२०१४-निवडणुकांची रणधुमाळी

सचीन's picture
सचीन in जनातलं, मनातलं
18 Dec 2013 - 5:36 pm

२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.

ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय.

आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे.

देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात.

२०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज
१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी

२)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव

३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात.

प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे.

भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते.

शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

राजकारणलेख

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

18 Dec 2013 - 5:42 pm | छोटा डॉन

तुमचे अंदाज खरे ठरो यासाठी आमच्या तुम्हाला आणि तुमच्या मर्जीतल्या पक्षांना शुभेच्छा.
अंदाज रोचक वाटले.

- छोटा डॉन

सचीन's picture

18 Dec 2013 - 9:36 pm | सचीन

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 9:59 pm | मुक्त विहारि

ठ्ठो...............

हहपु

स्वलेकर's picture

27 Dec 2013 - 12:38 pm | स्वलेकर

१++++++++++++

सचीन भाऊ कढुन आणखीन एक विडंबन . शतकासाठी पुनश्च शुभेच्छा .
=)) =))

मृत्युन्जय's picture

18 Dec 2013 - 5:51 pm | मृत्युन्जय

भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते.

हे वाचुन बसलेल्या धक्क्यातुन अजुन सावरलेलो नाही आहे. सचिन पिळगावकर नंतर तुम्हीच एक सचिन. तुम्हाला दोघांनाही तोड नाही.

भुमन्यु's picture

18 Dec 2013 - 7:51 pm | भुमन्यु

सचिन पिळगावकर नंतर तुम्हीच एक सचिन.>>>>>

हे सचिन नाही तर "सची...न" आहेत.

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2013 - 5:55 pm | टवाळ कार्टा

मिपा सध्ध्या मार्केटिंग साठी वापरले जाते का??

शिद's picture

18 Dec 2013 - 6:01 pm | शिद

सच्च्चिन...सच्च्चिन...
मस्त विषय निवडला...आता शतकासाठी शुभेच्छा...

बाकी हे पटले.

शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

क्लिंटन's picture

18 Dec 2013 - 6:11 pm | क्लिंटन

कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी

+१. असेच होणार. काँग्रेसला स्वबळावर कमितकमी साडेतीनशे जागा मिळणार.

भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत

-१. भाजपला १९८४ मध्ये २ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षाही कमी जागा मिळणार. एखादी जागा मिळाली तरी भाजपने स्वतःला धन्य समजावे.

तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव

ती वेळ येणारच नाही.वरच म्हटले आहे की काँग्रेसला कमीतकमी साडेतीनशे जागा मिळणार आहेत.

शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

अगदी अगदी

बाकी सचीनरावांचा हा लेख म्हणजे मी मिपावर आजपर्यंत वाचलेला सर्वोत्तम लेख आहे. मी आजपासून सचीनरावांचा मोठ्ठा फॅनच झालो आहे :)

आनन्दा's picture

19 Dec 2013 - 12:02 pm | आनन्दा

मराठीत "इन्फिनिटी" चे चिह्न कसे काढतात हो?

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 6:30 pm | मुक्त विहारि

खालील ३ वाक्यांनी पार त्रिफळाचीतच झालो आहे...

"१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी

२)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव

३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात."

ग्रेटथिन्कर's picture

24 Dec 2013 - 11:38 am | ग्रेटथिन्कर

त्यात त्रिफळाचित व्हायचे कारण काय...दिल्लीत 'आप'ने बीजेपीचेला खिजगणीतही ठेवले नाही, सर्वात मोठा पक्ष असून....याला म्हणायचे क्लीन बोल्ड करणे..
फक्त आठ जागा असुनही काँग्रेस चर्चेत आहे व बीजेपीला दिल्लीत कुणीच विचारत नाही, याला म्हणायचे 'राजकारण'.. ते कधी भाजपला जमले नाही...

सुहासदवन's picture

24 Dec 2013 - 12:37 pm | सुहासदवन

यालाच म्हणतात पुरोगामीपणा.....

देशाचे भले करायचे असेल तर पुरोगामी पणा आवश्यक आहे.

