डिसेंबर (२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Dec 2013 - 12:23 am

मागील दुवा : डिसेंबर http://misalpav.com/node/26361

डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात. हे कमी पडेल वाटले म्हणून की काय वृश्चिक राशी इंग्रजी एस आकारात आकाश व्यापून त्यातल्या अनुराधा मूळ ज्येष्ठा नक्षत्रानी दिवाळी साजरी करत असते.

यातच कधीकधी सिंह राशीतून होणारा लिओनीद उल्कावर्षाव आकाशाला चार चांद लावून जातो. अगोदरच आकाशात मोत्याने भरलेली चादर पसरलेली असते त्यात तो उल्कावर्षाव अस्मानात दिवाळी साजरी करत असतो. तारा पडताना पहाताना जर काही इच्छा व्यक्त केली तर खरी होते म्हणतात. उल्का वर्षाव होताना जणू नभांगन म्हणत असते घे लेका काय घ्यायच्या त्या इच्छा पूर्ण करुन घे. इकडे तिकडे उल्का पडताना आपण सगळ्या इच्छा विसरून जातो. बेभान होउन जातो. अन पहाटे पहाटे लक्षात येतो अरे आकाश आपल्याला ओंजळी भरभरून घे म्हणत होते आणि आपण काहीच मागितले नाही. ज्याने हा लिओनीद उल्कावर्षाव आयुष्यात एकदा तरी पाहीला तो जीवन भरभरुन जगला. "जीवेत शरद: शतम" असे उगाच म्हणत नसावेत. ही अस्मानी देन डिसेंबरमधेच मिळते.

सगळ्या हवेतच एक अनामिक उत्साह आनंद भरलेला असतो. कधी चुकून पहाटे जाग आली अन उबदार दुलई च्या बाहेर येवुन फिरायला जायचा मूड आला तर झकास मजा असते. थंडी अशी बहरात असते. अंगावर किंचीत काटा शिरशीरी, अशा रोमांचित अवस्थेपासून हुडहुडी, दातावर कडकड दात वाजणे डोळ्यातुण पाणी येणे. अशा आवेगी अवस्थेपर्यन्त सगळ्या अवस्था एकाच क्षणात अनुभवायला मिळतात. त्यातून बाहेर पडून थोडे चालायला लागलो की मग अंगात एक वेगळाच विलक्षण उत्साह सम्चारतो. पार जगाच्या अंतापर्यन्त पळत सुटावेसे वाटते. ही नशा अनुभवायची तर डिसेंबरातच कंटाळा हा शब्द डिक्षनरीतुनसुद्धा एकदम हद्दपार होउन कुठेतरी गायब झालेला असतो. अशावेळी आपलं चालणं सुद्धा एकदम वेगळच झालेलं असतं एकदम अल्लड. जगाचं दुसरं टोक गाठायची घाई झाल्यासारखं.
समोरुन येणारे सगळे चेहरे मफलर शाल स्वेटर कानटोपी जर्कीन यानी झाकलेले असतात.

अशाच वेळेस एखादी सकाळ स्वतःचं रुपडं बदलून येते. ऐन डिसेंबरात आभाळ दाटून येतं वातावर कुंद झालेलं असतं. सगळं अंधुकलेलं असतं नगरपालीकेचे स्ट्रीट लाईट अगदीच मिणमिणत असतात. त्याअंधुक सकाळी रस्त्याचे दुसरे टोक कुठेतरी दुसर्‍या जगात जात असल्यासारखं दिसतं त्या धूसर प्रकाशात झाडे, इमारती, लाईटचे खांब अर्धवट धुक्यात लपेटलेल्या असतात. एखाद्या चित्रकाराने आपले चित्र अर्धे स्केचिंग करून अर्धेच रंगवुन ठेवल्या सारखे दिसत असतं.
आपण त्या चित्रातली एक व्यक्तीरेखा बनलेले असतो.काळ थांबवल्यासारखा असतो. घड्याळाचे काटे कुणीतरी फ्रीज केल्यासारखे आपण चित्रबद्ध होतो.

अशावेळेस कधी अवकाळी पाऊस येतो. शिंतोडे टपोरे थेंब मग मोठ्ठा पाऊस..... हा पाउस मे महिन्यातल्या पावसासारखा आनंदी वाटत नाही तर ग्रेस च्या कवीतेतला गूढ दु:खी वाटतो.

"पाऊस कधीचा पडतो......झाडांची हलती पाने...हलकेच मज जाग आली .दु:खांच्या मंद सूराने....." या ग्रेस च्या ओळी आतून आल्यासारख्या येतात " ती गेली तेंव्हा रिमझीम पाउस निनादत होता..... मेघात अडकली किरणे... हा सूर्य सोडवीत होता......" या ओळीतील सूर्याची अवस्था आपण अनुभवत असतो.एरव्ही गूढगर्भ भासणारी ग्रेसची कविता आपल्या आतून उमटत असते....... अशा वेळचा एकटे पणा ज्याने अनुभवलाय तो त्याक्षणी तरी वैराग्याच्या पलीकडे पोहोचलेला असतो. अशावेळेस दुरून कुठून मारवा ऐकायला मिळा किंवा दिवारोंसे मिलके रोना अच्छा लगता है.... किंवा ऐकायला आला तर मग ती अवस्था अत्यवस्था या प्रत जाते. उगाचच कसलीशी रुखरुख वाटते. आतून एकदम दाटून येते. उगाचच एक अनामिक हुरहूर लागते. का कोण जाणे उदास होत जातो.

यातुन बाहेर यावेसे वाटत नाही. त्याच मूड मधे आपण झोपी जातो.

दुसर्‍या दिवशीची सकाळ मात्र जादु केल्यासारखी उगवते. धुक्यातून सूर्य किरण मार्ग काढत येतात. आणि आपले घर सोनेरी झळाळीने न्हाऊन काढतात.

एकदा मी अशाच डिसेंबरात. पंजाब मधे नांगल ( भीक्रा नांगल पैकी) गावात काही कामा निमित्त होतो. गेस्टहाऊस एकदम धरणाच्या काठाला होते. समोरूच्या किनार्‍यावर एक सुवर्णवर्खी छत मिरवणारे गुरुद्वारा होते. आदले दिवशी सम्ध्याकाळी त्याकडे काही लक्ष्य गेले नाही. दुसर्‍यादिवशी पहाटे जाग आली तेंव्हा खोलीत धुके गच्च भरलेले होते. माझा हात मला जेमतेम कोपरापर्यन्त दिसत होता. थोड्यावेळाने सूर्योदय झाला अन एक इश्वरी चमत्कार झाला. गुरुद्वाराच्या छतावररुन परावर्तीत झालेले सोनेरी उन पाण्यात उतरले ते पुन्हा परावर्तित होउन खिडकीतून आत आले. धुके अन ते सोनेरी ऊन .... तो एक तास मी अक्षरशः स्वर्गात होतो. माझ्या रूमच्या भिंती टेबल बेड फॅन सगळे सोनेरी रंगाने न्हाऊन निघाले होते. त्या सोनेरी सकाळीचा अनुभव मला डिसेंबरनेच दिला.

डिसेंबर सम्पतासंपता ख्रिसमस येतो. सांताक्लॉज ची संकल्पना आपल्या कडे फारशी माहीत नाही. त्यातून मी न्यू इंग्लीश स्कूलचा विद्यार्थी. त्यामुळे सांताक्लॉजचा परीचय फक्त फिल्मी गाण्यातच झालेला. एकदा नाताळला पुण्यात कॅम्पमध्ये गेलो होतो. माझ्या लहान मुलीला अचानक घोडागाडीत सांताक्लॉज दिसला. त्याने तिला हॅलो केले. मुलगी घोडागाडी जवळ गेल्यावर तिच्या हातात त्याने चॉकलेट दिले. माझ्या मुलीच्या डोळ्यात साम्ताक्लॉज दिसल्याचा आनंद अक्षरशः निथळत होता. सांताक्लॉज दिसला. तो आपल्याला भेटला आणि त्याने चॉकलेट दिले न मगताच असे काही काहीतरी मोठ्ठे मिळू शकते यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात आश्चर्य/आनंद मावत नव्हता.

डिसेम्बर असतो हुरहूर लावणारा. एक वर्ष सम्पले असे सांगणारा. इतकी वर्षे सम्पली तरीही आपण काहीतरी करु शकलो नाही ही जणीव करुन देणारा. एखादा जीवलग आप्त दूर जातो तशी मनाची झपुर्झा अवस्था झालेले असते.
या वर्षभरात मिळालेल्या सुखदःखांचा / दिल्याघेतल्याचा हिषेब करायला लावणारा. ही अवस्था वीस डिसेंबरनंतर सुरु होते.

लहानपणी शाळेत मित्रांना सांगताना एकतीस डिसेंबरला झोपुन एक जानेवारी ला उठलो तर मी मागील वर्षी झोपलो ते थेट यावर्षीच उठलो असे म्हणायचो. तोपर्यन्त एकतीस डिसेंबरचे फारसे वेगळेपण जाणावायचे नाही. मग कधीतरी टीव्ही आला. टीव्हीवर मुम्बै दूरदर्शन वर एकतीस डिसेंबरला विशेष कार्यक्रम व्हायला लागले. केबल टीव्ही आल्यानंतर हे व्यापक झाले. एकतीस डिसेंबर हा एक बघताबघता एक मोठा इव्हेंट बनला.

एकतीस डिसेंबर हा सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत हा डबल इव्हेंट झाला.अगोदरच डिसेंबरच्या हवेतला उत्साह असतोच.तो साजरा करायला निमित्तच लागते.धर्म देश प्रदेश भाषा सगल्या सीमा ओलांडून टाकणारा जागतीक उत्सव साजरा करायला मिळाला. एकतीस डिसेंबरच्या कितीतरी अगोदरपासून कोणाकोणाच्या एकतीस तारखेच्या कार्यक्रमाच्या जहीराती सुरु होतात. नाटकापासून /ऑर्केस्ट्रा./ फनी गेम्स /गझल / सुगम संगीत / फन फेअर कसले कसले कार्यक्रम होत असतात.

एकतीस तारखेला आपण वर्षभरात काय काय करायला मिळाले काय हुकले याचा हिशेब लावत असतो. मुलांचा संध्याकाळच्या पार्टीचा बेत एसएमेस वर किंवा व्हॉट्स अप वर पक्का ठरतो. आपन कोणालातरी आमंत्रीत करतो किंवा कोणातरी जायचे ठरवतो. एकमात्र असते. एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजताचा क्षण एकट्याने नव्हे तर मित्रांआप्तांसमवेत साजरा करायचा असतो. तो उन्मादी क्षण पुढच्या कितीतरी वर्षांसाठी आठवणीत साठवणीत ठेवून घ्याचा असतो.

साडेअकरा वाजतात आपण तयारी करतो. काय होणार माहीत असते तरी काहिशी उत्कंठा असते. अकरा पन्नास होतात.
आपण विल्डिंगाच्या टेरेसवर जातो. अकरा पंचावन्न..... आकाशात काहीच हालचाल नाही. अकरा सत्तावन्न.. ..अठठावन्न. एकोणसाठ... साठ.......ढुंम्म्म्म्म्म्म्म्म........ आकाश उजेडाने भरून जाते. कुणीतरी आकाशात कस्लासा आकाश झगमगीत सोनेरी लाल निळा हिरवा असे आभाळ भरून टाकणारे प्रकाशाचे झाड उवडलेले असते. एक एक करत सगळीकडून आतशबाजी सुरु होते. लिओनीद उल्कावर्षावाला जणु उत्तर म्हणून नव्या वर्षाचे स्वागत फटक्यांच्या आतीषबाजीने सुरु होते..हॅप्पी न्यू इअर च्या आरोळ्या ऐकु येताय.

सोसायटीतील सर्वजण मधल्या कॉमन पॅसज मध्ये किंवा पार्किंग कधे येवून एकमेकाना हॅपी न्यू इअर च्या शुभेच्छा देतात. मोबाईल विवीध रिंगटोन्समध्ये किणकिणत असतात. पण प्रत्येकातुन उमटणारे शब्द हॅपी न्यू इअर म्हणत असतात. वर्ष सरताना "का उगाच चिंतेत जगतोस मित्रा. आनंदी जग. उद्या नवा दिवस येणारा आहे." असा "हकूना मटाटा" दिलासा डिसेंबर देवून जातो. आपल्याला बोट धरून नव्या वर्षात घेवून जातो.

मुक्तकप्रतिभा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

15 Dec 2013 - 12:36 am | कवितानागेश

मस्स्त. :)

यशोधरा's picture

15 Dec 2013 - 12:36 am | यशोधरा

नेहमी असं का नाही लिहित हो विजूभाऊ?
सुंदर, सुंदर!

यसवायजी's picture

15 Dec 2013 - 12:45 am | यसवायजी

सुंदर..

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2013 - 2:26 am | प्रभाकर पेठकर

अप्रतिम.
विजुभाऊ, डिसेंबर माहात्म्य अतिशय काव्यमय, साहित्यिक मुल्यांनी ओतप्रोत आणि संपूर्ण डिसेंबर महिन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारे झाले आहे.
तुमच्या कवीमनाला आदरपूर्वक नमस्कार.

मुक्त विहारि's picture

15 Dec 2013 - 6:41 am | मुक्त विहारि

अप्रतिम...

बहुगुणी's picture

15 Dec 2013 - 7:26 am | बहुगुणी

पहिल्या पॅराग्राफ मध्ये स्वतःशीच अप्रतिम संवाद तर दुसर्‍यात समूहासह सामायिक आनंदाचं उन्मादी वर्णन, असा दुहेरी सोहो़ळा छान रंगवला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2013 - 7:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिसेंबर आवडला...!!!!

-दिलीप बिरुटे

आता मी सुखाने

रविवार साजरा करतो...

