बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच.
बर्याच जणांना असे वाटते कि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच लालुना बाहेर काढले असावे?काय असेल ते असो मात्र लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. लालू प्रसादांची धडाडी , बेदरकारपणा मला आवडतो.
बाबरी मस्जिद पतनानंतर अक्ख्या देशभर दंगे पेटले होते अपवाद बिहारचा.आपले राज्य दंगलमुक्त राखण्यात तेव्हा लालूंनी मोठी भूमिका बजावली होती.
महाराष्ट्र स्वताला पुरोगामी राज्य समजते ते अक्षरशः दंगलीच्या आगीत पोळत होते. माणुसकीचा, माणसाचा मुखवटा गळून पडला होता नि आतले हिस्त्र श्वापद दिसत होते विरुद्ध धर्मियाच्या नरडीचा घोट घ्यायला चटावलेले. आपले तीक्ष्ण सुळे पाजळत वाट पाहत असलेले दुसऱ्या जमातीची... आतुरतेने. त्यांच्या रक्ताने आपला धार्मिक कंड शमवायला. मग ती निरागस पोरेबाळे असोत कि पुढील आयुष्याचे स्वप्न मनाशी रंगवणारी नवयुवती. धार्मिक श्वापदे त्यांचा फडशा उडवून दुसरा नरबळी शोधायला जात....पुरोगामी ? म्हणवणाऱ्या राज्यांची हि अवस्था तर बिहार सारख्या राज्यांचे हाल काय होतील.
पण तेव्हा मोठ्या निग्रहाने लालुप्रसादानी दंगल बिहार मध्ये होवू दिली नाही त्यांच्यातील कठोर प्रशासकाचे ते एक रूप नक्कीच सुखावणारे होते.
प्रतिक्रिया
14 Dec 2013 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
जगात भाटांची कमतरता कधीच नव्हती. पण उत्तम भाट मिळणे मात्र नेहमीच कठीण होते. तेव्हा ह्रार्दीक हाबिणंदण !
येथेही एक छोटासा संदेश आहे
15 Dec 2013 - 5:52 am | चौकटराजा
सचिन यांचे या उपलब्धी बद्द्ल अमच्या कडूनही अभिनंदन ! लालू प्रसाद जर तुरुंगात गेलेच तर या भाटगिरीच्या आधारावरच ते सुखात राहतील तेथे ! बाकी त्यांच्या खटल्याचा निकाल सुप्रिम कोर्टात कधी लागायचा ......? की सध्या
जे काय चालले आहे त्यातच सचिनबुवा खुष आहेत. मला असे वाटते की लालूप्रसादना शिक्षाच व्हायला नको कारण त्याने
भारातातील ६००० जातींच्या भावना दुखावतील !
15 Dec 2013 - 9:51 am | टवाळ कार्टा
फटु आनी त्यो प्ल्येक्ष राह्यला की ....
15 Dec 2013 - 9:55 am | मुक्त विहारि
आली लहर, घेतला मिपाचा सर्व्हर.
होवू दे शाब्दिक खर्च....
15 Dec 2013 - 8:22 am | सुहासदवन
एक तो सचिन ज्याच्या मास्टरस्ट्रोकवर आपण फिदा होतो आणि आता त्यानंतर तुम्हीच.
त्या सचिनच्या अस्तानंतर झालेला ह्या सचीनचा उदय, आम्हांस जाणवणारी त्या स्ट्रोक्सची पोकळी तुमचे हे लेख भरुन काढतील ह्यात शंकाच नाही.
15 Dec 2013 - 9:30 am | मुक्त विहारि
?
15 Dec 2013 - 2:11 pm | सचीन
लालू हे चार घोटाळ्यात दोषी असतील तर न्यायालय त्यांच्या योग्य तो न्याय करेलच. पण लालूंचे इतर गुणही महत्वाचे आहेत ते कसे दुर्लक्षित केले जावू शकतात. लालू जर भ्रष्ट असतील तर ते प्रधान मंत्री होवू नयेत हे स्पष्ट आहे. भ्रष्ट आणि दंगलखोर नेते प्रधानमंत्री होवू नये असे मनापासून वाटते..
18 Dec 2013 - 6:23 pm | मंदार दिलीप जोशी
बरोबर आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींमधे आरोपी असलेले जगदीश टायटलर, ललित माखन, सज्जन कुमार, हरकिशनलाल भगत इत्यादी ज्या पक्षाचे आहेत त्यापक्षाचे सर्वोच्च नेतेही पंतप्रधानपदाच्या लायकीचे नाहीत मग. बरोबर ना?
दंगलींनंतर तसंही राजीव गांधी म्हणाले होते, एक मोठा वृक्ष पडतो तेव्हा जमीन हादरतेच. तरी ते झालेच की पंतप्रधान.
15 Dec 2013 - 2:12 pm | सचीन
जे काम चांगले केले त्याला चांगले म्हणायला कसली डर.लालू भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले असले तरी त्यांनी दंगलीत बिहार मध्ये दंगल होवू न देता जे लाखो निरपराध जीव वाचवले त्याचे मोल कमी होईल का ?
15 Dec 2013 - 2:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमचं एक सोडा... झोपेचं सोंग घेतलेल्याला आम्ही काय उठवणार, महाग्रेट (तुमच्या मते) लालूप्रसाद यादवही ते करू शकणार नाहीत ! जर ते मिपा वाचत असतील तर हसून हसून पोटदुखीने बेजार होऊन हॉस्पिटलमध्ये भरती होतिल... त्यांना तुमचे लेख ईमेल कराच ही आग्रहाची विनंती.
मात्र अजून एक नक्की, लालू हॉस्पिटलमध्ये जाण्याअगोदर इतका 'ग्रेट' अंधानुयायी दिल्याबद्दल त्यांच्या इष्टदेवतेला चढावा चढवण्यासाठी प्रथम देवळात जातिल.
मेरा भारत महान !
अजून एकः एकाची चूक दाखवून दुसर्याची चूक माफ होते समजणार्याला काय म्हणायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. आमच्या मते दोघांचीही कायदेशीररित्या उघड चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे.
18 Dec 2013 - 6:24 pm | मंदार दिलीप जोशी
:P
15 Dec 2013 - 2:31 pm | प्यारे१
>>>>महाराष्ट्र स्वताला पुरोगामी राज्य समजते ते अक्षरशः दंगलीच्या आगीत पोळत होते. माणुसकीचा, माणसाचा मुखवटा गळून पडला होता नि आतले हिस्त्र श्वापद दिसत होते विरुद्ध धर्मियाच्या नरडीचा घोट घ्यायला चटावलेले. आपले तीक्ष्ण सुळे पाजळत वाट पाहत असलेले दुसऱ्या जमातीची... आतुरतेने. त्यांच्या रक्ताने आपला धार्मिक कंड शमवायला. मग ती निरागस पोरेबाळे असोत कि पुढील आयुष्याचे स्वप्न मनाशी रंगवणारी नवयुवती. धार्मिक श्वापदे त्यांचा फडशा उडवून दुसरा नरबळी शोधायला जात....पुरोगामी ? म्हणवणाऱ्या राज्यांची हि अवस्था तर बिहार सारख्या राज्यांचे हाल काय होतील.
रत्नाकर मतकरी, नारायण धारप आठवले.
छान लिहीता तुम्ही. भयकथा ट्राय करा.
15 Dec 2013 - 2:33 pm | सचीन
दंगलीतला धार्मिक उद्रेक बघितला तर त्यापेक्षा भयकथा रम्य वाटू लागतात प्यारे>
15 Dec 2013 - 2:43 pm | प्यारे१
त्याहून जास्त उद्रेक अशा प्रकारच्या खोट्या नि दुर्दैवी प्रचाराने होत असतो, झालेला आहे.
बाकी सुरुवात बहुतेकदा का नि कशी होते हे आम्हाला सांगितलं नाहीत तरी आपणास ठाऊक असावंच.
मिरजेच्या दंगली कशा सुरु झाल्या ३-४ वर्षांपूर्वीच्या? पुन्हा तोच विषय काढून साध्य काय करणार आहोत ?
बाकी बिहारमध्ये लालू नि त्याची पिलावळ हेच सगळ्यात मोठे गुंड आहेत.
तेच राज्य चालवत असताना कशी बरं दंगल होईल? बहुतांश सगळीकडे तसंच म्हणता येईल. :)
15 Dec 2013 - 2:47 pm | सचीन
धार्मिक वातामुळे मुंबईत सामान्य माणूस हि दंग्यात उतरला होता. दंग्यात फक्त गुंडच उतरतात ह्या समजाला तडा दिला बाबरी पतनाच्या दंग्याने. देशाला मागे नेण्याचे कार्य ह्या दंगलीने केले होते .
15 Dec 2013 - 8:52 pm | श्रीगुरुजी
तुफान विनोदी लेख! हसून हसून पुरेवाट झाली. 'सचीन' एकापाठोपाठ एक आणि 'एक से बढकर एक' विनोदी लेख पाडत आहेत. पु.ल. देशपांड्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी १३ वर्षांनी पूर्ण भरून निघाली याचा मनोमन आनंद वाटतो. गेल्या दहा हजार वर्षात इतका विनोदी लेख वाचला नव्हता.
सचीन, पुलेशु. असेच विनोदी लेख पाडत जा. आमची मस्त करमणूक करा. तुम्हाला विनोदी लेखांसाठी काही नवीन विषय सुचवतो. खालील विषयांवर विनोदी लेख पाडावे ही नम्र विनंती.
