उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०६ : रेनडियर सफारी आणि हुर्टीग्रुटन क्रूझ

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
15 Mar 2013 - 12:27 pm

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

... गाइडला असे निराश झालेले प्रवासी पाहण्याची सवय होती. त्याने गेल्या काही वर्षांमध्ये काढलेल्या खास फोटोंच्या सीडीज प्रवाशांना "उत्तेजनार्थ बक्षीस" म्हणून देऊन त्यांचे सांत्वन केले. नाईलाजाने सर्वजण परतीच्या बसमध्ये चढले.

आज सहलीचा चवथा आणि ट्रुम्सोमधला शेवटचा दिवस... कालच्यासारखा जरासा लवकरच सुरू झाला. नऊ वाजता रेनडियर सफारीची बस येणार होती. भरभर आटपून न्याहारीला गेलो आणि नेहमीप्रमाणे खिडकीशेजारची जागा पकडली. आज रविवार असल्याने रस्त्यावर नेहमीसारखी रहदारी नव्हती. रस्त्याशेजारच्या जिममध्येही अंधारच होता. ट्रुम्सोकर रविवारी व्यायामालाही सुट्टी देतात असे दिसते. एकदुसरी चुकार गाडी भुर्रकन निघून जात होती.

रूमवर परत येऊन सर्व तयारीनिशी बाहेर पडलो. एस्कॅलेटरकडे जाताना त्या भल्यामोठ्या खिडकीतून कारपार्कमधल्या गाड्यांवर बरेच बर्फ साचलेले दिसले... म्हणजे कालच्या रात्री बरीच बर्फवृष्टी झालेली दिसत होती.

आकाशही बरेच ढगाळलेले होते. क्वचित बर्फाचे चुकार स्फटिक वाऱ्यावर तरंगत येऊन काना-नाकावर बसत होते. बस आम्हाला क्वालोया बेटावरच्या “फ्रिलुफ्त सेंटर” या रेनडियर सफारीच्या जागेवर घेऊन जाण्यास निघाली. प्रवास साधारण तासाभराचा होता. ट्रुम्सो बेटाबाहेर पडायला बस एका समुद्राच्या पाण्याखालच्या बोगद्यात शिरली तिथपर्यंत ठीक होते... पण बोगद्यातला चौक आयुष्यात पहिल्यांदा पाहिला...

ट्रुम्सोच्या ३.५ किमी लांबीच्या या बोगद्यात असे एकूण तीन चौक आहेत ! तसा नॉर्वे हा देश बोगदा-बहाद्दर देश आहे ! या देशात एकूण ७५० किमी पेक्षा जास्त लांबीचे तब्बल ९०० पेक्षा जास्त चारचाकी-वाहतू़कीचे बोगदे आहेत... त्यातला सगळ्यात लांब बोगदा Lærdalstunnelen (हा चारचाकी-वाहतूकीचा जगातीलही सगळ्यात लांब बोगदा आहे) तब्बल २४ किमी ५०५ मीटर लांबीचा आहे तर सगळ्यात खोल Eiksundtunnelen हा बोगदा समुद्रसपाटीच्या ७ किमी ७६५ मीटर खालपर्यंत जातो !

वाटेत मधून मधून टुमदार घरांच्या वस्त्या दिसत होत्या... काहीं घरे अगदी बर्फात मिसळून जाणाऱ्या पांढऱ्याशुभ्र रंगाची तर काही दिमाखाने उठून दिसणाऱ्या लाल-पिवळ्या रंगाची...

.

.

.

 n

तासभराने आम्ही कँपजवळ पोहोचलो आणि सांताबाबाची गाडी आणि तिचे वाहक रेनडियर यांचे पहिले दर्शन झाले...

सर्वप्रथम कँपच्या ऑफिसमध्ये जाऊन कालच्यासारखीच थंडी निरोधक कवचकुंडले चढविली आणि मग चालत २०० मीटर दूर असलेल्या रेनडियर सफारीच्या थांब्याकडे गेलो. ३० - ४० सेंमी तरी बर्फ काल रात्री पडला होता आणि आताही भुरभूर चालू होतीच. पण कवचकुंडले आणि स्नो बूट यांच्यामुळे थंडीचा कडाका जाणवत नव्हता.

हे आहेत सामी, स्लेड आणि गाब्बा (नॉर्वेजियनमध्ये पांढऱ्या शुभ्र रेनडियरला गाब्बा म्हणतात, हे फार विरळ आहेत)...

गाड्यांची जुळवणी झाली...

आणि आमची सफारी सुरू झाली. प्रत्येक स्लेडला एक रेनडियर जोडलेला असतो आणि स्लेड एकामागे एक जोडतात... पण अश्या की मागच्या स्लेडचा रेनडियर तुमच्या मागून नाही तर बाजूने चालतो. तो असा...

अर्ध्या तासाच्या या सफरीत आमच्या गाइडने साप्मीची (लापलँडची) सगळी रूपे दाखवली. स्लेड कधी बर्फाच्या वाळवंटातून...

तर कधी बुशलँडमधून जात होती...

आतापर्यंत लापलँडची सवय झाली होती सरळ डोक्यावरची टोपी काढून वरून भुरभुरणाऱ्या बर्फ़ाचा आनंद उपभोगला. फेरी मारून आल्यावर थोडा वेळ आमच्या गाइडांबरोबर गप्पा मारल्या. गेल्या वीस वर्षांत येथे भरपूर सुधारणा झाल्या आहेत... उत्तम रस्ते, उत्तम शाळा, पर्यटन विकास, वगैरे. आता रेनडियर हे केवळ मांसाकरिता आणि पर्यटनाकरिता पाळले जातात. प्रत्येक रेनडियरला नाव ठेवलेले असते आणि त्याच्या अंगावर GPS टॅग लावलेला असतो. आपल्या हातावरच्या रेषांसारखीच रेनडियरची शिंगे त्यांची ओळख असते. उन्हाळ्यात त्यांना गवताळ भागात मोकळे चरायला सोडून देतात आणि हिवाळा आला की GPS टॅग वापरून जो तो आपले रेनडियर गोळा करतो. येथे मांसाहारी वन्य प्राणी नसल्याने आणि येथील मनुष्यप्राणी समजूतदार असल्याने एखादा रेनडियर गायब झाला असे होत नाही. ऐकायला मजा आली आणि लोकांच्या सचोटीचे आणि समजूतदारपणाचे कौतुक वाटले.

हे आमचे सामी गाइड...

दीडदोन तास बर्फात काढल्यावर सामी तंबूच्या उबेत जाणे जरुरीचे झाले.

दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. रेनडियरचे मांस आणि भाज्यांचे चवदार सूप, रेनडियर सँडविचेस आणि भाजलेले बटाटे असा बेत होता. रेनडियरचे मांस मटणापेक्षा जास्त चवदार असते.

जेवण करतानाच्या गप्पात कळले की आमच्या सहप्रवाशांत दोन मैत्रीणी सहलीला आल्या होत्या. त्यातली एक मूळची मुंबईची पण आता आयर्लंडमध्ये बँकर आणि दुसरी मूळची नेपाळची पण आता फ्रांन्समध्ये एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून काम करत आहेत. केवळ कौतुकास्पद ! अजून काय ? जेवणाच्या वेळेस आमची पहिली गाइड (जिने आम्हाला बर्फाचे कपडे वगैरे दिले होते ती) आली. आमच्या गप्पा ऐकून तीही सामील झाली. २२-२५ वय असावं, भारतात दिल्लीला काही काळ राहून गेली होती... दिल्ली खूप आवडली म्हणाली. नंतर नेपाळला गेली, अगदी एव्हरेस्टच्या बेस कँपपर्यंत ! परत जरूर भारताला भेट देणार असं म्हणाली.

जेवणानंतर अर्धा तास आराम व गप्पा झाल्यावर गाइडने आम्हाला बर्फावर खेळायची / घसरायची बरीच साधने दाखवली आणि सांगितले, "जे आवडेल ते उचला आणि चला माझ्याबरोबर." कँपतल्या एका बऱ्या उंचीच्या टेकडीवर नेऊन ती साधने वापरायचे थोडे प्रात्यक्षिक दाखवून म्हणाली, "आता तुमची पाळी. काही कठीण नाही. शिकाल खेळता खेळता." मग काय, सगळे आबालवृद्ध बाल होऊन घसरू, पसरू, पडू, धडपडू लागले. सगळीकडे बर्फच बर्फ असल्याने लागणे-खरचटणे अजिबात नव्हते. सगळ्यांनी दे धमाल केली.

.

टेकडीवरून दिसणारा कँप...

परतीची वेळ झाली तेव्हा परत आलेलं बालपण मागे सोडून जाताना साऱ्यांनाच कसंचच वाटत होतं.

ट्रुम्सोमध्ये परत आलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. आता पुढचा कार्यक्रम होता संध्याकाळी साडेसहाला हुर्टीग्रुटन क्रूझ पकडणे. नुकतीच ओळख झालेल्या सहप्रवासी मुलींनी बातमी दिली की आज ट्रुम्सोमध्ये वार्षिक रेनडियर रेस आहे. रेस अगदी भर वस्तीत ट्रुम्सोच्या हमरस्त्यावर होती... तोच तो टणक बर्फाने आच्छादलेला मुख्य रस्ता. म्हणजे हे ठिकाण हॉटेलपासून पायी पाच मिनिटांवर. बसमधून हॉटेलच्या जरा अगोदरच उतरून ते अंतर दीड मिनिटाचे बनवले... अगोदरच सांगितले होते नाही का की ट्रुम्सोतले गल्लीबोळ पालथे केले होते म्हणून :)

हमरस्त्याच्या सुरुवातीलाच हा सामीभाई गाब्बाला घेऊन उभा होता... लोकांना त्याच्याबरोबर फोटो काढता यावे म्हणून...

हमरस्त्याच्या किलोमीटरभर लांबीवर टणक बर्फावर नवीन मऊ बर्फाचा जाड थर देऊन त्याचा स्किईंगसाठी उत्तम ट्रॅक बनवला होता आणि दोन्ही बाजूंना धातूचे संरक्षक लावले होते. त्यांच्यावर लावलेल्या असंख्य जाहिराती आजचा कार्यक्रम खास असल्याचे जाहीर करीत होत्या. नागरिक व प्रवाशांची खचाखच गर्दी झाली होती. ट्रुम्सोच्या या वार्षिक जत्रेची बातमी दिल्याबद्दल आमच्या सहप्रवासी मुलींचे मनोमन आभार मानले.

प्रत्येक रेनडियर कोण्या ना कोण्या कंपनीने स्पॉन्सर केला होता. प्रत्येक रेनडियरच्या मागे स्कीवरून त्याचे चालक वेसण धरून तयार होते. लाऊडस्पीकरवर कॉमेंट्री चालू होती... पण नॉर्वेजियनमध्ये... म्हणून अक्षरही कळले नाही. अर्थात त्याने जत्रेची मजा घेण्यात काडीचीही कमतरता आली नाही !

ही झाली पहिली रेस सुरू...

हा रेनडियर चालकाला धुडकावून एकटाच पुढे पळत गेला...

बराच वेळ रेसेस पाहून परत येताना क्रूझ बोटीची चौकशी करायला बंदरावर चक्कर मारली. चौकशी करताना कळले की बोट अजून आली नाही, पण येईल अर्ध्या तासात. पण ती नक्की कुठे उभी राहील हे आमच्या नॉर्वेजियनच्या अज्ञानाने आणि माहिती देणाऱ्याच्या इंग्लिशच्या अज्ञानाने गुलदस्त्यातच राहिले ! परत विचार केला की, "नंतर बंदरावर येऊ तेव्हा बोट दिसेलच ना... सगळे बंदर नजरेच्या एका टप्प्यात येईल येवढेच तर आहे." परत हॉटेलवर आलो आणि चिलखते उतरवू लागलो तेवढ्यात बोटीचा भोंगा ऐकू आला. खिडकीतून पाहिले तर आमची लाडकी क्रूझ बोट बंदरात शिरत होती...

निश्चिंत मनाने तास दीड तास डुलकी घेऊन ताजातवाना होऊन बोटीकडे निघालो. ट्रोलफ्योर्ड हुर्टिग्रुटन बंदरात वाट बघतच होती...

चेक् इन केल्यावर सर्वप्रथम मस्तपैकी शॉवर घेतला. नंतर दोन दिवसांच्या ऑप्शन्सची खात्री करून घेतली आणि सर्व नवीन प्रवाशांच्या माहितीसाठी खास सभा होती तिला गेलो. सभा संपेपर्यंत बोट बंदरातून हालली होती. जड अंतःकरणाने ट्रुम्सोचे शेवटचे दर्शन घेतले. या ठिकाणाने माझे बऱ्याच वर्षांचे स्वप्न पुरे केले होते...

रात्रीचे जेवण चालू असताना बोटीच्या सार्वजनिक सूचना यंत्रणेवरून घोषणा झाली की आकाशात ऑरोरा दिसतोय. सगळ्यांबरोबर मीही धावत सर्वात वरच्या डेकवर गेलो. आदल्या दिवशीच्या टामोक कँपच्या ऑरोरा प्रमाणेच आजही फिकट प्रकाश दिसत होता... "आपण जंक्शन ऑरोरा बघितलाय, राव. आपल्याला असला दम नसलेला ऑरोरा बघण्यात काय प्वाईंट वाटला नाय, काय? +D." परत येऊन दमाने जेवण केले आणि केबीनकडे गेलो. आता प्रवासाचा दुसरा, क्रूझचा, टप्पा सुरू झाला होता.

क्रूझचा मार्ग (ट्रुम्सो ते किर्केनेस)...

(क्रमशः )

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

हाही भाग आवडला. ध्रुवापर्यंत कधी जाता ते बघण्याची अनिवार उत्सुकता लागली आहे.

वैशाली हसमनीस's picture

15 Mar 2013 - 1:14 pm | वैशाली हसमनीस

हाही भाग खूप आवडला.अजून किती भाग आहेत? केवळ उत्सुकतेपोटी विचारते आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 4:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

किती भाग लिहायचे हे अगोदर ठरवून लिहीत नाहीय. मी जशी सहल अनुभवली तशी शब्द आणि चित्रांद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. जिथे भाग जास्त न लांबवता थांबता येईल तेथे भाग संपवतो. सहलीचा जो भाग मला जास्त भावला तो सहाजिकच जास्त मोठा होतो. तेव्हा सहलीचे दिवस आणि वर्णनाचे भाग समान असा हिशेब नाही.

असाच लोभ कायम असू द्या. अजून बर्‍याच गमती बाकी आहेत !

सव्यसाची's picture

15 Mar 2013 - 3:53 pm | सव्यसाची

पुढचे भाग लवकर लवकर लवकर टाका.. धन्यवाद..!

nishant's picture

15 Mar 2013 - 4:34 pm | nishant

पळणार्या रेंन्डियरचा फोटो खास आवडला. :) पुढ्चा भाग लौकर येउ द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 4:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन, सव्यसाची आणि nishant : सुंदर प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद !

मैत्र's picture

15 Mar 2013 - 5:08 pm | मैत्र

रेनडिअर प्रत्यक्ष काढलेला फोटो लै भारी.
पण शेवटचा रात्रीचा फोटो आवडला. पाण्यात दिसण्यार्‍या दिव्यांच्या लांबट प्रतिमा खूप सुंदर आहेत.
कुठला कॅमेरा आहे जो इतक्या बर्फात सुद्धा छान फोटो देतो आणि रात्री सुद्धा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 5:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो आवडले हे वाचून आनंद झाला.

कॅमेरा Sony Cyber-shot DSC TX7.

सुज्ञ माणुस's picture

15 Mar 2013 - 5:39 pm | सुज्ञ माणुस

निशब्द झालो !!! खूपच छान
फोटो तर सुपर्ब आहेत.
रेनडियर ला GPS , मजा वाटली.

राघवेंद्र's picture

15 Mar 2013 - 8:46 pm | राघवेंद्र

सुज्ञ माणसा, स्वाक्षरी छान आणि विचार करायला लावणारी आहे.

मस्त फोटो... पुढचा भागाच्या प्रतिक्षेत. :)

वाचतीये. कौतुकाचे शब्द समजून घ्यावेत.

इस्पिक एक्का साहेब, स्वतः मजा करताय नि आम्हालाही ते अनुभव देताय.

रेनडियर दिसला तसे एस्किमो, इग्लू असे सगळे शब्द नि भूगोलाचा तास आठवले.

अनन्न्या's picture

15 Mar 2013 - 7:21 pm | अनन्न्या

फोटोही छान, लिहीत रहा. अनेक नवीन भागांची माहिती मिळते आहे. सर्व फोटो लेकालाही दाखवलेत.

दिविजा's picture

15 Mar 2013 - 7:46 pm | दिविजा

मस्त..आता केवळ भूगोलाचा पुस्तकात पाहिलेला आणी ऐकलेला इग्लू पाहण्यास उत्सुक!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुज्ञ माणुस, Mrunalini, रेवती, प्यारे१, अनन्न्या आणि दिविजा : आपणा सर्वांच्या बरोबर ही सहल परत करताना खूपच मजी येतेय. असाच लोभ असू द्यावा.

आनन्दिता's picture

15 Mar 2013 - 8:50 pm | आनन्दिता

पुढचे भाग लवकर आने दो!

राघवेंद्र's picture

15 Mar 2013 - 8:53 pm | राघवेंद्र

तुझ्या प्रवास वर्णनामुळे, मी हिवाळा घरात बसुन काड्ल्याचे वाईट वाटत आहे.
मस्त ट्रिप, प्रत्येक भागामध्ये नवीन उत्सुकता लागुन आहे.

राघवेंद्र

सानिकास्वप्निल's picture

15 Mar 2013 - 8:58 pm | सानिकास्वप्निल

वाचत आहे :)

पैसा's picture

15 Mar 2013 - 9:41 pm | पैसा

नेहमीप्रमाणे मस्त!

मोदक's picture

15 Mar 2013 - 10:51 pm | मोदक

नेहमीप्रमाणे मस्त! हेच बोल्तो...

स्वाक्षरीशी प्रचंड सहमत!!!!!!!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

आनन्दिता, राघव८२, सानिकास्वप्निल व पैसा : आपल्या सर्वांना अनेकानेक धन्यवाद !

लई भारी पुना एकदा, आणि पहिलाच फोटो लई आवडला, उतरवुन घेतला आहे.

प्रचेतस's picture

16 Mar 2013 - 8:44 am | प्रचेतस

लेखमाला अतिशय सुरेख होतेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2013 - 11:46 am | डॉ सुहास म्हात्रे

मोदक, ५० फक्त आणि वल्ली : आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !

श्री गावसेना प्रमुख's picture

16 Mar 2013 - 12:41 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही फिरतांना मोबाइल स्विच ऑफ करता का हो,एक्का राव

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2013 - 2:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

फिरतांना मोबाइल स्विच ऑफ नाही करत मी. कारण मग मोबाइलचा एक फार मोठा उपयोग (२४ तास संपर्कात राहणे) निघून जाईल आणि आपल्यालाच हुरहुर वाटत राहील की माझ्या गैरहजेरीत काही प्रॉब्लेम तर नाहीना झाला? म्हणजे सहलीचा थोडासा पण सततचा विचकाच होणार ! त्याऐवजी मी अशी पूर्व-व्यवस्था करून जातो की खरंच मोठी अडचण असल्याशिवाय फोन येउ नये. आतापर्यंतच्या पाच सफरींत एकदाच फोन आला होता तेही सहाय्यक माझी एक सूचना विसरली होती म्हणून आणि त्याबाबतीत आठवण करून दिल्यावर दोन मिनिटात फोन बंद करता आला. बाकी आतापर्यंत तरी हा उपाय मला छान उपयोगी ठरला आहे.

आवांतरः वरची व्यवस्था नीट केल्यानंतर मात्र मी "ऑफिस-मोड ऑफ" करतो आणि सहलीचा पूर्ण आनंद घेतो. सहल संपवून परतल्यावरच "ऑफिस-मोड ऑन" करतो. हे सवयीने छान जमते असा माझा अनुभव आहे +D

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2013 - 3:04 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला रोमिंग खुप लागत असेल की नाही,जाउ द्या फिरायला एव्हढे खर्च करतात तर रोमिंग काय चीज आहे
चंगंळवाद अनुभवताय

मदनबाण's picture

16 Mar 2013 - 1:00 pm | मदनबाण

सगळे भाग वाचतो आहे. उत्तम लेखमाला ! :)

अस्मी's picture

16 Mar 2013 - 1:04 pm | अस्मी

व्वाह...अप्रतिम!!
आज सगळे भाग एकत्र वाचून काढले. निव्वळ अप्रतिम. खरंच असं वाटलं की स्वतःच हा सगळा प्रवास करतेय..एकदम सुंदर लेखनशैली.
सर्व फोटो (खासकरून ऑरोराचे) अत्युच्च, आणि तो "सिन्धुरक्षक" चा फोटो पाहून खरंच एकदम सह्ही वाटलं.

अक्षया's picture

16 Mar 2013 - 2:15 pm | अक्षया

+ १

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2013 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण आणि अस्मी : आपल्या सुंदर प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद !

तुमचा अभिषेक's picture

17 Mar 2013 - 12:02 am | तुमचा अभिषेक

भाग उलट सुलट वाचतोय... अन निव्वळ हेवा वाटतोय एवढेच बोलेन..

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2013 - 11:24 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !