मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाह्यांचा खरवस.

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या. १ वाटी काजू. १ वाटी खवलेले खोबरे. ८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे) अर्धा चमचा वेलचीपूड. दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी). तूप. कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा. भिजलेले काजू व लाह्या एकत्र करून मिक्सर मध्ये वाटा.त्यात साखर व दूध घालून गंधासारखी(देवाला लावण्यासाठी उगाळतात त्याप्रमाणे) पेस्ट करा. वेलचीपूड मिसळा. हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओता. हा डबा कुकरमध्ये ठेवून खरवस उकडा. थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या कापा.

वाचने 8920 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by मोदक

कवितानागेश Tue, 09/11/2012 - 11:12
म्हंजे ही पाकृ अंडे घालून करता येणार नाही?? :( असो. सोपीच आहे कृती. पण आता इथे लाह्या शोधणे आले. ( खर्रेच! :( )

भरत कुलकर्णी Tue, 09/11/2012 - 03:45
अफलातून पाककृती आहे ही. एक कुतूहूल म्हणून खालील प्रश्न विचारतो: लाह्या म्हणजे काय? त्या कशा बनतात? हे कुणाकुणाला माहित नाही? हात वरती करा.

In reply to by भरत कुलकर्णी

रेवती Wed, 09/12/2012 - 20:04
अगदी वेगळी पाकृ आहे. आवडली. भकु, जोंधळे थोडावेळ पाण्यात भिजवतात, नंतर फडक्यात बांधून ठेवतात असे काहीसे आठवते. नंतर मात्र मोठा कुकर कोरडाच गरम करायचा आणि त्यात थोडे थोडे जोंधळे टाकून ते उडू नयेत म्हणून झाकण हातानेच अर्धवट धरायचे. तडतड करत लाह्या फुटतात. त्या काढून पुन्हा जोंधळे टाकायचे. नंतर चांगल्या लाह्या इतर गोष्टींसाठी वापरायच्या तर गणंग/ न फुटलेल्या/ अर्धवट फुटलेल्या लाह्यांपासून आणखी पदार्थ होतात. एकंदरीतच वाया काही घालवायचे नाही. :)

तर्री Tue, 09/11/2012 - 12:33
पा. कृ . आवडली. (करायला सांगण्यात येईल !) खरवस हा अत्यंत आवडता प्रकार. लई वेळा आभार !

रमताराम Wed, 09/12/2012 - 20:32
दोन वाट्या लाह्या की लाह्यांचं पीठ? दोन वाट्या लाह्यांबरोबर एक वाटी काजू नि एक वाटी खोबरं हे प्रमाण पाहता त्यांना लाह्यांचा खरवस म्हणायचा की काजू-खोबर्‍याचा? दोन वाटी लाह्या घेतल्या तर त्यांचं पीठ जेमतेम अर्धी वाटी होईल ना? लाह्या अल्पमतात जातायत ना.