अनुप ढेरे's picture

25 Dec 2013 - 7:14 pm | अनुप ढेरे

पुरोगामी म्हन्जी??

ढेरेजी पुरोगामी म्हणजे ठावूक नाय हो तुम्हास्नी ? पुरोगामी म्हंजी

पुरोगामी!

बॅटमॅन's picture

25 Dec 2013 - 10:04 pm | बॅटमॅन

स'चीन'जी यांच्या हो ला हो म्हटले की झाले पुरोगामी, हाकानाका.

मंदार दिलीप जोशी's picture

27 Dec 2013 - 1:41 pm | मंदार दिलीप जोशी

गडे सांगाना पुरोगामी पणा म्हणजे काय

होबासराव's picture

18 Dec 2013 - 7:05 pm | होबासराव

सचिन
तुम्हाला आणि कॉंग्रेसला आगाऊ शुभेछा.
तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फारच अभ्यासपुर्ण असतात, आपण हा लेख दिग्विजय किंवा राहुल गांधि ह्याना ईमेल केल्यास भारताचे पुढिल होम मिनिस्टर तुम्हिच असाल आणि रेल्वे मंत्रि आपले आदरणिय लालु प्रसाद असतिल.
फारच रोचक महिति.

होबासराव's picture

18 Dec 2013 - 7:14 pm | होबासराव

"लालूजी धर्मांधाना रोखण्यासाठी जनता तुमच्या बरोबर आहे. सत्ता कॉंग्रेस नाही तर तिसर्या आघाडीचीच येणार ह्यात शंका नाही."
ईथे आपण जे भाकित वर्तवले त्यानुसार तिसरी आघाडि येणार आहे, तुमचे उद्याचे भाकित (भाबडे) मुस्लिम लीग (नवाज शरीफ) भारतात सरकार स्थापन करेल हे असणार आहे.

तुमची भाकिते माझ्या नावावर खपवू नका

होबासराव's picture

18 Dec 2013 - 7:28 pm | होबासराव

पप्पु पास हो गया असे म्हणावे लागेल असे झाले तर.. पण पहिले काँग्रेस राहुल किंवा सोनिया ह्यांचे नाव तर त्या पदा साठि जाहिर करु दे.

विकास's picture

18 Dec 2013 - 7:29 pm | विकास

लेखकाने मुद्दे एकदम अचूक मांडले आहेत. फक्त अजून एक होईल याची मनोमन खात्री आहे... मा. राष्ट्रपती, हे श्री. लालूप्रसाद यादव यांना माफ करतील आणि जे काही धर्मांध शक्तींनी त्यांना (म्हणजे श्री. लालूप्रसाद यांना) खोट्या चाराघोटाळ्यात अडकवले आहे त्यातून बाहेर काढतील. एकदा का तो वाघ मोकळा झाला की काय विचारता! भाजपा, शिवसेना, मनसे आणि तमाम पक्ष आणि त्यातील कमकुवत नेत्यांची ऐशीतैशी होईल. त्यानंतर वडीलकीच्या आणि राजकीय गुरूच्या नात्याने श्री. लालूप्रसाद हे नवीन उमेदीच्या पंतप्रधान श्री. राहूलजी गांधी यांना नेतृत्वाचे मार्गदर्शन करतील. मग भारतवर्षात रामराज्यासारख्या खुळचट कल्पना लोप पावतील आणि लालूराज्य साकार होईल.

(अवांतर - मालकांना विनंती: जसे नवे लेखन करताना विडंबन म्हणून वर्गीकरण करता येऊ शकते, तसेच प्रतिसादांचे पण विडंबन/उपरोध वगैरे म्हणून वर्गीकरण करणे अथवा टॅग लावणे शक्य करा की साहेब! ;) )

सचीन's picture

25 Dec 2013 - 8:55 pm | सचीन

बरोबर आहे..

होबासराव's picture

18 Dec 2013 - 7:31 pm | होबासराव

हसुन हसुन पुरेवाट झालिय हा लेख वाचुन.... आपण विनोदि कथा लेखन करावे अशी एक विनंति.

