तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये.
डाव खेळून बघता येईल.
Play Online Chess[Event "Anand-Carlsen World Championship"][Site "Chennai, India"][Date "2013.11.12"][Round "3"][White "Magnus Carlsen"][Black "Viswanathan Anand"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2870"][BlackELO "2775"]%Created by Caissa's Web PGN Editor1. Nf3 d5 2. g3 g6 3. c4 dxc4 4. Qa4+ Nc6 5. Bg2 Bg7 6. Nc3 e5 7. Qxc4 Nge78. O-O O-O 9. d3 h6 10. Bd2 Nd4 11. Nxd4 exd4 12. Ne4 c6 13. Bb4 Be6 14. Qc1Bd5 15. a4 b6 16. Bxe7 Qxe7 17. a5 Rab8 18. Re1 Rfc8 19. axb6 axb6 20. Qf4Rd8 21. h4 Kh7 22. Nd2 Be5 23. Qg4 h5 24. Qh3 Be6 25. Qh1 c5 26. Ne4 Kg7 27.Ng5 b5 28. e3 dxe3 29. Rxe3 Bd4 30. Re2 c4 31. Nxe6+ fxe6 32. Be4 cxd3 33.Rd2 Qb4 34. Rad1 Bxb2 35. Qf3 Bf6 36. Rxd3 Rxd3 37. Rxd3 Rd8 38. Rxd8 Bxd839. Bd3 Qd4 40. Bxb5 Qf6 41. Qb7+ Be7 42. Kg2 g5 43. hxg5 Qxg5 44. Bc4 h4 45.Qc7 hxg3 46. Qxg3 e5 47. Kf3 Qxg3+ 48. fxg3 Bc5 49. Ke4 Bd4 50. Kf5 Bf2 51.Kxe5 Bxg3+ 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384318664").value=document.getElementById("cwvpg_1384318664").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384318664").submit();
आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:)
http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVD...
प्रतिक्रिया
12 Nov 2013 - 6:41 pm | चतुरंग
किती वेळ वाट बघणे! डी स्तंभात हत्ती डबल केले कार्लसनने.
12 Nov 2013 - 6:43 pm | कपिलमुनी
काळा उंट बी २ ??
12 Nov 2013 - 6:44 pm | सुहासदवन
आता हत्ती चाललाच पाहिजे
12 Nov 2013 - 6:45 pm | चतुरंग
आणि शेवटी एकदाचा वजीर बाहेर आला म्हणे एफ ३ वर!
12 Nov 2013 - 6:47 pm | तिरकीट
कुणी आत्ताची पट-परिस्थिती (चित्र) देउ शकेल का इथे?
12 Nov 2013 - 6:48 pm | कपिलमुनी
डी ३ वर डोळा आहे कार्ल भौ चा !!
आणि आनंद भौ नी हत्ती चा वापर करावा अशी आमची इछा आहे
12 Nov 2013 - 6:50 pm | कपिलमुनी
पांढरा उंट असताना सर्व प्यादी पांढर्ञा घरात आहे .. ही कदाचित डोकेदुखी होइल ..आणि आता सेटल करायला वेळ / मूव्ह नाहियेत
12 Nov 2013 - 6:50 pm | सुहासदवन
हत्ती हलवायला हवा वजीर देखील पाठी गेला असता
12 Nov 2013 - 6:51 pm | अमेय६३७७
आनन्दसाठी Bf6 ऐवजी Rf8 कशी ठरली असती?
12 Nov 2013 - 6:58 pm | चतुरंग
बघायला पाहिजे काय वेरिएशन झाले असते!
12 Nov 2013 - 7:04 pm | अमेय६३७७
गेम संपल्यावर सांगता आले तर जरूर पहा
12 Nov 2013 - 6:52 pm | कपिलमुनी
पटावर कुरुक्षेत्र झाला ..
आनं दच्या राजाची पोझिशन वीक आहे ..
काळजी वाटू लागली आहे..
12 Nov 2013 - 6:52 pm | चतुरंग
आनंदला बी प्यादे वाचवायचे आहे आणि आता तो मारामारी करुन मोहोरी कमी करणार!
12 Nov 2013 - 6:52 pm | सुहासदवन
चुकावर चुका आनंदच्या
12 Nov 2013 - 6:53 pm | प्रसाद गोडबोले
??
12 Nov 2013 - 6:53 pm | कपिलमुनी
पांढर्या वजीरावर बराच लोड आहे ..तो हालला तर डीफेन्स अवङ्ह्ड होइल ..
आनंद चा वजीर मो़कळा आहे ..हाच फायदा
12 Nov 2013 - 6:53 pm | चतुरंग
लॅग आहे त्यामुळे ३ खेळ्या मागचे रांगते समालोचन सुरु आहे! =)) =))
12 Nov 2013 - 6:55 pm | प्रसाद गोडबोले
आनंद ने प्यादे का दिले फुकटात ???
12 Nov 2013 - 6:55 pm | चतुरंग
विरुद्ध रंगाचे उंट शिल्लक आहेत. आणि ३-३ प्यादी.
12 Nov 2013 - 6:56 pm | कपिलमुनी
??
मॅच निकाली होलिल अशी आशा आहे
12 Nov 2013 - 6:59 pm | अग्निकोल्हा
सामना निकाली झाला असता तर मज्या आली असती '(
12 Nov 2013 - 6:59 pm | कपिलमुनी
सद्य स्थिती पहाता ड्रॉ !!
12 Nov 2013 - 7:00 pm | रमताराम
आम्हाला जरा एन्ड-गेमची मजाही लुटू द्या.
12 Nov 2013 - 7:06 pm | llपुण्याचे पेशवेll
ड्रॉ?
12 Nov 2013 - 7:07 pm | आनन्दा
ड्रॉ होणार असेच वाटत होते..
12 Nov 2013 - 7:08 pm | अमेय६३७७
अखेर ड्रॉ पण थोड्याश्या विपरीत स्थितीतून बाहेर आल्याने कार्लसन थोडा आनंदात असणार हे नक्की
12 Nov 2013 - 7:08 pm | llपुण्याचे पेशवेll
आत्ता सायटीवर जाऊन बघितले तर दोघेही शेकहँडकरून उठताना दिसले लाईव्ह स्ट्रीम मधे. तेवढेच आपल्याला ड्रॉ झाल्यासारखे वाटले.
12 Nov 2013 - 7:09 pm | रमताराम
अर्र. शेवटीही आनंदने उंट-प्याद्याचे कॉम्बिनेशन न सोडत राजा पुढे आणत गेम प्रेस करायला हवा होता. मॅग्नस काहीही करून त्या दोघांना हात लावू शकत नव्हता. जर आनंदच्या राजाने मॅग्नसचे प्यादे मटकावण्याचा प्रयत्न करायला हवा होता. अर्थात इथे पुन्हा तीन रिपीट मूवची शक्यता ९९.९९% होती. पण आनंदने झटपट ड्रॉ घेतला. बहुत मजा आया आज.
12 Nov 2013 - 7:10 pm | चतुरंग
पण मजा आली, जोरदार खेळून ड्रॉ झाल्यामुळे फार वाईट वाटले नाही!
12 Nov 2013 - 7:11 pm | प्रसाद गोडबोले
श्या: श्या: श्या:
आनंदने हाडाव जिंकायला हवा होता ...
12 Nov 2013 - 7:11 pm | कपिलमुनी
वाटला ... फायटींग एक नंबर झाली ..
12 Nov 2013 - 7:13 pm | चतुरंग
आनंद तोंडि भराभर पोझीशन्स सांग्तोय की काय काय झाले असते बोर्ड न बघताच, शेवटी ती मुलाखत घेणारी म्हणाली जरा बोर्डवर दाखव म्हणून!!! =)) =))
12 Nov 2013 - 7:16 pm | चतुरंग
आश्चर्य वाटते आहे मला. यावेळी आनंद कमालीचा फिट वाटतोय. त्याने वजन १० किलोने कमी केले आहेच म्हणा!
12 Nov 2013 - 7:16 pm | रमताराम
मॅग्नस गॅरीच्या सपोर्टला काही फारशी किंमत देत नाही दिसतंय. 'जस्ट अ डायमेन्शन' म्हणतोय. गॅरीला यावर काय वाटतं कुणीतरी विचारलं पाहिजे.
12 Nov 2013 - 7:22 pm | चतुरंग
बिचारा आलरेडी फोर्थ डायमेन्शन मधे गेलाय!! ;)
12 Nov 2013 - 7:44 pm | रमताराम
काही किंमत देत नाहीत दिसतंय. हे पहा
12 Nov 2013 - 7:46 pm | रमताराम
...Kasparov, a Russian, has briefly coached Carlsen in 2009, keeping their collaboration under wraps for several months until the Norwegian chess prodigy abruptly called it off, saying that he wasn’t comfortable working with him.... :)
12 Nov 2013 - 7:22 pm | चतुरंग
"मॅग्नुसची तयारी कशी काय वाटते तुला?" असा प्रश्न आनंदला विचारला!!
"बरी वाटते आहे"! असे उत्तर द्यायला हवे होते!!! =)) =))
12 Nov 2013 - 7:27 pm | अमेय६३७७
प्रश्नांचा दर्जा भंगार. कास्पारोवबाबत एकदा सूचक उत्तर ऐकल्यावर पुन्हा तेच उगाळत बसले काही पत्रकार. आणि तो टिपीकल चेन्नै अॅक्सेंटवाला... देअर वॉज ब्लड ऑन द बोर्ड म्हणे.
12 Nov 2013 - 8:53 pm | आतिवास
चौथा डाव कधी आहे?
13 Nov 2013 - 10:37 am | चतुरंग
अजून चार तासांनी. उद्या सुट्टीचा दिवस, मग पुन्हा दोन डाव, मग पुन्हा सुट्टी असे १२ डाव संपेपर्यंत चालेल.
13 Nov 2013 - 12:44 pm | आतिवास
धन्यवाद. बहुतेक जमेल आज पाहायला.
12 Nov 2013 - 8:56 pm | मालोजीराव
डाव एकदम सरळसोट झाला, बरोबरी करण्यासाठीच खेळला गेला असं वाटून गेलं
12 Nov 2013 - 10:46 pm | भडकमकर मास्तर
आज डाव दिवसभरात पाहू शकलो नाही.. आणि रिझल्ट माहित नसताना ही रनिंग कॉमेन्ट्री वाचायला घेतली... धमाल आली... धन्यवाद सर्वांना
13 Nov 2013 - 11:20 am | चतुरंग
कार्लसन चमत्कारिक स्थिती पटावर निर्माण करायला मागेपुढे बघत नाही. बेधडक खेळत जातो. त्याची इंट्यूशन अतिशय सशक्त असल्याने कोणत्यावेळी रेटून खेळायचं आणि कोणत्यावेळी 'चड्डीत राहायचं' याचे त्याचे आडाखे पक्के आहेत! त्याच्या या बेभरवशी खेळण्याच्या शैलीमुळे तुमचा घरचा अभ्यास किती उपयोगी पडेल हे नक्की सांगता येत नाही. महाभयानक अशा स्मरणशक्तीमुळे त्याला अनेक डाव आठवू शकतात आणि त्यात वापरलेल्या चाली प्रतिचाली तो इंप्रोवाईज करुन वापरु शकतो. प्रतिस्पर्ध्याला जराही सैल पडण्याची उसंत तो देत नाही, एकदम टाईटरोप वॉक! एखादी जरी चूक झाली तरी तो निर्दयपणे घुसून ते भगदाड मोठे करायला बघतो. कालच्या डावात उंट आणि वजीर जेव्हा पटाच्या मध्यात ठाण मांडून बसले होते तेव्हा ४-५ खेळ्या आनंदची धडगत नव्हती! परंतु आनंदची खासियत अशी आहे की समोरच्याचा खेळ जितका उंचावेल तितका तो स्वत्:चा खेळ उंचावर नेऊ शकतो, ही अॅडॅप्टिबिलिटी त्याचे सामर्थ्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे बुद्धीबळाचे ग, म, भ, न अत्यंत पक्के आहेत. समोरच्याने कितीही विचलित करणारा खेळ केला तरी हा आपले बेसिक्स कधीही सोडत नाही (क्रिकेटच्या भाषेत, त्याला त्याचा ऑफस्टंप कुठे आहे हे बरोब्बर माहीत असतं!) त्याला धीर पुष्कळ आहे. त्यामुळे वाट बघू शकतो, उतावळा होत नाही. आणि त्याचा अनुभव तर प्रचंड आहे. ओपनिंग मधले त्याचे प्रभुत्व जगात अव्वल दर्जाचे आहे. त्याचीही मेमरी भयानक आहे.
तिसर्या डावात मॅग्नुस करेल त्या प्रत्येक खेळीला आनंदने सडेतोड उत्तर शोधून काढले इतकेच नव्हे तर मॅग्नुसचा वजीर जेव्हा, त्याने स्वतःच, एच १ वरती अडकवून घेतला होता तेव्हा आनंद जिंकू शकेल अशी परिस्थिती निर्माण होता होता राहिली.
एकूण कालचा डाव हातघाईवर आलेला होता पण तरिही बाजू तुल्यबळ राहिल्या. इथून पुढचे सगळे डाव मात्र श्वास रोखून धरायला लावणारे होतील अशी दाट शक्यता वाटते. अतुलनीय बुद्धीबळ कौशल्य आपल्याला बघायला मिळेल असा विश्वास वाटतो!
13 Nov 2013 - 12:25 pm | कपिलमुनी
>>त्याला धीर पुष्कळ आहे. त्यामुळे वाट बघू शकतो, उतावळा होत नाही. आणि त्याचा अनुभव तर प्रचंड आहे.
+१
13 Nov 2013 - 11:47 am | लॉरी टांगटूंगकर
नुसतं वाचून काहीही कळत नाहीये, व्हिज्युअलाइज पण होत नाहीये. लि़ंका हापिसात चालत नाहीयेत. पण भारी मजा येते आहे.
सर्व खेळ नंतर यु ट्युब वरुन पहातो..
लै इंट्रेस्ट तयार केलात. धन्यवाद!!
15 Nov 2013 - 12:45 pm | सुहासदवन
जबरदस्त ओपनिंग आणि बर्फासारखा संयम असून देखील, दुसऱ्या आणि तिसऱ्या डावात एकदा-दोनदा जिंकण्याची पटावर स्थिती असून देखील आनंदने डाव जिंकण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्याच वेळी कार्लसन मात्र अवघडलेल्या स्थितीतून सही सलामत बाहेर पडून डाव बरोबरीत सोडवून गेला.