‍याचदा मनासारखं फिरता नाही आलं. पण जे काही फिरलो ते सुद्धा कायमच आठवणीत राहील..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2013 - 1:40 am | निनाद मुक्काम प...

संपूर्ण बवेरीया मध्ये एक लिटर ची बियर ग्लासात मिळते.
त्याला मास असे म्हणतात
आइन मास
म्हणजे एक मास म्हटले की हा एकच प्याला दिला जातो.
आणि तुम्ही इथे म्हणून ज्या मधुशाळेची लिंक दिली आहे तेथेच तुम्ही पुढे लिहिले आहे त्या प्रमाणे हिटलर ने प्रयत्न केला होता , आमचे तेथे महिन्यातून दोनदा तरी जाणे होते.
खूप दिवसांनी जर्मनी बद्दल लेख वाचून बरे वाटले.
माझ्या आख्यानाची आठवण झाली ,
आधी माहिती असते तर एका दिवसात म्युनिक ह्या सदराखाली अजून पाहण्यासारखे बरेच सुचवता आले असते ,
म्युनिक व आजू बाजूचा परिसर पाहण्यासाठी किमान ३
दिवस हवेत
येथे मेरियान प्लाट चा उल्लेख झालेला वाचला.
येथे एक गंमत पाहायची एक सुवर्णसंधी दडवल्या गेली.
ह्याचे वाईट वाटले.
तेथे दुपारी व संध्याकाळी ५ वाचता ह्यात पाहत आहोत तशी तोबा गर्दी असते कारण मग घंटेचा नाद सुरु होतो ,Glockenspiel
क्लॉक टोवर च्या वरील बाहुल्या फिरायला लागतात.
वर्षाच्या बारा महिने हे दृश्य ह्या ठिकाणी ह्यावेळेला असते.
म्युनिक म्हणजे दुसरे पुणे , आपल्या शहराच्या परंपरा ,प्रथा ह्यांचा जाज्वल्य अभिमान त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतो , अश्या बर्याच गमती जमती ह्या शहराबद्दल आहेत , युरोपातील पहिल्या ३ नात येणार सौना बाथ येथे आहे ,त्यावर लिहिले तर एक लेखाची जिलबी नक्की पडेल. त्या बद्दल परत कधीतरी फुरसतीत
लिहीन.

यसवायजी's picture

23 Dec 2013 - 10:44 am | यसवायजी

आपण म्युनीकमधे असता हे माहित नव्हते. पुन्हा योग आल्यास नक्की भेटु अन 'स्वाई मास' (बराबर?) ची ऑर्डर देऊ.
तुमचे आख्यान आत्ता वाचतोय. छान झालंय. सध्या का लिहित नाही?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Dec 2013 - 12:47 am | निनाद मुक्काम प...

तुम्हाला खरड केली आहे.

चित्रगुप्त's picture

16 Dec 2013 - 6:19 am | चित्रगुप्त

बोले तो एकदम झकास.

सुधीर कांदळकर's picture

16 Dec 2013 - 7:41 am | सुधीर कांदळकर

हॉप ऒन हॊप ऒफ बस आवडली. पुष्करणी आवडली, पुतळे मस्तच. खाली टाकलेल्या आणखी चित्रातले कारंजे सुरेख. अलियांझ अरीना लाजबाब.

फोटोतले चर्च मुंबईतल्या ब्रिटीश इमारतींशी जुळते पण सुरेखच आहे.

पुभाप्र

मी युरोप बघायचा मगच मरायचे असा पण केला आहे. त्यासाठी काही महिने लागणार आहेत मुहूर्ताला. ( मरणाच्या नव्हे).
त्यामुळेच हा धागा पाहून जास्त उत्सुकता ताणली जात आहे त्यात Neuschwanstein castle हा लाडका विषय येणार हे कळल्यामुळे त्याची ही वाट पहात आहे. बाकी येथील सर्व फोटो हे " क्लास" दर्जाचे आहेत हे नमूद करतो.मोठे मोठे नगर चौक हे युरोपचे खास वैशिष्ट्य आहे त्यातील एखाद्याचा फटू पुढील धाग्यात यावा.

यसवायजी's picture

16 Dec 2013 - 7:09 pm | यसवायजी

या चौकांना बहुतेक वेळेस प्लाट्झ म्हणतात. मेरीयनप्लट्झ हा म्युनीकचा मोठ्ठा सिटी स्क्वेअर आहे. त्याचे फोटो दिले नाहीत कारण त्या दिवशी तिथे मरणाची गर्दी होती. (चौक दिसतच नव्हता)
न्युरेम्बर्गच्या चौकातले फोटो मस्त आलेत. ते देईन पुढील भागात.
Neuschwanstein castle तर मस्त आहेच. पण ते खेडेवजा गाव,म्हणजे जणू स्वर्गच आहे..
आणी तुमच्या दौर्‍याला मनसे शुभेच्छा. एकदा युरोप बघाच..

पियुशा's picture

16 Dec 2013 - 11:58 am | पियुशा

वा वा मस्त फोटू यसवायजी , एकदम फ्रेश वाटल फोटु बघुन :)

प्रचेतस's picture

16 Dec 2013 - 3:06 pm | प्रचेतस

एकदम भारी.

सूड's picture

16 Dec 2013 - 3:43 pm | सूड

पुभाप्र !!

दिव्यश्री's picture

16 Dec 2013 - 4:25 pm | दिव्यश्री

लेख आवडला
English Garden ,Olympia Tower हे पहिले कि नाही ?

अनिल तापकीर's picture

16 Dec 2013 - 5:29 pm | अनिल तापकीर

फोटो नि लेख दोन्ही छान

पैसा's picture

16 Dec 2013 - 7:00 pm | पैसा

लिखाण आणि फोटो एक नंबर! लै भारी!

सुहास..'s picture

16 Dec 2013 - 7:14 pm | सुहास..

रिफ्रेशिंग !!

अनिरुद्ध प's picture

16 Dec 2013 - 7:20 pm | अनिरुद्ध प

फक्त मलाच दिसत नाहीत असे वाटते. बाकी वर्णनावर्च समाधान मानावे लागत आहे.

मदनबाण's picture

23 Dec 2013 - 3:50 pm | मदनबाण

मस्त ! :)

जाता जाता :- बेंगॉली बाबू रसिक माणूस दिसतो. ;)

मस्तचं...वाचनखुण साठवली आहे... कधी जर्मनीला जायचा योग आला तर उपयोग होईल.

बाकी वर सुचवल्याप्रमाणे "ड" जीवन्सत्वाचे पहा काही करता येईल का पुढच्या लेखात ;)

जीवन्सत्वाचे = जीवनसत्वाचे