कॉकटेल लाउंज : बार्ने स्नॅच (Barney Snatch)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
13 Apr 2012 - 9:47 am

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बार्ने स्नॅच (Barney Snatch)

पार्श्वभूमी:

फार वर्षांपूर्वी पूजा भट आणि नागार्जुन ह्यांच्या एका चित्रपटातल्या गाण्यात मालिबू बघितली होती. तेव्हा कॉलेजात होतो त्यामुळे फक्त बघण्यावर समाधान मानून मोठेपणी कधीतरी मालिबू विकत घ्यायची ठरवले होते. :)

ही मालिबू , नारळाचा तडका (ट्वीस्ट) देउन मस्त गोड चव आणलेली कॅरेबीयन व्हाईट रम आहे. एकदम मलमली पोत (Texture) असतो ह्या मालिबूला. उन्हाच्या काहिलीत 'ऑन द रॉक्स' मलिबू एकदम मस्त थंडवा देते, एकदम गारेगार.

आजचे कॉकटेल हे ह्याच मालिबूचे, वाढत्या उन्हाळ्यवरचा 'उतारा' म्हणून एकदम धमाल आणेल.

प्रकार
मलिबू कोकोनट रम बेस्ड कॉकटेल

साहित्य

बकार्डी व्हाईट रम
0.5 औस (15 मिली)

मलिबू कोकोनट रम
0.5 औस (15 मिली)

ब्लु कुरास्सो लिक्युअर
0.5 औस (15 मिली)

ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप)
10 मिली

अननसाचा रस

बर्फ

अर्ध्या लिंबाचे काप

स्ट्रॉ

ग्लास
कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि लिंबाचे काप घालून घ्या.

आता ग्लासात अनुक्रमे व्हाइट रम, मालिबू आणी ब्लु कुरास्सो ओतून घ्या.

आता ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे इफेक्ट यायला हवा.

आता अननसाचा रस टाकून ग्लास टॉप अप करा.
तळाशी लाल, मध्ये निळा आणि वरती पिवळसर अश्या रंगेबिरंगी थरांचा माहोल जमून येईल.

चला तर मग, बार्ने स्नॅच तयार आहे. :)

रंगीत थरांचा क्लोज अप.

प्रतिक्रिया

आयला हा धागा अजुन सुक्काच?

इरसाल's picture

13 Apr 2012 - 12:54 pm | इरसाल

केला ओला.....

प्रीत-मोहर's picture

13 Apr 2012 - 12:53 pm | प्रीत-मोहर

व त्याचे रंग आवडल्या गेले आहेत!! :)

मुक्त विहारि's picture

13 Apr 2012 - 1:24 pm | मुक्त विहारि

खूप छान माहिती दिलीत...

हाय हाय !!!
मला गणेशाज्वराने पीड्ले,एकही फोटु दिसला नाही :(

प्र.का.टा.आ. दोनदा झाल्याने

कपिल काळे's picture

13 Apr 2012 - 6:00 pm | कपिल काळे

मस्त !!

एक शंका.
ग्रेनेडाइन शेवटी का ओतायचे? तळाशी जाउन बसणार ना? मग पहिल्यांदाच ओतून घेतले तर..

असो पण मस्त कॉक्टेल आहे. इतके दिवस बारमध्ये गेल्यावर काही टेबलावर निळ्या रंगाचे कॉक्टेल दिसायचे. ब्लू कुरास्सो मुळे तो रंग असतो तर.. कुरास्सो हे नाव ही वाचले होते कुठेतरी, पण त्याचा उच्चार आत्ता कळला.

धन्यवाद विजय मल्लोत्रि !!

सोत्रि's picture

14 Apr 2012 - 7:51 am | सोत्रि

ग्रेनेडाइन शेवटी का ओतायचे? तळाशी जाउन बसणार ना? मग पहिल्यांदाच ओतून घेतले तर..

ग्रेनेडाइन खूप गडद लाल असते. जर ग्रेनेडाइन पहिल्यांदाच ओतून घेतले तर नंतर त्याच्यावर पडणार्‍या इतर द्रव्यांमुळे Bruice होऊन ते कॉकटेला गढूळ करेल. शेवटी ओतल्यामुळे ते वरून खाली जाताना एक हलका हलका लाल रंग सोडत सोडत तळाशी जाउन बसते. कॉकटेल्स किंवा मॉकटेल्स मध्ये असणारा 'सनराईज' इफेक्ट ग्रेनेडाइन ने आलेला असतो, तो ते शेवटी ओतल्यामुळे येतो.
:)

- (साकिया) सोकाजी

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2012 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा

हायला...! कस्लं भारी दिसतय....!

ग्लासातली रंगसंगती बघुन आज ह्याला पी-कॉकटेल म्हणावेसे वाटत आहे... ;-)

स्मिता.'s picture

13 Apr 2012 - 6:35 pm | स्मिता.

रंगीत ग्लास छानच दिसतोय.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2012 - 6:49 pm | परिकथेतील राजकुमार

.......

ह ल क ट्ट !

हरकाम्या's picture

18 Apr 2012 - 1:30 am | हरकाम्या

तुमच्या या आगळ्यावेगळ्या रेसिपींनी जगातल्या दारुड्यांच्या संख्येत एकाची भर पडणार हे नक्की .
तुमच्या ह्या रेसिपी मनाला फारच भुरळ घालतात बुवा.

प्रभाकर पेठकर's picture

19 Apr 2012 - 1:53 am | प्रभाकर पेठकर

'दारुड्या'च्या नाही, 'शौकिना'च्या संख्येत म्हणा.
'दारुडा' नशे साठी पितो. त्याला कुठलीही दारू चालते.
'शौकिन' नजाकतीने आणि चोखंदळपणे 'आस्वाद' घेतो. त्याच्या लेखी नशा दुय्यम असते, रंग - रुप - चव आणि माहोल हे 'शौकिना'ला भुरळ पाडतात.

सोत्रि's picture

19 Apr 2012 - 11:12 pm | सोत्रि

पेठकरकाका,

'शौकिन' नजाकतीने आणि चोखंदळपणे 'आस्वाद' घेतो. त्याच्या लेखी नशा दुय्यम असते

एक नंबर प्रतिसाद!

- ( 'शौकिन' ) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

20 Apr 2012 - 2:18 am | प्रभाकर पेठकर

चिअर्सSSSS...!