तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-४३

खुशि's picture
खुशि in भटकंती
16 Sep 2012 - 8:19 pm

स्नान पुजा करुन तिठ्यावर आलो,थोडावेळ वाट पाहिली पण येणार्‍या बस मन्डलामार्गे जाणार्‍याच होत्या.म्हणुन मग मन्डला स्टॉपवर गेलो. तिथे सिवनी व्हाया देवगाव बस मिळाली. साडेदहा वाजता देवगाव फाट्यावर उतरलो. तिथुन ३कि.मि. आत देवगावला जाताना वाटेत श्री. प्रेमकुमार सौ.रामकुमारी यानी बोलावले,विचारपुस केली.आम्हाला तीळाचा आणि गुळपापडीचा लाडू खायला दिला,चहाही झाला,खुप बरे वाटले.
पुढे निघालो,आज किन्क्रान्त आहे त्यामुळे नर्मदास्नानासाठी आजुबाजुच्या गावातील लोकान्ची खुप गर्दी होती त्यामुळे रस्त्याने चालताना चालावे लागतच नव्हते,आपोआप ढकलले जात होतो,तेवढ्या गर्दीतही परिक्रमावासी म्हणून लोक आमच्या पाया पडत,या नर्मदामैय्यावरील श्रद्धेला काय म्हणायचे हेच समजत नाही.
देवगावला जमदग्नेश्वर मन्दिरात आलो. या ठिकाणी जमदग्नी मुनिनी तप केले अशी आख्यायिका आहे. नर्मदा आणि बुढनेर यान्चा सन्गम आहे. बुढनेरनदीला इकडे बुढीमा म्हणतात.ही नर्मदेची आई आहे असे सान्गतात. सन्क्रान्तीचा मेळा लागला होता. लोक भान्डी-कुन्डी स्वयम्पाकाचे सामान घेउन आले होते,सन्गमस्नान नन्तर स्वयम्पाक मैय्याला भोग चढवणे{नैवेद्य} आणि मेळा पाहुन सन्ध्याकाळी घरी असा सार्‍या कुटुम्बासहीतचा कार्यक्रम असतो.
धर्मशाळेत खुप गर्दी होती तेथिल व्यसथापकानी राहण्याचा भोजनप्रसाद घेण्याचा खुप आग्रह केला पण तिथली गर्दी पाहुन आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पन्चवीसएक पायर्‍यान्चा सिमेन्टने बान्धलेला घाट आहे. घाटावरील धर्मशाळेच्या एका खुप म्हातार्‍या साधुबाबानिही खुप आग्रह केला पण हे नाही म्हणाले,पायर्‍याउतरुन खाली प्रवाहाजवळ आलो. बुढीमाला जास्त पाणी नव्हते पण पात्रात दगडधोन्डे खुप होते,निसरडेही होते हे तर पुढे गेले पण माझे पाय सटकत होते,हातातली काठीही सटकत होती शोरगुल इतका होता की माझा आवाज त्यान्च्यापर्यन्त पोहोचत नव्हता.एका मुलाला माझी दया आली,त्याने माझी पिशवी घेतली आणि मला आधार देउन पलिकडे नेले.माझे लाख लाख आशीर्वाद त्याला.थोडे वाळवन्टातुन चालावे लागले तिथे लागलेल्या दुकानातुन बिस्किटे,आणि ताजे मुळे घेतले. एक दरड चढून वर आलो. दोन तीन बस उभ्या होत्या,एका महाराजपुरला जाण्यार्‍या बसमध्ये बसलो,उन चढले होते भयन्कर गरम होत होते.
बराच वेळ झाला तरी बस सुटायचे नाव नव्हते जवळची बिस्किटे,मुळे सम्पले पाणीही थोडेच शिल्लक राहिले होते .शेवटी द्रायव्हर म्हणाला,सब लोक स्नान,भोजन करके आयेन्गे तब बस छुटेगी ये स्पेशल मेळाबस है. बसलो डोक्याला हात लावून खुप भुक लागली होती,मनात आले आश्रमात मैय्याचा भोजनप्रसाद नाकारला म्हणून तर ही वेळ आली नसेल? मैय्या क्षमा कर. मुर्ख आहोत आम्ही पण आहोत तर तुझीच लेकरे. क्षमा कर माते.
चार वाजुन गेले.मोटरसायकलवरुन दोन पाण्ढर्‍याकपड्यातील पुढार्‍यान्सारखी माणसे आली,ते बसच्या ड्रायव्हरशी कुठल्या बस कुठे न्यायच्या ते सान्गत होते,आम्ही त्याना विचारले ते म्हणाले आधी जवळपासच्या गावातील लोकाना सोडून शेवटी महाराजपुरला बस जाईल. आम्ही हैराण झालो,चालत गेलो असतो तर निदान रामनगरला तरी मुक्कामाला गेलो असतो पण आता खुपच उशीर झाला होता. मग त्याच माणसाने आम्हाला चहा दिला.
अखेर सहावाजता एक बस महाराजपुरला निघाली.आम्ही बसलो. खरेतर तिथे नेहमी बस नसते फक्त मेळा असेलतरच बस सर्व्हीस असते.असो झाले ते झाले. बिलगाव आले,सकाळी आमच्यासमोरुन चालत निघालेले काही परिक्रमावासी तिथे बसची वाट बघत होते.म्हणजे चालत आलो असतो तरी फक्त बिलगावलाच पोहोचलो असतो.
रामनगर आले.इतिहास प्रसिद्ध नगर ,आता एक कसबा आहे. सुहास लिमयेकाकानी या स्थळाबद्दल खुप लिहिले आहे. भारती ठाकुर यानीही लिहिले आहे. पण रात्र व्हायला लागली होती त्यामुळे नीटपणे काही बघता आले नाही. पुन्हा येईन असे आश्वासन श्रीरामाला दिले,बस पुढे निघाली. मधुपुरी,पद्मीचौराहा,सुरजकुन्ड आणि बन्जरनदीवरील पुल क्रॉस करुन महाराजपुरला आलो. एवढया रात्री आश्रम वगैरे शोधणे अवघड होते,खुप दमलो होतो भुक लागली होती,देवगावला प्रेमकुमार-रामकुमारी यानी दिलेले ते लाडू चहा जणू मैय्याने याच साठी दिले होते कारण नन्तर आम्हाला होणारा त्रास तिला माहीत होता.आम्हाला डायबेटीस आहे फक्त चारदोन बिस्किटे आणि त्यानन्तर बराचवेळाने मिळालेला चहा. आमची शुगरलेव्हल डाउन झाली होती,त्या साजुकतुपातील पौष्टीक लाडवान्मुळेच आम्ही तग धरुन होतो.
एकजणाजवळ हॉटेलची चौकशी केली,त्याने जवळच असलेले नवेच बान्धलेले रमारमण हॉटेल दाखवले. चान्गले हॉटेल मिळाले,तिथे असलेल्या मुलाने आमची आस्थेने चौकशी करुन लगेच आम्हाला स्नानासाठी गरम पाणी दिले आधी गरम गरम चहा दिला. आम्ही परिक्रमावासी म्हणून हॉटेलच्या मालकिण बाईनी आपल्या घरुन गरम जेवणाचा डबा पाठवला. स्नान पुजा आरती भोजन मैय्याच्या असीम क्रुपेने दिवसभर झालेल्या मनस्ताप आणि दमणूक यान्चे इतके सुरेख परिमार्जन झाले. आता विश्रान्ती.
सकाळी स्नान पुजा करुन धुतलेले कपडे गच्चीवर वाळत घातले. नन्तर बाहेर पडलो,नास्ता केला आणि रेल्वेस्टेशन्वर गेलो पण आम्हाला सुटेबल गाडी नव्हती.तिथुन सन्गमघाटावर गेलो इथेही मेळा लागलेला होता,उगमापासुन सागरसन्गमापर्यन्त प्रत्येक पर्वकाळी मैय्याच्या किनारी असे मेळे लागतात. घाटावर खुप गर्दी होती.समोरच्या तिरावर मन्डला फोर्ट दिसत होता. मागच्याच सोमवारी नऊ जानेवारीला आम्ही त्या तिरावरुन हा महाराजपुरचा घाट पाहिला होता. मैय्याचे दर्शन घेउन पवारसमाज धर्मशाळा पाहिली,इथेच सुहास लिमये काका राहिले होते.
परतलो.शशीभोजनालयात भोजनासाठी आलो. भोजनालयाचे मालक परिक्रमावासीना रोज भोजन करवतात,अर्थात पैसे घेत नाहीत हे निराळे सान्गणे नकोच. तिथे समजले की मैय्या क्रॉस न करता नरसिन्हनगर बस दोन वाजता आहे असे कळले म्हणून बसची तिकिटे रिझर्व करण्यासाठी शशी जवळ पैसे देउन आम्ही हॉटेलवर आलो,सामान आवरुन चेकआउट केले. परत शशीभोजनालयात येउन बसलो. त्या बस साठी परिक्रमावासीन्ची बरीच गर्दी होती म्हणुन शशीने एक मुलगा बरोबर दिला आणि थोडे पुढे जाऊन आम्हाला उभे राहायला सान्गितले. तुमच्या रिझर्व सीट काढून ठेवल्या असतील त्या कन्डक्टरला लावून द्यायला सान्गा असेही त्याने आम्हाला सान्गितले.
दोनची बस अडीचला आली,बसमध्ये चढलो पण कितीही सान्गितले तरी तो कन्डक्टर आम्हाला काढून ठेवलेली ती सीट लावून देईना. मग आम्ही शशीला फोन केला,त्याने मुलाला परत पाठवले तेव्हा आम्हाला सीट मिळाल्या. बस अगदी खचाखच भरल्यावर निघाली. दर अर्ध्या कि.मि. थाम्बत एकदोन प्रवासी उतरत पाचसहा चढत असे करत रात्री साडेनऊला एकदाची नरसिन्हनगरला पोहोचली.शशीने रेल्वेस्टेशनला उतरुन जवळच्या लुनावत हॉटेल मध्ये रहा म्हणजे सकाळची पिपरियाला जाणारी रेल्वे पकडणे सोपे जाईल असे सान्गितले होते म्हणुन तसेच केले. श्री. लुनावत यानी त्यान्च्या घरातुन आम्हाला जेवण आणून दिले.आता विश्रान्ती.उद्या पिपरियाहुन पन्चमढी.

मंडला इथे नर्मदामय्या

narmada

मंडला किल्ला

kila

१२ ज्योतिर्लिंगे मंडला

shiv1

संक्रांति मेळा देवगाव
devgao

नर्मदा संगम महाराजपुर

pic1

क्रमशः

प्रतिक्रिया

हा भागही छान ..

दादा कोंडके's picture

16 Sep 2012 - 9:15 pm | दादा कोंडके

वाचतोय.

स्पंदना's picture

24 Sep 2012 - 3:51 am | स्पंदना

न्रमदे हर!

सतिश रानडे's picture

23 Oct 2012 - 12:49 pm | सतिश रानडे

वाचायल मिळ्त नहि

आचरट's picture

8 Nov 2012 - 6:52 pm | आचरट

नमस्कार,
आजच हा भाग वाचला, पण आधिचे भाग दिसत नाहियेत. काढुन टाकले का?
असतील तर क्रुपया मेल वर पाठवाल का?