कॉकटेल लाउंज : मार्गारीटा (फ्रोझन)

आज शुक्रवार, अर्धा दिवस संपला, विकांतचे वेध लागले असतीलच...

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “808000;">मार्गारीटा (फ्रोझन)

पार्श्वभूमी:

माझी कॉकटेलच्या रंगबीरंगी आणि मादक विश्वाची सफर ह्या कॉकटेलपासूनच झाल्यामुळे हे कॉकटेल मला जास्त जवळचे आहे.

ह्या कॉकटेलच्या उगमाच्या फार दंतकथा आहेत. एका कहाणीप्रमाणे एका मोठ्या समारंभात त्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्याच्या मुलीच्या नावाने एक नविन ड्रिंक बनवले ते म्हणजे मार्गारीटा. तर एक कहाणी सांगते की एका बारटेंडरने ह्या ड्रिंकचा शोध लावला आणि तीच्या नावाचे स्पॅनिश रुपांतर होत होते मार्गारीटा म्हणून ह्या कॉकटेलला मार्गारीटा हे नाव पडले.

पण मी म्हणतो आपण 'गुठलीया गिननेकाच क्यू, डायरेक्ट आमंच खाने का ना' smiley

तर जरी हे कॉकटेल मेक्सिकन टकीलापासून बनवले असले तरीही हे पुर्णतः अमेरिकन कॉकटेल आहे. मेक्सिकोमधे हे तितकेसे लोकप्रिय नाहीयेय.

प्रकार: टकीला बेस्ड कॉकटेल

साहित्य:

टकीला 1.5 औस (45 मिली)
कॉईंत्रु (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) 1 औस (30 मिली)
मोसंबी ज्युस 0.5 औस (15 मिली)
लिंबू ज्युस 10 मिली
एक कप बर्फ
मोसंबीची साल सजावटीसाठी
ब्लेंडर
मोजण्याचा जिगर

ग्लास: – कॉकटेल किंवा मार्गारीटा

कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमधे पाणी आणि बर्फाचे खडे टाकून फ्रीझमधे फ्रॉस्टी करण्यासाठी साधारण तासभर ठेवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे मस्त फ्रॉस्टी करा.

आता एका प्लेट मधे मीठ पसरवून घ्या. लिंबू कापुन ते ग्लासच्या तोंडावर एकसारखे चोळून घ्या. आता ग्लासाचे तोंड त्या मीठाच्या प्लेटमधे गोल फिरवून घ्या. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या तोंडावर मीठ बसलेले असले पाहिजे.

आता मोसंबीचा आणि लिंबाचा रस काढून घ्या.

आता टकीला, कॉइंत्रु (किंवा ट्रिपल सेक), आणि मोसंबी आणि लिंबू रस ब्लेंडर मधे ओतून घ्या.

आता बर्फ ब्लेंडर मधे टाका आणि मिडीयम स्पीडवर बर्फाचा चुरा होईपर्यंत व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.

आता ब्लेंड झालेले मिश्रण ग्लासमधे ओतून घ्या. मोसंबीची साल सजावटीसाठी ग्लासमधे अलगद सोडा.

चुरा झालेला बर्फ म्हणजे बर्फाचा गोळा खाताना होतो तसा झालेला चुरा. पण त्यात थोडे थोडे तुकडे असलेले मला आवडतात.

मस्त चवदार फ्रोझन मार्गारीटा तयार आहे smiley

3366ff;">ब्लु मार्गारीटा

वरच्या रेसिपीमधे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक ऐवजी '3366ff;">ब्लु कुरासाओ (Blue Curacao)' 000000;">ही लिक्युअर वापरल्यास तेवढ्याच प्रमाणात वापरल्यास '3366ff;">ब्लु मार्गारीटा' 000000;">हे एक व्हेरिएशन कॉकटेल तयार होते.

ब्लु कुराकाओ हे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक प्रमाणेच एक ऑरेंज लिक्युर आहे. अधिक माहितीसाठी.


(ब्लु मार्गारीटाचे चित्र आंजावरून साभार)

प्रतिक्रिया

_/\__/\__/\_
मद्यसम्राट सोकाजीरावांना मानाचा मुजरा.

