बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच.
बर्याच जणांना असे वाटते कि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच लालुना बाहेर काढले असावे?काय असेल ते असो मात्र लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. लालू प्रसादांची धडाडी , बेदरकारपणा मला आवडतो.
बाबरी मस्जिद पतनानंतर अक्ख्या देशभर दंगे पेटले होते अपवाद बिहारचा.आपले राज्य दंगलमुक्त राखण्यात तेव्हा लालूंनी मोठी भूमिका बजावली होती.
महाराष्ट्र स्वताला पुरोगामी राज्य समजते ते अक्षरशः दंगलीच्या आगीत पोळत होते. माणुसकीचा, माणसाचा मुखवटा गळून पडला होता नि आतले हिस्त्र श्वापद दिसत होते विरुद्ध धर्मियाच्या नरडीचा घोट घ्यायला चटावलेले. आपले तीक्ष्ण सुळे पाजळत वाट पाहत असलेले दुसऱ्या जमातीची... आतुरतेने. त्यांच्या रक्ताने आपला धार्मिक कंड शमवायला. मग ती निरागस पोरेबाळे असोत कि पुढील आयुष्याचे स्वप्न मनाशी रंगवणारी नवयुवती. धार्मिक श्वापदे त्यांचा फडशा उडवून दुसरा नरबळी शोधायला जात....पुरोगामी ? म्हणवणाऱ्या राज्यांची हि अवस्था तर बिहार सारख्या राज्यांचे हाल काय होतील.
पण तेव्हा मोठ्या निग्रहाने लालुप्रसादानी दंगल बिहार मध्ये होवू दिली नाही त्यांच्यातील कठोर प्रशासकाचे ते एक रूप नक्कीच सुखावणारे होते.
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 3:03 am | हुप्प्या
ह्याचे उत्तर ओळखायचे असेल तर तो काय प्रकारची पोपटपंची करतो आहे ते पहा.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalu-on-Modi/articleshow/2...
युवराज राहुलजींपुढे केजरीवाल वा मोदी हे कःपदार्थ आहेत असे ह्या इसमाचे म्हणणे आहे. जामिनावर सोडताना काय अटी घालून सोडले आहे ते ओळखणे अवघड नसावे!
सुमार केतकर, दिग्गी, फार काय महाराणी सोनियांनाही अतीरंजित वाटेल अशा प्रकारची राहुलस्तुतीचे आवर्तन ह्या पशुने चालवले आहे.
लालूसारख्या भ्रष्ट बरबटलेल्या हीन जनावराचे क्यारेक्टर सर्टिफिकिट कितपत फायद्याचे ठरेल ते काळच सांगेल.
30 Dec 2013 - 11:48 am | मोग्याम्बो
सचीन तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
सचीन हमारा नेता है .....
16 Jan 2014 - 9:41 pm | सचीन
राहुल गांधींमध्ये पंतप्रधानपदाचे सर्व गुण- लालू
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5476200950418013643&Se...
16 Jan 2014 - 10:01 pm | गब्रिएल
लालूनं तारे तोडून लै दीस झाले. लोकं खो खो हस्ली आनि इसारली बी. आता तर राऊलच्या मायेनी बी त्येला सांगीतलं की बाबा ह्ये तुला जमनार न्हाय. उगं त्वोंडावर पडून फाय्दा न्हाय. लालू काय आप्ले पलवे चाटायला एका पायावर हुबा है, त्येला काय जेल चुकवाय्चिय. आनि लालूचे तल्वे चाटाय्ला पन काय्बाय लोकं अस्तात, त्यानाबी काय्तरि चारा लालू ताकत आसल नायतर तो चारा टाकल या आशेनं ति लोकं झुरत अस्त्याल.
पन हा फुटकळ धागा परत पर्त वर आनायचा क्शीन प्रय्त्न बघून तुम्ची लैच कीव वाट्ली