- सत्यवचनी, एकपत्नीव्रती आधुनिक राम अर्थात एन डी तिवारी
- राष्ट्रमाता सोनिया
- जाणता राजा पवारसाहेब
- अतिरेकी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ आबा ('आबां'च्या ऐवजी शिवराज पाटील हे नाव सुद्धा चालेल)
- कणखर तरीही मृदु, कर्तव्यकठोर प्रशासक मनमोहन सिंग
.
.
.
अजून बरेच विषय आहेत. सध्या एवढेच लिहा. आणि फार हसवू नका.
16 Dec 2013 - 4:30 am | मोदक
अजून बरेच विषय आहेत.
राष्ट्रीय मम्मी...सोनिया गाँधी
राष्ट्रीय रोबोट…मनमोहन सिंह
राष्ट्रीय गेम चेंजर…राहुल गांधी
राष्ट्रीय चिंता…सलमान की शादी
राष्ट्रीय रहस्य…सोनिया गांधी
राष्ट्रीय गिरगिट… मुल्लायम
राष्ट्रीय रथ यात्री…लालकृष्ण आडवाणी
राष्ट्रीय चुगलखोर…स्वामी अग्निवेश
राष्ट्रीय स्ट्रगलर…अभिषेक बच्चन
राष्ट्रीय दामाद… रॉबर्टवढेरा
राष्ट्रीय कोयल…मीरा कुमार
राष्ट्रीय गहनों की दुकान…बप्पी लहरी
राष्ट्रीय पागलखाना… बिग बॉस का घऱ
राष्ट्रीय हंसी… राहुल महाजन
राष्ट्रीय जासूस… दया
राष्ट्रीय गर्लफ्रेंड…दीपिका पादुकोण
राष्ट्रीय रईसज़ादा..सिद्धर्थ माल्या
राष्ट्रीय टेलीफोन ऑपरेटर…दिग्विजय सिंह
राष्ट्रीय गणितज्ञ…कपिल सिब्बल(जीरो लास)
राष्ट्रीय किसान – अमिताभ बच्चन
राष्ट्रीय मसखरा… लालू यादव
राष्ट्रीय इंतज़ार…राहुल का प्रधानमंत्री बनना
राष्ट्रीय दहशत…रा वन का सीक्वल
राष्ट्रीय गाली…आम आदमी
राष्ट्रीय हाथ… हरविंदर सिंह
राष्ट्रीय गाल… शरद पवार
राष्ट्रीय बहन-मायावती
राष्ट्रीय मां-बहन…राखी सावंत.
(चेपुवरून.)
16 Dec 2013 - 4:45 am | प्यारे१
राष्ट्रीय कार्यं नि कर्तव्यं पण आहेत काही, अखिल पुणे विचारवंत महासंघाकडून आलेली! ;)
16 Dec 2013 - 9:34 am | खटासि खट
राष्ट्रीय कोयल…मीरा कुमार (री)
या बाई बोलतात तेव्हां हसायला येतंच. प्लास्टीक सर्जरी केल्यासारखे कायम हसत असल्यासारखे गाल वर आलेले दिसतात. खासदारांना दटावताना त्या स्वतःच विनोद करतायेत असंच वाटतं.
24 Dec 2013 - 9:55 pm | बाप्पू
+१ सहमत… मीरा कुमारी ह्या बोलताना हसतात कि हसताना बोलतात… कि हसत हसत बोलतात ???
सचीन... लेख येउ द्या याबद्दल पण...
16 Dec 2013 - 1:11 pm | श्रीगुरुजी
>>> राष्ट्रीय चुगलखोर…स्वामी अग्निवेश
स्वामी अग्निवेश म्हणजे भगवे कपडे घातलेला दिग्विजय. दिग्विजयने भगवे कपडे घातले की तो अगदी अग्निवेशसारखा दिसेल किंवा अग्निवेशने खादीचे कपडे घातले की दिग्विजयचाच भास होईल इतके त्या दोघात साम्य आहे. दोघांचे चेहरे डोळ्यासमोर आणून बघा म्हणजे साम्य लक्षात येईल.
पण हे साम्य इथेच संपत नाही. दोघेही काँग्रेसचे दलाल, दोघेही भोंदू, दोघेही आचरटासारखे बरळणारे आणि दोघेही बेताल आरोप करणारे. दोघांनाही कोणीही गांभिर्याने घेत नाही. दोघेही मेंटल केस वाटतात.
16 Dec 2013 - 5:42 pm | चौकटराजा
राष्ट्रीय गाढव- पटत नसले तरी पद्म पुरस्कारामूळे मूग गिळून बसलेले सर्व तज्ञ मंडळी
राष्ट्रीय अपराधी- आयकर चुकविणारे, बेंकाची कर्जे थकविणारे, वीज चोरणारे, ट्रकमधला उस पळविणारे,कामात चालढकल करणारे, अहवाल दाबून ठेवणारे, सिलिंडर पेक्षा जास्त पैसे मागणारे,सिगनल तोडणारे. किमान थर्ड पार्टी इस्शुरन्स न काढणारे,ट्राफिक कडे लक्ष न देता गप्पा ठोकणारे,निवडणुकीत पिकनिकला जाणारे , कामगाराला ओ टी न देता फुकट जादा काम करून घेणारे ......म्हणजेच आपण सर्व .