मद्य पीत नसलो तरी एक शंका. हे कॉकटेल पिताना ग्लासच्या सर्वच बाजूने पितात का मीठाचा स्वाद उतरण्यासाठी?

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

ब्ल्ड प्रेशरचा त्रास असेल तर कडा पुसुन प्यावे,मिठ चांगले नाही त्या त्रासाला.........

टकीलाचा स्वाद सर्वार्थाने खुलण्यासाठी मीठ हा एक अत्यावश्यक घटक आहे.
त्यामुळे ग्लासच्या सर्व बाजूने पिण्यास अजिबात लाजू नये. smiley

- (साकिया) सोकाजी

एकदम झकास भाग आहे हा सोकाजीराव..

.. गोव्यात मे महिन्यात गेलो असताना ताज्या हापूस आंब्याची मार्गरिटा बनवत होते.. एकावर एक दोन मार्गरिटा फस्त केल्या.. काय अप्रतिम होता तो प्रकार.. अर्थात आंब्याची मार्गरिटा अशी कन्सेप्ट ओरिजिनल असेल नसेल.. पण होती मात्र खल्लास...

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

ब्लू मार्गारीटाने आठवणी ताज्या केल्या smiley !!
दिसायला अतिशय सुंदर असा कॉकटेल आहे ..सजवु तेवढे सुंदर दिसते ..

तुमचा प्रेजेंटेशन आणि स्टेपस अप्रतिम !!

जाम आवडला !!

असाच एक नीलवर्णी पेय म्हणजे ब्लू लगून

आणि गवि म्हणतात तस "ताज्या हापूस आंब्याची मार्गरिटा " प्यायला गोव्याला गेला पाहिजे ..

तुम्हाला मेनी मेनी धन्यवाद ....

आणि एक फर्माईश आहे :

न्यु ईयरसाठी एक कॉकटेल होउन जाउ द्या smiley

==============================

कपिलमुनी उवाच :

ताज्या हापूस आंब्याची मार्गरिटा " प्यायला गोव्याला गेला पाहिजे ..

मलाही असंच वाटत होतं.. पण मुंबईत पॉप टेट्समधे मी मे महिन्यात अशी हापूस मार्गरिटाची मागणी केली तेव्हा मला इथेही त्यांनी खास फर्माईश म्हणून आनंदाने बनवून दिली..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

असाच एक नीलवर्णी पेय म्हणजे ब्लू लगून

फटू पाहिल्या पाहिल्या अगदी हेच आठवले होते. मुंबईला हा प्रकार पहिल्यांदा चाखला होता.

सोत्रि लेका सकाळी सकाळी असले काय टाकत नको जौ बे ... उगा जीवाची कालवाकालव होत राहते संध्याकाळपातुर .

बाकी कॉकटेल हाय एकदम बुम्बाट smiley

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

न्यु ईयरसाठी एक कॉकटेल होउन जाउ द्या

नक्कीच! एक कॉकटेल, 'देसी धमाका' कॅटेगरीतले, राखून ठेवले आहे न्यु ईयरसाठी smiley
पुढच्या शुक्रवार पर्यंत कळ काढा smiley

- (साकिया) सोकाजी

जबरा.... !!!!

मद्यसम्राट सोकाजीरावांना मानाचा मुजरा.

____________________________________________________

I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

ती निळी मार्गारीटा भलतीच आकर्षक आहे.
कधी पासुन खुणावतेय... ये उचल मला, मी तुझीच आहे.
:love: :love:

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

smiley

फारच भन्नाट मद्यकॄति आहे.......

म्हणूनच मी सोडत नाही....... smiley

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

आत्ताच चिंतातूर जंतू कडून मिळालेल्या लिंकवरून मस्त माहिती मिळाली.


Margarita Sames
legendary inventor of the margarita

Sokajirao hits high again with Margarita frozen. Great!

We are who we are!

_/\__/\__/\_ मुजरा हो मद्याचार्य smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
मिपा खाद्य मोहोत्सव झालाच पाहिजे!http://www.sherv.net/cm/emoticons/eating/lemon-smiley-emoticon.gif

जबराच, धन्यवाद या अशा माहितीवरुन जिथं पार्ट्यात जातो तिथं पित नसलो तरी फंडे द्यायला तुमचे धागे फार उपयोगी पडतात,

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.