तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-३८

खुशि's picture
खुशि in भटकंती
6 Sep 2012 - 1:01 pm

झुन्जुमुन्जु झाल्यावर घाटावर स्नानासाठी गेलो. गावातिल लोकही स्नानासाठी आलेले होते. पायरीवर बसुन स्नान करायला लागलो. थन्डीचे दिवस आहेत्,पण नर्मदाजल सुखद उबदार होते. अरुणोदय झाला होता पुर्वा उजळली होती,आणि आपल्या सातरन्गी किरणान्च्या घोड्यान्च्या रथात आरुढ होउन भास्कराचे आगमन झाले.पुर्वेकडे तोन्डकरुन सुर्याला अर्घ्य देण्यासाठी उभी राहिले तर तेव्हा दिसले,सुर्य आपले प्रतिबिम्ब मैय्याच्या जलात पाहुन जणू तिला विचारत होता,खरच धरतीच्या सफरीवर जाण्यासाठी मी रथावर आरुढ होउन जेव्हा निघतो तेव्हा इतका सुन्दर दिसतो? की ही सर्व माणसे भान हरपुन माझ्याकडे बघत राहतात,पक्षी किलबिलाट करु लागतात,व्रुक्षवेली बहरतात,कमलफुले फुलतात,रान फुले हसु लागतात. सान्ग शिवकन्ये ! खरच मी इतका सुन्दर दिसतो? आणि मैय्या लहरीन्च्या खळखळत्या हास्याने उत्तर देत होती,अरे दिवाकरा ! खरच तू खुपच सुन्दर आहेस. तिचे हे उत्तर अ‍ॅकुन सुर्याने मोठ्या खुशीने तिच्यावर सप्तरन्गान्ची उधळण केली. मैय्याला लाल सोनेरी फिरत्या रन्गान्ची जणू कान्जीवरमची साडीच भेट दिली. आणि मैय्याही लगेच ती परिधान करुन चमचमत रत्नसागराला भेटण्यासाठी लगबगीने निघाली. मग आम्हीही अर्घ्य देउन परतलो.
खोलीत येउन निघायची तयारी केली.आशिष दुबेनी डबा खोलीतच ठेवुन दाराला नुसती कडी घालुन गेलात तरी चालेल असे सान्गितले होते, म्हणून नर्मदामैय्याच्या आरती-प्रसादासाठी काही पैसे त्या डब्यात ठेवुन आम्ही निघालो. काल दिनेशने जवळचा रस्ता दाखवला होता त्या रस्त्याने चौराहापर्यन्त फक्त २कि.मि. यायला माझ्या दुखर्‍या पायामुळे पाउणतास लागला. पिण्याचे पाणी सम्पले होते,समोरच एक माताजी अन्गणात झाडलोट करत होत्या त्यान्च्याकडे पाणी मागितले.त्यानी घरात बोलावले लगेच चहाही दिला,पाण्याच्या बाटल्याही भरुन दिल्या. घरातील सर्वानी आम्हाला परिक्रमावासी म्हणुन नमस्कार केला. ते घर बुधनी भाजपच्या अध्यक्षान्चे होते. त्या भाविक कुटुम्बाचा निरोप घेउन बसस्टॉपवर आलो.
तासभर वाट पाहिल्यावर फौजदार कम्पनीची बस आली,पतईघाटला ही बस जाते असे कन्ड्क्टरने सान्गितले म्हणुन चढलो. बस खचाखच भरलेली होती,सर्वात मागच्या सीटवर कसेबसे बसलो. पिशव्या ठेवायलाही जागा नव्हती;पायापाशी ठेवल्या .गळ्यातच घेउन बसलो. रस्ता भयन्कर होता त्यातच मागच्या सीट अन्ग खिळखिळे करणारे धक्के बसत होते.प्रत्येक एकदोन कि.मि. थाम्बत प्रवाश्यान्ची चढ उतर करत बस डूकू डूकू चालत होती,चालत गेलो असतो तर बरे झाले असते असे होउन गेले होते. दुपारी दीडवाजता पतईघाट आले उतरा असे सान्गितले म्हणुन उतरलो. बस भुर्कन निघुन गेली. रस्त्याच्या समोरील बाजुला पाटी होती थाना दियावन.
अरे बापरे! पतईघाट नाही. तिथे फक्त एक टपरीवजा एक हॉटेल होते.काहीमाणसे तिथे होती.चौकशी करता समजले पतईघाट येथुन १०कि.मि. दुर आहे. एरवी तिथे जाण्यासाठी रिक्षा मिळतात पण आज काही कारणाने रिक्षा बन्द होत्या म्हणजे आता चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.खुप भुक लागली होती,एक साधुबाबा चालवत असलेल्या त्या एकुलत्याएक टपरीवर फक्त चहा बिस्किटेच मिळत होती तीच घेतली.पतईघाट खुप सुन्दर निसर्गरम्य ठिकाण आहे असे पुण्याच्या सुहास लिमये यान्च्या नर्मदे हर हरनर्मदे या पुस्तकात लिहिलेले आहे,आम्ही आमची परिक्रमा बहुतान्शी त्या पुस्तकानुसार करत होतो म्हणून मला पतईघाटला जावेच असे फार वाटत होते पण माझ्या तब्येतीमुळे आणि आता सुजलेल्या पायामुळे हे मात्र पायी जायचे नाही यावर ठाम होते. तिथे असलेले एकग्रुहस्थ म्हणाले,तीन वाजता जबलपुरला जाणारी बस आहे,तुम्ही तिने जबलपुरला जाणेच श्रेयस्कर होईल.
तीन वाजता बस आली.गर्दी होतीच पण चढलो. थेट जबलपुरला जाणार म्हटल्यावर कन्डक्टरने दोघा जवळच जाण्यार्‍या प्रवाशाना उठवुन आम्हाला जागा दिली.खट्टूमनाने प्रवास सुरु झाला कारण आता सरळ जबलपुरला जाण्याने वाटेतील हीरापुर,ब्रम्हान्डघाट,भेडाघाट,छोटी धुव्वाधार वगैरे सुन्दर ठिकाणे पाहता येणार नव्हती.मन नाराज झाले होते.
खराब रस्त्याने नाराज मनाने प्रवास करताना वाटेत लागलेले जन्गल दर्‍या डोन्गर यान्च्या सौन्दर्याचा आस्वाद घेणेही जमले नाही.जबलपुरला पोहोचायला सन्ध्याकाळ होणार होती,तिथे राहायचे कुठे आश्रमाची,धर्मशाळेची काय सोय असेल मैय्या किती दुर असेल काहीच कल्पना नव्हती . आमच्या मुलीच्या राणीच्या कॉलेजमधील शिरीष कुलकर्णी याची ताई जबलपुरला राहत असे हे आठवले.शिरीष आम्हाला अगदी जवळचा आहे म्हणून त्याला फोन केला. त्याच्या नवीन दुकानाचे दुसर्‍यादिवशी उद्घाटन होते त्या गडबडीत तो होता पण मला बरे नसल्याचे मदतीची गरज असल्याचे सान्गितले,तो म्हणाला मी ताईचा पत्ता आणि फोननम्बर एस एम एस करतो . आम्ही निश्चिन्त झालो.
सात वाजता जबलपुर आले. शिरीषने काहीच कळवले नव्हते,त्याला फोन केला तर तो बन्द. आता काय करायचे? आठवले, डायरीत जबलपुर मधील काही हॉटेल्सची इन्टरनेट वरुन घेतलेली यादी आहे. मग त्या प्रमाणे रिक्षाने रसेलचौकातील हॉटेल क्रिष्णा मध्ये आलो. हॉटेल स्टार हॉटेल होते त्यामूळे फार महाग पण आता नाइलाज होता चेक इन केले.
रुम मध्ये आल्यावर पहिल्यान्दा गरम पाण्याने स्नान केले कारण फारच चिकचिक झाले होते. पुजापाठ करुन खाली रेस्टॉरन्ट मध्ये जावुन पोटभर जेवलो,कारण आज उपाशीच होतो, आता विश्रान्ती.
आज मैय्याने दोन धडे शिकवले, पैशासाठी कन्डक्टर दिशाभुल करतो. आणि मुख्य म्हणजे काहीजण आपल्याला कितीही जवळचे वाटत असले तरी ते तसे असतातच असे नाही. म्हणून जो दुसर्‍यावरी विसम्बला त्याचा कार्यभाग बुडाला हे नेहेमी ध्यानात ठेवावे.क्रमशः

प्रतिक्रिया

पैशासाठी कन्डक्टरच काय अगदी सख्खी भावंडही दिशाभूल करतात. तेव्हा काळजी घ्या.
बाकी नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण, ओघवती लेखनशैली
पुभाप्र

मोदक's picture

6 Sep 2012 - 10:59 pm | मोदक

बाकी नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण, ओघवती लेखनशैली
पुलेशु.

शुचि's picture

6 Sep 2012 - 6:44 pm | शुचि

सुर्य आपले प्रतिबिम्ब मैय्याच्या जलात पाहुन जणू तिला विचारत होता,खरच धरतीच्या सफरीवर जाण्यासाठी मी रथावर आरुढ होउन जेव्हा निघतो तेव्हा इतका सुन्दर दिसतो? की ही सर्व माणसे भान हरपुन माझ्याकडे बघत राहतात,पक्षी किलबिलाट करु लागतात,व्रुक्षवेली बहरतात,कमलफुले फुलतात,रान फुले हसु लागतात. सान्ग शिवकन्ये ! खरच मी इतका सुन्दर दिसतो? आणि मैय्या लहरीन्च्या खळखळत्या हास्याने उत्तर देत होती,अरे दिवाकरा ! खरच तू खुपच सुन्दर आहेस. तिचे हे उत्तर अ‍ॅकुन सुर्याने मोठ्या खुशीने तिच्यावर सप्तरन्गान्ची उधळण केली. मैय्याला लाल सोनेरी फिरत्या रन्गान्ची जणू कान्जीवरमची साडीच भेट दिली. आणि मैय्याही लगेच ती परिधान करुन चमचमत रत्नसागराला भेटण्यासाठी लगबगीने निघाली

सुंदर!!!

स्पंदना's picture

7 Sep 2012 - 6:14 am | स्पंदना

एकुण शेवटी दगदग सोसेनाशी झालेली दिसतेय खुशी ताई.
नर्मदे हर!

काही झाले तरी तुम्ही परिक्रमा नक्कीच सुफळ संपूर्ण करणार !
आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी!