Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 12/30/2010 - 14:58
http://www.misalpav.com/node/15714 भाग १ http://www.misalpav.com/node/15729 भाग २ http://www.misalpav.com/node/15766 भाग ३ http://www.misalpav.com/node/15893 भाग ४ http://www.misalpav.com/node/15996 भाग ५ मी जरा का कु करत होतो सौनाला जायला . तेव्हा सासरे बुआ म्हणाले कि आधी कधि युरोपियन सौना बाथ घेतला नाही आहे का ? मी माझे फुटबॉल पटू सहकारी येथे हिवाळ्यात आठवड्यातून एकदा येतो .येथे अर्ध्या तासावर ३ मजली सौना व स्विमिंग पूल आहे .मी जाण्यास तयार झालो .ह्या सौनाची बांधणी रोमन पद्धतीची होती ..मी मनात म्हटले इन रोम बी रोमन चलो सौना. सौना बाथ हा आरोग्यासाठी खूप चांगला स्टीम बाथ त्याचे जुळे भावंडे .एका मोठ्या खोलीत जेथे बसायला व कलंडून घेण्यासाठी बाकडे लाकडी असतात .व तापमान फक्त ६०/ ८०/ ९०/ १००.सेल्सिअस असते .येथे ४५ म्हणजे भारतात नि आखतात ५० सेल्सिअस म्हणजे कडक उन्हाळा मानला जातो .तेथे कमाल ५ ते किमान १५ मिनिट उष्ण तापमानात बसायचे .म्हणजे मनोनिग्रह व सहनशीलता हवी .थोडक्यात मुशकील हे पर नामुमकीन बिलकुल नही. गोरे क्रिकेटर भारतीय उपखंडात येण्याआधी स्टीम व सौना बाथ मध्ये १ त१ २ तास सराव करतात तेव्हा कुठे चेन्नई किंवा वेस्ट इंडीज ला त्यांचा टिकाव लागतो . येथे मला मात्र माझ्या मनाचा सराव आधी करायचा होता .युरोपात जिम मध्ये चेन्गिंग रूम मध्ये सगळेच पुरुष नैसर्गिक अवस्थेत बागडत असतात .अर्थात लंडनला सुरवातीला जरी विचित्र वाटले.पण गोर्या मित्रांसोबत त्यांचे नैसर्गिक अवस्थेत अत्यंत नैसर्गिक रित्या वावरणे पाहून संकोच मनातून निघून गेला .मग त्यात काही विशेष वाटेनासे झाले .येथे मात्र एखाद्या रूम पुरता प्रकार मर्यादित नव्हता तर तीन मजली सौना गृहात किती तरी पुरुष स्त्रिया दिगंबरावस्थेत फिरत होते .शोवर घेत होते .. नाही म्हणा फ्रेंच रीवेर्यात न्यूड बिचेच असतात .ते पहिले आहेत .पण प्रत्यक्ष स्वत फिरायची पाळी येते तेव्हा जरा विचित्र वाटले पण एव्हाना माझा ताबा माजी फुटबॉल खेळाडूंनी घेतला . होता . येथे सौनाचे विविध छोट्या व मोठ्या खोल्या होत्या .छोट्या खोल्या म्हणजे छोटेसे केबिन .ज्यात चार माणसे मावतील इतकी .तर मोठ्या सौना मध्ये २० ते २५ माणसे बसू शकतील इतकि जागा होती ..त्याच्या बाजूला दुसर्या मजल्यावर १५ माणसे मावतील इतका मोठा गरम पाण्याचा जकुजी होता . ह्या जकुजी मध्ये साध्या स्विमिंग पूल ला कडेला जी बीळ असतात . तशी होती .पण त्यातून फेसाळ गरम पाण्याचा फवारा येत होता त्यामुळे बुद्बुड्यांचे साम्राज्य होते त्या जाकुजीत अंग चांगले शेकून निघत होते ..येथे अर्थातच फोन आता न्यायला परवानगी नव्हती .एकेमेकांकडे रोखून न पहायचा अलिखित संकेत होता .४ तासाचे १२ युरोची दक्षिणा देऊन आम्ही त्या अग्नी कुडांत प्रवेश केला होता .येथे बहुतेक करून विशीच्या वरची व ७० च्या खालची लोक आलेली होती. २० /३०/५० च्या वयाची अनेक जोडपी होती .ह्यात २० शी ची जोडपी ७० ब ८० च्या दशकात बॉलीवूड मध्ये उद्यानात जसा हिरो व होरोइनिसोबत बागडत असतो. सौम्य प्रमाणात प्रणय करत असतो तसे सर्वत्र फिरत होते. .साठी सत्तरीचे दांपत्या एकमेकाला आधार देत निवांत पणे झाकुजी मध्ये पाण्याचा शेक घेत गप्पा मारत होते .व ४० चे मात्र दुनिया मे आये हे तो जिना हि पडेगा. असे काहीशे भाव चेहऱ्यावर घेऊन स्टीम घेत बसले होते . बहुदा तारुण्य व वार्धक्याच्या सीमेवर असल्याने किंवा मंदीमुळे ह्यांना आपल्याकडील लोकांसारख्या जीवन गाडा ओढण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागत आहे हे त्यांच्या एकंदरीत अविर्भावरून दिसून येत होते .बाकी .महागाई /बेकारी असे ओळखीचे शब्द युरोपातही माझी साथ देत आहेत मंदीच्या काळात सर्वत्र त्यांचा बोलबाला आहे ..येथे प्रत्येक खोलीत कोपर्यात शेकोटीच्या करतात तेवढ्या आकाराचे कप्पे आहेत .तेथे गरमागरम दगड ठेवले असतात .बाजूला एक लाकडी बादली व लाकडी पळी असते .त्यात निलगिरीचे पाणी असते २० जण मोठ्या खोलीत जमल्यावर एक स्वयंसेवक येतो तो निलगिरीच्या पाणी पळीने टाकतो ते टाकताना स्वताचा परिचय देऊन आता नक्की तो काय करणार ह्यांची कल्पना देतो .आणि . ..त्याच बरोबर विक्सच्या वेपर सर्वत्र पसरल्या जातात .मग तो मोठ्या टर्किश पंचा दांडपट्टा फिरवावा तसा त्या खोलीत फिरवतो .(तेव्हा मला बाजीप्रभूची आठवण आली .) .जेणेकरून तेथे वाफेचा झोत त्या खोलीत झपाट्याने पसरतो .अंगातून पाणी पानशेत फुटाव तसे वाहू लागते .अंगातील मीठ व साखरेची मात्रा भराभर बाहेर जात असल्याने एक लिंबाची /मोसंबी /नि ग्रेफृत ची फोड वाट्यात येते ते जीवनदायी पदार्ध आघाशासारखे खाल्ले जातात .मग खोलीबाहेर एक बेसिन असते त्याच्या नाल्यातून पाण्यापेक्षा बर्फाचा कीस बाहेर पडत असतो .(आत कोण गोळेवाला बर्फ किसात असेल ह्या कल्पनेने मला थंडगार गोळ्याची नि गोलेवाल्याची खूप आठवण येऊन गेली .) .हा बर्फाचा कीस मग सरत शेवटी वाटल्या जातो .त्याचा सर्वांगावर शिडकाव केल्यानंतर खरी गंमत असते तिसर्या मजल्यावर . तेथे १ सेल्सिअस चा थंडगार बर्फाळ पाण्याचा टंक होता .व लगेच बाहेर आल्यावर हलका शोवर घेऊन आम्ही त्यात डुबकी मारायला गेलो .त्याचे वर्णन करायचे म्हणजे सर्व स्त्री पुरुष रांगेत उभे होते. व एका मागोमग सर्व जण डुबकी मारून येत होते .फ्रीजर मध्ये पाण्याचा तांब्या ठेवून काही मिनिटात त्याचा बर्फ होण्याआधी तो बाहेर काढावा व ते पाणी डोक्यावरून ओतल्यास काय वाटेल ह्याची कल्पना करा ..आम्ही चक्क त्यात डुबकी मारली .अंग /भावना सर्व त्याक्षणी गोठल्या गेल्या . १००च्य तापमानातून शरीर १ सेल्सिअस मध्ये तब्बल अर्धा मिनिट होते .ह्याने शरीराचे रक्ताभिसरण चांगले होते म्हणे आणि त्याचा त्वचेच्या कांतीवर पण परिणाम होतो . युरोपात नक्की आठवत नाहि मात्र पार शून्याखाली गेला कि त्या देशातील लोक समुद्र किनारी येवून बर्फाळ पाण्यात डुबक्या मारतात .हे टीवीवर पहिले होते .मात्र प्रत्यक्ष अनुभवले त्या दिवशी .मंग सर्व जण इथे तिथे पांगले .काही जण पुस्तक वाचत बसले. तर काही गप्पा अर्थात काही जणांनी टोवेल अंगावर घेतला होता काही अजिबात नाही ..काही म्हातारे तसेस माझ्यासारखे नवखे तर मात्र इकडे तिकडे ओझरते पाहत होते .व कोणाचे आपल्याकडे लक्ष तर नाहि ना ह्याची उगाच मनातल्या मनात भीती बाळगून होते .काही टर्किश ललना उगाच सर्वांगाला हिंदोळे देत फिरत होत्या . ह्या पोरी येथेच जन्मलेल्या टर्किश लोकांची अनिवासी पिढी होती .पण अजूनही ह्या समाजाची मानसिकता त्यांना जर्मन म्हणून देशाचा मुख्य प्रवाहात त्यांना येऊ देत नाही .उगाच येथे सर्वत्र गोर्यांचे राज्य होते .मला ..अर्थात कुठेही बसताना गुप्तांग शक्यतो टोवेल ने झाकून बसत होते .अर्धी लोक रूम शिवाय बाहेर हिंडताना टोवेल वर व बाथ सूट घालून असायाचे मात्र म्हतार्यांचा ग्रुप मात्र वस्त्राची अजिबात तमा बाळगत नव्हता . .आम्ही मात्र खेळाडूचा ग्रुप असल्याने बर्थडे सूट वर होतो .ह्या म्हतार्यांचा आयुष्यभर खेळाशी व फिटनेस शी लगीन लागल्याने काया /प्रकृती /चर्या व वृत्ती अत्यंत उमदी होती .जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खेळकर असतो .तेवढ्यात शेजारच्या गावातील माझ्या सासर्याच्या दोन मैत्रिणी दिसल्या त्यांच्याशी परिचय करून देतांना माझ्या सासर्याने जावई म्हणून ओळख करून दिली ती त्याच्या चाली रीतीने माय डॉटरस मेन शुद्ध मराठीत भाषांतर माझ्या मुलीचा माणूस लगेच त्यानि सुद्धा हस्तादोलन करून नाईस तू मिट यु केले .. मी खरच लाजल्या सारखा झालो एकतर सर्व आदिमानावासारखे उभे असताना ह्यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकताना अजून दुसरे काय होणार ? तिसर्या मजल्यावर मोठा स्विमिंग पूल होता तेथे काही तरुण जोडपी एकत्र पोहत होती .आंम्ही मात्र न पोहता सरळ स्टीम बाथ घ्यायला गेलो .येथे आरामखुर्ची टाकलेल्या होत्या व त्याला बुड टेकल्यावर वरती मिणमिणते लाईट लावून आकाशातील तारकाची कल्पना साकारली होती ,वाफारा अंगावर घेत शांत पणे बसलो होतो. .माझ्या बाजूला एक षोडस वर्षीय कन्या आई समवेत आली होती .भट्टी मध्ये तापलेल्या वातावरणात मनात कोणताही दुसरा विचार येणे शक्य नव्हते .मी तर खात्रीने सांगेन कितीही चंचल व अस्थिर मनाचा माणूस असेल व ध्यान लावता येत नसेल त्याने सोना किंवा स्टीम ध्यावी जेव्हा .वाढत्या तपामानाबरोबर शरीराचे ७०% द्रव असलेला भाग आतल्या आत उकळू लागतो .हदयाचे ठोके जोरात पळतात.तर रक्तदाब वाढतो तेव्हा चित्त वृत्ती आपसूक एका बिंदूपाशी येऊन थांबतात . .पण जरा जरी अस्वस्थ वाटले तरी लगेच रुमच्या बाहेर पडणे असा इथे दंडक आहे .पण .लहानपणापासून येणाऱ्या सराईत लोकांना ह्याचा त्रास होत नव्हता .माझा सासरा तर एकेकाळचा फुट बोल पटू नि ट्रेनर त्यामुळे भर पावसात ग्राउंड मध्ये निसरड्या मैदानात फुटबॉलचे सामने खेळणे म्हणजे स्तमिना हवा तारांगण पाहत आम्ही तेथे स्वस्थ पणे पहुडलो होतो मग अजून काही लोक आली .त्यात त्यातील काही आपापसात चर्चा करत होते . फुट बॉल चा विश्वचषक स्पर्ध्धा कतार ला होणार .त्यांचाकडे कोणी फुट बॉल खेळत तरी का ? मी बोललो खेळत नसेल तरी त्यांच्याकडे पैसा आहे .फिफा ला एवढे सबळ कारण पुरते .ह्यावर आमचे मत जुळले मग त्या मुलीच्या आईने तू कोणत्या देशातून आला आहेस ? वैगेरे चौकशी केली मग मी भारत म्हटल्यावरलगेच त्यांनी आम्ही गोव्याला जायचा बेत करत आहोत पुढच्या वर्षी असे सांगून टाकले. मी पुढील ५ मिनिट गोव्याचा पर्यटन विभागाचा प्रतिनिधी असल्यासारखा त्यांना माहिती देत राहिलो .मग त्यांना आजचा दिवस चांगला जावो अशी सद्भावना व्यक्त करून मी त्यांचा निरोप घेतला तळमजल्यावर मधोमध एक छोटेखानी मोकळे पटांगण होते .त्यावर आईस हॉकी च्या मैदानासारखा टणक बर्फाचा थर होता बाजूला बसायला बाकडे होते ते हिमवर्षावात नाहून निघाले होते . सर्व आदिमानव स्त्री पुरुष तिथे गोल गोल फेर्या मारता होतो. .माझा विश्वास बसत नाहि कि मी हिमवर्षाव अंगावर घेत उण्या ३ तापमानात ह्या फेर्या मारल्या .आणि त्या बाकड्यांवर काहीकाळ बसून संत्री सोलून खाल्ली . . .पण त्या माजी खेळाडूंपुढे आपण कुठे कमी पडायचे नाहि असा वज्र निर्धारच केला होता. .फिटनेस ह्या लोकांचा पंचप्राण एखाद्या गोष्टीचे वैद्यानिक फायदे लक्षात आले. कि ती गोष्ट आपल्या जीवनाचा एक भाग बनवायची .हा त्यांचा खाक्या .म्हणूनच योगा कधी त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनला हे आता त्यांनाच आठवत नाहि .हजारो वर्षआधी तन व मन ह्याच्या विकास करणारी व सुधृड जीवनशैली देणारे हि योगासने व संपूर्ण योगाभ्यास आपल्या संस्कृतीत होता .ह्यावरूनच त्यांना आपली संस्कृतीची महती कळून आली .येथे गल्लोगल्ली योगा क्लास आहेत .आम्ही शाखेत लहानपणी सूर्य नमस्कार घालायचो तेवढेच काय तो योगाभ्यास .येथे एक गोष्ट मला जी वेळो वेळी वाचली एकली त्याची अनुभूती आली .कि अश्लीलता हि नग्नतेत नाहि तर नजरेत त्याहून जास्त मानसिकतेत असते .येथे कितीतरी दांपत्या लहान मुलांना घेऊन आले होते .त्यांना बालपणापासूनच ह्या वातावरणात वावरल्याने काही प्रमाणात त्याची व आदिवासी लोकांची नग्नते कडे पाहण्याचा दृष्टीकोन निकोप असतो हे वाचले पटले ..अर्थात ह्याचा अर्थ त्यांच्या कडे सौदर्यदृष्टी रसिकता नसते अशातला भाग नाहि .पण वखवख नसते .आपल्या कडे मात्र झाकण्याची प्रवूत्ती असल्याने त्याच्या पाठीमागे काय आहे ह्यातच कल्पना शक्ती विकृत रूप घेते .उद्या माझा सासरा भारतात आला व सर्वाजिक सुलभ मध्ये गेला तर अनेक अनामिक पिकासो /रवी वर्मा ह्याचा कलाकृती दरवाजावर पाहून तो सर्दच होईल .अर्थात प्रचंड भौतिकता व अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्य व आयुष्यात येणाऱ्या चढ उतरणा साथ सोबत करणारी कुटुंब व समाजव्यवस्था डबघाईला आल्याने येथे ड्रग व सेक्स ह्यांनी अकाली मुलांना जाणते केले आहे .माझ्या कितीतरी मैत्रिणी मित्र बालपणीच्या आठवणी सांगताना त्यावेळी १४ ते १५ व्या वर्षी जराशे दमाने घेतले असते तर बालपण अजून काही काळ उपभोगता आले असते .अश्या वेळी मला जगजीत सिंहांचे वो कागज कि कश्ती आठवते .त्यांचे भाषांतर करून त्यांना सांगणे अशक्य होते कारण कवितेचा बाज अस्सल भारतीय होता .अर्थात परकीय फेअर लेडी अस्सल भातीय फुल राणी झाली .एवढी प्रतिभा माझ्यात नक्कीच नव्हती . ** मी जरा का कु करत होतो सौनाला जायला. तेव्हा सासरेबुवा म्हणाले की "आधी कशी युरोपियन सौनाबाथ घेतला नाहीये का? मी व माझे फुटबॉलपटू सहकारी येथे हिवाळ्यात आठवड्यातून एकदा येतो. येथे अर्ध्या तासावर ३ मजली सौना व स्विमिंग पूल आहे." मी जाण्यास तयार झालो. ह्या सौनाची बांधणी रोमन पद्धतीची होती. मी मनात म्हटले "इन रोम बी रोमन, चलो सौन". सौनाबाथ हा आरोग्यासाठी खूप चांगला. स्टीमबाथ त्याचे जुळे भावंडं. एका मोठ्या खोलीत जेथे बसायला व कलंडून घेण्यासाठी लाकडी बाकडे असतात व तापमान फक्त ६०/ ८०/ ९०/ १०० सेल्सिअस असते. जिथे ४५ म्हणजे भारतात आणि आखातात ५० सेल्सिअस म्हणजे कडक उन्हाळा मानला जातो, तिथे कमाल ५ ते किमान १५ मिनिटे उष्ण तापमानात बसायचे. म्हणजे मनोनिग्रह व सहनशीलता हवी. थोडक्यात मुष्किल है पर नामुमकीन बिलकुल नही. गोरे क्रिकेटर भारतीय उपखंडात येण्याआधी स्टीम व सौना बाथ मध्ये १ ते १२ तास सराव करतात तेव्हा कुठे चेन्नई किंवा वेस्ट इंडीजला त्यांचा टिकाव लागतो. येथे मला मात्र माझ्या मनाचा सराव आधी करायचा होता. युरोपात जिम मध्ये चेन्जिंग रूम मध्ये सगळेच पुरुष नैसर्गिक अवस्थेत बागडत असतात. अर्थात लंडनला सुरूवातीला जरी विचित्र वाटले, तरीपण गोर्‍या मित्रांसोबत त्यांचे नैसर्गिक अवस्थेत अत्यंत नैसर्गिकरित्या वावरणे पाहून संकोच मनातून निघून गेला. मग त्यात काही विशेष वाटेनासे झाले. येथे मात्र एखाद्या रूमपुरता प्रकार मर्यादित नव्हता तर तीन मजली सौना गृहात किती तरी पुरुष व स्त्रिया दिगंबरावस्थेत फिरत होते. शॉवर घेत होते... नाही म्हणायला फ्रेंच रीवेर्यात न्यूड बिचेस असतात. ते पहिले आहेत. पण प्रत्यक्ष स्वतः फिरायची पाळी येते तेव्हा जरा विचित्र वाटले, पण एव्हाना माझा ताबा माजी फुटबॉल खेळाडूंनी घेतला होता. येथे सौनाचे विविध छोट्या व मोठ्या खोल्या होत्या. छोट्या खोल्या म्हणजे छोटेसे केबिन. ज्यात चार माणसे मावतील इतकी. तर मोठ्या सौना मध्ये २० ते २५ माणसे बसू शकतील इतकी जागा होती... त्याच्या बाजूला दुसर्‍या मजल्यावर १५ माणसे मावतील इतका मोठा गरम पाण्याचा जकुजी होता. ह्या जकुजी मध्ये साध्या स्विमिंगपूलला कडेला जी बीळ असतात, तशी होती. पण त्यातून फेसाळ गरम पाण्याचा फवारा येत होता त्यामुळे बुडबुड्यांचे साम्राज्य होते त्या जाकुजीत. अंग चांगले शेकून निघत होते... येथे अर्थातच फोन आत न्यायला परवानगी नव्हती. एकेमेकांकडे रोखून न पहायचा अलिखित संकेत होता. ४ तासासाठी १२ युरोची दक्षिणा देऊन आम्ही त्या अग्नीकुडांत प्रवेश केला होता. येथे बहुतेक करून विशीच्या वरची व ७०च्या खालची लोक आलेली होती. २०/३०/५०च्या वयाची अनेक जोडपी होती. ह्यात २०शी ची जोडपी ७० ब ८० च्या दशकात बॉलीवूड मध्ये उद्यानात जसा हिरो हिरोइनसोबत बागडत असतो, सौम्य प्रमाणात प्रणय करत असतो तसे सर्वत्र फिरत होते. साठी सत्तरीचे दांपत्या एकमेकाला आधार देत निवांत पणे जाकुजी मध्ये पाण्याचा शेक घेत गप्पा मारत होते. पण ४०चे मात्र दुनिया मे आये हे तो जिना हि पडेगा, असे काहीशे भाव चेहऱ्यावर घेऊन स्टीम घेत बसले होते. बहुधा तारुण्य व वार्धक्याच्या सीमेवर असल्याने किंवा मंदीमुळे ह्यांना आपल्याकडील लोकांसारख्या जीवन गाडा ओढण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागत आहे हे त्यांच्या एकंदरीत अविर्भावरून दिसून येत होते. बाकी महागाई /बेकारी असे ओळखीचे शब्द युरोपातही माझी साथ देत आहेत मंदीच्या काळात सर्वत्र त्यांचा बोलबाला आहे... येथे प्रत्येक खोलीत कोपर्यात शेकोटीच्या करतात तेवढ्या आकाराचे कप्पे आहेत. तेथे गरमागरम दगड ठेवले असतात. बाजूला एक लाकडी बादली व लाकडी पळी असते. त्यात निलगिरीचे पाणी असते. २० जण मोठ्या खोलीत जमल्यावर एक स्वयंसेवक येतो व तो निलगिरीचे पाणी पळीने टाकतो. ते टाकताना स्वतःचा परिचय देऊन आता नक्की तो काय करणार ह्यांची कल्पना देतो. आणि... त्याच बरोबर विक्सच्या