कॉकटेल लाउंज : बार्ने स्नॅच (Barney Snatch)
'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बार्ने स्नॅच (Barney Snatch)”
पार्श्वभूमी:
फार वर्षांपूर्वी पूजा भट आणि नागार्जुन ह्यांच्या एका चित्रपटातल्या गाण्यात मालिबू बघितली होती. तेव्हा कॉलेजात होतो त्यामुळे फक्त बघण्यावर समाधान मानून मोठेपणी कधीतरी मालिबू विकत घ्यायची ठरवले होते. :)
ही मालिबू , नारळाचा तडका (ट्वीस्ट) देउन मस्त गोड चव आणलेली कॅरेबीयन व्हाईट रम आहे. एकदम मलमली पोत (Texture) असतो ह्या मालिबूला. उन्हाच्या काहिलीत 'ऑन द रॉक्स' मलिबू एकदम मस्त थंडवा देते, एकदम गारेगार.
आजचे कॉकटेल हे ह्याच मालिबूचे, वाढत्या उन्हाळ्यवरचा 'उतारा' म्हणून एकदम धमाल आणेल.
कृती:
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि लिंबाचे काप घालून घ्या.
आता ग्लासात अनुक्रमे व्हाइट रम, मालिबू आणी ब्लु कुरास्सो ओतून घ्या.
आता ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे इफेक्ट यायला हवा.
आता अननसाचा रस टाकून ग्लास टॉप अप करा.
तळाशी लाल, मध्ये निळा आणि वरती पिवळसर अश्या रंगेबिरंगी थरांचा माहोल जमून येईल.
चला तर मग, बार्ने स्नॅच तयार आहे. :)
रंगीत थरांचा क्लोज अप.

| प्रकार | मलिबू कोकोनट रम बेस्ड कॉकटेल |
| साहित्य | |
| बकार्डी व्हाईट रम | 0.5 औस (15 मिली) |
| मलिबू कोकोनट रम | 0.5 औस (15 मिली) |
| ब्लु कुरास्सो लिक्युअर | 0.5 औस (15 मिली) |
| ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) | 10 मिली |
| अननसाचा रस | |
| बर्फ | |
| अर्ध्या लिंबाचे काप | |
| स्ट्रॉ | |
| ग्लास | कॉलिन्स किंवा हाय बॉल |
कृती:
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि लिंबाचे काप घालून घ्या.
आता ग्लासात अनुक्रमे व्हाइट रम, मालिबू आणी ब्लु कुरास्सो ओतून घ्या.
आता ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे इफेक्ट यायला हवा.
आता अननसाचा रस टाकून ग्लास टॉप अप करा.
तळाशी लाल, मध्ये निळा आणि वरती पिवळसर अश्या रंगेबिरंगी थरांचा माहोल जमून येईल.
चला तर मग, बार्ने स्नॅच तयार आहे. :)
रंगीत थरांचा क्लोज अप.

वाचने
8586
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
आयला हा धागा अजुन सुक्काच?
In reply to आयला हा धागा अजुन सुक्काच? by गणपा
हे घ्या
कॉकटेल
व्वा!...मस्त...
हाय हाय !!! मला गणेशाज्वराने
हाय हाय !!!मला गणेशाज्वराने
मस्त !!एक शंका.ग्रेनेडाइन
In reply to मस्त !!एक शंका.ग्रेनेडाइन by कपिल काळे
चांगला प्रश्न...
हायला...! कस्लं भारी
मस्त
....
मस्त
In reply to मस्त by हरकाम्या
शौकिन.
In reply to शौकिन. by प्रभाकर पेठकर
एक नंबर
In reply to एक नंबर by सोत्रि
धन्यवाद.