टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)
राम राम मंडळी,
आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! 
अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे. लवकरच ते नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण संस्थेत पोलिस उपनिरिक्षकाच्या पदाकरता प्रशिक्षण घेण्याकरता दाखल होतील!
मी संपूर्ण मिसळपाव परिवाराच्यावतीने नीलकांतचे हार्दिक अभिनंदन करतो व त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो!
एक अतिशय प्रामाणिक, सच्चा व कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमवावे हीच विठोबाच्या चरणी प्रार्थना!
तात्या.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

अभिनंदन !
नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं...
पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन!
प्रिय नीलकांत,
तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
आपला
(शुभचिंतक) आजानुकर्ण
हेच म्हणतो..
निलकांतशेठ,
कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ...
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
आपला
(शुभचिंतक) केशवसुमार
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर
:)
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ...
हे स्वगत बाकी लै भारी!
आवडणारच....
आवडणारच तुम्हाला.
मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात!
सो. नीलकांत
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही.
संजीव
फालतूगिरी...
आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा
नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही.
संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने??
ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस?
आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला??
तात्या.
अरे वा!
वा! वा!! वा!!!
नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
ओळख असू द्या साहेब.
सायबर सेल चे पोस्टींग मिळणार का?
अभिनंदन.जयहिंद.
अभिनंदन
अभिनंदन नीलकांत!
अरे वा..
निलकांत,
अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी.
जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मस्त रे........
नीलकांतजी,
मनःपुर्वक अभिनंदन.
आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे.
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अभिज्ञ.
अभिनंदन
अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!
अभिनंदन!
नमस्कार नीलकांत,
मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा!
तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!
आमच्या ही
आमच्या ही शुभेच्छा.
शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली.
सखाराम गटणे
)
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला
***** अभिनंदन *****
निलकांतराव मनःपुर्वक अभिनंदन.....
मदनबाण.....
जबरदस्त खबर
प्रिय नीलकांत
अभिनंदन व शुभेच्छा!!.
अभिनंदन
नीलकांतचे हार्दिक अभिनंदन
वा!
वा! बातमी वाचून बरं वाटलं.
नीलकांतराव,
पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
तात्या,
छान बातमी दिलीत. आभार!
-('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश
वाह!
नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!
चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
वा!
रामराम नील्कांतराव!
आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!!
गरिबाची वळख ठेवा हां सायेब!
येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!
बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!!
आमच्या शुभेच्छा!!
-डांबिसकाका
अरे वा..
अभिनंदन नीलकांत.
अपेक्षा खूप आहेत..
पुनश्च एकवार अभिननदन.
विद्याधर
नीलकांतजी,
नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन...
खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती.
तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.
अभिनंदन !!!
मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब,
नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!!
यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!!
राम राम
अभिनंदन नीलकांत साहेब, आठवण राहुद्या!!
चंबा
अभिन॑दन
अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
(एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद
शिर्षक
शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!!
अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री..
http://bhagyashreee.blogspot.com/
अभिन॑दन
अभिन॑दन नीलका॑तजी ! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
ईश्वरी
अभिनंदन..
रामराम साहेब. ओळख ठेवा गरीबाची..
अभिनंदन!
निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत.
अभिनंदन !!
+१
अगदी असेच मनात आले.
अभिनंदन, नीलकांत!
सहमत आहे ....
असेच म्हणतो ...
खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत.
जनतेला नक्की फायदा होईल ....
*** निलकांतचे हार्दीक अभिनंदन ***
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अभिनंदन
अभिनंदन नीलकांत! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सैरंध्री
अभिनंदन नीलकांत!
'मिपा'सारखी साईट तयार करणार्या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!
पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!!
चतुरंग
नीलकांत
सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा !
आपला
कॉ.विकि
अभिनंदन !
नीलकांत यांचे अभिनंदन ! अतिशय आनंदाची बातमी. केव्हा तरी मिपावर येऊन जरूर लिहा !
आमच्यातील
आमच्यातील एक झाल्याबद्द्ल अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
नीलकांतचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अभिनंदन
एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.
या धाग्याचे शीर्षक डेन्जर होते एकदम...
ओहो... खूप छान खबर..
फार आनंद झाला...
अभिनंदन नीलकांत ...
आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अभिनंदन
अभिनंदन नीलकांत ...आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन !!
नीलकांत साहेब,
तुमच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!
स्वप्निल..
शुभेच्छा
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!
तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप.
- मनिष
धन्यवाद !
धन्यवाद...मानापासून धन्यवाद.
(आणि बोलू तरी काय?)
नीलकांत
अभिनंदन इन्सपेक्टर साहेब....
आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा!
असो
लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते
चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला.
मात्र आमची पण ओळख ठेवा.
निलकांतशे
निलकांतशेठ,
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!!
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
अभिनंदन
नीलकांतरावांचे शतशः अभिनंदन
हार्दिक अभिनंदन आणि
खूप खूप शुभेच्छा!
(शुभेच्छुक)बेसनलाडू
मन:पूर्वक शुभेच्छा!
नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला.
हार्दिक अभिनंदन.
नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन !
नीलकांत .. हार्दिक अभिनंदन !
' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------