(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)

रमताराम's picture
रमताराम in जे न देखे रवी...
25 Jul 2012 - 8:59 pm

(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...)

आता पुन्हा उपोषण होणार
मग देश ढवळून निघणार
मग बेदींना कंठ फुटणार
मग मध्येच मोदी बोलणार
मग जुनाच खेळ चालू होणार...
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...

मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार...
मग सारीपाट मांडणार...
मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार...

मग ते कुणीतरी ओरडणार
मग अण्णा-मित्र असतील तर रडणार
रामदेव बाबा असतील तर चिडणार
मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार

आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना
काहीच घेण-देणं नसणार...

काय रेऽऽ देऽऽवा

मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार...
मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार...
मग त्याला अण्णांनी आपली संमती दिलेली असणार...

मग ते केजरीवालांनी लिहिलेलं असणार
मग ते अण्णांनी अप्रूव केलेलं असणार
मग रामदेवबाबांची मागणी नक्की काय
असावी असा प्रश्न सार्‍यांना पडणार

मग उगाच डोक्यात किडा वळवळणार
मग ना घेणं ना देणं पण गांधी टोपी घालणार....
काय रेऽऽ देऽऽवा

मग च्यानेलवाले उत्साहात सगळीकडे धावणार
मग केजरीवाल त्यांना स्पेशल बाईट देणार...
मग बेदी त्याचे खंडन करणार...

मग विरोधक अण्णांना पाठिंबा देणार
पण विधेयकाला विरोध करणार
मग सुंठेवाचून खोकला जाणार
म्हणून काँग्रेस खूश होणार

मग उगाच थोड्या वाटाघाटी होणार...
मग विधेयक पुनर्विलोकनासाठी जाणार...
काय रेऽऽ देऽऽवा

मग फेसबुकी समाजसेवक उत्साहित होऊन जाणार...
मग त्यांना नव्या क्रांतीची पुन्हा स्वप्न पडणार...
मग झुकरबर्गने दिलेल्या फुकट्च्या भिंतीवर
ते बरेच काही राष्ट्रप्रेमी वगैरे खरडणार...

मग लिहिण्यासाठी आपली वॉलही अपुरी वाटणार...
मग जाऊन ट्विटही करावंस वाटणार...
एखाद्या मित्राचे अकाउंट हॅक करून
त्याच्या नावेही आपणच लिहावंसं वाटणार...

मग सारंच कसं इजिप्तसारखं
पेटंत पेटंत जाणार

पण तरीदेखील सत्ताधारी
फक्त कूस बदलंत राहणार...
पण जागे नाही होणार!...

काय रेऽऽ देऽऽवा

आता उपोषण होणार
मग देश जागृत होणार
मग आयटीवालेही मागे नाही राहणार

मग मागच्या वेळच्या गांधीटोप्या
पुन्हा बाहेर काढणार
मग फेज-१ पासून फेज-२ पर्यंत
गांधीटोप्या नि तिरंग्यांचा मोर्चा काढणार
मग चार फोटो फेसबुकासाठी काढणार

मग एकदम लंच टाईम संपल्याचं समजणार
मग लगेचच बॉसचा फोनही येणार...

मग ते कंटाळणार....
मग पुन्हा हापिसात येणार...

घसा बसू नये म्हणून हापिसातल्या मशीनची कॉफी घेणार
मोर्चात कोण आले नव्हते त्यांना फोटो दाखवून जळवणार

लंच टाईम तोपर्यंत संपलेला असणार...
फेसबुकच्या वॉलवर फोटो पडलेले असणार...
माझ्या क्युबिकलमधे मी असणार...
त्याच्या क्युबिकलमधे तो असणार...

आमचा मोर्चा मात्र फेसबुकच्या साक्षीने आता
गावभर फेमस झालेला असणार...

उपोषण एप्रिल मध्ये झालं...
उपोषण जुलैमधे होतंय...
उपोषण डिसेंबरमधेही होणार...

काय रेऽऽ देऽऽवा

हास्यविडंबनजीवनमानराजकारण

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

25 Jul 2012 - 9:32 pm | छोटा डॉन

चीयर्स !!!

ह्यात अजुन काही अ‍ॅड करुन संस्थळे, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या ह्यावरही काही टिप्पणी झाली असती तर किरपा झाली असती. असो,मजा आली.

- (अण्णांध) छोटा डॉन

रमताराम's picture

25 Jul 2012 - 9:51 pm | रमताराम

तर होते. पण आधीच फार मोठी झालीये म्हणून सोडून दिले. अर्थात इथले जाणते लोक भर घालतीलच.

(फेसबुकी) रमताराम

हे असेच घडते आहे आणि असेच घडणार आहे...
शेवट मात्र थोडा फास्ट वाटत आहे वाचताना..

निवांत पोपट's picture

25 Jul 2012 - 10:01 pm | निवांत पोपट

विडंबन कोणत्या कवितेचे आहे ते माहीत नाही पण कवितेतील उपहास आवडला..

आता रमतारामजी सारख्या कट्टर नास्तिकानेच देवाचा धावा केल्यावर.........??
देव मनावर घेऊन काहीतरी करेल आणि काहीतरी बरं होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. ;)

बाकी मजा आली वाचताना... :)

अर्धवटराव's picture

25 Jul 2012 - 10:06 pm | अर्धवटराव

काय हो रामजी...
अहो तुम्ही देवाला साकडं घालताय कि घाबरवुन पळवुन लावताय :D

अर्धवटराव

पिवळा डांबिस's picture

25 Jul 2012 - 10:11 pm | पिवळा डांबिस

काहीसं घाई-गडबडीत असावं.....
मग चटकन मिपावर नवीन काय आलंय ते नुसतं वाचनमात्र राहून पहावं...
आणि असं काही नजरेला पडल्यावर...
मग मुद्दाम लॉग-इन होऊन दाद द्यावीशी वाटावी...
असली जबरा कविता आहे ही!!!!!!
जियो ररा!!
:)

चिगो's picture

25 Jul 2012 - 11:59 pm | चिगो

एकदम कडक.. कसले सटासट हाणलेयत राव!
मनःपुर्वक दाद.. जियो ररा. ररा झिंदाबाद..

सहज's picture

26 Jul 2012 - 6:53 am | सहज

देश उबल रहा है आणि तुम्हाला विडंबनाच्या उकळ्या फुटतायत!!

नितिन थत्ते's picture

26 Jul 2012 - 8:14 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

हेच ते, कोणी काही चांगलं करू पाहतात त्यांचे पाय ओढणारे नतद्रष्ट (की दळभद्री?). ;)

रमताराम's picture

26 Jul 2012 - 9:42 am | रमताराम

आता तुम्हा दोघांच्या सहीने आमच्या देशद्रोही असण्यावर शिक्कामोर्तब झाले. ;)

परवाच रतन टाटांच्या देशप्रेमाबाबतची तथाकथित बातमी (मी बातमीला तथाकथित हे विशेषण लावतो आहे याची कृपया नोंद घ्यावी. व्याकरण-अशिक्षित बरेच असल्याने हा खुलासा) खोटी आहे हे दाखवून दिले तर एका फेसबुकी देशप्रेम्याने आम्हाला 'असे देशद्रोही लोक घरात असल्यावर पाकिस्तानची काय गरज' असे सर्टफिकट दिले आहे. एकुण राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हा वाटतो तितका अवघड मामला नाही असे - खास करून फेसबुकच्या उदयानंतर - दिसून येऊ लागले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jul 2012 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार

देश एका मोठ्या परिवर्तनाकडे निघाला आहे (मी थत्ते चाचांशी सहमत झालो ह्याशिवाय वेगळा पुरावा काय हवा?), आणि ह्या ररा सारख्यांना विडंबने आणि टिंगल सुचत आहे. त्याला साथ डान्या सारख्या पैशात लोळणार्‍या माजोर्‍या नवश्रीमंतांची.

असो...

उद्या जेंव्हा अण्णा लोकशाहीनी नवी पहाट आणतील, तेंव्हा ररा सारख्या देशबुडव्यांना आधी देशाबाहेर हाकलले जाईलच.

छोटा डॉन's picture

26 Jul 2012 - 8:07 pm | छोटा डॉन

>>उद्या जेंव्हा अण्णा लोकशाहीनी नवी पहाट आणतील, तेंव्हा ररा सारख्या देशबुडव्यांना आधी देशाबाहेर हाकलले जाईलच.

ऑ ?
म्हणजे तेव्हा लोकशाही वगैरे भानगडी असणार नाहीत काय ? नाही म्हणजे, तुम्ही डायरेक्ट देशाबाहेर हाकलण्याची भाषा सुरु केलीत म्हणुन विचारले हो.
बाकी तुमच्या सो कॉल्ड परिवर्तनाचे अपडेट्स फेस्बुकवरुन देताल ना ? आम्ही जमलं तर 'लाईक' वगैरे करत राहु इतकच आश्वासन तूर्तास देतो.

- छोटा डॉन

रमताराम's picture

26 Jul 2012 - 8:24 pm | रमताराम

तुम्ही राजकारणाचे अभ्यासक म्हणे. अहो मुळात लोकपाल आला तर तो सर्वशक्तिमान परमेश्वरासारखा. आल्या आल्या तो दणादण निर्णय वगैरे घेऊन सगळं आलबेल करून टाकणार आहे. त्याला आमच्या सारखी चार झुरळं म्हणजे किस झाड की पत्ती.

अवांतर: अनिल कपूरचा 'नायक' नावाचा चित्रपट आठवतो का? ;) दणादण ढिसमिस आर्डरी छापून देश सुधारून टाकतो एका दिवसात. व्हेअर आर यू? (आहात कुठ?)

छोटा डॉन's picture

26 Jul 2012 - 9:03 pm | छोटा डॉन

अहो मुळात लोकपाल आला तर तो सर्वशक्तिमान परमेश्वरासारखा. आल्या आल्या तो दणादण निर्णय वगैरे घेऊन सगळं आलबेल करून टाकणार आहे.

ओह्ह, अच्छा अच्छा.
असा प्रकार आहे काय ?
इन दॅट केस लोकपाल नावाच्या व्यक्तीचा युद्धपातळीवर शोध घेऊन त्याच्या हाती पटकन सत्ता देऊन टाकावी असे आमचे स्पष्ट मत झाले आहे ( ह्याला कोणी आम्ही पार्टी बदलली असे म्हणत असेल तर तो त्याचा राजकीय अपरिपक्वपणा असे आम्ही म्हणु).
बाकी आत्ता कुठे आपण बॅक टु बेसिक्स आलो आहोत, आपल्याला नेहमीच असा एक सर्वशक्तीमान परमेश्वर किंवा देवासमान नेता लागतो, इतिहासात ह्याचे दाखले आपल्याला अनेक ठिकाणी मिळतील. मध्यंतरी इंग्रज आल्याने व नंतर ते जाताना लोकशाही नावाचे पिल्लु इथे सोडुन गेल्याने आपल्याइथली काही मंडळी 'लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य' वगैरेंच्या भ्रामक कल्पनात होते, आता त्यांना चांगलीच चपराक बसुन त्यांचे डोळे उघडले असतील अशी अपेक्षा आहे.
असो, लोकपाल नावाच्या 'तारहणार'ला त्वरित आणावे अशी आम्ही मागणी करत आहोत.

अवांतर: अनिल कपूरचा 'नायक' नावाचा चित्रपट आठवतो का? Wink दणादण ढिसमिस आर्डरी छापून देश सुधारून टाकतो एका दिवसात. व्हेअर आर यू? (आहात कुठ?)

आम्ही इथेच आहोत. आत्ताच ’स्वदेस’ नावाच्या फ़िक्शन (भ्रामक?) चित्रपटातले खालील गाणे ऐकत होतो.
ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे तुमरे बिन हमरा कौनो नाहीं....
हमरी उलझन सुलझाओ भगवन तुमरे बिन हमरा कौनो नाहीं....
तुम्ही हमका हो संभाले तुम्ही हमरे रखवाले तुमरे बिन हमरा कौनो नाहीं...
कसला योगायोग आहे नाही ;)

- छोटा डॉन

राजेश घासकडवी's picture

26 Jul 2012 - 9:20 pm | राजेश घासकडवी

आत्ताच ’स्वदेस’ नावाच्या फ़िक्शन (भ्रामक?) चित्रपटातले खालील गाणे ऐकत होतो.

डॉनराव, आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच शब्दांचं अजून एक गाणं 'लगान' नावाच्या एका भ्रमपटातही आहे. केवढा कोइन्सिडन्स नै?

छोटा डॉन's picture

26 Jul 2012 - 9:32 pm | छोटा डॉन

बरोबर आहे, 'लगान'मध्येही हे गाणे आहे, अर्थात तिथे हे कसे आले ह्याबाबत मला काही कल्पना नाही, तुम्ही म्हणता तसा योगायोग असावा बॉ.

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jul 2012 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

अपेक्षीत असा तुच्छ प्रतिसाद.

असो....

रात्री ग्लेन फिडिच आणि फ्रेंच फ्राइज बरोबर चर्चा करूच.

रमताराम's picture

27 Jul 2012 - 12:18 pm | रमताराम

दोन राष्ट्रभक्तांची चर्चा वाचून ड्वाले पानावले.

बाकी डान्राव राजकारनात आज उजवीकडं उंद्या डावीकडं चालायचंच, त्ये काय कुनी मनावर घ्येत न्हाई. त्ये बंगारप्पा आपलं आदर्श अस्लं पायजे. देशाच्या शेवेसाटी चार टैम बाजू बदलल्याली चालतीया बगा.

अवांतरः रातचं चरचेला बसाल तवा या म्हातार्‍याला इसरू नगा बरं का. (म्हत्वाचं ह्ये.)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jul 2012 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

आंदोलनाची तुलना राजकारणाशी केलेली पाहून मस्तकात संतापाची तिडीक उठली. पण अहिंसेच्या मार्गाने चालत असल्याने फक्त शाब्दीक प्रतिकार नोंदवत आहे.

अवांतरः रातचं चरचेला बसाल तवा या म्हातार्‍याला इसरू नगा बरं का. (म्हत्वाचं ह्ये.)

म्हातारबा, तुम्ही नसाल तर आम्हाला आणायला आणि सोडायला कोण हो ? ;) तुम्ही तर हवेतच.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jul 2012 - 5:16 pm | बिपिन कार्यकर्ते

ग्लेन फिडिच, फ्रेंच फ्राइज आणि भेंडी मसाला... ;)

रमताराम's picture

30 Jul 2012 - 11:46 am | रमताराम

भेंडी? भेंऽऽडी????? सग्गळं मुसळ केरात हो. इतकं शिकवलं पण मागासलेले ते मागासलेलेच राहणार बघा तुम्ही. ग्लेन फिडिच नि फ्रेंच फ्राईज हे काम्बिनेशन आधी चुकलं नि त्यात भेंडीऽऽ? हे राम. मसाल्यात घातली तरी भेंडी ती भेंडीच*.

* या 'स्वधर्मे निधनं श्रेयः' विधानावरून ह.भ.प. कणेकरांचा एक ड्वायलाक आठवला: आखाड्यातली माणसं आखाड्यातच रहायला हवीत, ती राजकारणात आली तर राजकारणाचा आखाडा करणारच.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jul 2012 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार

भेंडी? भेंऽऽडी????? सग्गळं मुसळ केरात हो. इतकं शिकवलं पण मागासलेले ते मागासलेलेच राहणार बघा तुम्ही. ग्लेन फिडिच नि फ्रेंच फ्राईज हे काम्बिनेशन आधी चुकलं नि त्यात भेंडीऽऽ? हे राम. मसाल्यात घातली तरी भेंडी ती भेंडीच*.

इतक्या बैठकांना नेले तुम्हाला आजोबा, पण त्यातून ज्ञान काही मिळवले नाहीत तुम्ही. अहो डाण्रावांना उद्या तुम्ही विष किंवा गोमूत्र किंवा इनो काही प्यायला दिलेत ,तरी ते आधी फ्रेंच फ्राईज ची ऑर्डर दिली का असे विचारतील.

आणि हो ,उगाच फिंग चिप्स वैग्रे तत्सम शब्द वापराल तर मग अपमान निश्चित.

रमताराम's picture

30 Jul 2012 - 12:25 pm | रमताराम

पहिलं म्हणजे त्या तीनपैकी आमचा संबंध फक्त पहिल्या गोष्टीशी. एकदा तो संबंध जडला की समोर भेंडी आहे की फ्रेंच फ्राय्ज (उच्चार बरोबर आहे ना?) काय समजणार.
दुसरे म्हणजे फ्रेंच फ्रायज बरोबर चखणा म्हणून ग्लेन फिडिच चालत नाही हेच तर सांगतोय तुम्हाला, तिथे फ्रेंच वाईन हवी किंवा तुम्ही 'त्यातले' नसलात तर 'कोक' (पेप्सीसुद्धा चालत नाही!) कधी समजणार तुम्हाला राजकुमारसाहेब. अजून पुरेशे हुच्चभ्रू झाला नाहीत तुम्ही.

स्पंदना's picture

26 Jul 2012 - 7:18 am | स्पंदना

रऽ ऽराऽऽ!

खरच असच वाटल. अति झाल अन हसु आल.

किसन शिंदे's picture

26 Jul 2012 - 8:24 am | किसन शिंदे

झक्कास विडंबन केलंय ररा तुम्ही. :) यातला आयटीवाल्यांचा फेज १ ते फेज २ पर्यंतचा प्रवास वाचून हसूच आलं.

रमताराम's picture

26 Jul 2012 - 10:29 am | रमताराम

या डोल्यानं बगलाय म्या. म्या हसलू म्हून आमचा बॉस चिडला आमच्यावं. म्हनं 'या निमित्तानं जाग्रती का काय म्हंतात ती व्हतेय तर कशापायी दात काडतूस?' येका वर्सानंतर 'बॉस बॉस ना रहा' (कारण आमीच थतं न्हाय आता), पर त्येला इचरायला होव का गेल्या वर्सात तुमच्यात कसली जाग्रती जाह्ली त्ये. यवड्यात काय चांगला बदल घडला म्हून.

सूड's picture

26 Jul 2012 - 8:40 am | सूड

मस्त!!

पैसा's picture

26 Jul 2012 - 9:03 am | पैसा

आमची पण देशसेवा!

मदनबाण's picture

26 Jul 2012 - 9:55 am | मदनबाण

मस्त आशय ! :)

स्पा's picture

26 Jul 2012 - 10:03 am | स्पा

मग संस्थळांवर का. कु.निघणार
वांझोट्या चर्चांना ऊत येणार
लिंकांचा, आणि विकीचा पाऊस पडणार
तिकडची माहिती इकडे चोप्य पस्ते होणार

अण्णा शाकाहारी का मांसाहारी
बामन का दलित , स्त्री का पुरुष
असली वळणं लागणार ..

मग एकदम एकमेकांवरच चिखलफेक सुरु होणार
अण्णा नि उपोषण राहिले बाजूला
जुने स्कोर सेटल होणार
कम्पुंना ऊत येणार ..

कधीतरी धागा वाचनमात्र किंवा संपादित होणार
सभासद नवीन धाग्याची वाट पाहत , खव खव खेळत राहणार
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...

चिगो's picture

26 Jul 2012 - 10:13 am | चिगो

आण्भव आण्भव म्हणतात तो हाच.. स्पावडूच्या कवित्वाचे बुच उघडले.. व्वा व्वा.. :-)

प्रसाद प्रसाद's picture

26 Jul 2012 - 5:53 pm | प्रसाद प्रसाद

अण्णा शाकाहारी का मांसाहारी
बामन का दलित , स्त्री का पुरुष

हे हे!!!!!!! अण्णा शाकाहारी मांसाहारी बामन दलित इथपर्यंत वळणं ठीक आहेत, पण स्त्री का पुरुष?

काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...

राजेश घासकडवी's picture

26 Jul 2012 - 10:08 am | राजेश घासकडवी

मग एकदम लंच टाईम संपल्याचं समजणार
मग लगेचच बॉसचा फोनही येणार...

हे म्हणजे फारच प्रचंडच भारीच.

"आपली सोत्ताची इमेज सोत्ताच्याच मनात जपण्यासाठी जनतेच्या मनात एक इशिष्ट इमेज करण्याचा माणूस प्रयत्न करतो, आणि त्यामुळे सत्य म्हणजे काय हा मूलभूत प्रश्न लय वंगाळ होतो" हे तुम्ही या कवितेतून लय भारीरीत्या सांगलंय ब्वॉ. मंग प्रस्न असा पडतू, की हे यवढं छान सांगता येतं, तर मंग ते मागे सात सात आठ आठ जडजड लेखांचं रतीब का घालून घालत बसले वो?

(वरील प्रतिसादांत मराठीच्या किती बोलींची काय घातली ओळखा पाहू?)
(आता तुम्हाला म्हणून सांगतो, ते लेखही आवडलेच होते... )

रमताराम's picture

26 Jul 2012 - 10:37 am | रमताराम

त्येच काये घासकडवीसाहेब, 'शान्याला शब्दांचा मार आन् खुळ्याला धोतराचा भार' (ढुश्क्लेमरः उत्तरार्ध म्या चिकटवलेला हाय) आसं अस्तंय. शहाण्यास्नी ढीगभर शब्दातून कायतरी कळतं (म्हजी असं तवा वाटायचं. ) तवा थोडे कस्ट घेटले व्हते तवा. पर फेसबुकीस्नी काय सांगावं हो. दिसातून 'लाईकलाईकाट' नि शेर्‍याशेर्‍या खेळल्याबिगर आन्न पचन न्हाई त्येस्नी.

(आता तुम्हाला म्हणून सांगतो...
असं का वो. बाकीच्यास्नी बी सांगा की.

ते लेखही आवडलेच होते... )
धण्णेवाद. (

राजेश घासकडवी's picture

28 Jul 2012 - 10:40 am | राजेश घासकडवी

'शान्याला शब्दांचा मार आन् खुळ्याला धोतराचा भार'

ही म्हण मनातल्या मनात अनासपुरेच्या तोंडून ऐकली, आणि मोठ्याने हसून मनातल्या मनातच लोळायला लागलो.

पर फेसबुकीस्नी काय सांगावं हो. दिसातून 'लाईकलाईकाट' नि शेर्‍याशेर्‍या खेळल्याबिगर आन्न पचन न्हाई त्येस्नी.

इतका निगेटिव्ह विचार करू नका हो, बरं नाही तब्येतीला.

या स्टेटसांतुन या कॉझांतुन
लाइकांतुन अन् शेअरांतुन या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप चढतिल वरती बाह्या

अखेर घेता टक्कर जरि मग
युगायुगांची भरेल वॉल
अशाश्वताच्या तलवारीवर
शाश्वताचिही तुटेल ढाल

रमताराम's picture

30 Jul 2012 - 12:15 am | रमताराम

तुमच्या फेबु स्टेटसात टाका नि 'या कवितेला किती 'लाईक' देणार?' असा प्रश्न इचारून ट्यागा लोकांना.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2012 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा

प्रीत-मोहर's picture

26 Jul 2012 - 10:38 am | प्रीत-मोहर

या देशद्रोह्याला हाकलुन लावले पाहिजे मिपावरुन......

(फेसबुकी देशभक्त) प्रीमो

रमताराम's picture

27 Jul 2012 - 12:24 pm | रमताराम

तुम्हीच फेसबुक क्याम्पेन सुरू करा की 'जर ररा यांना मिपावरून हाकलावे असे तुम्हाला वाटत असेल तर लाईक करा.' किंवा 'जर खरे मिपाभक्त असाल तर शेअर कराल, मिपाद्रोही असाल तर सोडून द्याल.' अशी धमकी देत.

प्रीत-मोहर's picture

30 Jul 2012 - 2:11 pm | प्रीत-मोहर

actually मी बेक्कार बिझले होते त्यामुळे हे सगळ करायला वेळ नव्हता. आता पयलं काम ह्येच्च करनार की वो!!!!

अन्तु बर्वा's picture

26 Jul 2012 - 12:08 pm | अन्तु बर्वा

मस्तचं!

चैतन्य दीक्षित's picture

26 Jul 2012 - 12:16 pm | चैतन्य दीक्षित

ररा झिंदाबाद!

निश's picture

26 Jul 2012 - 4:12 pm | निश

अण्णाप्रेमी आता परत चिडणार
सरकार झोपेच सोंग वठवत अजुन झोपेत गाढ निजणार.

येता जाता सुड उगवण्या सरकार, पेट्रोल डिजेल दरवाढ करणार
लोक अण्णाना सोडुन महागाईच्या चिंतेने ऊपास नावाच उपोषण करणार.

गरीब अजुन गरीब होणार ,
अन्नाविना रस्त्यावर धाय मोकलुन रडणार
अण्णाना कात्रजचा घाट दाखवत दिल्लीवाले पुन्हा देश लुटणार.
फेसबुकी विचारजंत फेसबुकी विरोध करणार
रस्तावर लढायच म्हटल की फेसबुक बंद करुन झोपी जाणार.
अण्णांच पुन्हा एकदा उपोषण फेल जाणार.

हा य रे देवा धाव रे आता
अस म्हणताच देव तरी कसा येणार,
तोही वरती आकाशात
टिव्ही वर अण्णांच्या उपोषणाच लाइव टेलिकास्ट बघत असणार
ब्रेकींग न्युज बघुन आता देशाच कस होणार म्हणत
मिपावरच्या काही विचारजंतासारख उगाच काथ्या कुटणार
देव तरी कसा धाऊन येणार ?
देव तरी कसा धाऊन येणार?

निश (मिपावरचा मी असाही विचारजंत )

प्रभाकर पेठकर's picture

26 Jul 2012 - 4:40 pm | प्रभाकर पेठकर

विदारक वास्तव उपरोधाच्या शालजोडीतून.

अनेक नाटक्या समर्थकांमधूनही कांही चिमुटभर लोकांच्या मनांत भ्रष्टाचाराविरुद्ध बिजारोपण झाले तरी भविष्यात त्याचा वटवृक्ष होईल असा आशावाद बाळगावयास हरकत नाही. वणवा पेटण्यास अशीच एखादी ठिणगी पुरेशी ठरावी. असो.

प्रभाकर पेठकर सर, अतिशय योग्य बोललात.

१००% ट़क्के सहमत . वणवा पेटण्यास खरच अशीच एखादी ठिणगी पुरेशी ठरावी.

रमताराम's picture

27 Jul 2012 - 12:40 pm | रमताराम

ठिणग्या पुष्कळ पडतात हो, पण पडतात नि विरून जातात. कारण हेच. टोकन समाजसेवा, टोकन राष्ट्रप्रेम पुरेसे झाले आहे हल्ली. तू माझी पाठ खाजव... च्या धर्तीवर 'तू मला लाईक कर, मी तुला लाईक कर' च्या जमान्यात मुर्दाड खडकांवर पडलेक्या ठिणग्या काय वणवा लावणार? अशा ठिणगीला प्रगतीविरोधी म्हटले की समृद्धी, पैशासाठी हपापलेली जनता लगेच थंड पडते. आणि जे पेटतात ते भलत्याच - बरेचदा हास्यास्पद, उदा. एखाद्या पुस्तकात अमूक लिहिले आहे त्याचा निषेध वगैरे - मुद्द्यांवर रक्त नि घाम आटवत बसतात.

आमरण उपोषण या शब्दाची थट्टा चालवली आहे. दर चार महिन्यांनी आमरण उपोषण, डॉक्टर म्हणाले जिवाला धोका होऊ शकतो की सोडले. अरे 'आमरण उपोषण' आहे ना, मग मरणाची भीती कसली. आणि तशी भीती असलीच तर 'आमरण उपोषण' करायचा फार्स कशाला?

मुळात उपोषण हा निर्वाणीचा उपाय आहे, क्रमाक्रमाने तीव्रता वाढवत न्यायचे आंदोलन नव्हे. जेव्हा एक घाव दोन तुकडे अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तेव्हाच वापरायचे शस्त्र आहे ते. नुसत्या आश्वासनावर सुटायला तो काय एकादशीचा उपवास आहे. एवढा प्रचंड जनसमुदाय मागच्या एप्रिलमधे खर्‍या अर्थाने जागृत झाला होता, निर्वाणीच्या संघर्षासाठी सिद्ध झालेला होता. प्रचंड प्रमाणात जनमत तयार झाले होते. आता नक्की काही चांगले घडेल अशी अशा निर्माण झाली होती सार्‍यांना. तापल्या लोखंडावर घाव घालून योग्य तो, अपेक्षित तो आकार देता आला असता. तेव्हा निव्वळ आश्वासनावर विसंबून -ते ही सत्ताधार्‍यांच्या - सगळ्यांचा अवसानघात केला आणि आता श्राद्धाचे पिंड घातल्यासारखे ठराविक काळानंतर उपोषणांचे फार्स चालू आहेत.

सागर's picture

26 Jul 2012 - 6:58 pm | सागर

ररा गुरुजी

लैच भारी...

एकदम वास्तव आणि नेमक्या कोपरखळ्या मारणारे कवन ;)

शेवटची ओळ लैच आवडली...

उपोषण डिसेंबरमधेही होणार...

माया संस्कृतीच्या कॅलेंडरप्रमाणं जगबुडी होणार आहे म्हणे डिसेंबरात ;)
अण्णांना उपोषणाला संधी मिळते की नाय ? का त्यानंच जगबुडी होणार आहे? :P

मृत्युन्जय's picture

27 Jul 2012 - 12:08 pm | मृत्युन्जय

अरेरे हे असले देशद्रोही मिपावर असताना देशाचे कसे व्हायचे (देशहिताचे निम्मे निर्णय मिपावरच घेतले जातात) ;)

अभिज्ञ's picture

27 Jul 2012 - 12:27 pm | अभिज्ञ

मस्त विडंबन

अभिज्ञ.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Jul 2012 - 11:01 am | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__