वेपर सर्वत्र पसरल्या जातात. मग तो मोठ्या टर्किश पंचा दांडपट्टा फिरवावा तसा त्या खोलीत फिरवतो. (तेव्हा मला बाजीप्रभूची आठवण आली ). जेणेकरून तेथे वाफेचा झोत त्या खोलीत झपाट्याने पसरतो. अंगातून पाणी पानशेत फुटाव तसे वाहू लागते. अंगातील मीठ व साखरेची मात्रा भराभर बाहेर जात असल्याने एक लिंबाची / मोसंबी / ग्रेपफ्रुटची फोड वाट्यात येते. ते जीवनदायी पदार्ध आधाशासारखे खाल्ले जातात. मग खोलीबाहेर एक बेसिन असते त्याच्या नाल्यातून पाण्यापेक्षा बर्फाचा कीस बाहेर पडत असतो. (आत कोण गोळेवाला बर्फ किसात असेल ह्या कल्पनेने मला थंडगार गोळ्याची नि गोळेवाल्याची खूप आठवण येऊन गेली ). हा बर्फाचा कीस मग सरत शेवटी वाटल जातो . त्याचा सर्वांगावर शिडकाव केल्यानंतर खरी गंमत असते तिसर्‍या मजल्यावर. तेथे १ सेल्सिअसचा थंडगार बर्फाळ पाण्याचा टंक होता. बाहेर आल्यावर लगेच हलका शोवर घेऊन आम्ही त्यात डुबकी मारायला गेलो. त्याचे वर्णन करायचे म्हणजे सर्व स्त्री पुरुष रांगेत उभे होते. एका मागोमग सर्व जण डुबकी मारून येत होते. फ्रीजर मध्ये पाण्याचा तांब्या ठेवून काही मिनिटात त्याचा बर्फ होण्याआधी तो बाहेर काढावा व ते पाणी डोक्यावरून ओतल्यास काय वाटेल ह्याची कल्पना करा... आम्ही चक्क त्यात डुबकी मारली. अंग /भावना सर्व त्याक्षणी गोठल्या गेल्या. १००च्या तापमानातून शरीर १ सेल्सिअस मध्ये तब्बल अर्धा मिनिट होते. ह्याने शरीराचे रक्ताभिसरण चांगले होते म्हणे आणि त्याचा त्वचेच्या कांतीवर पण परिणाम होतो. युरोपात नक्की आठवत नाहि मात्र पार शून्याखाली गेला कि त्या देशातील लोक समुद्र किनारी येवून बर्फाळ पाण्यात डुबक्या मारतात. हे टीवीवर पहिले होते. मात्र प्रत्यक्ष अनुभवले त्यादिवशी. मग सर्व जण इथे तिथे पांगले. काही जण पुस्तक वाचत बसले. तर काही गप्पा अर्थात काही जणांनी टोवेल अंगावर घेतला होता काही अजिबात नाही... काही म्हातारे तसेच माझ्यासारखे नवखे, ते मात्र इकडे तिकडे ओझरते पाहत होते व कोणाचे आपल्याकडे लक्ष तर नाहि ना ह्याची उगाच मनातल्या मनात भीती बाळगून होते. काही टर्किश ललना उगाच सर्वांगाला हिंदोळे देत फिरत होत्या. ह्या पोरी येथेच जन्मलेल्या टर्किश लोकांची अनिवासी पिढी होती. पण अजूनही ह्या समाजाची मानसिकता त्यांना जर्मन म्हणून देशाचा मुख्य प्रवाहात त्यांना येऊ देत नाही . उगाच येथे सर्वत्र गोर्यांचे राज्य होते. मला, अर्थात कुठेही बसताना गुप्तांग शक्यतो टोवेल ने झाकून बसत होते. अर्धी लोक रूम शिवाय बाहेर हिंडताना टोवेल वर व बाथ सूट घालून असयाचे मात्र म्हातार्‍यांचा ग्रुप मात्र वस्त्राची अजिबात तमा बाळगत नव्हता... आम्ही मात्र खेळाडूचा ग्रुप असल्याने बर्थडे सूट वर होतो. ह्या म्हतार्यांचा आयुष्यभर खेळाशी व फिटनेसशी लगीन लागल्याने काया / प्रकृती / चर्या व वृत्ती अत्यंत उमदी होती. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खेळकर असतो. तेवढ्यात शेजारच्या गावातील माझ्या सासर्याच्या दोन मैत्रिणी दिसल्या त्यांच्याशी परिचय करून देतांना माझ्या सासर्याने जावई म्हणून ओळख करून दिली ती त्याच्या चाली रीतीने 'माय डॉटरस मॅन'. शुद्ध मराठीत भाषांतर माझ्या मुलीचा माणूस. लगेच त्यांनी सुद्धा हस्तांदोलन करून नाईस टू मिट यु केले... मी खरंच लाजल्या सारखा झालो एकतर सर्व आदिमानावासारखे उभे असताना ह्यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकताना अजून दुसरे काय होणार? तिसर्‍या मजल्यावर मोठा स्विमिंग पूल होता तेथे काही तरुण जोडपी एकत्र पोहत होती. आंम्ही मात्र न पोहता सरळ स्टीम बाथ घ्यायला गेलो. येथे आरामखुर्च्या टाकलेल्या होत्या व त्याला बुड टेकल्यावर वरती मिणमिणते लाईट लावून आकाशातील तारकांची कल्पना साकारली होती. वाफारा अंगावर घेत शांत पणे बसलो होतो. माझ्या बाजूला एक षोडषवर्षीय कन्या आई समवेत आली होती. भट्टी मध्ये तापलेल्या वातावरणात मनात कोणताही दुसरा विचार येणे शक्य नव्हते. मी तर खात्रीने सांगेन, कितीही चंचल व अस्थिर मनाचा माणूस असेल व ध्यान लावता येत नसेल त्याने सोना किंवा स्टीम घ्यावी. जेव्हा वाढत्या तापमानाबरोबर शरीराचे ७०% द्रव असलेला भाग आतल्या आत उकळू लागतो, हृदयाचे ठोके जोरात पळतात. रक्तदाब वाढतो तेव्हा चित्त वृत्ती आपसूक एका बिंदूपाशी येऊन थांबतात... पण जरा जरी अस्वस्थ वाटले तरी लगेच रुमच्या बाहेर पडणे असा इथे दंडक आहे. पण लहानपणापासून येणाऱ्या सराईत लोकांना ह्याचा त्रास होत नव्हता. माझा सासरा तर एकेकाळचा फुटबॉलपटू नि ट्रेनर, त्यामुळे भर पावसात ग्राउंड मध्ये निसरड्या मैदानात फुटबॉलचे सामने खेळणे म्हणजे स्टॅमिना हवा. तारांगण पाहत आम्ही तेथे स्वस्थ पणे पहुडलो होतो मग अजून काही लोक आली. त्यात त्यातील काही आपापसात चर्चा करत होते. फुटबॉल ची विश्वचषकस्पर्धा कतारला होणार. 'त्यांचाकडे कोणी फुट बॉल खेळतं तरी का?'. मी बोललो, "खेळत नसेल तरी त्यांच्याकडे पैसा आहे. फिफा ला एवढे सबळ कारण पुरते." ह्यावर आमचे मत जुळले मग त्या मुलीच्या आईने "तू कोणत्या देशातून आला आहेस?" वगैरे चौकशी केली. मग मी भारत म्हटल्यावरलगेच त्यांनी आम्ही गोव्याला जायचा बेत करत आहोत पुढच्या वर्षी असे सांगून टाकले. मी पुढील ५ मिनिटे गोव्याचा पर्यटन विभागाचा प्रतिनिधी असल्यासारखा त्यांना माहिती देत राहिलो . मग त्यांना आजचा दिवस चांगला जावो अशी सद्भावना व्यक्त करून मी त्यांचा निरोप घेतला. तळमजल्यावर मधोमध एक छोटेखानी मोकळे पटांगण होते. त्यावर आईस हॉकी च्या मैदानासारखा टणक बर्फाचा थर होता. बाजूला बसायला बाकडे होते ते हिमवर्षावात न्हाऊन निघाले होते. सर्व आदिमानव स्त्री पुरुष तिथे गोल गोल फेर्या मारता होते. माझा विश्वास बसत नाहि कि मी हिमवर्षाव अंगावर घेत उणे ३ तापमानात ह्या फेर्या मारल्या. आणि त्या बाकड्यांवर काहीकाळ बसून संत्री सोलून खाल्ली ... पण त्या माजी खेळाडूंपुढे आपण कुठे कमी पडायचे नाहि असा वज्र निर्धारच केला होता. फिटनेस ह्या लोकांचा पंचप्राण. एखाद्या गोष्टीचे वैद्यानिक फायदे लक्षात आले, की ती गोष्ट आपल्या जीवनाचा एक भाग बनवायची, हा त्यांचा खाक्या. म्हणूनच योगा कधी त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनला हे आता त्यांनाच आठवत नाही. हजारो वर्ष आधी तन व मन ह्याचा विकास करणारी व सुदृढ जीवनशैली देणारी ही योगासने व संपूर्ण योगाभ्यास आपल्या संस्कृतीत होता. ह्यावरूनच त्यांना आपली संस्कृतीची महती कळून आली. येथे गल्लोगल्ली योगा क्लास आहेत. आम्ही शाखेत लहानपणी सूर्य नमस्कार घालायचो तेवढेच काय तो योगाभ्यास. येथे एक गोष्ट मी जी वेळोवेळी वाचली एकली त्याची अनुभूती आली, की अश्लीलता ही नग्नतेत नाहि तर नजरेत त्याहून जास्त मानसिकतेत असते. येथे कितीतरी दांपत्यं लहान मुलांना घेऊन आले होते. बालपणापासूनच ह्या वातावरणात वावरल्याने काही प्रमाणात त्याची व आदिवासी लोकांची नग्नते कडे पाहण्याचा दृष्टीकोन निकोप असतो हे वाचले पटले... अर्थात ह्याचा अर्थ त्यांच्याकडे सौदर्यदृष्टी, रसिकता नसते अशातला भाग नाही. पण वखवख नसते. आपल्या कडे मात्र झाकण्याची प्रवृत्ति असल्याने त्याच्या पाठीमागे काय आहे ह्यातच कल्पनाशक्ती विकृत रूप घेते. उद्या माझा सासरा भारतात आला व सार्वजनिक सुलभ मध्ये गेला तर अनेक अनामिक पिकासो /रवी वर्मा ह्याचा कलाकृती दरवाजावर पाहून तो सर्दच होईल. अर्थात प्रचंड भौतिकता व अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्य व आयुष्यात येणाऱ्या चढ उतरणा साथ सोबत करणारी कुटुंब व समाजव्यवस्था डबघाईला आल्याने येथे ड्रग व सेक्स ह्यांनी मुलांना अकाली जाणते केले आहे. माझ्या कितीतरी मैत्रिणी व मित्र बालपणीच्या आठवणी सांगताना त्यावेळी १४ ते १५ व्या वर्षी जरासे दमाने घेतले असते तर बालपण अजून काही काळ उपभोगता आले असते. अश्या वेळी मला जगजीतसिंहांचे वो कागज कि कश्ती आठवते. त्यांचे भाषांतर करून त्यांना सांगणे अशक्य होते कारण कवितेचा बाज अस्सल भारतीय होता. अर्थात परकीय फेअर लेडी अस्सल भातीय फुलराणी झाली. एवढी प्रतिभा माझ्यात नक्कीच नव्हती .
  • Log in or register to post comments
  • 9135 views

Book traversal links for जर्मन आख्यान भाग ६ सौनायन नमः

  • ‹ जर्मन आख्यान भाग ५
  • Up
  • जर्मन आख्यान भाग ७ ›

प्रतिक्रिया

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 12/30/2010 - 15:00

Permalink

नेहमीच्या प्रघातानुसार

नेहमीच्या प्रघातानुसार प्रतिक्रियेमध्ये : ह्याचे फोटो काढले नसल्याने त्याची लिंक देता येते नाहि आहे. गैर सोयीबद्दल शमस्व
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 12/30/2010 - 17:46

In reply to नेहमीच्या प्रघातानुसार by निनाद मुक्काम …

Permalink

हे हे हे.

नेहमीच्या प्रघातानुसार प्रतिक्रियेमध्ये : ह्याचे फोटो काढले नसल्याने त्याची लिंक देता येते नाहि आहे. गैर सोयीबद्दल शमस्व हे जरा जास्तच होत आहे. एव्हढ्या खुलाशाची जरूरी नव्हती. हां. एक मात्र खरे. काहीजणांना "जखमेवर मिठ" चोळल्यासारखे वाटेल.;)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 12/31/2010 - 03:43

In reply to हे हे हे. by चिंतामणी

Permalink

सौंना बाथ हा युरोपात अत्यंत

. लोकप्रिय आहे .ह्याने शरीराचा चयापाचायाचा वेग वाढतो .व मेद्निर्मितीची प्रकिया शरीरात संथ होते .शरीरातील विषारी द्रव्ये घामावाटे बाहेर टाकली जातात . शरीराची बाह्य हवामानाला तोंड देण्याची शक्ती वाढते. नवीन वर्षी म्युनिक येथे जाणार आहे तेथील प्रमुख आकर्षण म्हणजे जर्मनीतील नावाजलेले प्रमुख सौंना बाथ तेथे आहे .त्याची लिंक देतो. त्याचे दिवसभराचे पेकेज घेतले ३० युरोमध्ये कि विविध प्रकारचे मसाज आणि सौंना पूर्ण दिवस घेता .येईल .एक दिवस फक्त माझा ८४ लक्ष योनीतून फिरवल्यावर मिळणारा मनुष्य नरदेह त्याचे चोचले सभ्यतेच्या मर्यादेत राहून पुरवणे मला खूप आवडते म्युनिक येथे श्रेयस ने स्वताची शाखा उघडली आहे .त्यामुळे मराठी खाद्य पदार्थांचा दुष्काळ माझ्या आयुष्यातून संपणार नवीन वर्षी . http://www.sakaaltimes.com/sakaaltimesbeta/20100514/4744413720911188894.htm .बाकी आत्म्याची उन्नती म्हणून काय करावे ह्या साठी तज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे . बाकी एक गंमत सांगण्याची राहिली येथे शोवर साठी एक वेगळा प्रकार आहे .म्हणजे थंड पाणी एका लाकडाच्या बादलीत भरले असते आणि ती बदली वरती लटकावली असते .व तिच्या दोन्ही कडांना दोर्या बांधल्या असतात .दोरी खेचली कि पूर्ण बादली आपल्या डोक्यावर उलटी होते .नि पाण्याचा धबधबा कोसळतो .
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 12/30/2010 - 18:02

In reply to हे हे हे. by चिंतामणी

Permalink

मान्य आहे . इनोद निर्मितीचा

मान्य आहे . इनोद निर्मितीचा फुटकळ प्रयत्न फु बाई फु च्या ओवर डोस मुळे माझ्या बालमनावर वाईट परिणाम केला असून माझा इनोदाचा दर्जा खालावला आहे असे बराच वेळ चिंतन व मनन केल्यांनतर मला आढळून आले आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 12/30/2010 - 18:03

In reply to हे हे हे. by चिंतामणी

Permalink

मान्य आहे . इनोद निर्मितीचा

मान्य आहे . इनोद निर्मितीचा फुटकळ प्रयत्न फु बाई फु च्या ओवर डोस मुळे माझ्या बालमनावर वाईट परिणाम केला असून माझा इनोदाचा दर्जा खालावला आहे असे बराच वेळ चिंतन व मनन केल्यांनतर मला आढळून आले आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 12/30/2010 - 15:24

Permalink

हा हा हा हे वाचताना हमाम में

हा हा हा हे वाचताना हमाम में सभी नंगे होते है ही म्हण राहून राहून आठवत होती ;-) खूप मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 12/30/2010 - 15:53

Permalink

निनाद झक्कास ल्हिले आहेस

निनाद झक्कास ल्हिले आहेस रे. मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 12/30/2010 - 17:43

Permalink

मस्त रे.

बहुदा तारुण्य व वार्धक्याच्या सीमेवर असल्याने किंवा मंदीमुळे ह्यांना आपल्याकडील लोकांसारख्या जीवन गाडा ओढण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागत आहे हे त्यांच्या एकंदरीत अविर्भावरून दिसून येत होते . अश्लीलता हि नग्नतेत नाहि तर नजरेत त्याहून जास्त मानसिकतेत असते . अश्या वाक्यांबद्दल काय बोलु?????? लाजवाब
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Fri, 12/31/2010 - 14:48

In reply to मस्त रे. by चिंतामणी

Permalink

ऑ?

सौना बाथ माहिती एकदम उत्तम.. अश्लीलता हि नग्नतेत नाहि तर नजरेत त्याहून जास्त मानसिकतेत असते . हे वाक्य फक्त ह्या लेखाबाबतीत किंवा सौना बाथ बाबतीत पटते. राखी सावंत हीने तिच्या कार्यक्रमात एका व्यक्तीला तिच्या cleavage कडे बघतो म्हणून झाडले होते. आता येथे त्या व्यक्तीचा ही दोष असला तरी राखीचा पण तेवढाच दोष आहे. तिने असे उत्तान कपडे घालायचे, लोकांच्या भावना चाळवायच्या आणि वर म्हणायचे तुम्ही बघताच कशाला? अशा ठिकाणी हे लागू होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 12/30/2010 - 18:17

Permalink

चांगले लिहिले आहे.

सगळे लेख चांगले आहेत. या सौना बाथचे वर्णन वाचताना माझे (गरीब!) भारतीय मन, फक्त 'अशा बांधकामाला खर्च किती येइल बरे?' हाच विचार करत होते. बाकी शरीर झाकण्याच्या बाबतीत हा प्रश्न नेहमीच पडतो, माणूस सोडून कुठलेच प्राणी कपडे वापरत नाहीत, पण कित्ती गोड दिसतात! ३-४वर्षांपर्यंतची मुले सुद्धा बहुतेक वेळेस कपडे वापरण्याविरुद्ध असतात. नन्तरच असे काय बिघडत जाते की ते झाकायला आवरणांची गरज पडते?!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 12/31/2010 - 08:36

In reply to चांगले लिहिले आहे. by कवितानागेश

Permalink

नन्तरच असे काय बिघडत जाते की

नन्तरच असे काय बिघडत जाते की ते झाकायला आवरणांची गरज पडते?! नंतर मोठे होतात आणि कळायला लागते, म्हणून.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 12/30/2010 - 18:58

Permalink

निन्या.... हा भाग मस्त झालाय

निन्या.... हा भाग मस्त झालाय रे....
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 12/30/2010 - 21:17

Permalink

छान

छान लिहिलय!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 12/30/2010 - 21:18

Permalink

दोन दा पेस्ट केलं गेलंय का?

दोन दा पेस्ट केलं गेलंय का?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 12/31/2010 - 01:10

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on Fri, 12/31/2010 - 01:41

Permalink

निनाद..

सौना प्रकरण एकुण छानच ;) दिसतयं.... @प्राजु तै: "दोन दा पेस्ट केलं गेलंय का?" च्या ऐवजी "दोन दा का पेस्ट केलं ?" असं म्हणुयात... - (हरहर गंगेवाला) वाटी आंघोळ्याकर
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 12/31/2010 - 20:12

Permalink

लेखन आवडले.

लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Mon, 01/03/2011 - 09:40

Permalink

चिंतामणी /यशवंत एकनाथ

चिंतामणी /यशवंत एकनाथ /विजुभाऊ /खादाड माऊ//लिमा उजेट/पुण्याचे पेशवे /स्पा /सुनील /प्राजू /शुची /रेवती /वाटाड्या ह्या सर्वांचे मनपूर्वक आभार सौंना हे आरोग्यासाठी उत्तम आहे .भारतात तळवलकर व अनेक नामवंत जिम मध्ये सौना बाथ उपलब्ध आहेत . फक्त परदेशात सौनाला जाण्यासाठी एकच विशेष काळजी घ्यावी कि सौना बाथ ला जाण्यापूर्वी त्या बाथ ची नेट वरून खातरजमा करून घ्यावी . कारण काही सौना हे फक्त समलैंगिक लोकांसाठी असतात .तर काही सौना बाथ हे गणिके सोबत उपलब्ध असतात . बाकी शरीरातील विषारी द्रव्ये घामा वाटे काढण्यास सौना बाथ मदत करते . पण मनातील विकार आणि द्वेष भावना काढायला कोणता तरी बाथ हवा, नाही तर '' नाही निर्मल मन काय करी साबण अशी अवस्था होईल''
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 10/16/2011 - 02:10

Permalink

छायाचित्रे.....

छायाचित्रे टाकता येत नाहीत म्हणून लेख दोनदा टाकला आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 10/16/2011 - 03:08

In reply to छायाचित्रे..... by प्रभाकर पेठकर

Permalink

दुसर्यांदा तो लेख बिका

दुसर्यांदा तो लेख बिका ह्यांनी माझ्या अनुमतीने संपादित केला आहे . अर्थात दुसर्यांदा वाचतांना मूळ थोडा सुसह्य झाला आहे . उत्तम सादरीकरण किती महत्वाचे असते त्याने वाचकांना व त्यामुळे पर्यायाने लेखकला किती फायदा होतो . ह्याचे दोन लेखांमधील फरक हा एक आदर्श नमुना आहे . माझ्यासाठी व नवीन मिपाकरांसाठी उदाहरण म्हणून मूळ लेख तसाच ठेवला आहे . . अवांतर सहा च्या पुढील भाग सुद्धा आपण वाचाल व व आपले मार्गदर्शन व प्रतिक्रिया अश्याच मिळत राहतील .ही आशा करतो .
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com