16 Dec 2013 - 10:03 pm | सचीन
राष्ट्रीय दंगलखोर कोण असावे बरे? तज्ञांनी उत्तर द्यावे
17 Dec 2013 - 9:39 am | चौकटराजा
आम्ही वरच म्हटलंय या देशात मूळ गिळून बसतात ते तज्ञ ! बाकी सचिन हे नाव राष्ट्रीय दंगलखोर ला योग्य आहे !
एकाने ५० वर्षे पडद्यावर दंगल केली तर दुसर्याने मैदानावर ! एक आता मिपावर करीत आहे !
17 Dec 2013 - 12:44 pm | श्रीगुरुजी
>>> राष्ट्रीय दंगलखोर कोण असावे बरे? तज्ञांनी उत्तर द्यावे
अर्थात काँग्रेस आणि काँग्रेसी विचारांचे निधर्मांध पक्ष (म्हणजे राकाँ, समाजवादी, राजद, बसप वगैरे वगैरे).
सूचना - हे तज्ञांनी दिलेले उत्तर असल्याने या उत्तरावर शंका घेऊ नये.
30 Dec 2013 - 10:27 am | मंदार दिलीप जोशी
१९८४ च्या शीख दंगलीला जबाबदार असणारे टायटलर, सज्जनकुमार, माखन, हरकिशनलाल भगत आणि या सगळ्यांच्या पापांवर पांघरूण घालणारे "विशाल वृक्ष पडला की जमीन हादरतेच" असं निर्लज्जपणे सांगणारे राजीव गांधी.
30 Dec 2013 - 10:43 am | मंदार दिलीप जोशी
1947
Bengal….5,000 to 10,000 dead …CONGRESS RULE.
1967
Ranchi….200 DEAD……….CONGRESS RULE.
1969
Ahmedabad…512 DEAD……..CONGRESS RULE.
1970
Bhiwandi….80 DEAD………….CONGRESS RULE.
1979
Jamshedpur..125 DEAD……CPIM RULE (COMMUNIST PARTY)
1980
Moradabad…2,000 DEAD…CONGRESS RULE.
1983
Nellie Assam…..5,000 DEAD…CONGRESS RULE.
1984
anti-Sikh Delhi…2,733 DEAD…CONGRESS RULE
1984
Bhiwandi….146 DEAD….CONGRESS RULE
1985
Gujarat…..300 DEAD..CONGRESS RULE
1986
Ahmedabad……59 DEAD…..CONGRESS RULE
1987
Meerut….81 DEAD…CONGRESS RULE
1989
Bhagalpur……1,070 DEAD……CONGRESS RULE
1990
Hyderabad……300 PLUS DEAD….CONGRESS RULE
1992
Mumbai….900 TO 2000 DEAD….CONGRESS RULE
1992
Aligarh….176 DEAD…..CONGRESS RULE
16 Dec 2013 - 6:45 am | लॉरी टांगटूंगकर
गुरुजी, दुसर्या विषयावर लेख आला नाही अस वाटतंय???
15 Dec 2013 - 9:19 pm | सचीन
ह्या लेखात तुम्हाला काय विनोदी वाटले ?
15 Dec 2013 - 9:24 pm | श्रीगुरुजी
>>> ह्या लेखात तुम्हाला काय विनोदी वाटले ?
तुमचा नम्र स्वभाव आवडला. अहो या लेखातल्या प्रत्येक वाक्यात ठासून विनोद भरलेला आहे. तरी बरं लेख छोटा आहे. २-३ पाने असती तर हसून हसून प्राण कंठाशी आले असते.
15 Dec 2013 - 9:25 pm | सचीन
बिहारात दंगल झाली नाही नि महाराष्ट्रात झाली हा तुम्हाला विनोद वाटतो. दंगल त्यातील नरसंहार हा तुमच्यासाठी विनोदाचा विषय असावा
15 Dec 2013 - 9:29 pm | श्रीगुरुजी
तुम्ही केलेले महाराष्ट्रातल्या दंगलीचे वर्णन हा एक प्रचंड विनोद आणि बिहारात दंगल झाली नाही हा त्याहून मोठा विनोद!
धन्य आहे तुमच्या विनोदी स्वभावाची.
24 Dec 2013 - 9:56 pm | बाप्पू
+१ सहमत…
15 Dec 2013 - 9:34 pm | सचीन
बाबरी पतनानंतर मुंबईत मानवतेला फासणाऱ्या दंगली झाल्या लष्करास पाचारण करावे लागले होते परिस्तिथी काबूत आणायला.बिहार मध्ये मात्र लालुजीनी दंगल होवून दिली नाही अडवानींची रथयात्रा त्यांनीच रोखली.लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा.
16 Dec 2013 - 9:29 am | मुक्त विहारि
"लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा."
जबरा....
असेच उत्तम विचार तुमच्या मनांत येवो..
16 Dec 2013 - 1:25 pm | श्रीगुरुजी
>>> "लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा."
लालूच्या राजधर्म पालनाचे एक जबरदस्त उदाहरण आहे. लालूच्या थोरल्या लेकीचे लग्न १२-१३ वर्षांपूर्वी पाटण्यामध्ये झाले होते. लग्नाच्या वर्हाडी मंडळींसाठी लालूच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टाटा मोटर्सच्या शोरूम फोडून त्यातून बर्याच जीप, कार्स पळवून नेल्या. तसेच अनेक फर्निचरची दुकाने फोडून त्यातले नवे सोफासेट, बेड, खुर्च्या इ. घेऊन गेले. दुकान मालक पोलिसात गेल्यावर पोलिसांनी माणुसकीच्या भूमिकेतून उगाच दुकान मालकांना भविष्यात त्रास नको म्हणून तक्रारी घेतल्या नाहीत. लालूला हे समजल्यावर त्याचा संताप अनावर झाला. लग्न झाल्यावर लगेच सर्व फर्निचर, गाड्या जिथल्या तिथे नेऊन देण्याचा त्याने आदेश दिला. लग्न झाल्यावर ७-८ दिवसांनी लालूच्या कार्यकर्त्यांनी एका रात्री गुपचूप सर्व गाड्या, फर्निचर दुकानाबाहेरच्या फूटपाथवर नेऊन सोडले. ज्याच्या वस्तू घेतल्या त्याला परत करणे यालाच म्हणतात राजधर्माचे पालन.
16 Dec 2013 - 2:04 pm | मुक्त विहारि
अजून पण लोक लालूचे नांव घेतात....
लालूच्या काळात संध्याकाळी ५ वाजल्यापासून रस्ते बंद असायचे. इतका दबदबा होता पण पुढे नितीश कुमार ह्यांचे राज्य आले आणि लोक परत रस्त्यावर यायला लागले.आज काल रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत दुकाने वगैरे उघडी असतात...की ही पीछेहाट नाही, ह्या नितीशच्या राज्यात.
असो....
आपल्याला तर लालूच प्रिय.
16 Dec 2013 - 9:53 pm | सचीन
नशीब लालूंच्या काळात लोक घराबाहेरच पडायचे नाहीत असे लिहिले नाही.
16 Dec 2013 - 10:01 pm | सचीन
उत्कृष्ठ कल्पनाशक्ती चे उदाहरण
16 Dec 2013 - 11:33 pm | मुक्त विहारि
मी कल्पनाशक्ती लढवत नाही आहे.
तुम्ही स्वतः कधी बिहारला गेला असाल किंवा तुमचे काही बिहारी मित्र असतील तर त्यांना विचारू खात्री करून घेवू शकता.
16 Dec 2013 - 10:02 pm | सचीन
लालूच्या राजधर्म पालनाचे एक जबरदस्त उदाहरण आहे.>>>>>>>>>>>>>>उत्कृष्ठ कल्पनाशक्ती चे उदाहरण
24 Dec 2013 - 10:02 pm | बाप्पू
"अडवानींची रथयात्रा त्यांनीच रोखली"
बरयाच वेळेला हे एकच वाक्य बोलून दाखवताय.... अडवानींची रथयात्रा रोखणे हा काय चमत्कार आहे का? ती रथयात्रा रोखून त्यांनी असा काय पराक्रम केला ? जरा आपल्या विनोदी शैलीत स्पष्टीकरण द्या सचीन.…
16 Dec 2013 - 10:42 am | चौकटराजा
सचिन सारखे व ग्रेट थिंकर सारखे आय डी ही येथील शान आहे ! नाहीतर हे धागे एकांगी होतील. आमच्या सारखा घटनेत ही काही " रिडल्स" आहेत असे म्हणणारा इथे आवश्यक आहे त्या प्रमाणे १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारत देशात कोणतेही
" रिडल" नाही असे ठासून सांगणारे अभ्यासक ही येथे हवे आहेत. त्याशिवाय तत्वबोध नाही.
16 Dec 2013 - 11:42 am | मिनेश
>>>>"लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा."
तिकडेच जाउन राहत का नाही मग तुम्ही?????
16 Dec 2013 - 10:00 pm | सचीन
महाराष्ट्रातील सरकार हि राजधर्म पाळते.
