मैफिलीतले प्राणी - एक अभ्यास

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
27 Jan 2013 - 10:24 pm

तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे. तुम्हाला मैफिलींना जाण्यासाठी वेळ आणि संधी आहे. पण त्या मैफिलीचा आनंद तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकणार आहात, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गायक, राग, ध्वनिव्यवस्था वगैरे वगैरे. अजून एक महत्त्वाचा घटक त्यात आहे - तुमचा शेजारी. मैफिलीत तुमच्या शेजारी बसणारा इसम.

मैफिली ऐकण्याच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मला अनेक शेजारी लाभले. म्हणजे काही 'लाभले' आणि काही 'भोगावे लागले'. त्यांच्या जातकुळ्याही लक्षात यायला लागल्या. मैफलप्रेमी मिपाकरांसाठी हे "रेडी रेकनर".

१. अं.ज.जे. (अर्थात 'अंग्रेज के जमाने के जेलर'): हे लोक म्हणजे खानदानी शास्त्रीय संगीत श्रोते. वर्षानुवर्ष मैफिलींना येतात. सवाई गंधर्वसारख्या मैफिलीत त्यांची जागा ठरलेली असते. आजूबाजूला त्यांच्यासारखेच अं.ज.जे. असतात. त्यांना ते एरवी ओळखत असतील असं नाही. फक्त सवाई-ते-सवाई भेट होते. सवाईचे सगळे अलिखित नियम त्यांना माहीत असतात आणि स्वतः मनापासून पाळतात. गाण्यातून मधूनच उठून जाणार नाहीत. सतरंजीवर यायच्या आधी चपला हातात काढून घेतील. गाणं चालू असताना आपापसात बोलणार नाहीत. वेफर्ससारखे 'नादमय' पदार्थ गाणं सुरू असताना खाणार नाहीत. मधल्या वेळेत उठून गेले तर पिशवी, पर्स बिनधास्त तिथेच ठेवून जातील - कारण आजूबाजूचे अं.ज.जे. लक्ष ठेवतील अशी खात्री असते म्हणून नाही, तर सवाईमध्ये चोरी होणारच नाही याचा विश्वास असतो म्हणून! गाण्यांच्या मधल्या वेळेत "हा बागेश्री जमला नाही - कोमल निषाद नीट लागला नाही" वगैरे चर्चा करतात. रात्रीच्या सवाईच्या आठवणी काढून रमतात. (नाचाची आवड नसेल तर) शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाला हमखास झोपतात. 'सकाळ'मध्ये 'रात्रभर रांग लावून तिकीट मिळवलं' असले जे फोटो येतात ते हेच ते.

कुठलाही नवीन प्रकार त्यांच्या पचनी पटकन पडत नाही. त्यामुळे हे लोक तुम्हाला वसंतोत्सवामध्ये दिसणार नाहीत. काही जुन्या प्रकारांना सुध्दा नाकं मुरडतात. ("सुंद्रीवादन नाही यंदा ते बरंय" असा एक कुजकट शेरा एका अं.ज.जे.ने उगाचच मारला होता.) एखाद्या गायक/गायिकेने नाट्यसंगीत, भजन असं भरताड लावलं तर "ओंकारेश्वर मंदिर नाही हे" असं सुद्धा म्हणतात.

थोड्या गोष्टी सहन केल्या तर त्यांचा शेजार आनंददायी असतो. पडली तर ज्ञानात भरच पडते. पण कायम शहाण्या बाळासारखं वागायचं (मला तरी बुवा) दडपण येतं. म्हणून शक्यतोवर हा शेजार मी टाळतो.

२. टिपणीस: टिपणीस हे रेकॉर्डिंग करणारे लोक. आता मैफिलीला आलोय तर छान गाणं ऐकायचं सोडून जवळचा रेकॉर्डर काढतील आणि सगळं टिपून घेतील. स्पीकरच्या जवळची जागा पटकावतात. काही मैफिलीत मांडवाबाहेर स्पीकर लावलेले असतात त्याच्यासमोर रेकॉर्डर "नाझी सॅल्यूट" पद्धतीने धरून उभे असतात. आजूबाजूच्या लोकांनी मुडद्यासारखं गप पडून रहावं अशी त्यांची अपेक्षा असते. एखाद्या जागेला "क्या बात है" वगैरे दाद शेजार्याने दिली तर त्याच्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने पहातात. पण एखादं गाणं खूप रंगलं आणि संपूर्ण प्रेक्षागार दाद देत असेल, तर चक्क उभे राहून रेकोर्डर गोल गोल फिरवून ती दादही टिपून घेतात!

पूर्वी टिपणीस लोक जरा दुर्मिळ होते - कारण फार खटपटी कराव्या लागायच्या (मोठ्ठा रेकॉर्डर संभाळणे, विजेचा पॉईंट शोधणे, वेळोवेळी कॅसेटी बदलणे वगैरे). पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे टिपणीसांची वीण वाढली आहे. गाणं कसं झालं यापेक्षा ते नीट 'टिपलं' गेलं आहे की नाही याचीच चिंता त्यांना जास्त! एखाद्या टिपणीस काकांशी तुमची दोस्ती झाली तर रेकॉर्डर कुठल्या बनावटीचा आहे, सिंगापूर किंवा दुबईहून चिरंजीवांनी/सुकन्येने कसा पाठवला, पूर्वी ग्रुंडिगचे रेकॉर्डर यायचे तेव्हापासून कसं काका टिपणीसगिरी करायचे, वगैरे सगळं ऐकून घ्यावं लागेल.

