छोटे,मोठे तारे

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
16 Jul 2008 - 6:28 pm

छोटे,मोठे तारे
.

सुर्या किती रे गर्व करशील....
खरं आहे, प्रकाशमान आहेस तू!!
मी तुझ्याच प्रकाशात बागडतो.
तरी..
इथून काही योजनांवरून पाहा,
तू ही छोटासा तारा दिसतोस!
:
:
तू काय किंवा मी काय
आपण फक्त मिणमिणतो.... रे

तू जरा मोठा
म्हणून जरा जास्त तेजःपुंज दिसतोस.
इतकंच!!

तेल संपलं की
वात जाळत जाळत मी विझणार.
तसाच तू ही..................

मी जरा लवकर संपेन!!
तू थोडा जास्त तेवशील.
एवढंच!!

===========================
स्वती फडणीस .............................१०-०३-२००८

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

स्वाती फडणीस's picture

16 Jul 2008 - 11:27 pm | स्वाती फडणीस

माझी कविता एका विडंबन काराला शब्द स्फुर्ति देऊन गेली हे काय कमी आहे :)

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 11:37 pm | केशवसुमार

स्वातीताई,
तुमची ही कविता तितकी आवडली नाही
पावले मध्ये होता तो पंच (मराठी प्रतिशब्द??) ह्या कवितेत जाणवला नाही
(सपष्ट)केशवसुमार
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
स्वगतः केश्या स्वातीताईंनी तो अधीच वाचलायं #:S वेळच्या वेळी प्रतिसाद द्यायला काय धाड बडवते का? X(

स्वाती फडणीस's picture

16 Jul 2008 - 11:55 pm | स्वाती फडणीस

हात उचलला की ठेसाच मारला जतो असे नाही ना!