होबास राव एका प्रतिक्रियेत तुम्ही लिहता कि माझे लेख अभ्यासपूर्ण असतात एकात लिहिता कि विनोदी असतात.तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या प्रतिक्रियाही मला विनोदी वाटू लागल्यात.

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2013 - 9:19 pm | टवाळ कार्टा

अजुन किती विनोदी लिहिणार हो =))

यसवायजी's picture

25 Dec 2013 - 10:43 pm | यसवायजी

एखादा हसुन हसुन मेला तर सच्चीनजी, तुम्ही आणी तो पप्पू जबाबदार..

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2013 - 1:27 am | डॉ सुहास म्हात्रे

+D

होबासराव's picture

18 Dec 2013 - 7:41 pm | होबासराव

अहो मालक तुम्हि माझी पहिलि प्रतीक्रीया बघा..ह्याला उपरोध असे म्हणतात.

अरेच्च्या उपरोध असा असतो काय! माफ करा होबस्राव

चालू द्या तुमचा उपरोध!

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2013 - 9:19 pm | टवाळ कार्टा

बाकी काहिही असुदे....पण काय ही विनम्रता

चौकटराजा's picture

18 Dec 2013 - 9:20 pm | चौकटराजा

तमचे हे सर्व अंदाज म्हणजे तुमच्या द्रष्टेपणाचा खणखणीत पुरावा आहे ! त्यात काळानुसार ९६ दुरूस्त्या येऊ नयेत म्हणून
मनापासून शुभेच्छा !

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 9:25 pm | मुक्त विहारि

मिपाचे भाग्य फार थोर आहे....

आजकाल हे असे जबरद्स्त..द्रष्टे मिळत नाहीत....

वरील प्रतिसाद हा चौरा काकांना असल्याने इतर जणांनी नाहक आपापला आणि माझा वेळ फुकट घालवू नये, ही नम्र विनंती.

अहो भावी घटनाकार आहेत चौरा काका. द्रष्टे असायचेच. एकही चूक न करता बिनचूक अशी दुरुस्त्या न करावी लागणारी घटना लिहिणार आहेत ते देशासाठी .

ह्या निमीत्ताने आपल्याला वाचता येत नाही, हे पण समजले...

असो...

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2013 - 10:36 pm | टवाळ कार्टा

खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी

चौकटराजा's picture

19 Dec 2013 - 10:01 am | चौकटराजा

आपण अगदी घटनाकार वगैरे भूषवायला तयार नाही, पण सचिन शेठ कॉण्त्याही एका पक्षाला ( कारण आम्ही कोण्तीही एक टोपी डोक्यावर आंधळेपणाचे लावलेली नाही ) येत्या शंभर वर्षात " दो तिहाई" बहुमत मिळाले तर एकही नया पैसा न घेता घटनासमितीत काम करू व मुख्य म्हणजे त्या घटनेने काही विपरित परिंणाम झाले तर त्या प्रमाणात त्याचे उत्तरदायित्व आमचे असेल असे मृत्यू पत्रात आवर्जून लिहू !

सचीन's picture

19 Dec 2013 - 12:00 pm | सचीन

एकही नया पैसा न घेता घटनासमितीत काम करू व मुख्य म्हणजे त्या घटनेने काही विपरित परिंणाम झाले तर त्या प्रमाणात त्याचे उत्तरदायित्व आमचे असेल असे मृत्यू पत्रात आवर्जून लिहू ! >>>>>> नव घटनाकार काका मी गम्मत करत होतो गंभीर होवू नका .मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचे सरकार तुम्हाला विनामुल्याही घटना समितीत काम करायला घेईल.

अद्द्या's picture

19 Dec 2013 - 12:09 pm | अद्द्या

मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचे सरकार तुम्हाला विनामुल्याही घटना समितीत काम करायला घेईल.

हे मात्र अगदी बरोब्बर बोललात साहेब . .
विनामूल्य कसं कोणी समितीत घेईल . काही तरी "सेवा" करावीच लागेल .

चौकटराजा's picture

19 Dec 2013 - 2:20 pm | चौकटराजा

अरे वा ! तुमचे सगळे धागे गमतीने घ्यायचे हे सांगितलेत हे बरे केलेत ! हाबिनंदण ! हे आलेले जोकपाल ठरले तर त्या पदावर मग तुमचीच नियुकी होणार ब्वा ! तय्यारी जोरात चालू आहे ब्याकग्रांउंडची ! परत येकदा हाबिनंदण .पण एका
ड्रायव्हरने अर्धवट का होईना केला ना इतिहास निर्माण? कोठलेही रिझर्वेशन न मागता !

कोठलेही रिझर्वेशन न मागता ! ?>>>>>>>>>>>>>>>>>>>>

काका तुमच्या नेमके पोटात कशामुळे दुखते ते कळाले?

चौकटराजा's picture

20 Dec 2013 - 7:19 am | चौकटराजा

काका तुमच्या नेमके पोटात कशामुळे दुखते ते कळाले?
हे आपले विधान आहे की प्रश्न ?
बर असो, आरक्षणाला विरोध अशासाठी की तोच रोग आता किती पसरत चालला आहे हे आपण पहातच आहात ! एवढे करून
" त्यांच्या" तोडीचा एक तरी नेता गेल्या साठ वर्षात आरक्षणाने जन्माला घातला का?

अमोल मेंढे's picture

20 Dec 2013 - 2:14 pm | अमोल मेंढे

" त्यांच्या" तोडीचा एक तरी नेता गेल्या साठ वर्षात आरक्षणाने जन्माला घातला का?

म्हणजे कुणाच्या?

मृत्युन्जय's picture

20 Dec 2013 - 2:24 pm | मृत्युन्जय

चौरा मला वाटाते प्रश्न चुकीचा आहे. तसा तर गांधीजींच्या तोडीचाही एकही नेता सवर्णांमधुन गेल्या ६० वर्षात निघालेला नाही. गेल्या ४०० वर्षात एकही शिवाजी निपजलेला नाही. महान नेता रोज जन्म घेतच नसतो.

चौकटराजा's picture

20 Dec 2013 - 6:06 pm | चौकटराजा

आमच्या वाक्यातून हेच ध्वनित करायचे आहे की प्रगतिसाठी जर नेता लागत असेल तर तो एकाद्या क्षेत्रात आरक्षण निर्माण
करून होत नाही. कष्ट करण्याची वृती, मेधा, कल्पकता, सचोटी, हे गुण नैसर्गिकतः च येतात .ते ही आरक्षणातून येत नाहीत.आरक्षण तिथेच असावे जिथे वरील सर्व गुण समान असता संधी मर्यादित आहे तिथे गरीब माणसास प्रथम संधी मिळावी.जातीच्या आधारे नव्हे ! अशाने धर्म जात या कल्पना उलट गडद होत चालल्या आहेत.

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 9:21 pm | मुक्त विहारि

क्रुपया कुणाच्याही नावाची जाहीर चिरफाड करू नका, ही विनंती आहे.

त्यांचे नांव "होबासराव" असे आहे.

(का कुणास ठावूक पण जुन्या मालकांची आठवण झाली.)

हुप्प्या's picture

18 Dec 2013 - 10:03 pm | हुप्प्या

महाराणीजी असे जाहीर करतील की देशातले सर्व लोक समान आहेत. फक्त गांधी घराणे जास्त समान आहे त्यामुळे ह्यापुढे निवडणुका वगैरे भानगडी न ठेवता सर्वानुमते त्या जास्त समान घराण्यातला कोणीतरी सत्तेवर यावा.
त्यामुळे खर्चिक निवडणुका टळतील आणि देशाची भरभराट होऊ लागेल. आणि देश ज्यांनी एकहाती घडवला आहे त्यांचीही!

संपादित

हुप्प्या तुम्हालाही सोनियांना महाराणी म्हणावे लागते ह्यातच सगळे आले

संपादित

निमिष ध.'s picture

18 Dec 2013 - 10:04 pm | निमिष ध.

अत्यन्त मनोरजंक लेख आवडला. एक प्रश्न विचारू का? ते जाक्पोट चित्रपट वाले सचीन आपणच का?