पैसा's picture

15 Dec 2013 - 9:33 am | पैसा

दुसरा भागही मस्त जमला आहे! येऊ द्या आणखी असंच!

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Dec 2013 - 12:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मस्त मस्त,
दोन्ही भाग फार आवडले.
डिसेंबर तसाही आवडता महीना आहे.

प्यारे१'s picture

15 Dec 2013 - 12:40 pm | प्यारे१

___/\___

असं नेहमी का लिहीत नाही असंच म्हणावंसं वाटतं!
क्लास्स्स्स्स!

__/\__
दंडवत स्विकारा विजूभौ.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2013 - 2:40 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif

आदूबाळ's picture

15 Dec 2013 - 3:13 pm | आदूबाळ

हाही भाग मस्तच!

हरिप्रिया_'s picture

15 Dec 2013 - 4:07 pm | हरिप्रिया_

:) मस्तच

तुमचा अभिषेक's picture

15 Dec 2013 - 6:49 pm | तुमचा अभिषेक

छान झालाय हा भाग सुद्धा.. आवडल्ला..

कंजूस's picture

16 Dec 2013 - 10:59 am | कंजूस

गद्यकाव्य विजुभाऊ .

रुमानी's picture

16 Dec 2013 - 12:36 pm | रुमानी

डिसेंबर आवडला. :)
सुरेख टीपलात डिसेंबर...अगदी मनाच्या प्रत्येक कोपरयातुन...!!!

सुहास..'s picture

16 Dec 2013 - 7:01 pm | सुहास..

लयच खास !!

सूड's picture

16 Dec 2013 - 8:16 pm | सूड

आवडलं !!

डिसेंबर ला हनीमून मन्थ असेही म्हंटले जाते.
त्याबद्दल लिहायचे राहिलय........ क्रमशः
( लिहू का त्याबद्दल........................................ )

प्रभाकर पेठकर's picture

17 Dec 2013 - 1:02 am | प्रभाकर पेठकर

( लिहू का त्याबद्दल........................................ )

नेकी और पुछ पुछ?

डिसेंबर ला हनीमून मन्थ असेही म्हंटले जाते.

म्हणजे 'डिसेंबरला' माणसांचा 'भाद्रपद' म्हणतात म्हणाना..

विजुभाऊ's picture

17 Dec 2013 - 9:55 am | विजुभाऊ

नाही पेठकर काका........ त्या अर्थाने नाही........
पण एखाद्या हील स्टेशनवर जाउन थोड्या वेगळ्या नजरेने पहा.
तो आणो ती नवी नवी ओळख असते. थोडा संकोच. थोडी अधीरता ...थोडेशी लज्जा ...त्याचे तिच्यावर इंप्रेशन पाडायचे प्रयोग........आणि त्यातल्या गमती.........

प्रभाकर पेठकर's picture

17 Dec 2013 - 3:39 pm | प्रभाकर पेठकर

तो आणो ती नवी नवी ओळख असते.

झालं. म्हणजे आमचा पत्ता कट. आमची ओळख ३० वर्षे जुनी आहे.

विटेकर's picture

18 Dec 2013 - 10:37 am | विटेकर

झालं. म्हणजे आमचा पत्ता कट. आमची ओळख ३० वर्षे जुनी आहे.
म्हणजे ओळख जुनीच पण पुन्हा नव्याने ,,, असें काय तरी त्यांना म्हणायचे असेल. आणि एखादी नवीन ओळख झाली तरी ( म्हणजे अगदी पूर्ण नवीन हो ) तरी बिघडले कुठे ? त्यांनी लिहिलयं ना क्रमशः , पुढचं सांगणार आहेत ते !
.
.
.
.
असो आमचा आपला कंन्ट्री इनोद हो !

विटेकर's picture

17 Dec 2013 - 12:28 pm | विटेकर

दोन्ही भाग सुंदर ! आवडले.. ( लेखणीत ग्म्मत आहे हो तुमच्या)
दोन दिवस सज्जनगडावर होतो , पोट भरुन आकाष पाहीले पहाटे आण संध्याकाळी !
दुसर्‍या दिवशीची सकाळ मात्र जादु केल्यासारखी उगवते. धुक्यातून सूर्य किरण मार्ग काढत येतात. आणि आपले घर सोनेरी झळाळीने न्हाऊन काढतात.
खासच ! एक मस्त उत्साह आपल्या रोम-रोमात भरुन वाहतो अश्या सकाळी !

बॅटमॅन's picture

17 Dec 2013 - 3:49 pm | बॅटमॅन

डिसेंबर हा जादूचा महिना याबद्दल +१०^१०० बरे का विजुभौ. नाद खुळा लेख लिहिलेला आहे!!!