टिपणीसांच्या शेजारी बसणं शक्यतोवर टाळा. चुकूनमाकून बसलातच तर आवंढा गिळण्याचा आवाजही येऊ देऊ नका.

३. कोठावळे: हे टिपणीसांचे भाऊ. टिपणीस टिपतात आणि कोठावळे साठवतात. हे लोक पट्कन लक्षात येत नाहीत. पण दोन गाण्यांच्या मधल्या वेळात गाठून "माझ्याकडे अमुक इतके जी बी गाणी आहेत" वगैरे पकवतात. मल्लिकार्जुनचा १९५६ सालचा भीमपलास आपल्याकडे कसा आला याच्या ष्टोर्या लावतात. कॅसेटींच्या सीडी कशा करून घेतल्या वगैरे सांगतात. कुठल्या ना कुठल्या टिपणीस काकांशी यांचं संधान असतं.

कोठावळ्यांचा एक उपप्रकार म्हणजे "विशिष्ट कोठावळे". हे सरसकट कशाचाही साठा करत नाहीत. मला भेटलेले एक विशिष्ट कोठावळे "फक्त मालिनी ऐकतात" आणि साठवतात. एका विशिष्ट कोठावळ्यांची स्पेशालिटी "मल्हारचे प्रकार" अशी आहे.

कोठावळे भेटले तर त्यांच्याशी जरूर गप्पा मारा. तुमची आणि त्यांची आवड जुळली तर न जाणो तुम्हाला खजिना सापडून जाईल. माझ्या लहानपणी रेडिओवर माणिक वर्मांचा भटियार लागायचा. तो बहुदा फक्त ऑल इंडिया रेडिओ कडेच उपलब्ध असावा. एका कोठावळे काकांनी मला तो सप्रेम भेट दिला!

४. हवाबाण: हे म्हणजे शास्त्रीय संगीताची शष्प आवड नसूनही स्टेटस सिम्बॉल म्हणून मैफिलीला हजेरी लावणारे लोक. वर त्यांना आपली रसिकता सारखी सिद्ध करायची असते. हे लोक ओळखायला एकदम सोप्पे. सिल्कचा नाहीतर फॅब इंडियाचा कुर्ता घालून वर परफ्यूम वगैरे मारून येतील. स्त्री असेल तर मेक अप वगैरे सुध्दा. सरगमच्या लयीत हात वगैरे हलवायचा प्रयत्न करतील. दर पाच मिनिटांत एकदा "क्या बात है" किंवा "वाह" सारखी दाद कंपल्सरी असते असा यांचा समज असतो. उगाचच "नाही नाही" सारखं डोकं हलवतात. एक डोळा कायम आजूबाजूच्या श्रोत्यांवर असतो. त्यात समजा कोणी हाताने सम दाखवली किंवा बोटाने ताल धरला तर लग्गेच ती लकब उचलतात!

वसंतोत्सवासारख्या कार्यक्रमात हवाबाणांचा "स्वयंसेवक" असाही अवतार पहायला मिळतो.

अत्यंत तापदायक शेजारी. भेटलेल्या हवाबाणांचे किस्से नंतर आठवून हसू येतं, पण त्या क्षणी त्यांना ठोसा मारावासा वाटतो. एका हवाबाणाने माझ्या एका तबला शिकणार्या मित्राला "दोनदा सम आली, नाही?" असा प्रश्न विचारला होता. मी मित्राला घेऊन काढता पाय घेतला नाहीतर तिथे रक्तपात झाला असता.

५. वाती: आपल्या भागात शास्त्रीय संगीताची मैफल 'लागली' आहे, तर तिथे जाणं हे आपलं कर्तव्य आहे अशा विचाराचे लोक. मुद्दाम उठून "तालचक्र" ऐकायला जाणार नाहीत, पण आलाच आहे तौफिक कुरेशी तर सोडायला नको, असं. मैफिलीत जाऊन आपापली कामं करतील - वाती वळायच्या असतील तर वाती वळतील, भाजी निवडतील, मोबाईलवर मेसेज मेसेज खेळतील. प्रथम मागे जरी बसायला लागलं तरी पुढच्या चांगल्या जागेकडे डोळा ठेवून असतील. थोड्या वेळाने (गाणं सुरु असतानाच) उठून बाहेर जातील आणि मित्रांशी गप्पा छाटतील. फिरायला जायची वेळ झाली की फिरायला जातील. आठ वाजले की उशीर नको म्हणून उठून जातील. गाणं रंगल्याचं सुख नाही आणि पडल्याचं दुःख नाही.

वर्गातली काही मुलं असतात ना - नवनीत गाईड वाचून घोकंपट्टी करून चांगले मार्क मिळवतात, पण कुठल्याच विषयाचा धड आनंद घेत नाहीत - त्यातला प्रकार.

आणि....

शेवटचा प्रकार म्हणजे खरा श्रोता

हे फक्त ऐकायला येतात, आनंद घ्यायला येतात. कामधंद्यातून वेळ काढून, त्याच वेषात. दिवसभराच्या वापराने बाहेर आलेला शर्ट. हातात हेल्मेट. त्यांच्या मोबाईलवर शास्त्रीय संगीत सोडून इतर फारसं काही नसतं. "काहीतरी कला असायला हवी होती अंगात, मग या <नोकरी/व्यवसायाचे नाव> मध्ये पडलोच नसतो" असं त्यांना मनापासून वाटत असतं. आवडीनिवडी असतात, तीव्र नसतात, पण कलाकाराशी एक घट्ट भावनिक नातं असतं. भीमसेन जोशींना सरळ "अण्णा" म्हणतात. त्यांचा वारसा कोण चालवणार याची उगीचच चिंता करतात. गाणं आवडलं तर खुली दाद देतात. मनाला स्पर्शून गेलं तर डोळ्यातल्या पाण्याची लाज वाटून घेत नाहीत. कोणी हसेल का, याची पर्वाही करत नाहीत.

तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!

संगीतप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Jan 2013 - 10:34 pm | लॉरी टांगटूंगकर

जमेश!!!!!!
अशक्य निरिक्षण आहे...:)

पैसा's picture

27 Jan 2013 - 10:46 pm | पैसा

वर्गीकरण आवडलं. यात कार्यक्रमाला धरून बांधून कोणीतरी आणलेले अशीही एक क्याटेगरी करायला हरकत नाही!

जबरदस्त निरीक्षण! लेखन खूपच रोचक झाले आहे.

धन्या's picture

27 Jan 2013 - 11:06 pm | धन्या

शास्त्रीय संगितातलं काही कळत नसल्यामुळे सवाईला कधी गेलो नाही. परंतू सवाईला जाणारे काही प्राणी ओळखीचे आहेत. त्यातले काही तुमच्या "हवाबाण" कॅटेगरीत येतात असं आता वाटू लागलं आहे.

आनन्दिता's picture

27 Jan 2013 - 11:25 pm | आनन्दिता

लै भारी!! जबरदस्त निरीक्षण!!

मूकवाचक's picture

27 Jan 2013 - 11:26 pm | मूकवाचक

+१

दादा कोंडके's picture

27 Jan 2013 - 11:45 pm | दादा कोंडके

अं.ज.जे. आणि हवाबाण यांच्या मधला एक थिल्लर प्रकार असतो. समोरच्याला आवड आहे पण शास्त्रिय संगितातलं कमी कळतं असं दिसलं की यांना चेव येतो. आणि संगितातलं कळतं असं दिसलं की घराण्यांचा विषय काढतात. दिग्गज गायकांचे आपले किती घरोब्याचे संबंध आहेत हे सांगत असतात. कुणा उस्ताद-पंडीताचं नाव घेताना नाटकी पणानं कानाच्या पाळीला हात वगैरे लावतात. अशा मैफिलीत ब्याक स्टेजवर जाउन उगाच इकड-तिकडं करण्याची खोड असते. त्यामुळेच कळलेली 'पेट नेम्स'चा अशा चर्चेत उपयोग करतात.

किसन शिंदे's picture

28 Jan 2013 - 12:07 am | किसन शिंदे

अचूक निरीक्षणं करता राव तूम्ही. :)
नाझी सॅल्युट!! अगदी नेमकी अवस्था सांगितलीय.

सुहास झेले's picture

28 Jan 2013 - 11:25 am | सुहास झेले

अगदी अगदी....निव्वळ अप्रतिम :) :)

हकु's picture

9 Dec 2016 - 11:54 am | हकु

हाहाहा !!
अगदी चित्र डोळ्यासमोर आलं.

नंदन's picture

28 Jan 2013 - 12:21 am | नंदन

लेख आवडला, मार्मिक निरीक्षणं आहेत अगदी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2013 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला, मार्मिक निरीक्षणं आहेत अगदी.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

28 Jan 2013 - 12:34 am | बॅटमॅन

लै खत्रा निरीक्षणे हैत!!! जियो.

तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!

अत्यंत रसिक अवलोकन!

अभ्या..'s picture

28 Jan 2013 - 1:14 am | अभ्या..

अत्यंत सूक्ष्म निरिक्षण आणि तेवढेच मार्मिक शब्दांत वर्णन.
एकदम आवडले :)

योगप्रभू's picture

28 Jan 2013 - 1:41 am | योगप्रभू

आदूबाळ,
लिखते रहना..आगे चलकर तू जरुर कुछ बनेगा...

सवाई म्हणजे जत्राच असते. तरी अजुन बर्‍याच मेंटॅलिटीचे लोक उल्लेख करायचे राहिलेत.

...खुर्चीची १५०० रुपयांची मर्यादित तिकिटे तासाभरात संपतात, मग आपण त्याच्यासाठी रात्रभर फूटपाथवर कसे झोपून होतो, हे सांगणारे लोक. खुर्चीवर बसून हे भारतीय बैठकीवर बसलेल्यांकडे तुच्छतेने बघत असतात.
...काहीजणांना स्वस्थ बसवत नाही, ते थोडावेळ गाणे ऐकतात, मध्येच उठतात. स्टॉलवर चकरा मारतात. शाली पांघरुन आलेले छान छान चेहेरे न्याहाळत बसतात.
... काहीजण 'गाणे कमी-खाणे जास्त' गटातले असतात. सारखे आजूबाजूच्या खादाडी स्टॉल्सवर चरत असतात शिवाय मध्ये बसलेल्या ओळखीच्यांना इशारे करुन 'मूगभजी गरम आहेत' असे सांगत असतात.
...मित्र-मैत्रिणी भेटल्यावर त्यांच्याशी संगीतेतर विषयांवर मोठ्या-मोठ्याने गप्पा मारणारे आणि कुणी नाराजी दाखवताच त्याच्याकडे बरेचदा रागारागाने पाहणारे पुरुष व स्त्रिया.
...तुसडेपणाने अपमान करण्याची एकही संधी न सोडणारे प्रवेशद्वारावरील स्वयंसेवक

दादा कोंडके's picture

28 Jan 2013 - 4:24 pm | दादा कोंडके

शिवाय मध्ये बसलेल्या ओळखीच्यांना इशारे करुन 'मूगभजी गरम आहेत' असे सांगत असतात.

असे लोक बघितलेले आहेत. :))

वसंत क्न्या's picture

11 Feb 2013 - 11:38 am | वसंत क्न्या

आदूबाळ, निरिक्षण आणि लिहिणं दोन्ही जमलय !! लिहित रहा बाळा !!

हकु's picture

9 Dec 2016 - 11:56 am | हकु

+१

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2013 - 1:47 am | प्रभाकर पेठकर

'सवाई' चा विषय आणि साबुदाण्याच्या खिचडीचं वर्णन करणारा 'रसिक श्रोता' नाही? कालच्या कार्यक्रमात कुठल्या स्टॉलवर काय होते आणि कसे हादडले ह्याचे दुसर्‍या दिवशी वर्णन करणारेही भेटतात. त्यांना 'खादाड रसिक' अशा वर्गवारीत टाकावे काय?

मिसळपाव's picture

28 Jan 2013 - 1:52 am | मिसळपाव

विषेशतः तुझ्या शेवटच्या वाक्याला - "तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!' - दिलखुलास दाद दिल्याशिवाय रहावत नाहिये - क्या बात है, व्वा !!

अगोचर's picture

28 Jan 2013 - 11:16 am | अगोचर

+१

मुक्त विहारि's picture

28 Jan 2013 - 9:35 am | मुक्त विहारि

अवलोकन

फारएन्ड's picture

28 Jan 2013 - 9:40 am | फारएन्ड

जबरी लिहीले आहे! सुंदर निरीक्षण.


टिपणीस, कोठावळे, हवाबाण, वाती ...

:)

आणि या सगळ्यांना शोधणारे संशोधक कि निरिक्षक?

शैलेन्द्र's picture

28 Jan 2013 - 10:15 am | शैलेन्द्र

भन्नाट लेख.. आवडेश..

राही's picture

28 Jan 2013 - 10:17 am | राही

लिखाण अतिशय आवडले. सूक्ष्म तपशिलांचे नर्मविनोदी वर्णन. अगदी पु.ल. स्टाइल. "दोनदा सम आली, नाही?" आणि "मैफल 'लागली' की.." खासच. एखाद्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राची शोभा वाढवली असती या लेखाने.

मुक्तसुनीत's picture

12 Feb 2013 - 9:21 am | मुक्तसुनीत

>>>एखाद्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राची शोभा वाढवली असती या लेखाने. <<<

हेच म्हणतो ! लेख अतिशय मनापासून आवडला. अत्यंत सुरस नि वाचनीय.

तर्री's picture

28 Jan 2013 - 11:05 am | तर्री

वाचताना मनापासून दाद गेली. मस्त हो आदू बाळराजे ! निरीक्षण , अवलोकन आणि लेखन अशी तिहाई !
टिपणीस , कोठावळे हया जमाती आणि नामकरण एकदम प्रातिनिधिक.
हल्ली तेथे व्यापारी नामक जमत जाम उच्छाद आणते हो - त्यावर काही मार्मिक टिपण्णी ?

अवांतर
पु.लंची शैच्या शैली चा लेखनावर अती भयंकर प्रभाव आहे . नस्ती उठाठेव ते खिल्ली ची किती पारायणे झाली असतील त्याची कल्पना आली. ही कसदार शैली पु,लं च्या कॅसेटी ऐकून येणारी येणारी नाही.

चौकटराजा's picture

28 Jan 2013 - 12:02 pm | चौकटराजा

मैफिलीत स्टेजवर चार पाच जणांची टोळी असते. त्यात गायक , तबलेवाला, पेटीवाला, दोन तानपुरावाले असा संघ !
निरनिराळ्या तबलजींच्या संवयी ( बसण्याच्या, हसण्याच्या, तबला डग्गा ठेवण्याच्या, गायकाला समेत गुडाळण्याचा, मला किती तोडे तुकडे न तिय्ये येतात हे दाखविण्याच्या ) गायकांच्या ( रेकण्याच्या, माईकला भिडण्याच्या, मधे तानपुरावाल्याकडे बघण्याच्या, पेटीवाल्याला खाणाखुणा करण्याच्या, मधे गद्यात लोकांशी बोलण्याच्या, ताना सुरू झाल्या की दळण दळणे दोरीला पीळ घालणे, ताक घुसळणे , तार पंचमाला भीडता आले नाही तर फक्त वर बोट करून तो लागला आहे असे समजा मायबापानो असे श्रोत्याना दर्शविणे )पेटीवाल्याच्या ही नाना तर्‍हा ( सारखी प्रेयसीला जवळ ओढल्या सारखी पेटी जवळ खेचणे, गायकाने जागा घेतली की आपण जागा घेताना " विव्हल झालो" असा चेहरा करणे)
कच्चा माल दिला आहे. त्यावर कोणीतरी लिहा राव !

आदूबाळ's picture

28 Jan 2013 - 12:12 pm | आदूबाळ

तुम्हाला अजून एक फालतू निरीक्षण सांगू का? बर्याचदा पेटीवाल्याला टक्कल असतं आणि तबलजीला जरूरीपेक्षा जास्त केस असतात!

सुधीर's picture

28 Jan 2013 - 1:19 pm | सुधीर

धमाल आली वाचताना.

चौकटराजा's picture

28 Jan 2013 - 4:50 pm | चौकटराजा

कुरळे केसवाले एक घराणे असते तबलजींचे व दुसर्‍या घराण्याचा " बाज " असतो मानेवर रुळणाच्या लांब केससुणीचा !

