आम्ही आणि स्वाईन फ्लु

चाफा's picture
चाफा in जनातलं, मनातलं
12 Apr 2012 - 2:44 am

हा लेख फार पुर्वी म्हणजे जेंव्हा स्वाईन फ्ल्यु ने भारतभर हाहाकार माजवला होता तेंव्हा लिहीलेला आहे पण आता पुन्हा एकदा पुण्यात स्वाईनफ्ल्यु चे दुष्टचक्र सुरु झाल्याचं कळल्यावर इथे टाकतोय

**********

" येतो गं अशु...." बाहेर पाडण्यापूर्वी मी सौ. ला हाक मारली.
" अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करून दिली.
हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापेक्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहिताय. आजकाल जगभर धुडगूस घालणारा ‘स्वाईन फ्लू’.

या रोगाने माझ्या जीवनशैलीत मरणाचा फरक करून ठेवलाय. पूर्वी बाहेर जाताना रुमाल, पाकीट, मोबाईल असल्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या पण आता त्यात मास्कची भर पडलीये. या प्रकाराने माझ्यासारख्या सरळ नाकासमोर चालणार्‍या माणसाला बरेच चित्रविचित्रं अनुभव आलेत. मलाच नाही पण माझ्यासारख्या अनेक जणांची हिच तर्‍हा आहे.

अगदी परवा परवाचीच गोष्ट घ्या ना ! बाहेर नाक्यावर सहज रेंगाळलो तर तिथे चर्चा चालू होती.
" पक्या, च्यायला मी एन नाईन्टीफ़ाय घेतलाय."
" आईशपथ, कुठे मिळाला तो?"
"अरे, आपला एक दोस्त आहे त्याने दिला एकदम स्वस्तात"
" वाव, पक्या साल्या, वशिला दांडगा रे तुझा !"
त्यांच्या बोलण्यावरून एव्हाना मला नोकीया कंपनीचे नवे मॉडेल बाजारात आल्याचा शोध लागला होता. मग मीही त्या संभाषणात उगीचच चोच मारली. तशी ही नाक्यावरची मंडळी माझ्या बर्‍यापैकी ओळखीची आहेत म्हणा !
" पक्या, काय फीचर्स आहेत रे या मॉडेलची?" माझ्या प्रश्नाबरोबर त्या ठिकाणी एकदम शांतता पसरली. सगळेजण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले. पण मी ही संभाषण पुढे रेटण्याच्या तयारीत त्याला विचारून टाकले.
"कधी लॉच झाला रे? आणि परवडण्यासारखा आहे का?"
" काका, काय कधी लॉच झाला?" बुचकळ्यात पडलेल्या त्या तारुण्याने मला विचारले.
" अरे तोच तो तुझा एन नाईन्टीफ़ाइव्ह, त्याची फीचर्स काय आहेत रे ? टच स्क्रीन आहे का ? " आतामात्र त्या तरुण चेहर्‍यांवर एक मिश्किल हास्य पसरले.
" काका, हा मोबाईल नाहीये मास्क आहे तोंडाला लावायचा एकदम फूलप्रूफ" त्यातल्या एकाने मला समजावले.
घ्या म्हणजे आता गल्लोगल्ली अभिमानाने दाखवल्या जाणार्‍या नव्या महागड्या मोबाइलची जागा आता मास्कने पटकावली होती तर.

दुस-याच दिवशी कंपनीत हेच ते तथाकथित, फारच चर्चेत असणारे एन नाईन्टीफ़ाईव्ह असले एखाद्या मोबाइलच्या मॉडेलसारखे नाव असलेले मास्क सर्वांना वाटण्यात आले आणि इतकेच नव्हे तर त्यांची सक्तीही करण्यात आली. का? तर यांच्या ९५ % गाळण क्षमतेमुळे आपला या रोगाच्या विषाणूंपासून बचाव होतो. मनात एक चुकार विचार चमकून गेला ‘ तरीच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडे स्वाईन फ्लूचा प्रसार झाला नाही, नाहीतरी जेव्हा केव्हा हे तालीबानी टी.व्ही. वर दिसतात तेव्हा त्यांची तोंडं कायम भल्या थोरल्या कपड्याखाली झाकलेलीच दिसतात की. काय बिशाद विषाणूंची आत शिरायची ! ’

या मास्कची वेगळीच अडचण आहे, एकतर हे मास्क पार घुसमटवून टाकतात, वर ते चेहर्‍यावर लावल्यानंतर माणसाचा चेहराही त्याच्या पूर्वजांप्रमाणे दिसायला लागतो. असे आपले मला वाटते. एव्हाना आमच्या कंपनीतल्या भाषा सुद्धा बदलायला लागल्यात. त्याच दिवशी एक सहकारी दुसर्‍याला विचारत होता.
" आजचा स्कोअर काय झालाय रे?" यावरून मी आपला भारताचा क्रिकेट सामना चालू असल्याचा गैरसमज करून घेऊन तासभर नेटवर लाइव्ह स्कोअर शोधत होतो. मग हळूच मला साक्षात्कार झाला हा क्रिकेटचा स्कोअर नसून या स्वाईन फ्लू ला बळी पडलेल्यांची संख्या विचारण्याचा कोड होता.

या मास्क प्रकाराने काही कमी गोंधळ घातलेला नाहीये ! दिवसभर मास्क घालून फिरत राहिल्याने त्याची इतकी सवय होते की तो आपल्या चेहर्‍यावर असल्याची जाणीवच राहत नाही. आमचा ‘पंडित’ असले विद्वान नाव असलेला सहकारी या मास्कचा पहिला बळी ठरला. दुपारी चहाच्या वेळी महोदयांनी अंगावर गरमागरम चहा सांडवला. दिवसभराच्या मास्कच्या सवयीने त्याला आपण मास्क घातल्याचे लक्षातच राहिलं नाही आणि त्याने चहाचा कप तसाच तोंडाला लावला. नायरची आणखी वेगळी कहाणी. ‘नायर’,आमच्याकडे जुनाट झालेला इंजिनियर, गुटख्याचे रवंथ हा त्याचा दिवसभरातला पार्टटाइम जॉब. या महाशयांनी तोंडावरच्या मास्कचे भान न राहिल्याने आपल्या मुखरसाची पिंक टाकून मास्कचे अंतरंग रंगवलेच पण तोच मुखरस नाकात गेल्याने तासभर तरी माणसात नसल्यासारखा वागत होता.

यथावकाश मास्कची सवय झाली, त्याचे नावीन्य संपले आणि मग सुरुवात झाली ती आपापल्या मनात दडलेल्या कलाकाराला वाव देण्याची. हळूहळू या सुप्त कलाकारांच्या मास्कवर हलकासा रंगाचा एखादा फराटा दिसायला लागला. पुढे त्यावर काहीच प्रतिक्रिया न आल्याने या कलाकारांची कला पूर्णपणे जागृत झाली. मग काय ! कुठे चेहर्‍यावर मास्कचे मांजराच्याच चेहर्‍यात रूपांतर झाले तर कुणाच्या चेहर्‍यावर वाघोबांनी वस्ती केली. पहातापहाता आख्ख्या ऑफिसचे प्राणिसंग्रहालयात रूपांतर व्हायला लागले. शेवटी आमच्या वाघोबाला अर्थात जी.एम. ना यात हस्तक्षेप करावा लागला.

या नंतर सुरू झाला जास्तीच्या खबरदारीचा खेळ. ऑफिसात पाऊल टाकण्यापूर्वीच सगळ्यांना थर्मामीटरच्या चाचणीला सामोरं जायला लागलं. चुकूनमाकून भर उन्हातून तापून आलेला एखादा प्राणी या टेस्टला बळी पडायला लागला. ९९.५ पर्यंत जरी थर्मामीटरचा पारा चढला तर वाळीत टाकल्यासारखा त्या माणसाला फ़स्टएड रूम मध्ये बसवला जायला लागला. भीक नको पण कुत्रे आवर या चालीवर तो स्वाईन फ्लू परवडला पण काळज्या आवर अशी गत होऊन बसली. यातून सुटका केली ती आमच्या ऑफ़ीसबॉयने, त्याने सरळ एका व्हिजिटरलाच असा वाळीत टाकला, मग नाईलाजास्तव ही प्रक्रिया बंद करावी लागली पण........

दुसर्‍याच दिवशी अशी दवंडी पिटवण्यात, आय मीन सर्क्युलर काढण्यात आले की कुणालाही अंगात कणकण जरी जाणवत असेल त्याने कामावर येऊ नये. मग काय? दर दोन दिवसांनी एकाला तरी अशी कणकण जाणवायला लागली. एकूणच कंपनीतली संख्या रोडावायला लागल्यावर हा ही हुकुमनामा रद्द करण्यात आला.
प्रकरण इतक्यावरच संपले असे वाटत असतानाच पुण्यावरून आमचे एम.डी. आपल्या फौजफाट्यासह आले. आणि दुर्दैवाने, कुणाच्या ते माहीत नाही, त्यातला एक इथल्या मलेरीयावाहू ( ते विमानवाहू असतात तसं) मच्छरांच्या तडाख्यात सापडला. त्याचा ताप चढत गेला आणि इकडे अफवांचा आलेखही चढत गेला त्यांना आता पंख फुटले, तोंडावरचे मास्क आणखी घट्ट आवळल्या गेले. इतकेच काय पण समोरून त्यांच्यापैकी कुणी येताना दिसलेच तर लोक चक्क रस्ता बदलायला लागले. त्यातच कुणीतरी संधीसाधूने हळूच सुरक्षा विभागाला चिठ्ठी पाठवली की पुण्यातल्या शाळांप्रमाणे आपणही कंपनी सात दिवसासाठी बंद ठेवावी.

