✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन डाव ७

च
चतुरंग यांनी
Mon, 11/18/2013 - 15:00  ·  लेख
लेख
४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी. कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे! चला गेम बघूयात.
Play Online Chess
[Event "FWCM 2013"]
[Site "Chennai"]
[Date "2013.11.18"]
[Round "7"]
[White "Anand, Viswanathan"]
[Black "Carlsen, Magnus"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2870"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. Bxc6 dxc6 6. Nbd2 Bg4 7. h3 Bh5
8. Nf1 Nd7 9. Ng3 Bxf3 10. Qxf3 g6 11. Be3 Qe7 12. O-O-O O-O-O 13. Ne2 Rhe8
14. Kb1 b6 15. h4 Kb7 16. h5 Bxe3 17. Qxe3 Nc5 18. hxg6 hxg6 19. g3 a5 20.
Rh7 Rh8 21. Rdh1 Rxh7 22. Rxh7 Qf6 23. f4 Rh8 24. Rxh8 Qxh8 25. fxe5 Qxe5 26.
Qf3 f5 27. exf5 gxf5 28. c3 Ne6 29. Kc2 Ng5 30. Qf2 Ne6 31. Qf3 Ng5 32. Qf2
Ne6 1/2-1/2

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव ७

  • ‹ आनंद - कार्लसन डाव ६
  • Up
  • आनंद - कार्लसन डाव ८ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
20708 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

ई ४- ई ५

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:02 नवीन
घोडा एफ ३, घोडा सी ६ मागल्या डावासारखीच सुरुवात रॉय लोपेझ
  • Log in or register to post comments

परत रोय लोपेझ? का?

मृत्युन्जय
Mon, 11/18/2013 - 15:11 नवीन
परत रोय लोपेझ? का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंदला पोझीशन कॉम्प्लिकेट करायलाच हवी आणि कार्लसनला

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:05 नवीन
डावात खेचायला हवे. आक्रमक खेळल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण कार्लसनला काठावर बसून भागणार आहे!
  • Log in or register to post comments

एच ३

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:09 नवीन
ही बरीचशी परिचित खेळी. आल्याआल्या उंटाला हुसकावून लावणे. अगदी नवीन नवीन बुद्धिबळ खेळायला लागलो तेव्हा 'उंट इतका जवळ येतो म्हणजे काय?' असं म्हणत त्याला ताबडतोब हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जाई त्याची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments

+१

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:11 नवीन
अगदी, अगदी!! चल हाकल मागे असा आविर्भाव चेहेर्‍यावरती!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मॅग्नुस इतका चटकन खेळतोय!

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:09 नवीन
सायकॉलॉजिकल लढाई जिंकण्याचा मार्ग. आनंद्ला वेगळ्या खेळ्या हुड्कल्याच पाहिजेत. आतापर्यंतच्या सगळ्या डावात आनंदची प्यादे रचना दुबळी पडल्याने तो एंडगेमला अडचणीत आला होता. तो भाग त्याला यावेळी सांभाळावा लागेल.
  • Log in or register to post comments

कार्लसनने उंट जी३ मध्ये आणून

आतिवास
Mon, 11/18/2013 - 15:10 नवीन
कार्लसनने उंट जी३ मध्ये आणून आक्रमणाचा इरादा पुरेसा स्पष्ट केला आहे आजही.
  • Log in or register to post comments

आत्ताच बघायला सुरुवात केलि आहे

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 15:11 नवीन
माग्नुस फ़ेवोरिट आहे पण हा डाव विशिने जिंकावा तरच चुरस राहिल!
  • Log in or register to post comments

मॅग्नस लै हुशार

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:12 नवीन
त्यांने उंट एच पट्टीत नेऊन पिन कायम राखला. आनंद इतक्यातच जी प्यादे पुढे आणणार नाही असा त्याचा - वाजवी - अंदाज आहे. कारण तसे केले तर त्याला उजवीकडे कॅसल-इन करण्याचा पर्याय जरा दुबळा होऊन जातो.
  • Log in or register to post comments

जोवर

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:14 नवीन
वजीर पुढे सरकून राजाला पर्यायी जागा देत नाही तोवर मेट-थ्रेट (क्वीन ई-४ आणि नंतर क्वीन x एफ-२ ने येणार) वाचवण्यासाठी कॅसल हा पर्याय त्याला हाताशी ठेवावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मोहोर्‍यांची मारामारी टाळणे

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:14 नवीन
आज आनंदला फायद्याचे आहे. कार्लसन ज्या प्रकारे बसलाय ते बघण्यासारखे आहे! इतका कॅज्युअल बसलाय तो की कुठल्याशा क्लबात कॉफीटेबल खेळ चालू असावा. आनंदला लक्ष फक्त पटावर ठेवायचे आहे. आणि जिंकायचे आहे.
  • Log in or register to post comments

क्काय?

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:16 नवीन
पुन्हा एकवार घो एफ-१? दुसर्‍या डावाप्रमाणे पुन्हा घोड्यांना जागा शोधण्यात आनंद वेळ घालवणार की काय?
  • Log in or register to post comments

ही खेळी चांगली आहे

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:21 नवीन
कारण घोडी राजाच्या बाजूला हल्ला करुन नेणे महत्त्वाचे आहे. कार्लसनने घोडा मारला. तो डाव सोपा करायला बघतोय. वजिराने घोडा घेतला. जी ६ प्यादे सरकले आता घोड्याच्या उड्या थांबवल्यान त्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

भयंकर दबाव आहे आनंदवर

सुहासदवन
Mon, 11/18/2013 - 15:16 नवीन
आज कॅसलिंग पण करू देणार नाही बहुतेक कार्लसन
  • Log in or register to post comments

आता एफ६ अशी काळ्याची धमकी आहे

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:17 नवीन
आनंदला घोडा जी ३ खेळून उंट मागे हाकलायला हवा. आज किल्लेकोट अजून टाळलेले आहेत. कदाचित आता काळा जी ६ खेळेल.
  • Log in or register to post comments

आज जिंकायलाच हवे ....

प्रसाद गोडबोले
Mon, 11/18/2013 - 15:18 नवीन
आज जिंकायलाच हवे ....
  • Log in or register to post comments

आनंद ग3 ?

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 15:20 नवीन
मस्तच चाल आहे विशिची! कालुचा अंदाज चुकायला सुरुवात समजायची काय ?
  • Log in or register to post comments

आज मी ऑफीसात :(

प्रसाद गोडबोले
Mon, 11/18/2013 - 15:22 नवीन
आज मी ऑफीसात आहे , कोणतीही स्पोर्ट साईट ओपन होत नाहीये :( कोणी तरी इथे खेळ्या टाकेल काय ? प्लीझ
  • Log in or register to post comments

इथे पहा

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:34 नवीन
फक्त बोर्ड आहे, वीडिओ नाही. त्यामुळे बॅण्डविड्थ कमी असली तरी चालेल. http://www.chessdom.com/world-chess-championship-2013-live/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आप ने यह ट्राय किया

सुहासदवन
Mon, 11/18/2013 - 15:24 नवीन
http://chessbomb.com/site/
  • Log in or register to post comments

हे ही ओपन होत नाहीये

प्रसाद गोडबोले
Mon, 11/18/2013 - 15:27 नवीन
हे ही ओपन होत नाहीये :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

हे बघा

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:30 नवीन
http://chennai2013.fide.com/fide-world-chess-championship-2013-live/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आजपासून मी बघतोय ना खेळ आणि

ऋषिकेश
Mon, 11/18/2013 - 15:24 नवीन
आजपासून मी बघतोय ना खेळ आणि हा धागा.. आता आनंद जिंकेल बघा ;) बाकी रंगराव.. आभार
  • Log in or register to post comments

तसे झाले तर

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:27 नवीन
ऋष्या तुझ्या तोंडात हत्ती, उंट, घोडे पडोत!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

किती अश्लील ते

मृत्युन्जय
Mon, 11/18/2013 - 15:29 नवीन
किती अश्लील ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

त्यात काय अश्लील?

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:32 नवीन
तोंडात साखर पडो च्या ऐवजी बुद्धीबळ खेळतोय म्हणून तसे म्हंटले. असो. मला डावात जास्त इंटरेस्ट आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:30 नवीन
तुला हव्या त्या ठिकाणी पोटभर मिसळ खाऊ घालेन. हत्तीवरून मिरवणूक काढेन तुझी. होऊ दे खरचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वाचतोय ...

छोटा डॉन
Mon, 11/18/2013 - 15:24 नवीन
मागच्या ३ सामन्यात असेच धावते समालोचन देऊन आम्हाला अगणित आनंद दिल्याबद्दल ररा, रंगाशेठ आणि इतर सर्वांचे आभार. साला टिव्हीवरची कॉमेंट्री ऐकायला लै मज्जा येते. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

आज सर्वरवरचा लोड

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:26 नवीन
जाम वाढलाय! विडिओ थांबतोय मधेमधे. उंट ई३? उंटांचे एक्सचेंज का करतोय आनंद? वजिराने मारुन मग एच ६ असे घुसायचा प्रयत्न आहे का? वजीर जी ४ अशी जास्तडायनामिक होती. किंबहुना आज ओपनिंग सुद्धा दुसरे करायला हवे होते!
  • Log in or register to post comments

अशा आहेत ...

आतिवास
Mon, 11/18/2013 - 15:27 नवीन
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. Bxc6 dxc6 6. Nbd2 Bg4 7. h3 Bh5 8. Nf1 Nd7 9. Ng3 Bxf3 10. Qxf3 g6 11. Be3 *
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद गिरीजा यांच्या

आतिवास
Mon, 11/18/2013 - 15:29 नवीन
हा प्रतिसाद गिरीजा यांच्या प्रतिसादाला होता - तोवर मध्ये बरेच प्रतिसाद आले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

धन्यवाद धन्यवाद !!

प्रसाद गोडबोले
Mon, 11/18/2013 - 15:31 नवीन
धन्यवाद धन्यवाद !! खेळ्याबघुन बर्‍यापैकी बोर्ड इमॅजिन करता येतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

वन्ली बोर्ड

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:36 नवीन
http://www.chessdom.com/world-chess-championship-2013-live/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आनंद आज लाँग कॅसल करणार

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:29 नवीन
असं दिसतंय कारण राजाच्या बाजूला प्यादी रेटायची असली तर ते सोयीचे पडेल. आता बहुतेक ०-०-० आणि त्यानंतर एच४ असे प्यादे पुढे सरकेल असा अंदाज.
  • Log in or register to post comments

झाले लाँग कॅसल.

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:35 नवीन
आता कार्लसनला चॉइस करायचाय कॅसल कुठल्याबाजूला? तोही बहुदा तेच करेल. येस! त्याचेही लाँग कॅसल. मॅग्नुस त्या त्या खेळीसाठी जे आवश्यक आहे तेवढेच करतो आहे. जास्त लांबवर विचारकरुन डोके शिणवून घेत नाहीये!
  • Log in or register to post comments

सेम साईड

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:38 नवीन
कॅसल्स. लांबणार डाव पहिल्या सहा प्रमाणेच. (बायली या वीडिओला काय होतंय. बंद पडतोय सारखा. आणि पुन्हा चालू होतो तेव्हा पुन्हा मागचेच संवाद ऐकू येतायत.)
  • Log in or register to post comments

हो. सर्वरवर ताण येतोय

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:39 नवीन
मलाही असेच दिसतेय दोन खेळ्या मागची कॉमेंट्री!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

घोडा ई २

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:38 नवीन
जी प्यादे पुढे ढकलायची तयारी सुरु झाली बहुदा.
  • Log in or register to post comments

डी प्यादे म्हणायचे आहे!

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:40 नवीन
ती खेळी आनंदसाठी महत्त्वाची आहे. पटाच्या मध्यात डाव कॉम्प्लिकेट करणे आवश्यक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंद प्यादे डी4 खेळ णार बहुदा

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 15:40 नवीन
.
  • Log in or register to post comments

मॅग्नुस

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:45 नवीन
हत्ती आणणार ई८ मधे.
  • Log in or register to post comments

आणलाच की त्यानं....कारण कळलं

तिरकीट
Mon, 11/18/2013 - 15:47 नवीन
आणलाच की त्यानं....कारण कळलं नाही पण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंदने डी ४ असे प्यादे खेळले तर

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:52 नवीन
ई५ प्याद्याने ते मारायचे आणि मग ई४ वरचे आनंदचे प्यादे वजीर, हत्ती असे डबल जोरात येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिरकीट

च्यायला

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:45 नवीन
हे हिडो बोंबललं की पार.
  • Log in or register to post comments

F5

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:51 नवीन
रिफ्रेश करत राहा सारखं, मला ते करावे लागते आहे अधून मधून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

धा येळंला क्येल

रमताराम
Mon, 11/18/2013 - 15:54 नवीन
परत परत तीच कामेंट्री ऐकायला गावतेय. Grrrrrrrrrrrrrrrr
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

फिडे साईट बघताय का दुसरी कोणती?

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 16:01 नवीन
http://chennai2013.fide.com/fide-world-chess-championship-2013-live/ मला इथे छान दिसतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

तिथे पाहतोय

रमताराम
Mon, 11/18/2013 - 16:09 नवीन
आता झाले चालू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आता आनंद

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:48 नवीन
जी ४ असे प्यादे टाकेल का? कारण मोहोरी हलवण्यात काही मतलब दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

ओक्के!

चतुरंग
Mon, 11/18/2013 - 15:50 नवीन
राजा बी १ मधे गेला. ए२ मधले प्यादे सपोर्ट केले शिवाय पुढे मारामारी झाली तर राजा उघडा पडायला नको. मॅग्नुस बहुदा कॉपीकॅट स्टाईलने त्याचाही राजा हलवेल बी८ मधे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा