लाह्यांचा खरवस.
प्रेषक, ज्योति प्रकाश, Tue, 11/09/2012 - 00:09

साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या.
१ वाटी काजू.
१ वाटी खवलेले खोबरे.
८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे)
अर्धा चमचा वेलचीपूड.
दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी).
तूप.
कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व
घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा. भिजलेले काजू
व लाह्या एकत्र करून मिक्सर मध्ये वाटा.त्यात साखर व दूध घालून गंधासारखी(देवाला लावण्यासाठी
उगाळतात त्याप्रमाणे) पेस्ट करा. वेलचीपूड मिसळा. हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओता. हा डबा
कुकरमध्ये ठेवून खरवस उकडा. थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या कापा.
प्रतिक्रिया
स्स्स्स्सह्ही !!
हि रेसिपी कुरीयन साहेबांना श्रद्धांजली म्हणायची काय??
अर्धवटराव
-रेडि टु थिंक
दंडवत.
अफलातून पाककृती आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
अगदी हेच म्हणतेय
अगदी हेच म्हणतेय..
छान पाकृ
***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/
एग पुडींगचे व्हेज व्हर्जन आहे का..?
एग पुडींगचे व्हेज व्हर्जन आहे का..?
म्हंजे ही पाकृ अंडे घालून
म्हंजे ही पाकृ अंडे घालून करता येणार नाही??
)
असो.
सोपीच आहे कृती.
पण आता इथे लाह्या शोधणे आले. ( खर्रेच!
========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ
अफलातून पाककृती आहे ही. एक
अफलातून पाककृती आहे ही.
एक कुतूहूल म्हणून खालील प्रश्न विचारतो:
लाह्या म्हणजे काय? त्या कशा बनतात? हे कुणाकुणाला माहित नाही? हात वरती करा.
अगदी वेगळी पाकृ आहे.
अगदी वेगळी पाकृ आहे. आवडली.
भकु, जोंधळे थोडावेळ पाण्यात भिजवतात, नंतर फडक्यात बांधून ठेवतात असे काहीसे आठवते.
नंतर मात्र मोठा कुकर कोरडाच गरम करायचा आणि त्यात थोडे थोडे जोंधळे टाकून ते उडू नयेत म्हणून झाकण हातानेच अर्धवट धरायचे. तडतड करत लाह्या फुटतात. त्या काढून पुन्हा जोंधळे टाकायचे. नंतर चांगल्या लाह्या इतर गोष्टींसाठी वापरायच्या तर गणंग/ न फुटलेल्या/ अर्धवट फुटलेल्या लाह्यांपासून आणखी पदार्थ होतात. एकंदरीतच वाया काही घालवायचे नाही.
मस्त
मस्त ,आत्ताच खाव्याश्या वाटत आहे
www.mejwani.in
प्रेषक कच्ची कैरी Tue,
प्रेषक कच्ची कैरी Tue, 11/09/2012 - 07:16.
मस्त ,आत्ताच खाव्याश्या वाटत आहे Smile
अभिनंदन............... अभिनंदन........ अभिनंदन
वेगळीच पाकृ आहे. आता इथे कोमट
वेगळीच पाकृ आहे. आता इथे कोमट पाणी शोधणे आले
********************************************
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी
जॉधळ्याच्याच हव्या का लाह्या?
जॉधळ्याच्याच हव्या का लाह्या? मक्याच्या नाही चालणार?
करुन पाहेन म्हणते.
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
मक्याच्या लाह्यांचा कधी करून
मक्याच्या लाह्यांचा कधी करून बघितला नाही.केल्यावर मलाही सांगा कसा होतो ते.
ज्योति प्रकाश
इनोव्हेशन !
पा. कृ . आवडली. (करायला सांगण्यात येईल !)
खरवस हा अत्यंत आवडता प्रकार.
लई वेळा आभार !
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
(No subject)
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
पाकृ आवडली!
काजू बिजू आहेत म्हणजे चव मस्त असणारच!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
हटके रेशिपी. पण कुकरमध्ये
हटके रेशिपी. पण कुकरमध्ये ठेवून उकडायचा म्हणजे शिट्टी ठेवायची का काढायची ?
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
कुकरची शिट्टी काढून खरवस
कुकरची शिट्टी काढून खरवस उकदावा.
ज्योति प्रकाश
मस्त!!
मस्त!!
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
सुंदर अनवट पाकृ
सुंदर अनवट पाकृ
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
ज्योति प्रकाश जी , खरच पप्रतिम रेसिपी आहे ही.
ज्योति प्रकाश जी , खरच पप्रतिम रेसिपी आहे ही.
मस्त भारी रेसिपी
निश
आमच्याकडे खरवस खुपसारा खजूर
आमच्याकडे खरवस खुपसारा खजूर आणि पिस्ते टाकून बनवतात. तुम्ही दिलेला प्रकार खूप वेगळा आहे. छानच असणार
---------------------------------------------------------------------------------------------------------
"To confront a mind that radically alters our perception of the world is one of life's most unsettling yet liberating experiences."
अश्याच आणखी जरा नेहमीपेक्षा
अश्याच आणखी जरा नेहमीपेक्षा वेगळ्या पाककृती हव्यात..
धन्यवाद..
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
झक्क्क्कास !
कधी येऊ खायला ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
एक शंका
दोन वाट्या लाह्या की लाह्यांचं पीठ? दोन वाट्या लाह्यांबरोबर एक वाटी काजू नि एक वाटी खोबरं हे प्रमाण पाहता त्यांना लाह्यांचा खरवस म्हणायचा की काजू-खोबर्याचा? दोन वाटी लाह्या घेतल्या तर त्यांचं पीठ जेमतेम अर्धी वाटी होईल ना? लाह्या अल्पमतात जातायत ना.
__________________________________________
Every 'ism' is a euphemism, every religion a contagion
दोन वाट्या लाह्याच
दोन वाट्या लाह्याच घ्यायच्या.पीठ नाही.लाह्या अल्पमत्तत जात नाहीत्.खर्वसात लाह्यांची चव येते.
ज्योति प्रकाश
मस्त!!
नेहमीपेक्षा वेगळी पाकृ.