17 Dec 2013 - 9:46 am | चौकटराजा
बाबा राज( गोपनीयता ) चे कारण सांगून रास्ट्रवादी ची गोची करताहेत असा जबाब कलिक यांचा दावा आहे !
याला म्हणतात राज धर्म. आदर्शचा आहवाल दाबून ठेवणे हे त्याचे एक रूप आहे !
16 Dec 2013 - 1:27 pm | श्रीगुरुजी
>>> सचिन सारखे व ग्रेट थिंकर सारखे आय डी ही येथील शान आहे
बाकी या वाक्यातील भावनेशी सहमत!
16 Dec 2013 - 2:47 pm | ऋषिकेश
इन एनी केस, सहा वर्षे खासदार बनता येणार नैचे लालुंना, हे काय कमीये?
बाकी एक "लोकनेता" म्हणून काही वर्षे त्यांनी गाजवली हे निर्विवाद,पण बदलत्या काळाबरोबर जुळवून घेऊ न शकलेल्या नेत्यांचेच असे नाही कोणत्याही व्यक्तीचे जे होते ते त्यांचे झाले आहे.
16 Dec 2013 - 10:42 pm | विकास
त्या गाजवलेल्या काळातील लीलाच त्यांना नंतर भोवत आहेत हे देखील निर्विवाद. ;)
16 Dec 2013 - 3:03 pm | बॅटमॅन
"लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा"
असे म्हणून धागाकर्त्याला लालू हे मनसेचे कार्यकर्ते आहेत असे सूचित करावयाचे आहे. लोकहो उगी पिडू नका त्यांना.
16 Dec 2013 - 9:58 pm | सचीन
लालू हे मनसेचे कार्यकते नसून मनापासून लोकसेवा करणारे कार्यकर्ते आहेत.
17 Dec 2013 - 12:49 pm | श्रीगुरुजी
>>> लालू हे मनसेचे कार्यकते नसून मनापासून लोकसेवा करणारे कार्यकर्ते आहेत.
*crazy* *CRAZY* :crazy:
तुमच्या लेखापेक्षाही तुमचे प्रतिसाद जास्त विनोदी आहेत.
17 Dec 2013 - 6:03 pm | मुक्त विहारि
लोकसेवा करणारे कार्यकर्ते आहेत.
असेल कदाचित तसेही असेल.
पण आजकाल लोकांना अशी लोकसेवा बघवत नाही.लालू बिचारे, लोकांची सेवा तर करत होतेच.लोकांना चोरांचा त्रास होवू नये म्हणून त्यांनी किती कष्ट घेतले हे लालू स्वतः काहीच सांगत नाहीत.खरे तर त्यांना मुख्यमंत्रीपद पण नको होते.केवळ लोकांचा आग्रह म्हणूनच त्यांनी ते स्वीकारले. केवळ लोकांच्या आग्रहासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीण केले.घराणेशाहीला लालूंचा किती विरोध आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. शिवाय लालू जनावरांची पण सेवा करत होते.त्या जनावरांसाठी त्यांनी चारा पण आणला.पण मराठी जनता दुष्ट आहे.त्यांना हे काही बघवले नाही आणि म्हणूनच मराठी लोकांनी लालू विरुद्ध केस टाकली.पण आता लालू सुटले आहेत.त्यामुळेच आता कोण तरी माणूस बिहारला जावून लालूंचा भाट व्हायला प्रयत्न करत आहे, असे ऐकिवात आहे.
24 Dec 2013 - 10:11 pm | बाप्पू
तुमच्या नम्रतेची आणि सहनशक्ती ची तारीफ करावी थोडीच … नाहीतर आम्हाला आमच्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका जरी काढल्या तरी वाईट वाटते…. इथे तर तुमच्या प्रत्येक वाक्याचे पोस्ट मार्टेम होतेय… आणि तुम्ही आपले विनोदी लेखन तेवढ्याच उत्साहाने लिहिताय… येऊ द्या आणखी
16 Dec 2013 - 10:10 pm | विकास
आमच्याकडून समस्त मिपाकरांना...
16 Dec 2013 - 11:35 pm | विनोद१८
*man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE**man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE**man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE*
विनोद१८
18 Dec 2013 - 7:35 pm | अनिरुद्ध प
कशाला कशाला,
बरं असुदे असुदे,(जास्त मिठाई खाणे हे तब्येतिला वाईट हो लोक तो बेचव चारा कसा खात अस्तिल बरे)
18 Dec 2013 - 7:52 pm | विकास
लोक तो बेचव चारा कसा खात अस्तिल बरे
चार्यामधे फायबर कंटेट खूप असते. त्यामुळे येकदम पौष्ठीक!
17 Dec 2013 - 9:21 am | मिनेश
17 Dec 2013 - 9:53 pm | सचीन
धर्मांधाना सत्तेपासून रोखणार लालूंची सिंहगर्जना..
17 Dec 2013 - 10:01 pm | शिद
ढाण्या वाघाची सिंहगर्जना का???
चान चान... चालु दे...
18 Dec 2013 - 11:38 am | श्रीगुरुजी
>>> धर्मांधाना सत्तेपासून रोखणार लालूंची सिंहगर्जना..
म्हणजे काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रीय जनता दल, बसप, राष्ट्रवादी इ. धर्मांध पक्षांना सत्तेपासून रोखणार.
लालू तुम आगे बढो, हम कपडे संभालते है !
लालू तुम चारा खाओ, हम तुम्हे बचाते है!!
17 Dec 2013 - 10:20 pm | सचीन
लालूजी धर्मांधाना रोखण्यासाठी जनता तुमच्या बरोबर आहे. सत्ता कॉंग्रेस नाही तर तिसर्या आघाडीचीच येणार ह्यात शंका नाही.
18 Dec 2013 - 3:35 pm | टवाळ कार्टा
मारली पल्टी =)) =))
18 Dec 2013 - 3:49 pm | सचीन
पलटी मारण्याचा प्रश्नच येत नाही देशाच्या हितासाठी सत्ता कॉंग्रेसचीच यावी असे मला वाटते देशाचा विकास कॉंग्रेसच करू शकते ह्यात वाद नाही. पण जर दुर्दैवाने कॉंग्रेस ची सत्ता आली नाही तर मात्र तिसर्या आघाडीची सत्ता यायला हवी.देशाचा अजून विकास व्हायचा असेल तर कॉंग्रेस व तिसरी आघाडी ह्या शिवाय पर्याय नाही.
18 Dec 2013 - 5:36 pm | चौकटराजा
अहो सचिनशेट, दुदैवाने का म्हणता दुष्कर्माने म्हणा ना राव !
दैववाद आणून तुम्ही आपल्या पुरोगामीपणाला का दुखवताय मालक ?
24 Dec 2013 - 10:13 pm | बाप्पू
कालपर्यंत कोन्ग्रेस वाल्यांची सत्ता येईल असे म्हणत होता कि राव
17 Dec 2013 - 10:34 pm | जोशी 'ले'
खरं सांगा सचीन मनातल्या मनात हसताय की नाहि? :-)
नाय तर कोन ओ येवढं पेडगाव चा रस्ता पकडुन जाईन
येsssला परत फिफ्टी.. :-)
18 Dec 2013 - 9:30 am | मिनेश
ट्रोलू प्रसाद यादव...........
>>>>>लालूजी धर्मांधाना रोखण्यासाठी जनता तुमच्या बरोबर आहे. सत्ता कॉंग्रेस नाही तर तिसर्या आघाडीचीच येणार ह्यात शंका नाही.
उठा ले रे भगवान उठा ले.....मेरे को नही रे.....ये ट्रोलू को उठा ले.... :D
18 Dec 2013 - 10:59 am | मृत्युन्जय
इतक्या गांभीर धाग्यावर टोळभैरवांनी असल्या टवाळ प्रतिक्रिया बघुन आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. श्री. सचीन यांनी इतक्या पोटतिडकीने लिहिले आहे आणि अजाण मिपाकर त्याची टिंगल टवाळी करताहेत हे बघुन दु:ख झाले. लालुप्रसाद यादवांची चाराखाऊ म्हणुन चेष्टा करणारर्या समाजकंटकांनी एकदा स्वतः चारा खाउन बघावा म्हणजे ते किती कष्टप्रद काम असते ते कळेल. अर्रे गुरेढॉरे खातात तो चारा त्या गोप्रतिपालक समाजधुरिणाने स्वतः खाउन बघितला त्याच्या मागचे कारण इतकेच की जनावरांना योग्य खुराक मिळतो आहे की नाही ते बघणे. अर्रे इतका कोमल ह्रिदयाचा माणूस तो त्याचे पाय पुसण्याची तरी लाय्की आहे का तुमची? कुठे फेडाल ही पापे.
ई ळोवे योउ ललु
18 Dec 2013 - 11:13 am | मुक्त विहारि
लालूंचे किती गुणगान करावे?
ते तुरुंगात गेले असतांना. जेलरने त्यांना तंबाखू मळून दिली असे वाचलेले आहे.
कुठे ते इंग्रजांच्या जमान्यातील स्वातंत्र्यसैनिकांना त्रास देणारे जेलर आणि कुठे हे लोकनेत्यांच्या साठी झटणारे जेलर.
मला तरी हे वाचून एक भारतीय म्हणून बरेच काही तरी वाटले.
18 Dec 2013 - 2:12 pm | सचीन
तुरुंगात गेले असतांना. जेलरने त्यांना तंबाखू मळून दिली असे वाचलेले आहे>>>>>>>>>>>>>>>
छान..कोठल्या वृत्तपत्रात वाचले ते आम्हालाही सांगा म्हणजे आम्हीही वाचू
18 Dec 2013 - 4:50 pm | मुक्त विहारि
हे बरे आहे राव....