पण घोळ वेळीच निस्तरल्या गेलाय आमच्या शहरात तरी या स्वाईन फ्लू चा कुणी रोगी नसल्याची खात्री शहरातल्या तमाम डॉक्टरांनी दिलीय. त्यामुळे देशभरातला स्वाईन फ्ल्यूचा विळखा जसा सैलावलाय तसे आमच्या चेहर्‍यावरचे मास्कही सैलावलेत म्हणजेच केराच्या टोपलीत गेलेत. हे सगळं खरं पण गेल्या दहा-पंधरा दिवसात हे मास्क सतत घालून बसल्याने चेहर्‍यावर त्यांचा एक गोरा गोमटा ठसा उमटलाय त्यामुळे सध्या तरी चेहर्‍यावर रुमाल बांधण्याशिवाय दुसरा पर्याय सुचत नाहीये.

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मनोरंजक लेखन.
आम्ही त्याचवेळी भारतवारी करत होतो. विमानतळावर (दिल्ली आणि मुंबई) प्रत्येकाचे तापमान पाहूनच देशात एंटरू देत होते. भली थोरली लाईन होती आणि सगळेजण कंटाळलेले होते.
परतीच्यावेळेस तर सगळ्या नातेवाईकांनी इतके घाबरवले होते की मुंबईत बाहेर जेवायचे धाडस होईना. मग मिपाकर प्रभूमास्तरांकडे जेवायला गेलो होतो. तिथेच रामदास आणि मदनबाण भेटले होते.

जेनी...'s picture

12 Apr 2012 - 9:00 am | जेनी...

सुरुवात छान ....

पण ते चहाचा कप मास्क असणार्‍या तोंडाला ,आणि तसच दुसर उदाहरण झेपलं नाहि .

हापिसात असलेली परिस्थिति जशीच्या तशी उतरवलियेत ..ते आवडलं

एकन्दरित ठिक वाटला.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2012 - 11:30 am | मुक्त विहारि

तो अतिशयोक्ती अलंकार आहे....वाचा आणि सोडून द्या..

हे हे !! मस्त हलक -फुलक लिहील आहेस :)
ते ही स्वाइन फ्लु सारख्या भयंकर विषयावर ;)

प्रभाकर पेठकर's picture

12 Apr 2012 - 10:27 am | प्रभाकर पेठकर

झकास जमला आहे लेख.

लेखातील विनोदी भाग वगळता सर्वांनी काळजी घ्यावी अशीच ही साथ होती/आहे. आजार भयंकर किंवा असाध्य नसला तरी तीव्र संसर्गजन्य आहे. एखाद्या रुग्णाच्या सहवासात, काही काळजी न घेता, काही तास काढल्यास लक्षणांचा संसर्ग होऊ शकतो. लहान मुले, वृद्ध आणि मधुमेही व्यक्ती ह्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. जरा ताप आहेसे वाटले तर अंगावर न काढता ताबडतोब निष्णांत डॉक्टरला तब्येत दाखवून आपली शंका (स्वाईन फ्लूची) बोलून दाखवावी. प्राथमिक अवस्थेत उपल्बध अँटिबायोटिक्सने (प्रतिजैविके?) आजार आटोक्यात येऊन पूर्णपणे सुटका होऊ शकते.

शैलेन्द्र's picture

12 Apr 2012 - 4:03 pm | शैलेन्द्र

"जरा ताप आहेसे वाटले तर अंगावर न काढता ताबडतोब निष्णांत डॉक्टरला तब्येत दाखवून आपली शंका (स्वाईन फ्लूची) बोलून दाखवावी."

काका, पंधरा वीस हजाराला चंदन लावायची सोय करताय तुम्ही :)

प्रभाकर पेठकर's picture

13 Apr 2012 - 12:50 am | प्रभाकर पेठकर

पंधरा वीस हजाराला चंदन लावायची सोय करताय तुम्ही

एवढा खर्च येत असेल असे वाटत नाही. रेवती ह्यांच्या प्रतिसादात दीड ते दोन हजार खर्च सांगितला आहे. तो शक्य असेल. पण आपल्या जीवा पेक्षा पैसा मोठा आहे का? आजकाल तर सगळ्यांचा आजारपणाचा विमा असतो असे निरिक्षण नोंदविले आहे.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2012 - 11:32 am | मुक्त विहारि

एकदम हलका-फुलका...

चाफा's picture

12 Apr 2012 - 10:33 pm | चाफा

धन्यवाद मंडळी,
पेठकर काका आता स्वाईन फ्ल्यु ची लस ही निघालेली आहे :) आणि ती चकटफू मिळते म्हणे :)

रेवती's picture

12 Apr 2012 - 11:40 pm | रेवती

नक्की काय माहित नाही पण माझ्या नवर्‍याला आणि सासर्‍यांना प्रत्येकी ५०० रू. लशीचे दोन वर्षांपूर्वी द्यावे लागले शिवाय गेल्या दहा पंधरा दिवसांपूर्वी माझ्या आईवडिलांचे मिळून रू १५०० घेतले. गेली २० वर्षे ज्या डॉ. कडे आम्ही जातोय त्यांच्याकडून.

पैसा's picture

13 Apr 2012 - 12:42 am | पैसा

कोणीतरी पुणेरी लग्नातला फोटो म्हणून नऊवारी साड्या नेसून तोंडाला मॅचिंग मास्क घातलेया बायकांचा ग्रुप फोटो ईमेलमधून फॉरवर्ड केला होता त्याची आठवण झाली!