विनायक प्रभू's picture

18 Dec 2013 - 10:20 pm | विनायक प्रभू

नॉस्टर् डंबस

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 10:46 pm | मुक्त विहारि

"नॉस्टर् डंबस"

प्रभू काकांनी "आंजा"ला नविन शब्द बहाल केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2013 - 1:29 am | डॉ सुहास म्हात्रे

नॉस्टर् डंबस की नॉस्टर् डँबीस??? :)

अर्धवटराव's picture

18 Dec 2013 - 10:29 pm | अर्धवटराव

आंधळ्या मोदीभक्तांनी कितीही उपरोधीक लिखाण केलं तरी सत्य बदलणार नाहि. उपरोध करताना देखील काहि क्वालिटी जपावी लागते. शरद पवार साहेबांना खड्यासारखं बाजुला काढलं प्रधानमंत्रीपदाच्या यादीतुन. तिसर्‍या आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच बनेल.

संग्राम कदम's picture

18 Dec 2013 - 11:05 pm | संग्राम कदम

काँग्रेसच सत्तेत यावी.

साऱ्या गोरगरीब,धर्मनिरपेक्ष, अल्पसंख्यांक,देशाच्या विकासाच्या बाजूने असणार्यांमुळे काँग्रेसचेच राज्य येणार. ह्यात शंका नाही .

निल्या१'s picture

18 Dec 2013 - 11:15 pm | निल्या१

ई सकाळ व आता मिसळपाववरही प्रधानमंत्री हा हिंदी शब्द मराठी लोक सर्रास वापरताना दिसतात. मराठीत पंतप्रधान असा शब्द असताना लोक हिंदी माध्यमांचे अनुकरण करत प्रधानमंत्री हा शब्द का वापरायला लागलेत हे अनकालनीय आहे. प्रधान व मंत्री हे दोन्ही शब्द मराठीत अस्तित्वात असले तरीही प्रधानमंत्री हा शब्द हिंदीच आहे.

लोटीया_पठाण's picture

18 Dec 2013 - 11:22 pm | लोटीया_पठाण

ब्रिगेड चा फतवाच आहे तसा …प्रधानमंत्री शब्द वापरण्याबद्दल. पंत या शब्दामुळे त्याचं पित्त खवळतं.

शिद's picture

19 Dec 2013 - 3:04 am | शिद

_/\_

सचीन's picture

25 Dec 2013 - 8:57 pm | सचीन

पंत प्रधान पेक्षा प्रधानमंत्रीच योग्य वाटते.

खटपट्या's picture

19 Dec 2013 - 4:19 am | खटपट्या

देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

याचे स्पष्टीकरण द्याल काय ?

कॉंग्रेस वगळता इतर पक्षांचे आलेले राज्य

खटपट्या's picture

21 Dec 2013 - 1:02 pm | खटपट्या

म्हणजे कोन्ग्रेस ने नियोजनबद्ध विकास केला. आणि जो काही "विकास" केला त्यास ६० वर्षे लागली? आपल्या बरोबरच जपानलाही स्वातंत्र मिळाले (चू, भू, द्या घ्या) पण मला नाही वाटत जपानला आपला एवढा "विकास" करता आला. मागासलेलाच राहिला बिचारा नै.

जपानचे लोक सज्जन आहेत त्यांनी आपल्यासारख्या दुनियाभरच्या जाती निर्माण नाही केल्यात

खटपट्या's picture

22 Dec 2013 - 10:07 pm | खटपट्या

जातींचा आणि विकासाचा काय सम्बध ? आणि आपल्याकडे सर्व दुर्जनच आहेत का ?

जातीचा आणि विकासाचा काहीच संबंध नाही? बरोबर आहे आपले. *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

खटपट्या's picture

25 Dec 2013 - 11:53 pm | खटपट्या

तुमच्या हसण्याला माझी हरकत नाही पण तुम्ही का हसताय ते पण सांगा म्हणजे मी पण हसेन !!!

मंदार दिलीप जोशी's picture

19 Dec 2013 - 10:49 am | मंदार दिलीप जोशी

पप्पूच्या निमित्ताने भारताला एक नवा विदूषक लाभला आहे. सत्ता कुणाचीही आली तरी राष्ट्रीय विदूषक या पदासाठी पप्पू आणि लालू यांच्यात पहिल्या व दुसर्‍या स्थानासाठी स्पर्धा राहील हे नक्की. ;)

श्रीगुरुजी's picture

19 Dec 2013 - 2:27 pm | श्रीगुरुजी

>>> पप्पूच्या निमित्ताने भारताला एक नवा विदूषक लाभला आहे. सत्ता कुणाचीही आली तरी राष्ट्रीय विदूषक या पदासाठी पप्पू आणि लालू यांच्यात पहिल्या व दुसर्‍या स्थानासाठी स्पर्धा राहील हे नक्की.

दिग्विजयला विसरलात की काय? आणि चेहरा कोरा ठेवून विनोद करणारे म.मो.सिंग कितव्या क्रमांकावर असतील? भ्रष्टाचाराची कितीही गंभीर प्रकरणे बाहेर आली तरी चेहरा कोरा ठेवून "भ्रष्टाचार्‍यांची अजिबात गय करणार नाही", "आमच्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही", "दोषींना शिक्षा होईल" अशी छापील वाक्ये उच्चारतात तेव्हा खेदाने का होईना पण हसू आल्याखेरीज रहात नाही.

संग्राम कदम's picture

20 Dec 2013 - 6:13 pm | संग्राम कदम

राष्ट्रीय फेकू ऑलंपियाडमध्ये फेकूचाच नंबर पैला येणार...

दैत्यापेक्षा विदुषक बरा!

श्रीगुरुजी's picture

20 Dec 2013 - 1:54 pm | श्रीगुरुजी

आता वर दिलेल्या नावांपैकी (पप्पू, दिग्विजय, लालू, म.मो. सिंग वगैरे) कोण कोणापेक्षा बरा आहे?

अद्द्या's picture

19 Dec 2013 - 11:58 am | अद्द्या

लोक एकतर स्वतः अंधळे असतात .
किंवा दुसऱ्यांना समजतात . .

लेखकाला दंडवत __/\__

सचीन's picture

19 Dec 2013 - 3:50 pm | सचीन

सुखी राहा

श्रीगुरुजी's picture

19 Dec 2013 - 2:17 pm | श्रीगुरुजी

पुन्हा एकदा जबरदस्त विनोदी लेख! वाचताना पोट धरधरून हसत होतो. हे असे एकापाठोपाठ एक दर्जेदार व निखळ विनोदी लेख यांना सुचतात तरी कसे!!

सचीनराव, अजून विनोदी लेख येऊ द्यात. आम्ही वाट बघतोय.

कालपासून दहावेंदा वाचतोय हा लेख . .

प्रत्येकवेळी तेवढाच हसतोय . .

एकदा कोन्ग्रेसी झाल्यावर लोकांना खरंच काही दिसत नाही का?
फक्त गांधी घराण्याचा पायचाटेपणा करणे . एवढेच समजते का?

श्रीगुरुजी's picture

20 Dec 2013 - 2:03 pm | श्रीगुरुजी

>>> शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

लोकशाही जपणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात हुकूमशाही आहे त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत.

देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, मुस्लिमांचे लांगूललाचन इ. ला सर्वोच्च प्राधान्य आहे. विकास हा मुद्दाच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत.

धर्मनिरपेक्ष - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्ष जातीयवादी आहेत. मुस्लिमांचे लांगूलचालन, जातीजातीत भांडणे लावणे, दुर्बल जातींवर अत्याचार हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत.

मानवी विकासाची जाण असणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात स्वतःची तुंबडी भरण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. देशाचे वाटोळे झाले तरी चालेल आम्ही लुटालूट करत राहणार हे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत.

>>> शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

असे गुण असणारा सध्या भाजप हा एकमेव पक्ष दिसतो.