तुम्ही माहिती न वाचता टंकायचे आणि मग आम्ही ती पुरवायची.
असो...
आता तुम्ही बिहारमध्ये न जाता पण लालू विषयी लिहू शकता तर , अशा बातम्या तुम्ही कशा काय वाचणार?
19 Dec 2013 - 10:19 am | मिनेश
बरोबर....९५० करोड चा चारा खाणे म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी सिंघम सारखी जिगर आणी बकासुरासारखी फिगर लागते....
18 Dec 2013 - 5:25 pm | सचीन
जेलरने त्यांना तंबाखू मळून दिली असे वाचलेले आहे. *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
18 Dec 2013 - 6:36 pm | मुक्त विहारि
तुम्ही पण वाचलेच आहे की....
18 Dec 2013 - 6:55 pm | सचीन
मला वाटते तुम्हाला तंबाखूची कल्पना तंबाखू खातानाच सुचलेली असेल.
18 Dec 2013 - 9:18 pm | मुक्त विहारि
http://www.duniakhabar.com/view_news.php?nid=680
असो...
18 Dec 2013 - 8:34 pm | होबासराव
http://www.duniakhabar.com/view_news.php?nid=680
18 Dec 2013 - 9:16 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
हीच बातमी एक-दोन मराठी पेपरमध्ये पण आली होती...
18 Dec 2013 - 9:54 pm | सचीन
छान विश्वासार्ह वृत्तपत्र
18 Dec 2013 - 10:13 pm | हुप्प्या
जेलरच्या पत्नीने त्यांच्या विपुल कर्णकेशसंभाराच्या वेण्या घालून त्यात एकेक गजराही माळला होता म्हणतात. खरे खोटे तो पशुपतीच जाणे!
19 Dec 2013 - 5:09 am | हुप्प्या
आप जेल मे थे तो नितिश ने बिहार का बिल्कुल महाराष्ट्र बना दिया!
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5272400163989472408&Se...संपादकीय&NewsDate=20131218&Provider=-&NewsTitle=छूट%20गईले%20ललवा%20हमार!%20(ढिंग%20टांग)
19 Dec 2013 - 10:10 am | सौंदाळा
बाहेर आल्या आल्याच लालुंनी 'राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य' असे वक्तव्य केले तर काल सोनिया गांधी 'लालुंच्या सुटकेने आनंद झाला' असे म्हणाल्या. हे बघुन लालुंना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठींबा द्यायला राजी करण्यासाठी दोन महीने तुरुंगात ठेवले असे वाटले ;)
24 Dec 2013 - 9:01 pm | सचीन
बाहेर आल्या आल्याच लालुंनी 'राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य' असे वक्तव्य केले>>>>>>
जे लालुना कळते ते तुम्हाला कळू नये ह्याचे आश्चर्य वाटते
19 Dec 2013 - 1:16 pm | होबासराव
पोलिसांनि आदरणीय लोकनेत्याचे चरण कमल धुतले....हि तर चाटुगीरी ची सिमा आहे. जय हो.
http://www.ndtv.com/article/india/probe-ordered-into-police-officer-wash...
24 Dec 2013 - 8:59 pm | सचीन
लालू जेलबाहेर, मोदींना आव्हान>>>>>>>>>>>>>>>
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalu-and-modi/articleshow/...
24 Dec 2013 - 10:20 pm | बाप्पू
लालू जेलबाहेर, मोदींना आव्हान
"आता मोदींचे काही खर नाही" हे म्हणायचे विसरलात का सचिन ?
चला तुमचे आणखी एक विनोदी वाक्य आता मी गेस करतो
"झुंजार आणि सामान्य माणसांची जाण असणारा तसेच बिहार चा कायापालट करणारा ढाण्या वाघ आता मोदी नावाच्या बकऱ्या वर तुटून पडणार"
24 Dec 2013 - 10:54 pm | हुप्प्या
हा पराकोटीचा भ्रष्ट, असंस्कृत, गलिच्छ मनुष्य इतका कोडगा आणि निर्ढावलेला कसा आहे हे बघायला मिळते आहे. जामिनावर सुटला तर जणू निर्दोषच सुटला असा आव आणतो आहे. ह्या नालायक माणसाचे भाषण ऐकून लोक आपले मत बदलतील अशा दिवास्वप्नात रहाणार्यांची कीव येते.
एक विनोदी प्रोग्राम ऐकायला जाऊ असे म्हणत ह्या आचरटाचे तोडलेले तारे ऐकायला लोक येतील. एखादा डोंबार्याचा खेळ, तोंडे वेडीवाक्डी करणारा विदुषक इतकीच ह्या माणसाची लायकी.
बघू या काय दिवे लावतात हे कडबाकिंग!
24 Dec 2013 - 11:03 pm | बाप्पू
+१