सूड's picture

28 Jan 2013 - 12:05 pm | सूड

ओळखीतले आपण सवाईला जाऊन काय काय आणि कसं कसं ऐकलं त्याचं दररोज फेसबूकावर स्टेटस अपडेटवणारे काही लोक हवाबाण या क्याट्यागरीत येत असावेत असं वाटून गेलं. त्यांनी एखाद्या गायनाला, बासरीवादनाला, जुगलबंदीला दिलेल्या उपमाही भयानक असतात.

@टिपणीस: टिपणीस हे रेकॉर्डिंग करणारे लोक. >>> =)) वारल्या ग्येलो आहे... =))

@तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!>>> __/\__/\__/\__

मृत्युन्जय's picture

28 Jan 2013 - 12:28 pm | मृत्युन्जय

आपल्याला त्या शास्त्रीय संगितातले शष्प कळत नाही. त्यामुळे सवाईच्या वाटेला आजवर गेलेलो नाही. उत्सुकता म्हणुन कधी गेलोच तर फार काळ निभाव लागेल असे वाटत नाही. आणि खरे सांगायचे तर एकच "आ" कोणीतरी आवताण मारेपर्यंत ताणलेला ऐकायची सहनशक्ती माझ्यात नसल्याने आणि हे असले दळभद्री विचार रसिक श्रोत्यांसमोर बोलुन कुत्सित टोमणे ऐकुन घेऊन अपमान करुन घेण्याची इच्छाही नसल्याने सवाईला लांबुनच रामराम ठोकतो.

चौकटराजा's picture

28 Jan 2013 - 4:47 pm | चौकटराजा

रामराम लांबून नको . एकदा तरी जाच विशेशत: टिपणीस ज्ञातीला निरखा. काय समाधी लागलेली असते राव सांगू !

मैत्र's picture

28 Jan 2013 - 1:16 pm | मैत्र

झक्कास निरीक्षण!
वर्षानुवर्षं बाहेरगावाहून नियमित पणे येणारे श्रोते / अंजजे असतात.
खूप खवचट नसतील तर काही वेळा हे अंजजे बरीच उत्तम माहिती देऊन जातात.
विशेषतः अगदी स्टेजसमोर खुर्च्यांच्या मध्ये जिथे भा.बै. असते तिथले दर्दी मस्त असतात.

खादाड रसिक ही दिवसेंदिवस वाढत चाललेली कॅटेगरी आहे. (आठवा: खिडकी वडा)

मस्त लिहिलं आहे. अजून येऊ द्या..

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2013 - 1:37 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्ही आपले असेच एक हवाबाण कॅटेगरीतले.

यशोधरा's picture

28 Jan 2013 - 4:38 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे.

५० फक्त's picture

28 Jan 2013 - 4:58 pm | ५० फक्त

मी तरी त्या चार पाच दिवसात कसब्यात सुद्धा जात नाही, पुढच्या वर्षी तिथल्या खाडाडीवर एक कट्टा करायचा विचार आहे, आणि तिथं आलेल्यांना ' काय नाय, हादडायला आलेलो नुस्ता, तुम्ही पण का ?' असा प्रश्न विचारयाचा विचार आहे, काय सांगावं ' आयला तुम्हीपण आमच्याच गटातले की मग,' असा भेटेल एखादा.

बाकी, सवाईमधली सौंदर्य स्थळे यावर कुणी लिहिल का ? म्हणजे लग्नसराईच्या सुरुवातीलाच असतो सवाई म्हणुन म्हणलं काय नविन फॅशन ट्रेंड बिंड पाहायला मिळतो का तिथं, म्हणजे नुसतंच खादाडीला गेलो असं व्हायला नको.

अनिता ठाकूर's picture

28 Jan 2013 - 5:54 pm | अनिता ठाकूर

पुलमहाराजांच्या साहित्यावर माझे वाङमयीन पोषण झाले असल्यामुळे, तीच शैली पुन्हा पहाताच पुनःप्रत्ययाचा आनन्द मिळाला.फारच छान!!

धमाल मुलगा's picture

28 Jan 2013 - 6:19 pm | धमाल मुलगा

लै भारी! :)
आम्ही जातीवंत औरंगजेब असल्यानं ह्या एकुणच आनंदाला मुकलोच खरं. आता हे वाचून एकदा बघायला पाहिजे ही गंमत असं वाटायला लागलंय. द्येवा, पुढच्यावेळी अशा कार्यक्रमाला जाताना मलाही सोबत घेऊन चला की. पाहिजे तर मला तुमचा शिष्य करुन घ्या! :)

तिमा's picture

28 Jan 2013 - 7:23 pm | तिमा

थोर निरीक्षणे! प्रत्येक बॉल अगदी ब्याटीच्या मध्यावर घेतला आहे.
या कोठावळ्यांना 'माझ्याकडे अख्खा भीमसेन आहे' असे म्हणताना कधी निरखले आहे का ? पारलौकिक आनंद असतो त्या वेळेस त्यांच्या मुखावर! समस्त कोठावळे त्यांच्याकडील 'कलेक्शन' मधलं किती परत ऐकतात हा संशोधनाचा विषय आहे.

क्रान्ति's picture

28 Jan 2013 - 7:32 pm | क्रान्ति

जातकुळींची नावं जबरदस्त! मार्मिक लेख !

यसवायजी's picture

28 Jan 2013 - 8:57 pm | यसवायजी

लै भारी.. मजा आली वाचताना. सही.

घाटावरचे भट's picture

28 Jan 2013 - 9:40 pm | घाटावरचे भट

परंतु पहिल्या तीन प्रकारात खरे/चांगले/ज्ञानी श्रोते सापडत नाहीत हे काही तितकेसे खरे नाही, आणि त्या तीन प्रकारात वर्णन केलेले गुणच फक्त त्यांच्यात आढळतात असे नाही. किंबहुना खरा श्रोता हीच एक अत्यंत हायपोथेटिकल क्याटेगरी आहे असे म्हणावेसे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2013 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक आणि खुसखुशीत वर्णन. कानसेनांचे तुमचे निरिक्षण आणि त्याचे केलेले प्रकार एकदम चपखल आहे. शेवट तर केवळ अप्रतिम !

आवडीनिवडी असतात, तीव्र नसतात, पण कलाकाराशी एक घट्ट भावनिक नातं असतं. भीमसेन जोशींना सरळ "अण्णा" म्हणतात. त्यांचा वारसा कोण चालवणार याची उगीचच चिंता करतात. गाणं आवडलं तर खुली दाद देतात. मनाला स्पर्शून गेलं तर डोळ्यातल्या पाण्याची लाज वाटून घेत नाहीत. कोणी हसेल का, याची पर्वाही करत नाहीत.

तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!

हे मनाला स्पर्श करून गेलं.

आदूबाळ's picture

29 Jan 2013 - 2:07 am | आदूबाळ

सर्वांचे मनापासून धन्यवाद! मूठभर मांस अंगावर चढलं (ते योग्य ठिकाणी चढो ही ईश्वरचरणी प्रार्थना!)

"कार्यक्रमाला धरून बांधून कोणीतरी आणलेले" हे पैसाताईंचं निरीक्षण बरोबर आहे! सुचलं नाही...

दादांचं "अं.ज.जे. आणि हवाबाण यांच्या मधला एक थिल्लर प्रकार" हेही बरोबर निरीक्षण आहे. पण मी फार पूर्वीपासून "बॅकबेंचर" आहे, आणि असले लोक पुढे पुढे करतात. त्यामुळे माझा त्यांचा फारसा संबंध येत नाही.

योगप्रभू,पेठकरकाका, मैत्र आणि ५०फक्त - सवाईतली खादाडी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कोणीतरी लिहा ना!

चौकटराजा - गायक/गायिकांचे विभ्रम हे भयंकर विनोदी असतात. पण नुसत्या वर्णनावरून तो/ती विविक्षित व्यक्ती कोण आहे हे ओळखू येईल. कोणा कलाकारावर वैयक्तिक टीका करायची नसल्याने जाहीरपणे लिहीत नाही, पण आपण कधी भेटलो तर लै गमती सांगीन!

घाटावरच्या भटांनो - या क्याट्यागरी "म्युच्युअली एक्स्क्लूजिव" नाहीत हो! आणि "खरा श्रोता" हायपोथेटिकल नक्कीच नाही. हे लोक "स्वान्तसुखाय" असतात. आपल्या शास्त्रीय संगीताच्या आवडीची जाहिरात करण्यात त्यांना कोणताही रस नसतो.

या "खर्या श्रोत्या"ची कल्पना डोक्यात आली आमच्या इमारतीत रहाणार्या एका माणसावरून. हा इसम सिंहगड रस्ता ते सणसवाडी हे अंतर नोकरीसाठी रोज मोटरसायकलीवरून कापतो. बायको-मुलगी आहे, पॅरॅलिसीसग्रस्त आई आणि व्रूध्द वडील आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची आहे असं नाही पण दैनंदिन आयुष्यात संघर्ष फार आहे. इतकं करूनही हा बाबा मला दर मैफिलीला भेटतो! घामेजलेले कपडे, सतत मोटरसायकल चालवून येणारा फेंगडेपणा आणि हेल्मेट यांसह! मागे कुठेतरी कोपर्यात बसतो. आमच्या इमारतीत कोणाला त्याची ही आवड माहीतसुध्दा नाही.

हाच असं नाही, असे अनेक लोक भेटले: वेगवेगळ्या वयाचे, आर्थिक/सामाजिक परिस्थितीतले. पुण्यात होणार्या मैफिलींना कधी गेलात, तर स्वयंचलित व्हीलचेअरवरून गाणं ऐकायला येणारे एक आजोबा आहेत. त्यांच्याकडे लक्ष ठेवा - तुम्हाला खरा श्रोता सापडून जाईल.

शेवटचे दोन परिच्छेद लेखात आले असते तर जास्त भावले असते... असो.

मस्त लेख! पुलं स्टाईल.
(वरातीमागून घोड्याबद्दल माफ करा.)

स्वाती दिनेश's picture

12 Feb 2013 - 1:40 pm | स्वाती दिनेश

लेख फार आवडला.
हा अप्रतिम लेख नजरेतून कसा बरे सुटला होता?(तो नजरेस मुसु मुळे पडला, त्याबद्दल मुसुला जाहीर थँक्यु.)
स्वाती

यशोधरा's picture

12 Feb 2013 - 1:43 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे!

ऋषिकेश's picture

12 Feb 2013 - 1:50 pm | ऋषिकेश

=))
छ्या! यावरची एक 'हसविका' अर्धी लिहून पडलीये आता देऊन काही उपेगाची न्हय!
तुमी एकदमच मस्त लिवलंय!

दत्ता काळे's picture

12 Feb 2013 - 2:00 pm | दत्ता काळे

वर्गीकरण भारी झालंय.

मिपाच्या मैफिलीतला 'टिपणीस' :)

बांवरे's picture

13 Feb 2013 - 4:44 am | बांवरे

फक्कड लेख झाला आहे.

(टिपणीस) बांवरे.

रमताराम's picture

13 Feb 2013 - 12:30 pm | रमताराम

एक नंबर निरीक्षणे आहेत.
कोठावळे भेटले तर त्यांच्याशी जरूर गप्पा मारा. तुमची आणि त्यांची आवड जुळली तर न जाणो तुम्हाला खजिना सापडून जाईल.
इथे आपली लै वेळा असहमती. आवड जुळली तरी त्यांचा तथाकथित खजिना तुम्हाला दुरून सुद्धा पहायला मिळत नाही, देणे तर सोडाच. सतत 'त्या अमक्याने दिले मला ते रेकॉर्डिंग त्याने इतर कोणाला देऊ नकोस म्हणून निक्षून सांगितले आहे.' असा धोषा लावतात. पण त्यांच्याकडे कायकाय आहे हे तुम्हाला इत्थंभूत सांगितल्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीत. मुख्य उद्देश तुम्हाला जळवणे, 'माझा कडे आहे नि तुझ्याकडे नाही' हे ठसवणे. त्या गाण्याला इतर महत्त्वाच्या कारणांपेक्षा 'एक्स्लुजिव वॅल्यू' असणे यांना अधिक महत्त्वाचे वाटते. एखादा फारच उदार झाला तर 'घरी ये केव्हाही. ऐकवीन एकदा मस्त कुमारांचा चैती भूप.' वगैरे मिरचीच्या खळ्यावरचा वायदा करतात. तुम्ही त्यांना हवे ते बरेच काही देऊन उपकृत केलेच तर उपकार केल्यासारखे एखाद-दुसरे रेकॉर्डिंग तुमच्या पदरात पडते. ते ही ' इतर कोणाला देऊ नकोस म्हणून निक्षून सांगत.' नि अशा आविर्भावात की जणू साला हाच लेकाचा तो जगप्रसिद्ध गायक नि केवढा मोठ्ठा अनमोल ठेवा तो काळजावर दगड ठेवून तो तुम्हाला देतो आहे, जणू काय तुम्हाला जावईच करून घेतोय.

जयंत कुलकर्णी's picture

13 Feb 2013 - 8:42 pm | जयंत कुलकर्णी

"चला आज गंधर्व खाद्य महोत्सवाला जाउया ! आज गाणे आहे तेथे.........." असे काही वर्षांनी ऐकू येईल की काय ?

स्वरांगी's picture

11 Sep 2015 - 1:07 pm | स्वरांगी

कसलं भारी निरीक्षण आहे ! फारच छान..

नया है वह's picture

11 Sep 2015 - 5:47 pm | नया है वह

एक नंबर निरीक्षणे आहेत.

मारवा's picture

11 Sep 2015 - 7:24 pm | मारवा

आदुबाळ
तुम्ही फार मार्मिक निरीक्षण नोंदवलीत.
ग्रेट

पद्मावति's picture

11 Sep 2015 - 8:57 pm | पद्मावति

वाह, खुपच छान लिहिलाय.
जबरदस्त निरीक्षणे. पु.ल. देशपांडे यांच्यासारखी हलकी फुलकी, प्रसन्न विनोदी लेखन शैली आहे तुमची. मस्तं मजा आली लेख वाचून.

बोका-ए-आझम's picture

12 Sep 2015 - 11:15 am | बोका-ए-आझम

आम्ही सवाई गंधर्व संगीतमहोत्सवाऐवजी सवाई एकांकिकावाले जास्त आहोत आणि तिथेही अशा क्याटेगरीचे लोक येतात. अजून दोन क्याटेग-या जास्त असतात - आपल्या टीमला प्रोत्साहन देणारे - एकांकिका announce झाली की यांना जो चेव येतो की ज्याचं नाव ते आणि सलीम अली - पक्षीनिरीक्षण करायला आलेले - हे तर गळ टाकूनच बसलेले असतात.

सविता००१'s picture

12 Sep 2015 - 1:12 pm | सविता००१

कसलं भन्नाट लिहिलंय हो तुम्ही? आईशप्पत. सगळा सवाई माहोल तरळून गेला डोळ्यांसमोरून झरझर. भयानक पटलंय.
हे कसं राहून गेलं वाचायचं??????????????????????
खूप खूप आवडलं लिखाण. त्यापेक्षा लै म्हणजे लैच्च पटलंय.
मजा आलीये वाचायला.धन्स

जबराट लिहिले आहे. मजा आली वाचताना. लिहित राहा

मदनबाण's picture

13 Sep 2015 - 10:02 am | मदनबाण

झकास्स्स्स... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens

महासंग्राम's picture

8 Dec 2016 - 8:07 pm | महासंग्राम

यंदा दोन तीन नवीन प्रकार आढळलेट ते टाकायला हवेत.

१. फेसबुके : हे आपण सवाईला आल्याचं स्टेट्स अपडेट करून आपण कसे अभिरुची संपन्न आहोत हे दाखवतात. यातल्या फार कमी जणांना गाण्याची घेणं देणं असतं.
२. शेळफी वाले : यांना फक्त स्टेज बॅक ग्राउंडला ठेवून सेल्फी काढून पोस्ट करायचा असतो. बाकी मग मागे कोणीही गात असो त्याचं काही नसतं.
३. फोटोग्राफर : DSLR स्वस्त झाल्यापासून हि लोक काँग्रेस गवताप्रमाणे वाढली आहेत. हे सर्वात मागे भारतीय बैठकीवर बसणार, तुम्ही एका ठिकाणी बसले असला तिथूनच यांना नेमका अँगल घ्यायचा असतो.

संदीप चित्रे's picture

8 Dec 2016 - 8:09 pm | संदीप चित्रे

हा लेख वाचला नव्हता. खूपच आवडला.
(अजून खूप काही लिहिणार होतो पण कुठल्या तरी कॅटेगरीत फिट केला जाईन म्हणून थांबतो) :)

तिसर्‍यांदा माझी प्रतिक्रिया, एकदम सुरेख लिहिलंय! आम्ही जायचो सवाई ऐकायला. फार शास्त्रशुद्ध कळत होतं असं अजिबात नव्हतं पण खूप आवडायचं, अजूनही आवडतंच पण आता काही वर्षं महोत्सवाची वेळही बदललीये. (ज्याचा तीव्र निषेध.) नाही जात आता.

एकदम मार्मिक निरीक्षणं! =))
एक कोठावळे जरा लांबच्या नात्यातले होते. त्यांच्याकडे खरोखरंच भरपूर खजिना होता. बर्‍याच टिपणीसांकडून त्यांनी बार्टर तत्त्वावर माल जमवला होता. कधीकधी ते स्वतः देखील टिपणीस असत! :)
मी काही वर्षे बघू शकलो हा कार्यक्रम. तबला आवडायचा त्यामुळे ते चुकवायचो नाही. भजी, बटाटेवडा, चहा असा माफक आधार मध्यंतरात लागायचाच त्याशिवाय उरलेली रात्र जागणार कशी!

(संपूर्ण रात्रीनंतर अभंगवाणी आवडणारा) सवाई चतुरंग

हे खोदकाम आवडले. लेख आवडला. काही नमूने आठवले.
जसे, माझ्या कधीही, चुकूनही शा. सं. न ऐकणार्‍या वडिलांना अमकी तमकी चीज हवी होती. नवर्‍याने "मी मिळवून देतो" असे सांगितले. मक्काय, ती लवकर सापडेना. माझ्या सासर्‍यांच्या मामेभावाकडे आहे असे समजले. त्यांनी कॉपी मारून देण्याचेही मान्य केले, फक्त घरी येऊन घेऊन जावा असे म्हणणे होते ते आम्ही आनंदाने मान्य केले. त्यांच्याघरी अर्धा पाऊण तास ते सगळे ऐकावे लागले. त्यातही ते मामेसासरे दाद देत होते, अमकी जागा चांगली घेतलीये वगैरे. मला ओ की ठो कळेना. जेंव्हा तेथून निघालो तेंव्हा फार आनंद झाला.

यशोधरा's picture

8 Dec 2016 - 8:52 pm | यशोधरा

पण चीज मिळवलीत का, ते सांग आधी.

हो, ते सांगायचं राहिलं नाही का! अगं इतके अत्याचार झाल्यावर मिळाली व माझ्या वडिलांनी एक अदोनदा सोडता कधी ऐकली असेल असेही नाही.

माझ्या वडिलांनी एक अदोनदा सोडता कधी ऐकली असेल असेही नाही.

"क्षण एक पुरे प्रेमाचा...."

संदीप चित्रे's picture

8 Dec 2016 - 11:57 pm | संदीप चित्रे

अगदी मनापासून लिहिलेलं दिसतंय! :)

येस्स! तेच महत्वाचे आहे. अरे त्या मामेसासर्‍यांना मी आधी कधी भेटले नव्हते. तरी त्यांनी गाणं ऐकायला लावलं. मला तर पळून यावसं वाटत होतं पण काय करणार? वर विचारलं की तुझे वडील फारच दर्दी दिसतायत. आता काय बोलणार?

रमेश आठवले's picture

8 Dec 2016 - 9:35 pm | रमेश आठवले

लेख आवडला . छान निरीक्षण आणि विश्लेषण .

स्पार्टाकस's picture

9 Dec 2016 - 6:10 am | स्पार्टाकस

टिपणीस.. कोठावळे ...कहर!
एकदम जबरी जमलं आहे!

सिरुसेरि's picture

9 Dec 2016 - 10:59 am | सिरुसेरि

मस्त +१

किसन शिंदे's picture

9 Dec 2016 - 11:39 am | किसन शिंदे

पुनरेकवार लेख वाचल्या गेला आहे. ठाण्यातल्या परवाच्या वसंतोत्सवात एक टिपणीस पाहायला मिळाली, रेकॉर्ड करताना ऐनवेळी मोबाईल बंद पडू नये म्हणून त्याला भली मोठी पॉवर बँक जोडली होती, आणि तो सगळा जामानिमा सांभाळत 'नाझी सॅल्यूट' तर होताच. =))

विशाल कुलकर्णी's picture

9 Dec 2016 - 12:55 pm | विशाल कुलकर्णी

अतिशय सुंदर अवलोकन ! आवडलंच...
पुण्यात होतो तोवर जमेल तसं जायचो. पण मुद्दामहून ठरवून वगैरे कधीच नाही जमलं.

स्वीट टॉकर's picture

9 Dec 2016 - 1:32 pm | स्वीट टॉकर

अरे वा! बरं झालं मंदारभाऊंनी लेख वर काढला!

अचूक निरीक्षण आणि अगदी बेरकी वर्णन! मजा आली वाचायला.

काय कहर लिहिलंय दादा! मजा आली!!

(शेवट फार म्हणजे फारच भारी...!)

कंजूस's picture

14 Dec 2016 - 9:21 pm | कंजूस

!!!

मनिमौ's picture

14 Dec 2016 - 10:02 pm | मनिमौ

आवडेश एकदम

आज बर्याच दिवसांनी बराच वेळ काही लेख वाचून काढले .. त्यामधील दाद देण्याजोगा हा वाटला .. निव्वळ अप्रतिम .