लाह्यांचा खरवस.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
11 Sep 2012 - 12:09 am


साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या.
१ वाटी काजू.
१ वाटी खवलेले खोबरे.
८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे)
अर्धा चमचा वेलचीपूड.
दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी).
तूप.
कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व
घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा. भिजलेले काजू
व लाह्या एकत्र करून मिक्सर मध्ये वाटा.त्यात साखर व दूध घालून गंधासारखी(देवाला लावण्यासाठी
उगाळतात त्याप्रमाणे) पेस्ट करा. वेलचीपूड मिसळा. हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओता. हा डबा
कुकरमध्ये ठेवून खरवस उकडा. थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या कापा.

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

11 Sep 2012 - 12:51 am | अर्धवटराव

हि रेसिपी कुरीयन साहेबांना श्रद्धांजली म्हणायची काय??

अर्धवटराव

गणपा's picture

11 Sep 2012 - 12:56 am | गणपा

अफलातून पाककृती आहे.

सानिकास्वप्निल's picture

11 Sep 2012 - 3:28 am | सानिकास्वप्निल

अगदी हेच म्हणतेय..
छान पाकृ :)

एग पुडींगचे व्हेज व्हर्जन आहे का..?

कवितानागेश's picture

11 Sep 2012 - 11:12 am | कवितानागेश

म्हंजे ही पाकृ अंडे घालून करता येणार नाही?? :(
असो.
सोपीच आहे कृती.
पण आता इथे लाह्या शोधणे आले. ( खर्रेच! :( )

भरत कुलकर्णी's picture

11 Sep 2012 - 3:45 am | भरत कुलकर्णी

अफलातून पाककृती आहे ही.

एक कुतूहूल म्हणून खालील प्रश्न विचारतो:

लाह्या म्हणजे काय? त्या कशा बनतात? हे कुणाकुणाला माहित नाही? हात वरती करा.

रेवती's picture

12 Sep 2012 - 8:04 pm | रेवती

अगदी वेगळी पाकृ आहे. आवडली.
भकु, जोंधळे थोडावेळ पाण्यात भिजवतात, नंतर फडक्यात बांधून ठेवतात असे काहीसे आठवते.
नंतर मात्र मोठा कुकर कोरडाच गरम करायचा आणि त्यात थोडे थोडे जोंधळे टाकून ते उडू नयेत म्हणून झाकण हातानेच अर्धवट धरायचे. तडतड करत लाह्या फुटतात. त्या काढून पुन्हा जोंधळे टाकायचे. नंतर चांगल्या लाह्या इतर गोष्टींसाठी वापरायच्या तर गणंग/ न फुटलेल्या/ अर्धवट फुटलेल्या लाह्यांपासून आणखी पदार्थ होतात. एकंदरीतच वाया काही घालवायचे नाही. :)

कच्ची कैरी's picture

11 Sep 2012 - 7:16 am | कच्ची कैरी

मस्त ,आत्ताच खाव्याश्या वाटत आहे :)

विजुभाऊ's picture

12 Sep 2012 - 1:26 pm | विजुभाऊ

प्रेषक कच्ची कैरी Tue, 11/09/2012 - 07:16.
मस्त ,आत्ताच खाव्याश्या वाटत आहे Smile

अभिनंदन............... अभिनंदन........ अभिनंदन

मृत्युन्जय's picture

11 Sep 2012 - 11:15 am | मृत्युन्जय

वेगळीच पाकृ आहे. आता इथे कोमट पाणी शोधणे आले

जॉधळ्याच्याच हव्या का लाह्या? मक्याच्या नाही चालणार?
करुन पाहेन म्हणते.

ज्योति प्रकाश's picture

11 Sep 2012 - 2:50 pm | ज्योति प्रकाश

मक्याच्या लाह्यांचा कधी करून बघितला नाही.केल्यावर मलाही सांगा कसा होतो ते.

तर्री's picture

11 Sep 2012 - 12:33 pm | तर्री

पा. कृ . आवडली. (करायला सांगण्यात येईल !)
खरवस हा अत्यंत आवडता प्रकार.
लई वेळा आभार !

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2012 - 2:53 pm | अत्रुप्त आत्मा

पैसा's picture

11 Sep 2012 - 6:23 pm | पैसा

काजू बिजू आहेत म्हणजे चव मस्त असणारच!

हटके रेशिपी. पण कुकरमध्ये ठेवून उकडायचा म्हणजे शिट्टी ठेवायची का काढायची ?

ज्योति प्रकाश's picture

11 Sep 2012 - 11:59 pm | ज्योति प्रकाश

कुकरची शिट्टी काढून खरवस उकदावा.

जाई.'s picture

11 Sep 2012 - 9:51 pm | जाई.

मस्त!!

शुचि's picture

12 Sep 2012 - 3:04 am | शुचि

सुंदर अनवट पाकृ

ज्योति प्रकाश जी , खरच पप्रतिम रेसिपी आहे ही.
मस्त भारी रेसिपी

हारुन शेख's picture

12 Sep 2012 - 11:27 am | हारुन शेख

आमच्याकडे खरवस खुपसारा खजूर आणि पिस्ते टाकून बनवतात. तुम्ही दिलेला प्रकार खूप वेगळा आहे. छानच असणार

अश्याच आणखी जरा नेहमीपेक्षा वेगळ्या पाककृती हव्यात..

धन्यवाद..

परिकथेतील राजकुमार's picture

12 Sep 2012 - 5:01 pm | परिकथेतील राजकुमार

कधी येऊ खायला ?

रमताराम's picture

12 Sep 2012 - 8:32 pm | रमताराम

दोन वाट्या लाह्या की लाह्यांचं पीठ? दोन वाट्या लाह्यांबरोबर एक वाटी काजू नि एक वाटी खोबरं हे प्रमाण पाहता त्यांना लाह्यांचा खरवस म्हणायचा की काजू-खोबर्‍याचा? दोन वाटी लाह्या घेतल्या तर त्यांचं पीठ जेमतेम अर्धी वाटी होईल ना? लाह्या अल्पमतात जातायत ना.

ज्योति प्रकाश's picture

13 Sep 2012 - 12:01 am | ज्योति प्रकाश

दोन वाट्या लाह्याच घ्यायच्या.पीठ नाही.लाह्या अल्पमत्तत जात नाहीत्.खर्वसात लाह्यांची चव येते.

खडीसाखर's picture

16 Sep 2012 - 9:52 pm | खडीसाखर

नेहमीपेक्षा वेगळी पाकृ.