कॉकटेल लाउंज : पान सरप्राईज ('हॅप्पी न्यु इयर' स्पेशल)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
30 Dec 2011 - 12:07 pm

आज 2011 ह्या वर्षातला शेवटचा शुक्रवार, शेवटचे कॉकटेल...म्हणजे ह्या वर्षातले, 2011 चे शेवटचे!

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे पान सरप्राईज

पार्श्वभूमी:

ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना एक धमाका कॉकटेल टाकायचे असे ठरवून ठेवले होते. सर्वांना करता येईल असे आणि चवही आपली देशी ओळखीची असावी अशी इच्छा होती. कुठचे कॉकटेल टाकावे असा विचार करत होतोच आणि एक मित्र घरी जेवायला येताना आमच्यासाठी मघई पान घेऊन आला. ते पान खाताना एकदम एक कॉकटेल आठवले. पूर्ण देशी चव असणारे 'पान सरप्राईज'.
31 डिसेंबरला मस्त भरपेट आणि चोपून जेवण झाल्यावर, टीव्हीवर नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम बघता बघता हे डिझर्ट कॉकटेल ट्राय करा आणि तुमचे मत प्रतिसादातून नक्की कळवा. :)

प्रकार: व्होडका बेस्ड कॉकटेल, डिझर्ट, देशी धमाका

साहित्य:

वोडका
1.5 औस (45 मिली)

कंडेन्स्ड मिल्क
1 औस (30 मिली)

मघई पानं
2

एक कप बर्फ

ब्लेंडर

मोजण्याचा जिगर

ग्लास: – ओल्ड फॅशन्ड

कृती:

ब्लेंडरमध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकून घ्या. त्यावर वोडका ओता. एक पान त्यात टाका आणि एक पान सजावटीसाठी ठेवून द्या. आता कपभर बर्फ ब्लेंडरमध्ये टाका.

व्यवस्थित ब्लेन्ड करून घ्या. पानाचा पूर्णपणे लगदा होऊन ते मिल्क आणि वोडकामध्ये एकजीव व्हायला हवे. आता हे तयार झालेले कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे पान ग्लासच्या कडेला सजावटीसाठी अडकवा.

देशी धमाका 'पान सरप्राईज' तयार आहे:)

सदर कॉकटेल 'द टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल'मधून साभार

सूचना: हे कॉकटेल धमाकेदार होण्यासाठी मघई पानाचा दर्जा फार महत्वाचा आहे. एकदम थंड केलेले पान वापरल्यास आणखीणच मजा येते.

२-३ दिवस मिपावर नसणार आहे, त्यामुळे
!!! सर्व मिपाकरांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा !!!
!!! Wish you and your family a happy new year !!!

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

30 Dec 2011 - 12:13 pm | सुहास झेले

व्वा व्वा... सुंदर देशी कॉकटेल.... प्रचंड आवडल्या गेलं आहे :) :)

सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा !!!

पक पक पक's picture

30 Dec 2011 - 12:14 pm | पक पक पक

जेवण झाल्या नंतर प्यावे कि आधी......

सुहास झेले's picture

30 Dec 2011 - 12:16 pm | सुहास झेले

31 डिसेंबरला मस्त भरपेट आणि चोपून जेवण झाल्यावर, टीव्हीवर नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम बघता बघता हे डिझर्ट कॉकटेल ट्राय करा.....

पक पक पक's picture

30 Dec 2011 - 12:20 pm | पक पक पक

व्हय !व्हय!! आल लक्शात....

कसे लागेल असा विचार करत आहे. दुधासोबत वोडका.. अन त्यात पान...

खंग्री काँबो दिसतो आहे..

भले...

(एक शंका: पानात सुपारी (भले कतरी का असेना), बडीशेप, गुंजपाला, गुलकंद आणि अन्य चिजा असतात.. हे पान वेगळे नसावे असे गृहीत धरुन, मग ब्लेंडरमधून काढूनही त्या मिश्रणात अनेक तुकडे, चुरा आणि अवशेष तोंडात येणार नाहीत का? असे तुकडे पानात ठीक लागतात, पण पेयात?.. मग गाळून घ्यायला हवे का?)

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 1:12 pm | सोत्रि

मग गाळून घ्यायला हवे का?

अजिबात नाही, तसे असते तर रेसिपी मधे तशी स्टेप सांगीतली असती. :)

उलट ते तसे बारीक - बारीक तुकडे तोंडात येताच पानाची चव येते आणि आणखीणच मजा येते. पण हे माझे रेकोमंडेशन आहे. तसा चुरा आवडत नसेल तर गाळून घेतल्यास चालेल पण मला वाटते मजा येणार नाही.

- (साकिया) सोकाजी त्रिलोकेककर

सॉरी फक्त रेसीपी वाचली ,नंतर शंका निरसन झाले.....धन्यवाद , कॉक्टेल खुप छान लागेल.

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 12:37 pm | सोत्रि

कॉक्टेल खुप छान लागेल.

टेस्टॅड अ‍ॅन्ड प्रुव्हन आहे हे 'पान सरप्राइज'

- (साकिया) सोकाजी त्रिलोकेकर

नक्की करुन बघेन्.धन्यवाद.....

आत्मशून्य's picture

30 Dec 2011 - 12:19 pm | आत्मशून्य

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा !!! हॅप्पी न्यु इयर.

मन१'s picture

30 Dec 2011 - 12:27 pm | मन१

केवढा व्यासंग असावा तो .........
धन्य आहात.

श्रावण मोडक's picture

30 Dec 2011 - 12:28 pm | श्रावण मोडक

मघई पान कसलं? मसाला, की १२०-नवरतन, १२०-३००-नवरतन...?

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 12:35 pm | सोत्रि

मसाला पान हो, तंबाखूचे नव्हे.

१२०-३०० टाकेलेले पान वापरले तर कॉकटेल संपल्यावर ढगात जाऊन डायरेक्ट २०१३ च्या १ जानेवारीला जाग येण्याची शक्यता नाकारता येत नाही ;)

- (१२०-३०० प्रेमी) सोकाजी त्रिलोकेकर

सुहास झेले's picture

30 Dec 2011 - 12:39 pm | सुहास झेले

हा हा हा !!!

पक पक पक's picture

30 Dec 2011 - 3:32 pm | पक पक पक

मघई पान कसलं? मसाला, की १२०-नवरतन, १२०-३००-नवरतन...?

सोत्रिंना काँपिटीशन देता की काय...?

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2011 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

कॉकटेल आणि सजावट एकदम 'मघई' :)

बाकी

आज 2011 ह्या वर्षातला शेवटचा शुक्रवार, शेवटचे कॉकटेल

हे वाचून एकदम 'आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार, व्रताचे उद्यापन..' हे आठवले.

तुषार काळभोर's picture

30 Dec 2011 - 7:35 pm | तुषार काळभोर

व्रताचे उद्यापन..

मस्तच तुलना!!

तुषार काळभोर's picture

30 Dec 2011 - 7:35 pm | तुषार काळभोर

व्रताचे उद्यापन..

मस्तच तुलना!!

वसईचे किल्लेदार's picture

30 Dec 2011 - 12:49 pm | वसईचे किल्लेदार

दुध + वोडका ... कायपन सांगुन र्‍हायलं राव तुमी.
तरी पण ट्राय करीन म्हणतो.

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 1:31 pm | सोत्रि

दुध + वोडका ... कायपन सांगुन र्‍हायलं राव तुमी.

का हो किल्लेदार, काय झाले, काही चुकले का?

- (साकिया) सोकाजी त्रिलोकेकर

कदाचित लगेच बनवल्या बनवल्या प्यावे लागेल ...... ? दुध नासणार तर नाहीना?
अर्थात तुम्हि बनवले असल्याने तशी काहिच शक्यता नाही .तुम्चा ह्यातील व्यासंग दांडगा आहे.तरी पण शंके बद्द्ल क्शमस्व..

नावं वाचूनच ट्राय करायाची इच्छा होतेय पण माताय इथे खायचे पान कुठून शोधायचे?

:(

अन्या दातार's picture

30 Dec 2011 - 1:26 pm | अन्या दातार

काँबिनेशन आहे हे!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. :)

धमाल मुलगा's picture

30 Dec 2011 - 3:10 pm | धमाल मुलगा

भ्याव वाटतंय भो!
दूध+व्होड्का+गुलकंद वगैरे घातलेलं मघई?

दिसायला कितीही आकर्षक दिसत असलं तरी डेअरिंग होईना भौ!
(गर्भितार्थः मी तुझ्याकडे येतो, तूच तयार करुन पिलव ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2011 - 3:23 pm | अत्रुप्त आत्मा

सोकाजिराव खरे मद्यमार्गी आहात ब्वॉ... काय जबर्‍या शोध लावलात हो..! जेवल्यानंतरचं पान... आणी तेही दारुत कॉकटेल करुन... हे कॉकटेल मुळचं असो वा तुंम्हाला सुचलेलं,,,ज्याला कुणाला ही कल्पना पहिल्यांदा आली,,,त्याचं क्षेत्र हे का असेना...तो(च) खरा मोक्षमार्गी...
यातलं पान हे आमचं...!
म्हणुन इथे एक पानातलं कॉम्बीनेशन (मोह अजिबात न अवरता) देतो... फक्त एक पूर्व सुचना-हल्ली पानवाले (भैय्ये सुद्धा) मघई म्हणुन-कट करुन छोटं केलेलं बनारस पान देतात,,म्हणुन अधी ''पान दाखव'' असं बेलाशक सांगुन देठासकट असलेली दोन पानं घ्यायला लावावी..कात चुना वगैरे यथास्थित लावणं झालं की एकावर ६००नं विथ नवरतन किवाम,आणी दुसर्‍यावर ४००नं विथ राजरतन किवाम(राजरतन हल्ली अभावानीच मिळतो,पण हा हवाच...नायतर मजा ग्येली)वर पक्की बारीक सुपारी/हरापत्ता/इलायची-अशी दोन्ही पानं वेगवेगळी लाऊन घ्यावी...आणी तात्काळ(एकत्र)खावी,ती पानं गार/बीर करणं ही भैय्ये लोकांनीच अणलेली धंदेवाइक फ्याशन आहे,ते काही खरं नव्हे..त्यामुळे त्या भानगडीत अजिबात पडू नये...या पानाची खरी मजा येण्यासाठी,खाना एकदम तोड के होना जरुरी है। नंतरच खावं(श्रद्धा नीट ठेवायला हवी तरच उपासनेला फळ मिळते... :-D ),,,हे पान खाल्यावर पुढचे दोन तास तरी नक्की परमानंदात जातात...अतिशय लाइट पण तितकाच दीर्घवेळ मझा देण्याचं सामर्थ्य असलेला हा प्रकार आहे...(तंबाखुपानात मुरलेल्यांना वे.सां.न लगे.)पहिली १५मिनिटं न चावता एका साइडला गालात त्याची नीट समाधी लागू द्यावी, मग पुढे सावकाश हळू/हळु खावं...मजाच मजा..और क्या?

अवांतर-@-हे पान खाल्यावर पुढचे दोन तास तरी नक्की परमानंदात जातात>>> या दोन तासात अपल्या अवडीचं केलेलं कोणतंही कर्म अतिशय फलदायी होतं... :-D

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 3:33 pm | सोत्रि

दंडवत घ्या हो गुर्जी आमचा!
पुढच्या भेटीत हे पान खाऊ घालायची जबाबदारी आता तुमच्याकडे लागली आहे!

- (तंबाखुपानात मुरलेला) सोकाजी

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2011 - 3:58 pm | अत्रुप्त आत्मा

@-पुढच्या भेटीत हे पान खाऊ घालायची जबाबदारी आता तुमच्याकडे लागली आहे! :-D >>> जबाबदारी उचलण्यात आलेली आहे....

अवांतर-ऐचं तेच्या...! त्ये पानाला नाव द्यायचं र्‍हायलच....पत्ते पे पत्ता

निश's picture

30 Dec 2011 - 3:18 pm | निश

मस्त खरच

पुष्करिणी's picture

30 Dec 2011 - 3:22 pm | पुष्करिणी

मस्त दिसतय, करुन पहायला पाहिजे

स्मिता.'s picture

30 Dec 2011 - 3:47 pm | स्मिता.

पानाचं कॉकटेल तर छान दिसतंय आणि सोप्पंही वाटतंय. (ते वेगवेगळे बारवाले इंस्ट्रुमेंट्स दिसत नाहीयेत)

आता इथे प्यारिसात पान शोधणं आलं! ;)

अभिज्ञ's picture

30 Dec 2011 - 4:24 pm | अभिज्ञ

बाब्बो. असेहि कॉकटेल असते?
व्होडका व कंडेन्स्ड मिल्क जबराट कॉम्बिनेशन आहे. नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटले.

कॉकृ आवडली.

अभिज्ञ.

स्वाती दिनेश's picture

30 Dec 2011 - 7:44 pm | स्वाती दिनेश

पान सरप्राइज आवडले..
स्वाती

प्रयोग भारी आहे. बाकी मी काही पित नसल्याने पास.

- पिंगू

स्वाती२'s picture

31 Dec 2011 - 3:23 am | स्वाती२

लै भारी!

माझीही शॅम्पेन's picture

1 Jan 2012 - 9:14 pm | माझीही शॅम्पेन

बाब्बो ! तू एक झकास पुस्तक लिही बाबा , एकदम सगळ्या रेसिपीस रेफारन्स साठी कामाला येतील !!!

मेघवेडा's picture

3 Jan 2012 - 4:03 pm | मेघवेडा

क्लास! न्यू यीअर सेलिब्रेशन टीव्हीवर पाहताना 'पान सर्प्राईझ' ने बहार आणली! एकदम कल्ला आयटम आहे राव! लैच आवडलाय!

सोत्रि's picture

3 Jan 2012 - 11:44 pm | सोत्रि

धन्यवाद,
वा...वा...कोणीतरी ट्राय करून आवडल्याचे कळवले, हे कॉकटेल टाकल्याचे सार्थक झाले :)

- (साकिया) सोकाजी

सोकाजी ते एक ओल्या बडीशेपेचे कॉकटेल असते त्यीची रेशीपी ल्ह्याल का? लै भारी अस्तय.
बय द वे.......
माताय.... लैच भारी केल्लीस रे वर्षाची सांगता.

रेवती's picture

3 Jan 2012 - 8:40 pm | रेवती

बाब्बौ! हे भलतेच!