सचीन हे भाजपवाले दिसतात. त्यामुळे आपल्या पक्षाचे नाव न घेता ते भाजपला मते द्या असा प्रचार करत आहेत.

लोकशाही जपणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात हुकूमशाही आहे त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत.>>>>>>>>>>>>>>ह्या सर्व पक्षांचे प्रमुख स्वत जनतेतून निवडून येतात त्यांना नागपूरच्या आदेशाची वाट पहावी लागत नाही

मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे काय हो गुर्जी ?

असे गुण असणारा सध्या भाजप हा एकमेव पक्ष दिसतो.>>>>गुर्जी तुम्ही विनोदी आहात

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2013 - 5:40 pm | श्रीगुरुजी

>>> ह्या सर्व पक्षांचे प्रमुख स्वत जनतेतून निवडून येतात त्यांना नागपूरच्या आदेशाची वाट पहावी लागत नाही

कोणत्या पक्षाचे प्रमुख जनतेतून निवडून आलेले नाहीत? मौनमोहन सिंग कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते/आहेत्/येतील?

>>> मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे काय हो गुर्जी ?

हा प्रश्न म्हणजे "भ्रष्टाचार म्हणजे काय?" असं कॉग्रेसने विचारल्यासारखं किंवा अतिरेकी म्हणजे काय असं कसाबने विचारण्यासारखं आहे.

>>>> गुर्जी तुम्ही विनोदी आहात

तुमच्या तुलनेत काहीच नाही.

मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे काय हो गुर्जी ?

आनन्दा's picture

24 Dec 2013 - 11:20 am | आनन्दा

लांगूलचालन म्हणजे साध्या मराठीत "शेपटी हलवणे"

मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे काय ?

हाडक्या's picture

24 Dec 2013 - 9:23 pm | हाडक्या

@ गुर्जी.. आवो त्ये तुमच्या स्पेलिंग मिष्टेक वरनं तुमची टांग वडायला बगतंया.. :) .. :)

गुर्जी तुम्ही विनोदी आहात

तुमच्या तुलनेत काहीच नाही.>>>>>>>>>>>>>

काय हा विनम्रपणा ..

गुर्जी मुस्लिमाचे लागुलचालन म्हणजे काय ?

माफ करा गुर्जी चुकून बरोबर शब्द लिहिला पण एक कळले नाही

मुस्लिमाचे लागुललाचन म्हणजे काय

श्रीगुरुजी's picture

25 Dec 2013 - 5:35 pm | श्रीगुरुजी

>>> पण एक कळले नाही

तुम्हाला अजून बर्‍याच गोष्टी कळत नाही. पण त्यात तुमचा दोष नाही. असो.

>>> मुस्लिमाचे लागुललाचन म्हणजे काय

या विषयात ग्रेटथुंकर हे तज्ञ आहेत. आम्ही काहीही लिहिले तरी भाजपवाल्याने लिहिले म्हणून ते तुम्ही पटत असून सुद्धा नाही म्हणणार. त्याऐवजी ग्रेटथुंकरच् तुमचे शंकासमाधान करतील.

ग्रेटथुंकर - नुस्लिमांचे लांगूलचालन म्हणजे काय हे जरा समजावून सांगा हो या अज्ञ बालकाला.

ते असतील हो ग्रेट थीन्कर आम्हाला मात्र गुर्जी कडूनच शिकायचेय.

सांगाना गुर्जी मुस्लिमांचे लांगुलचालन म्हणजे काय?

श्रीगुरुजी's picture

25 Dec 2013 - 4:29 pm | श्रीगुरुजी

>>> त्यांना नागपूरच्या आदेशाची वाट पहावी लागत नाही

इटलीहून येणारे आदेश पाळण्यापेक्षा नागपूरचे आदेश केव्हाही चांगले.

सचीन's picture

25 Dec 2013 - 8:59 pm | सचीन

इटलीहून येणारे आदेश पाळण्यापेक्षा नागपूरचे आदेश केव्हाही चांगले.*crazy* *CRAZY* :crazy: