विडंबनकाराचे दुखः या जालावर कुणाला कळलच नाही.. त्यांना नेहमी गावकुसाबाहेरचे अशीच वागणूक मिळाली.स्वातीताईंचे छोटे,मोठे तारे
बघून आमच्यातला जखमी उपेक्षीत विडंबनकार बंड करून उठला
कविवर्या किती रे गर्व करशील....
खरं आहे, प्रतिभावान आहेस तू!!
मी तुझ्याच कवितांवर जगतो.
तरी..
उठून जरा सभोवार पाहा,
तू ही छोटासा कवी दिसतोस!
:
:
तू काय किंवा मी काय
आपण फक्त भुणभुणतो.... रे
तू जरा मोठा
म्हणून जरा जास्त प्रतिसाद मिळवतोस.
इतकंच!!
शब्द संपले की
लेखणी अटत अटत मी विझणार.
तसाच तू ही..................
मी जरा लवकर संपेन!!
तू थोडं जास्त लिहिशील.
एवढंच!!
===========================
केशवसुमार .............................१६-०७-२००८
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5185
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गग
विडंबनकार
सहमत!
In reply to विडंबनकार by मुक्तसुनीत
माताय!
पण ओढू नका बरं का!
In reply to माताय! by चतुरंग
ह्म्म .. हे बाकी खरं आहे, मराठी माणूस ना शेवटी?
In reply to पण ओढू नका बरं का! by प्रमोद देव
मस्तच आहे
अफलातून
वा ! दहा पैकी सात
धन्यवाद!!
वा..
विचारमंथन..
ओ
In reply to विचारमंथन.. by विसोबा खेचर